आज एका प्रभावशाली व्यक्तिमत्वाची भेट तुमच्याशी होणार आहे. त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसायात भागीदारीमधील येणारा अडथळा दूर होईल. समाजात तुमचे स्थान वधारेल. धनलाभ होईल. तुमच्या प्रेमाच्या नात्याला बळकटी येईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. विरोधकांपासून सावधान
तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला हवी असलेली पदोन्नति मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. अडकलेला पैसाअडका मिळण्याचे शुभसंकेत आज मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. पार्टनरसोबत बाहेर फिरण्याचे प्लॅन तुम्ही बनवू शकता. रचनात्मक कामात रस वाढेल.
जोडीदाराच्या गुडघा आणि पायदुखीमुळे तुम्हाला त्रास संभवतो. व्यायाम आणि जेवणात बदल करावा लागेल.नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक कामात यश मिळेल. बिघडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.कुटुंबात आनंदी वातावरण राहील.कोणतेही महत्वाचे काम आळस करुन टाळू नका. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थीवर्गाला करीअरसंदर्भात थोड्या अडचणी येतील. तर नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचे बदललेले वागणे सहकाऱ्यांना दुखवू शकते. अडचणीच्या काळात कोणताही निर्णय घेऊ नका. पैसे परत घेण्यावरुन वाद वाढू शकतो. विरोधकांच्या कारवायांपासून सावधान. अचानक धनलाभाचे संकेत.
उत्पन्नाचा नवा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता घेण्याची शक्यता. व्यावसायिक दौरा लाभदायक ठरणार आहे. राजकारणात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढणाऱ्या आहेत. त्यामुळे राजकारणात तुमची सक्रियता वाढणार आहे. समाजात तुमचा मान वाढेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. पार्टनरचा भावनिक सहयोग मिळेल.
नोकरी अथवा कामाच्या क्षेत्रात अधिकाऱ्यामुळे तुमच्यावर ताण पडेल. कामावरील होणाऱ्या राजकारणामुळे होणाऱ्या उलथापालथीला सामोरे जावे लागेल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे व्यग्र राहाल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्या व्यक्तिंकडून सुख मिळेल.प्रवासाचे योग संभवतात.
आरोग्यासंदर्भात लहान-मोठ्या तक्रारी संभवतात. नकारात्मक विचाराचा मनावर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थी वर्ग आळस त्यागून कामाला लागतील. नातेसंबधातील कलह मिटेल. परदेश यात्राचे योग संभवतात.
जुन्या परिचयाच्या व्यक्तिशी जवळीक वाढेल. कोणतेतरी महत्वपूर्ण काम पूर्णत्वास जाईल. अनोळखी व्यक्तिची मदत मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरी व्यवसायातील कामे पूर्ण होतील. कोर्टकचेरी संदर्भात यश मिळेल. देणी-घेणी करताना सावधान
नव्या नोकरीचे तुमचे प्रयत्न पूर्णत्वास जातील. व्यवसायातील मार्केटिंगमध्ये तुम्हाला इच्छित यश मिळेल. विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर होतील. उधार सहज परत करु शकाल. रचमात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा.
आर्थिक गणित चुकल्यामुळे थोडा त्रास होईल. व्यवसायात कमी फायदा होईल. नोकरीतील पदोन्नतिला अडथळा निर्माण होईल. पण तुम्हाला थोडा धीर धरायचा आहे. आईच्या सहकार्यामुळे तुम्हाला आधार वाटेल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. अडकलेली कामे मार्गी लागतील. देवधर्मात रुचि वाढेल
आज तुम्हाला प्रसन्न वाटेल. आरोग्यात सुधारणा होईल.कार्यक्षेत्रात वातावरण चांगले राहील. काम वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुमची रुचि वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील .
तुमच्या प्रेमाच्या नात्यात थोडी नाराजी येण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या पार्टनरची तुमच्या प्रती असणारी नाराजी वाढणार आहे. कडू बोलणी खावी लागतील ज्याचा तुमच्या मनावर भावनात्मक परिणाम होईल. नव्या नोकरीत तुम्ही तुमची क्षमता सिद्ध करु शकाल. विद्यार्थीवर्गाला शिक्षकांचे सहकार्य लाभेल. अडचणी येतील अशा कामांपासून दूर राहा. वाहन चालवताना सावधान
हेही वाचा
जाणून घ्या तूळ राशीसाठी कसं असणार आहे २०१९ हे वर्ष
मकर राशीसाठी २०१९ हे वर्ष असणार खास, होणार हे बदल
12 राशीपैकी या 4 राशी असतात सर्वात बलशाली