3 एप्रिल 2019 चं राशीफळ, कुंभ आणि धनु राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

3 एप्रिल 2019 चं राशीफळ, कुंभ आणि धनु राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

मेष : व्यवहार सांभाळून


तुम्ही भागिदारीमध्ये व्यापार, व्यवसाय करीत असाल तर आज तुम्हाला सांभाळूनच व्यवहार करावे लागणार आहेत. आपली फसगत होणार नाही, याची काळजी घ्या. गुरु विना नाही गती. म्हणून गुरुंचे आशीर्वाद व मार्गदर्शन घ्यायला विसरुन नका. गृहिणींनी आज अनावश्यक खरेदीचा मोह टाळावा. आपले आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.


कुंभ : बढती मिळेल


बढतीसाठी प्राप्त असणा-या सुयोग्य कर्मचा-यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. कारण आज त्यांना बढती मिळू शकते. साखरेचे खाणार त्याला देव देणार. त्यामुळे प्रत्येकाशी गोड बोलून आपले काम करवून घ्या. आपल्या घरात आज पाहुण्यांची वर्दळ असणार आहे. वैवाहिक आयुष्य ­अधिक सुरेख होण्यास आज मदत होईल.


मीन : भागीदारीत यश


तुम्ही जर भागीदारीमध्ये व्यापार, व्यवसाय करीत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. आज तुमच्यासाठी उत्तम योग असून यश प्राप्त होणार आहे. पराक्रमासह आज आरोग्यामध्येही वृद्धी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आत्मविश्वासासह दिवसभर तुम्ही ताजेतवाणे राहणार आहात. जोडीदाराचे सहकार्य मिळू शकेल.


वृषभ : गोंधळ उडेल


आजचा दिवस आपल्यासाठी गोंधळाचा ठरु शकतो. त्यामुळे आज कोणताही निर्णय घेतांना अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल. आज अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.


मिथुन : तणाव वाढेल


आज दिवस विशेषत: बँक कर्मचा-यांसाठी तणावाचा असेल. अतिरीक्त कामाचा ताण आज वाढणार आहे. त्यामुळे आज त्यांनी अत्यंत सांभाळून राहून कामात चुक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जंक फूड आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असतात. आज तर ते अजिबातच नको. नाही तर त्रास होऊ शकतो. मित्रांकडून आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे.


कर्क : कौतुक होईल


आजचा दिवस तुमच्यासाठी कौतुकाचा, आनंदाचा व आत्मवि·ाासाने परिपूर्ण होण्याचा आहे. कारण आज तुमच्या कामाचं वरीष्ठांकडून प्रचंड कौतुक होणार आहे. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आज स्वत:ची काळजी घ्यायची आहे. आपल्या त्रासामध्ये आज वाढ होऊ शकते. मित्रांबरोबर असलेले गैरसमज आज दूर होण्याच शक्यता आहे.


सिंह : मर्जी सांभाळावी लागेल


नोकरदार मंडळींना आज कामाच्या ठिकाणी आज इच्छा नसतांनाही अधिकारी वर्गाची मर्जी साभांळावी लागणार आहे. तरच तुमच्यासाठी पुढील दिवस सुखाचे येऊ शकतात. पोटाचे विकार असणा-यांनी आज दक्षता घ्यायला हवी. आजार बळावण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी वेळेवर घ्या.


कन्या : अभ्यासात लक्ष राहिल


आजचा दिवस विद्याथ्र्यांसाठी लाभदायक असणार आहे. कारण आज त्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहिल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे काही प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागणार आहे. दम्याच्या रुग्णांसाठी आज खराब वातावरण राहील. भावंडांशी होणारे वादविवाद आज टाळावेत.


तूळ : संततीला यश


आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असेल. कारण आज तुमच्या संततीला यश मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांना प्रोत्साहन द्यायला चुकू नका. विद्याथ्र्यांचाही कल आज पूर्णपणे अभ्यासाकडे असणार आहे. एकाग्रता वाढण्यास आज मदत मिळेल. घरातील वातावरण मात्र आज तणावपूर्ण राहू शकतं.


वृश्चिक : राजमार्ग सापडेल


आज तुम्हाला यशाचा राजमार्ग सापडणार आहे. त्यामुळे आज तुम्ही अत्यंत जागरुक राहायला हवं. जी संधी मिळते आहे तिचा पुरेपुर लाभ घ्यायला हवा. मुले मैदानी खेळांमध्ये आज भाग घेणार आहेत. त्यात त्यांना यशही मिळू शकतं. वैवाहिक आयुष्यात मात्र आज तणाव वाढू शकतो. मौन व शांत राहणे हे सर्व समस्यांवर प्रभावी औषध आहे हे लक्षात घ्या.


धनु : बढती मिळेल


नोकरीमध्ये तुम्ही बढती मिळविण्यास प्रात्र असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. कारण आज तुम्हाला बढती मिळू शकते. मुलांच्य बाबतीत तुम्ही विचार केलेल्या अपेक्षित गोष्टी आज साध्य होऊ शकतात. जेष्ठांकडून मिळणारो मार्गदर्शन व सल्ला आपल्या उपयोगात पडणार आहे. त्याचा आपल्या कामात उपयोग करुन घ्या.


मकर : सुर्वाता कानी येतील


नोकरदार मंडळींसह व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरु शकतो. आज सुवार्ता कानी येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही प्रवासही करणार असून त्यात तुम्हाला जोडीदराची साथ लाभू शकते. त्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणीत होईल. कुटुंबात आज तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असाल तर धैर्य राखुन सर्वांना विश्वासात घ्या. तरच तुम्ही योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकाल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद