आज विद्यार्थी अभ्यास करण्यात कंटाळा करतील. नोकरी करण्याऱ्यासाठी बदलीची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीत जिद्दीपणा केल्यास नुकसान होऊ शकतं. देवाणघेवाणीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. जोखमीच्या कामापासून दूर राहा. राजकारणात तुमची स्थिती मजबूत होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगा.
लक्ष्य प्राप्तीसाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल. ऑफिसमधलं काम घाईघाईत पूर्ण करण्याच्या नादात मोठी चूक होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. अडकलेले पैसे मिळणे अचानक मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक सम्मानात वृद्धी होईल. एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल.
तुम्हाला आईकडून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आज व्यावसायिक विस्तारात यश मिळेल. रखडलेली कामात तेजी येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. रचनात्मक कार्योमध्ये प्रगती होईल. चालताना सांभाळा, जखम होण्याची शक्यता आहे.
बाहेरील पदार्थ खाल्ल्याने तुमचं पोट बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. ऑफिसमधील वातावरण तुम्हाला अनुकूल असेल. व्यवसायात नवीन योजना आखाल. नव्याने ओळख झालेल्या लोकांपासून सावध राहा. धोक्याची संभावना आहे. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. अडकलेली काम पूर्ण होतील.
तुमचा आजचा दिवस खूपच चांगला जाणार आहे. अविवाहीतांना लग्नासाठी नवे प्रस्ताव येतील. जोडीदारांशी असलेले संबंध सुधारतील आणि अजून दृढ होतील. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. कार्यशैलीत बदल करून लाभ मिळवाल. राजकारणात असल्यास तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. मित्रांच्या सहकार्याने उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.
विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात यश मिळेल. ऑफिसमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक पैसे गुंतवा. व्यावसायिक जवाबदाऱ्या वाढल्यामुळे तुम्हाला कुटुंबाला वेळ देता येणार नाही. रखडलेली कामं वेळेवर पूर्ण होतील.
आज एखादा व्यवहार रद्द झाल्याने आर्थिक नुकसान होऊ शकतं. देवाण-घेवाणमध्ये सावधानता बाळगा. मन काहीसं उदास राहीलं. कुटुंबासाठी जास्त खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून मदतही मिळू शकते. वादापासून लांब राहा. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यांमध्ये वृद्धी होईल. लांबच्या प्रवासाचा योग आहे.
तब्येत बिघडली असल्यास आता सुधारणा जाणवेल. परीक्षेचा रिझल्ट चांगला आल्याने घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मनाप्रमाणे कामामध्ये यश मिळेल. उत्पन्न चांगलं राहील आणि भावंडांची मदत मिळेल. आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. वाहन वापरताना सावधानता बाळगा.
नातेवाईकांप्रती आत्मियता कमी होईल. कुटुंबाकडून विरोधही होण्याची शक्यता आहे. गरजेवेळी मित्रही माघार घेण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नव्या जवाबदाऱ्या मिळू शकतात. संपत्तीत भरभराट होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानात वाढ होईल. आरोग्य चांगलं राहील. धर्म- कर्मातही मन रमेल.
आज अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो. व्यावसायिक भागीदारीतून होणार लाभ. दिलेलं कर्ज परत मिळण्याची संभावना आहे. चल- अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना होऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होईल. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहयोग मिळेल.
पाय किंवा गुडघ्यांच्या दुखण्याने तुम्हाला त्रास होईल. वैवाहिक जीवनात समाधान मिळेल. आज ऑफिसमध्ये कामात मन लागणार नाही. खर्च वाढू शकतो. व्यापारात उतार- चढ कायम राहील. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल. रचनात्मक कार्यांमध्ये प्रगती होईल.
भाऊ-बहिणीच्या मदतीने व्यवसायात यश प्राप्त होईल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. तुमच्या योजनात्मक कामामुळे अधिकारीही खूष होतील. कामात बढतीची शक्यता आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. कायदेशीर विवादातून सुटका होईल. लांबच्या प्रवासाचा योग आहे.
हेही वाचा -
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)