19 एप्रिलचं राशीफळ,मकर राशीच्या व्यक्तींना परदेशवारीचे योग

19 एप्रिलचं राशीफळ,मकर राशीच्या व्यक्तींना परदेशवारीचे योग

मेष-  अधिक जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता


आज तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी संभवतात. तुमचे नाक किंवा कान दुखू शकतात. धर्म, अध्यात्मात तुमचे मन रमेल. तुम्हाला तुमचे प्रेमाचे नाते सांभाळून ठेवावे लागेल. आर्थिक विवंचना असल्यास त्या दूर होतील. तुमच्या कौशल्यामुळे आणि मेहनतीमुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या सोपवण्याची शक्यता आहे. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुमचे उद्दिष्टय पूर्ण करण्यात तुम्ही सफल राहाल.


कुंभ- वरिष्ठांचे सहकार्य लाभेल


प्रेमात निराशा होण्याची शक्यता आहे. पार्टनरपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. मुलांची काळजी तुम्हाला सतावेल. कामावर वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आखलेल्या योजना पूर्ण होतील. आर्थिक फायदा होईल. कोर्टाचे प्रश्न सुटतील. आरोग्य चांगले राहील.


मीन- फायद्याच्या अनेक संधी चालून येतील


आज तुम्ही आखलेल्या नव्या योजनेत यशप्राप्ती होईल. फायद्याच्या अनेक संधी चालून येतील. नोकरीत मान सन्मान वाढेल. कोर्टातील वादातून सुटका होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. विचारातील फरकामुळे जवळच्या संबंधामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे.


वृषभ-  आळस झटका


तुमच्या जबाबदारीच्या वागण्याची प्रशंसा तुमच्या कुटुंबाकडून केली जाईल. पार्टनरसोबत बाहेर जाण्याचा योग आहे. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल.आळशीपणा करुन महत्वाची कामे टाळू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील.


मिथुन- मंगलकार्यावर होईल चर्चा


विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गावर वरिष्ठांमुळे तणाव येईल. व्यवसायात चढ- उतार राहतील. विरोधकांना तुमची गोष्ट बरोबर असल्याचे पटवून द्याल. घरात काही त्रास असल्यास कमी होईल. लग्न वा तत्सम मंगल कार्याची चर्चा होईल.


कर्क - नवा व्यवसाय सुरु कराल


कोणत्या तरी नव्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रॉपर्टी संदर्भातील एखादा पेच सुटेल तुम्हाला त्यापासून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावधान. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.


सिंह -मित्रांसोबत वेळ घालवाल


आज विद्यार्थी वर्गाचे अभ्यासात मुळीच लक्ष लागणार नाही. मित्रांसोबत आज वेळ घालवला जाईल. नोकरीधंद्यातील लक्ष प्राप्त कण्यास असफल व्हाल. थोडी सबुरीच तुम्हाला यश मिळवून देऊ शकेल. खर्चाचे प्रमाण कोलमडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील नात्यांमध्ये तणाव निर्माण होईल.


कन्या -नवीन संपर्काचा फायदा होईल


पार्टनरची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे तुमचे मन अशांत राहील. तुम्हाला दिवसभर निराश आणि दु:खी वाटेल. कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील जबाबदार व्यक्तिचा सल्ला घ्या. तुम्हाला अडचणीत आणतील असा कामांपासून दूर राहा. व्यवसायातील नवीन संपर्काचा चांगला फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नति मिळण्याची शक्यता आहे.


 तूळ- लग्नातील अडथळे दूर होतील


आज तुम्हाला तुमच्या मुलासंबंधी मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होतील. पार्टनरसोबत कोणत्या तरी कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. घेण्या देण्याचे व्यवहारातील अडचणी सुटतील. राजकीय कामांमध्ये व्यग्र राहाल.


वृश्चिक- नोकरीमध्ये पद बदलण्याची शक्यता


विद्यार्थीवर्गाने त्यांची कामे वेळेवर पूर्ण केलीत तर त्यांना यश मिळेल. व्यवसायात नव्या गुंतवणुकीची शक्यता. नोकरीमध्ये तुमचे पद बदलण्याची शक्यता. एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. वाहन खरेदीची शक्यता आहे.कोणाशीही बोलताना तोंडावर साखर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.


धनु- आर्थिक अडचणी येण्याची शक्यता


आज देण्या-घेण्यात धोका मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गुंतवणूक रद्द होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होईल. काही गोष्टींमुळए तुमच्या कुटुंबात परिवारात कटुता येण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीतल्या खटल्यांचा निकाल लागेल.


मकर- परदेशी टूर आखण्याची शक्यता


आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. तुम्ही तुमची रोजची कामे पुन्हा सुरु करु शकता. आज कोणत्यातरी खास व्यक्तिची भेट होणार आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत पदोन्नति मिळण्याची शक्यता आहे. परदेशात एखादी टूर करण्याची योजना आखाल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.  समाजातील प्रतिष्ठा वाढेल.


हेही वाचा


तुमच्या मित्रांचाही स्वभाव त्यांच्या राशीनुसार आहे का? 


2019 हे वर्ष सगळ्यांसाठी असणार खास, वाचा वार्षिक राशीभविष्य


जाणून घ्या प्रत्येक राशीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत