2 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना मिळणार मनःशांती

2 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना मिळणार मनःशांती

मेष : प्रतिष्ठा प्राप्त होईल


आज नोकरदार मंडळींसह व्यावसायिंकांसाठीही लाभदायक दिवस आहे. कारण आज आपल्याला कामामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. आज तुम्ही सामाजिक कार्यात रममाण होणार आहात. त्यामुळे मन:शांतीचा अनुभव आज तुम्ही घेऊ शकाल. आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहिल. जोडीदाराच्या इच्छेप्रमाणे आज तुम्ही वागण्याचा प्रयत्न करणार आहात.


कुंभ : लालसा नको


लालसा ही नुकसानकारक असते. त्यात झटझटप पैसे मिळविण्याची लालसा तर आपल्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाऊ शकते. म्हणून आपला मार्ग तर चुकत नाही आहे ना? याची खात्री करुन घ्या. पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे लक्षात असू द्या. विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असून आज त्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहणार आहे.


मीन : कामे पूर्ण होतील


अपूर्ण राहिलेले महत्त्वपूर्ण काम किंवा अधिकारी वर्गाच्या हातात अडलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहिले अशी अवस्था होईल. विद्याथ्र्यांनी टीव्ही, सोशल मीडिया यापासून लांब राहावे. लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. वडिल बंधुंकडून आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.


वृषभ : निर्णय विचारपूर्वकच घ्या


आज विशेषत: सरकारी कर्मचा-यांना कोणताही निर्णय विचारपूर्वकच घेण्याच्या सल्ला देण्यात येत आहे. घाईगडबडीत घेतलेला निर्णय नुकसानकारक होऊ शकतो. तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल तर निर्णय घेतांना इतरांचा सल्ला विचारण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. सासु-सुनेमध्ये आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ लाभणार आहे.


मिथुन : संधी मिळतील


नोकरीसह आज व्यवसायातही संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांचा पुरेपुर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. जसा देश तसा वेश ही भूमिका ठेवा. जेष्ठ नागरीकांना आजार तापाची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आज आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असू शकते.


कर्क : भाग्याची साथ


आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा व लाभदायी आहे. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ लाभणार आहे. त्यामुळे आज धाडस करुन महत्त्वाकांक्षा पूर्ण कर­ण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून आज तुम्हाला सुवार्ता मिळणार आहेत. त्यांना प्रोत्साहन द्या. वडीलांचेही आशीर्वाद व मार्गदर्शन आज तुम्हाला मिळू शकतं.


सिंह : दिलासा मिळेल


नोकरीच्या शोधात जे लोक असतील त्यांचा शोध आज संपेल किंवा दिलासा तरी मिळेल. त्यामुळे आज जागरुक राहून प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. मुलांकडूनही तुम्हाला सुवार्ता मिळू शकते. त्यामुळे त्यांना आज अभिमान वाटेल. शक्यतोवर आज जोडीदाराशी गोडीगुलाबीने वागण्याचा प्रयत्न करा. त्याच्या इच्छेप्रमाणे वागाल तर घरात शांतता टिकून राहिल.


कन्या : कंटाळा येईल


आज तुमच्यासाठी कंटाळवाणा दिवस असेल. त्यामुळे आज कामे टाळण्याकडे तुमचा कल असेल. विद्याथ्र्यांनाही आज अभ्यासाचा कंटाळा येईल. मुलं तुमच्या आवडीप्रमाणे वागणार नाही. त्यामुळे आजच्या दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे राहिल. वडिल बंधुंकडून आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल.


तूळ : अभ्यासावर लक्ष द्या


आज विशेषत: महाविद्यालयीन विद्याथ्र्यांना अभ्यासावर लक्ष दे­ण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपले मन इतर गोष्टींमध्ये रमून अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. मधुमेह असणा-या व्यक्तींनी आपल्या सारखरेची आज तपासणी करुन घ्यायला हवी. त्रासामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य व सोबतीला आज खर्चही होऊ शकतो.


वृश्चिक : आशीर्वाद मिळवावेत


गुरु किंवा जेष्ठांचे मार्गदर्शन, आशीर्वाद मिळविण्याचा आज तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. तुम्हाला त्याची नितांत आवश्यकता आहे. त्यातून तुमचे विचलित मन एकाग्र होऊ शकते. आहाराचे पथ्य तुम्हाला सांगितलेले असतील तर आज अगदी तंतोतंत पाळा. आधी पोटोबा मगच विठोबा हे धोरण ठेवा. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो.


धनु : तारेवरची कसरत


आज नोकरदार महिलांना कुटुंब व नोकरी यांच्यामध्ये तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोघांचा ताळमेळ बसविण्यामध्ये आज दमछाक होणार आहे. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्या त्रासात वाढ होण्याची शक्यता आहे. चिंता कर­ण्यापेक्षा चिंतन करण्यावर भर द्या. मित्रांशी सुसंवाद वाढेल.


मकर : नाराजी ओढवाल


कामात लक्ष नसल्यामुळे किंवा होणा-या चुकांमुळे आज तुमच्यावर वरीष्ठांची नाराजी ओढवणार आहे. त्यामुळे काम करीत असतांना किंवा कोणताही निर्णय घेतांना काळजीपूर्वकच घ्या. आज तुम्ही अतिशय ठणठणीत राहणार आहात. दिवसभर ताजेतवाणे असल्याचा अनुभव आज तुम्ही घेऊ शकाल. ओळखीच्या व्यक्तींबरोबर आज सामंजस्य वाढणार आहे.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद