3 मे 2019 राशीफळ, कर्क राशीच्या व्यक्तीची खास माणसाशी होईल भेट

3 मे 2019 राशीफळ, कर्क राशीच्या व्यक्तीची खास माणसाशी होईल भेट

मेष - प्रेमसंबंधामध्ये तणावाची शक्यता


काही कौटुंबिक समस्यांमुळे प्रेमसंबंधामध्ये तणावाची शक्यता आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. आर्थिक गोष्टींमध्ये जोखीम घेऊ नका. रखडलेली कामं पूर्ण होण्याची चांगली संधी आहे. परदेशात जायचे असल्यास, यश मिळू शकतं. भौतिक सुखसमाधामध्ये वृद्धी होईल.


कुंभ - आर्थिक लाभापासून वंचित राहू शकता


ऑफिसमध्ये कामात आळस बाळगू नका अन्यथा आर्थिक लाभापासून वंचित राहू शकता. आदान - प्रदानामध्ये सावधानता बाळगा. कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी विचार करा. उगीचच्या खर्चामुळे तुमचं अर्थकारण बिघडू शकतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.


मीन - आजारपणातून होईल सुटका


जीवनशैलीमधील बदल तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. बरेच दिवस आजारी असल्यास, तब्बेतीत सुधारणा होईल. कोणत्याही प्रकारचा बेजाबदारपणा दाखवू नका. आज एखादी चांगली बातमी ऐकू येईल. ऑफिसमध्ये चांगलं वातावरण राहील आणि तुमचं मन प्रसन्न राहील. तुमचा उत्साह वाढेल. कुटुंब अथवा मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाऊ शकता.


वृषभ - उत्पन्नात वाढीची शक्यता


नोकरदार वर्गातील लोकांना उत्पन्नात वाढीची शक्यता आहे. व्यावसायिक योजना लाभदायक राहील. आर्थिक बाजू मजबूत होईल. नात्यात आलेला कडवटपणा दूर होईल आणि नवे संबंध बनतील. आधुनिक सुखाची साधनं वाढतील. तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. विरोधकांपासून सावधानता बाळगा.


मिथुन - आरोग्याच्या काळजीने मन चिंतित राहील


नकारात्मक विचार आणि आरोग्याच्या काळजीने सतत मन चिंतेत राहील. कुटुंबात काहीतरी वाईट गोष्ट समजल्यामुळे मन चिंताग्रस्त राहील. कुटुंब आणि मित्रांची चांगली साथ लाभेल. विरोधकांपासून सावधानता बाळगा. नोकरीमध्ये बदनामीची शक्यता आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.


कर्क - खास माणसाशी होतील भेटीगाठी


कोणत्यातरी तुमच्या खास माणसाशी होतील भेटीगाठी. अनोळखी व्यक्तीच्या मदतीने व्यवसायात यश मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यामध्ये दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक समस्यांंपासून सुटका मिळेल. वैवाहिक जीवन सुखकारक असेल. सामाजिक सन्मानात वाढ होईल.


सिंह - शिक्षण आणि कामात अडचणी येण्याची शक्यता


शिक्षण आणि कामातील क्षेत्रामध्ये कठीण परिस्थितीचा सामना करण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये नवे संबंध प्रस्थापित करताना नीट विचार करा. संपत्तीसंबंधी अडचणी येऊ शकतात. मित्रांंच्या मदतीने तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. नातेवाईकांच्या बोलण्याने वाईट वाटून घेऊ नका.


कन्या - नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता


नवे व्यावसायिक संंबंध सुधारतील. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कायम व्यग्र राहाल. मोठं काम आयोजित करण्यात यशस्वी व्हाल. पार्टनरच्या आरोग्यासंदर्भात काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीवर संबंध बिघडू शकतात. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळेल. मित्रांशी भेटीगाठी होतील.


तूळ - शिक्षण आणि कामात अडचणी येण्याची शक्यता


शिक्षण आणि कामातील क्षेत्रामध्ये कठीण परिस्थितीचा सामना करण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये नवे संबंध प्रस्थापित करताना नीट विचार करा. संपत्तीसंबंधी अडचणी येऊ शकतात. मित्रांंच्या मदतीने तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. नातेवाईकांच्या बोलण्याने वाईट वाटून घेऊ नका. मित्र तुम्हाला यातून बाहेर काढायला मदत करतील.


वृश्चिक - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या


कोणत्या तरी अनामिक भीतीने सतत मन चिंताग्रस्त राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची काळजी नीट घ्या. धार्मिक आस्थेने तुमच्या मनाची सुख-शांती राहील. रचनात्मक कार्यांमुळे मन उत्साहित राहील. व्यवसायात नव्या योजना आखल्यास यश मिळेल.


धनु - नात्यात प्रेम राहील


कुटुंबाबरोबर वेळ घालवल्यामुळे नात्यात प्रेम कायम राहील. झालेल्या गोष्टी उगाळत बसू नका, विसरण्याचा प्रयत्न करा. मनाला सकारात्मक ठेवा. व्यवसासायत नवं काहीतरी सुरु करण्याच्या प्रयत्नात राहाल. नोकरीमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सर्व काही नीट असूनही मन मात्र बेचैन राहील.


मकर - नोकरीमध्ये मनाप्रमाणे यश मिळेल


विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. करिअरमध्ये तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. पदोन्नती होईल. तुमच्या सहकाऱ्यांचा सहयोग मिळेल. वैवाहिक संबंधामध्ये तणाव येऊ शकतो. आरोग्यासंबंधी काळजी घेण्याची गरज आहे.


हेदेखील वाचा - 


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'


आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन