12 एप्रिल 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना प्रेमात यश

12 एप्रिल 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना प्रेमात यश

मेष -  नोकरी मिळेल


तरूणांचा नोकरीचा शोध संपेल. कामात यश मिळाल्याने प्रमोशन मिळण्याची शक्यता. व्यवसायात लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजूबाजूच्या लोकांपासून सावध रहा. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे.


कुंभ -  प्रेमात यश


मनापासून प्रेम असेल तर प्रेमसंबधात यश नक्की मिळेल. काम करण्याचा उस्ताह राहील. वरिष्ठांची मदत मिळेल. मित्रांकडून उत्पन्नाची साधने मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल


मीन- आरोग्याची काळजी घ्या


आरोग्याची नीट काळजी घ्या. वातावरण बदलल्यामुळे त्रास होऊ शकतो. आहाराबाबत सावध रहा. व्यवसायात यश मिळेल. काम करताना घाई करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील.


वृषभ - वाहनामुळे खर्च वाढेल


वाहनामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तणाव वाढू शकेल. वादविवादांपासून दूर रहा. सामाजिक संस्थांमध्ये मानसन्मान मिळेल. कायद्याच्या संकटातून सुटका होईल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता.


मिथुन - उत्साह वाढेल


आज तुम्हाला फ्रेश वाटेल. मनातील उत्साह द्विगुणित होईल. घर बदलण्याचा विचार कराल. अडकलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.


कर्क - जोडीदाराचा त्रास


जोडीदारासोबत न पटल्यामुळे ताण वाढेल. कौटुंबिक जीवनात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. अंहकारापासून दूर रहा. व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल.


सिंह -  उत्पन्नामध्ये वाढ


नोकरीत यश मिळून उत्पन्न वाढेल. व्यवसायात एखादी योजना सफळ झाल्यामुळे लाभ होईल. मात्र अती घाई केल्यामुळे एखादी चुक होऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची  काळजी घ्या. नातेसंबधातील कडवटपणा कमी होईल. देणी-घेणी करताना सावध रहा.


कन्या - दातदुखी वाढेल


अचानक दाताची समस्या सुरू झाल्याने त्रस्त व्हाल. व्यवयाय अथवा नोकरीत नाविण्य आणण्याची गरज आहे. यश मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सबसिडीतून लाभ मिळेल. वादापासून दूर रहा. अडकलेली कामे पूर्ण होतील.


तूळ -  जुन्या मित्रांपासून लाभ


जुने मित्रसंबध लाभदायक ठरतील. जोडीदारासोबत नाते सुधारेल. मुलांमुळे समाजात मानसन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. कलात्मक कार्यात रस घ्याल.


वृश्चिक - आज कामात मन लागणार नाही


आज व्यवसाय अथवा कामात मन लागणार नाही. आधिकाऱ्यांकडून ताण वाढेल. आर्थिक बाबतीत सावध रहा. विरोधकांचा त्रास जाणवेल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत परदेशात जाण्याचा योग आहे.


धनु - नवीन प्रोजेक्ट मिळेल


आज एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी तुमची निवड होईल. अडकलेले पैसे पुन्हा परत मिळण्याची शक्यता आहे. मनस्वास्थ मिळेल. मौज-मजा करू शकाल. एखाद्याबाबत आकर्षण वाढेल. विरोधक त्रास देतील. वादविवादांपासून लांब रहा.


मकर-  मनासारखे काम मिळणार नाही


तुमच्या आवडीचे काम न मिळाल्याने नोकरीत ताण वाढेल. व्यवसायात एखादा व्यवहार रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. अधात्म अथवा धार्मिक कार्यात मन रमवा.