15 एप्रिलचं राशीफळ, वृषभ राशीला नव्या ओळखीचा फायदा

15 एप्रिलचं राशीफळ, वृषभ राशीला नव्या ओळखीचा फायदा

मेष- निर्णय घाईत घेऊ नका


आज तुमची दगदग होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामामुळे तुमची दमछाक होईल.कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता देखील संभवते. त्यामुळे कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका. आज या सगळ्या धावपळीमुळे तुमच्यात आत्मविश्वास कमी होईल. विवाहितांना मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. तुमच्या जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.


कुंभ- राजकारण्यात जाण्याची शक्यता


तुमची कामांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती महागात पडू शकते. चांगल्या संधी तुम्ही घालवून बसाल. कामाच्या ठिकाणी मेहनतीसोबतच कौशल्याने काम करणे आवश्यक आहे. राजकारणात जाण्याचा विचार मनात येऊ शकतो. वाहन चालवताना सावधान. प्रेमसंबधांचा त्रास होण्याची शक्यता. मित्रांची भेट सुखद ठरेल.


मीन- धनलाभाचे संकेत


पैशांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात घेतलेले निर्णय खरे ठरतील. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. कामातून काही दिवस सुट्टी घेण्याचा विचार तुम्ही करु शकता. पार्टनरसोबत परदेशी जाण्याचा योग आहे. आरोग्य चांगले राहील.


 वृषभ -मित्रांसोबत फिरण्याचे प्लॅन


नव्या ओळखीमुळे आज फायदा होणार आहे. सामाजिक संपर्कात वाढ होण्याची शक्यता. नातेसंबंध अधिक दृढ होणार आहेत. नव्या कामाची योजना आखाल. राजकारणात पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत मस्त फिरायला जाण्याचे प्लॅन होऊन शकतात. देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील.


मिथुन- ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या


घरात वयस्क व्यक्ती असेल तर त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. विरोधकांपासून सावधान. मित्रांच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण होईल.


कर्क -कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील


विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल असा कालावधी आहे. उच्च शिक्षणात प्रगती होईल. व्यवसायातील प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. खेळाची आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकारणातील व्यक्तिंचा भाव वधारेल आणि कामाच्या जबाबदाऱ्याही वाढतील. जोडीदारामुळे तणाव वाढेल. कोर्टातील खटल्यातून मिळेल सुटका.


 सिंह - नातेसंबंधात वादाची शक्यता


 कमिशन मिळणाऱ्या कामांपासून सावध राहा. उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीमध्ये अडचणी येऊ शकतात. नातेसंबंधात वाद होण्याची शक्यता. राजकारणात अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता. घेणीदेणी मिटतील.


 कन्या - उत्साहवर्धक वाटेल


आजच्या दिवसाची सुरुवात अगदी उत्साहवर्धक आणि नव्या जोशाने भरलेली असेल. आजच्या दिवसात तुम्हाला अनेक गुड न्यूज मिळतील. संगीतात रुचि निर्माण होईल. कामासाठी केलेला परदेश दौरा लाभदायक ठरेल. पदोन्नतिसाठी प्रयत्न करा. समाजात तुमची प्रतिष्ठा अधिक उंचावेल.


तूळ- प्रेमात लव्ह ट्रँगलची शक्यता


अडचणीच्या काळात कुटुंबाचे सहकार्य मिळणार नाही. प्रेमात लव्ह ट्रँगल होण्याची शक्यता. काहीही झाले तरी रागावर नियंत्रण ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा ढासळण्याची शक्यता. राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तिंवर अधिक जबाबदाऱ्या येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन चालवताना जरा जपून.


वृश्चिक - प्रलंबित कामे पूर्ण होतील


मित्रपरिवाराकडून महागडे गिफ्ट मिळू शकते. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. व्यवसायाशी निगडीत योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. मित्रांच्या सहयोगाने उत्पन्नाचे स्रोत वाढतील. प्रगती होईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.


धनु - व्यवसायात आर्थिक फायदा


गुडघा आणि पाय दुखण्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. व्यायामाची आवड वाढू शकते. देण्याघेण्या संदर्भातील वाद मिटतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. बाहेर जाणार असाल तर तो प्लॅन रद्द करा. नोकरदारवर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल


मकर- कुटुंबासोबत वेळ घालवाल


ज्येष्ठांचा सल्ला लाभदायी ठरेल. नातेवाईकांचा मान ठेवा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामासाठी केलेला परदेश दौरा फायद्याचा ठरेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका.


हेही वाचा 


राशीवरुन ठरवा तुमचेही मित्र आहेत का अशाच स्वभावाचे


तुमचा जन्मही एप्रिल महिन्यातील आहे? वाचा तुमचा स्वभावही असाच आहे का?


जाणून घ्या राशीनुसार कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली