24 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या व्यक्तींना वेतनवाढीची शक्यता

24 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या व्यक्तींना वेतनवाढीची शक्यता

मेष - वेतनाढीची शक्यता


आज कोणत्यातरी नव्या प्रोजेक्टवर तुमचं लक्ष केंद्रीत होऊ शकतं. जुन्या मित्रांना भेटण्याचा योग येईल. कार्यालयात वेतनवृद्धी होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती मजबूत होईल. लहानसहान कटकटींपासून मुक्ती मिळेल. कोर्टाच्या काही बाबींपासून त्रास होण्याची मात्र शक्यता आहे.


कुंभ - जोडीदाराला गुढघा अथवा कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो


तुमच्या जोडीदाराला गुढघ्यात अथवा कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम करा. वाहन चालवताना काळजी घ्या. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. व्यावसायिक योजना आखल्या जातील. नव्या ओळखीच्या लोकांपासून सावधान राहा. धोका मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.


मीन - वैवाहिक जीवन रोमँटिक बनवू शकाल


आपापसातील मतभेद संपतील. यश मिळेल. वैवाहिक जीवन रोमँटिक बनवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मुलाबाळांबाबत चांगली गोष्ट ऐकू येईल. आर्थिक व्यवहारात योग्य निर्णय विचारपूर्वक घ्या. रखडलेली कामं मार्गी लागतील. कोर्टकचेरीतील गोष्टींपासून सुटका होईल.


वृषभ - आरोग्यवर खर्च होईल


तुमचा तुमच्या आरोग्याच्या बाबत आज जास्त खर्च होईल. महाग वस्तूची खरेदी करण्यापासून स्वतःला दूर ठेवा. व्यावसायिक अनुबंध रद्द होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यशैलीत सुधारणा करून चांगला फायदा करून घेऊ शकता. अधिकाऱ्यांकडून सहयोग प्राप्त होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. जोडीदारापासून मतभेद होत असतील तर दूर राहा. प्रवासाचा योग.


मिथुन - शारीरिक थकवा आणि ताण दूर होईल


शारीरिक थकवा आणि ताण आज दूर होईल. तुम्ही स्वतःला खूप मोकळं समजाल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमच्या अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. विचारपूर्वक खर्च करा. रखडलेली कामं मार्गी लागतील. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. लबाड लोकांपासून सावध राहा.


कर्क - कुटुंबात तणाव वाढण्याची शक्यता


तुमच्या प्रेमाचा खुलासा आताच करू नका. कुटुंबामध्ये तणाव वाढू शकतो. कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. सामाजिक सन्मानावर परिणाम होईल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. कार्यालयात वरीष्ठांशी मतभेद होऊ शकतात. मित्रांबरोबर प्रवासाचा योग आहे. तब्बेत ठीक राहील.


सिंह - अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल


व्यवसायात लागेबंधे मिळवण्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. राजकारणातदेखील लाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावधान राहा. अनावश्यक वादविवादात फसण्याची शक्यता. जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.


कन्या - थकवा आणि ताण जाणवेल


आज सततच्या धावपळीमुळे त्रस्त राहाल. शारीरिक थकवा आणि ताण जाणवेल. काम जास्त आणि त्याचा मोबदला कमी अशी आज स्थिती असेल. जोखीम असलेल्या कामापासून लांबच राहा. रखडलेले धन मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.


तूळ - आनंदाची बातमी मिळेल


आज अचानक आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या खासगी आयुष्यात वेळ द्या. त्यामुळे नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील. कोणत्या तरी संस्थेद्वारे सन्मान मिळेल. यश आणि धनप्राप्ती होईल. कौटुंबिक मित्रपरिवाराबरोबर फिरण्याची योजना होऊ शकते. आदान-प्रदानावर नियंत्रण ठेवा.


वृश्चिक - व्यवसायामध्ये मंदी जाणवल्यामुळे त्रस्त व्हाल


व्यवसायामध्ये मंदी जाणवल्यामुळे त्रस्त व्हाल. नोकरीमध्ये अस्थिरता राहील. आळस झटकून द्या. जोडीदाराकडून सहयोग मिळेल. तुमची रखडलेली कामं मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक निर्णय घेऊन करा. धार्मिक कार्यात आवड वाढेल. वादविवादापासून दूर राहा.


धनु - प्रियकाराकडून गिफ्ट मिळू शकतं


आज भाग्योदय दिवस आहे. प्रियकराकडून गिफ्ट मिळू शकतं. धनासंबंधित चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक सुख-समृद्धी मिळेल. नवविवाहित जोडी एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवा. विदेशात जाण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.


मकर - नोकरी सुटण्याचा धोका


कार्यालयात वरीष्ठांच्या आदेशाची केलेली अवहेलना महागात पडेल. नोकरी सुटण्याचा धोका आहे. आळस सोडून द्या. विवादापासून दूर राहा. आरोग्यासंबंधी चिंता दूर होईल. रखडलेले पैसे मिळतील. रखडलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता