30 एप्रिल 2019 राशीफळ, तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक

30 एप्रिल 2019 राशीफळ, तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक

मेष - नातेसंबध सुधारतील


आज तुमच्यासाठी भाग्योदयाचा काळ आहे. नातेसंबधांमधील कटूपणा दूर होईल. नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे. बोलताना सावध रहा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होतील. रखडलेली कामे पूर्ण करा. धार्मिक कार्यात रस वाढेल.वृषभ - विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही


आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. मित्रमंडळींसोबत वेळ घालवाल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काम लवकर आटपण्याचा प्रयत्न करू नका. एखादी चुक होऊ शकते. वाहन चालवताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात एखादी समस्या येऊ शकते.मिथुन - नवीन प्रोजेक्ट मिळेल


एखादे नवे काम मिळण्याची शक्यता आहे. नवीन ओळखींचा फायदा होईल. वरिष्ठांसोबत संबध सुधारतील. जोडीदारासोबत नातेसंबध चांगले होतील. आरोग्याची काळजी घ्या.मित्रमंडळीसोबत फिरण्याचा बेत आखाल. रचनात्मक कार्यात रस वाढेल.


कर्क - नोकरीत अपयश मिळेल


व्यवसायातील गती मंदावेल. नोकरीत यश गाठण्यात अपयश मिळण्याची शक्यता आहे. बोलताना सावध रहा. अडकलेले पैसे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्ती वाढेल. प्रिय व्यक्तीशी भेट होईल.


सिंह - आरोग्य सांभाळा


वातावरणातील बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. व्यापारासाठी आजचा दिवस शुभ असेल. उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या संस्थेकडून सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होण्याची  शक्यता आहे. विरोधक नमतील.


कन्या - वाद मिटतील


जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. कौंटुबिक वातावरण चांगले असेल. प्रभावशाली व्यक्तीची भेट लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रचनात्मक कामात प्रगती होईल. कुंटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल.तूळ- व्यवसायात लाभ


विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात मेहनत केल्यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील. सामाजिक क्षेत्रात योगदान करण्याचा विचार कराल. जुने मित्र भेटतील. प्रवास करणे टाळा. कोैंटुबिक वातावरण सुधारेल.वृश्चिक - मेहनतीचे योग्य यश मिळणार नाही.


व्यवसायात घेतलेल्या मेहनतीच्या बदल्यात इच्छित यश मिळणार नाही. एखादी महागडी वस्तू खरेदी करणे टाळा. कुटुंबात संपत्तीविषयक वाद निर्माण होऊ शकतात. कुटुंबाच्या मदतीने एखादे कठिण काम पूर्ण होतील. व्यवहार सुधारतील.


धनु - जुने आजारपण सुधारतील


एखादे जुने आजारपण सुधारण्याची शक्यता आहे. सुखद बदल होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. जोडीदाराशी नाते सुधारेल. परदेशात जाण्याचा योग आहे.मकर- कुटुंबात तणाव वाढेल


कुटुंबात लहान सहान वाद होऊ शकतात. बोलताना सावध रहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. द्विधा मनस्थितीत निर्णय घेऊ नका. व्यवसायात विस्तार होऊ शकेल. जोखिमेच्या कामापासून दूर रहा. रचनात्मक कार्यात रस वाढेल. स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.कुंभ - उत्पन्नात वाढ


नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात इच्छित यश मिळण्याची शक्यता आहे. लोकप्रिय व्हाल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. घाईघाईत काम करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. नात्यातील कटूपणा कमी होईल.


 


मीन- अपचन होण्याची शक्यता आहे


आज तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. आहाराची काळजी घ्या. कुटुंबातील समस्या वाढण्याची शक्यता आहे. सहकारी त्रास देतील. काम वेळेत करण्याची सवय लावा. सन्मान वाढेल. व्यवसायात नवीन सहकारी मिळतील.


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का


जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'