28 एप्रिलचं राशीफळ, कुंभ राशीच्या भाऊ-बहिणींसाठी चांगली बातमी

28 एप्रिलचं राशीफळ, कुंभ राशीच्या भाऊ-बहिणींसाठी चांगली बातमी

मेष - नवीन संपत्ती खरेदी कराल


नवीन संपत्ती खरेदी करण्याचा तुम्ही विचार कराल. मित्रांकडून मिळणाऱ्या महागड्या भेटीमुळे तुम्ही आनंदी व्हाल. व्यावसायिक विस्तार आणि प्रतिष्ठेत वृद्धी होईल. आत्मविश्वास वाढेल. भावनात्मक संबंधात जवळकीची भावना निर्माण होईल. रचनात्मक कार्यांमध्ये प्रगती होईल.


कुंभ - भावा-बहीणींंमधलं प्रेम वाढेल


भावा-बहीणींच आपापसातलं प्रेम वाढेल. लग्नाळू युवाचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमची स्थिती आनंददायी राहील. रखडलेली काम पूर्ण करण्याची चांगली संधी आहे. जुन्या ओळखींमुळे फायदा होईल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता. रचनात्मक कार्यांमध्ये प्रगतीची चिन्ह आहेत.  


मीन- व्यवसायात होऊ शकतं नुकसान


शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असल्याने वेळीच काळजी घ्या आणि मानसिकरित्या तयार राहा. आत्मविश्वासात कमी होण्याची शक्यता आहे. भांडण आणि वाद टाळा. बिघडलेल्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.


वृषभ - दुर्लक्ष केल्यास चांगली संधी जाऊ शकते


दुर्लक्ष करू नका नाहीतर हातात येणारी चांगली संधी गमवाल. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्यास महागात पडेल. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधकांपासून सावध राहा. देवाण-घेवाणीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. अचानक लाभ होण्याचे संकेत आहेत.


मिथुन - तणाव किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवेल


अति तणाव किंवा डोकेदुखीमुळे त्रास होईल. तुम्ही आखलेल्या योजना बारगळू शकतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्रांचं सहकार्य मिळेल. व्यवसायात भागीदारीत काम केल्यास लाभ होईल. पण महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करा.


कर्क - पार्टनरचा राग दूर होईल


पार्टनरचा राग आज दूर होऊन जवळीक वाढू शकते. संतान प्राप्तीबाबत विचार कराल. भागीदारीत केलेल्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. तुमच्या विरोधकांची माघार होईल. रखडलेल्या योजना पुन्हा जोमाने सुरू करू शकाल. फिरायला जायचं प्लानिंग करू शकता. सामाजिक कार्यांमधील सहभाग वाढेल.


सिंह - विद्यार्थांना मिळेल यश


आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. सामाजिक सन्मान आणि धनात वृद्धी होईल.


कन्या - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता


आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खराब आर्थिक स्थितीतही आशेचा किरण कायम राहील आणि शुभवार्ता समजेल. सामंजस्याने समस्यांना सामोरं जा. नवीन गोष्टी बारकाईने समजून घ्या. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये आलेला कडवटपणा दूर होईल.


तूळ - आरोग्यात सुधारणा होईल


आज तुम्हाला शुभ संकेत मिळतील, विशेषकरून आरोग्याच्याबाबतीत सुधारणा जाणवेल. खासगी संबंधांमधील गैरसमज दूर होतील. नात्यात गोडवा येईल. व्यापारातही विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. रचनात्मक कार्यांमध्ये तुमची आवड वाढेल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचे प्लॅन्स ठरतील.


वृश्चिक - नवीन ओळखींमध्ये सावधानता बाळगा


प्रेम संबंध तुटण्याची वेळ येऊ शकते. पार्टनरशी ताळमेळ नसल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. नव्या ओळखींमध्ये सावधनता बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रकरणांमध्ये यश मिळेल. अडकलेली काम पूर्ण होतील. सामाजिक कार्यांमध्ये तुमचा रस वाढेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे.


धनु - लाभाच्या नव्या संधी मिळतील


आज तुम्हाला एखाद्या नवीन योजनेत यश मिळू शकतं. लाभाच्या अनेक संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी सन्मान वाढेल. कायदेशीर विवादात यश मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरींमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. विचारांमधील भिन्नतेमुळे संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.


मकर- शारीरिक अशक्तपणा जाणवेल


आज तुम्हाला शारीरिकरित्या अशक्तपणा जाणवेल. कामात मन लागणार नाही. आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहीक नात्यांमधील कडवटपणा दूर होईल. खर्च वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी नव्या जवाबदाऱ्या वाढल्यामुळे कामातील व्यस्तता वाढेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं.


हेही वाचा -


आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का


जाणून घ्या शरीरावरील तीळ काय सांगतात तुमच्याबद्दल


एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या