4 एप्रिल 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक

4 एप्रिल 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक

मेष : खर्चाकडे लक्ष द्या


आज तुम्हाला होणा-या खर्चाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. खर्चामुळे आपले आर्थिक गणिते बिघडणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. अंथरुन पाहुन पाय पसरावे, हे लक्षात घ्या. पती-पत्नीमध्ये आज सामंजस्य वाढीस लागून वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहू शकतं.


कुंभ : नफ्याकडे लक्ष द्या


व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष दिले पाहिजे. नाही तर दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था होईल. विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस तापदायक ठरु शकतो. मन एकाग्र राहणार नाही. अभ्यासातही लक्ष राहणार नाही. अगोदर श्रम नंतरच भाग्य तुमच्या सोबत येणार असल्यामुळे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून त्यात सातत्य ठेवा.


मीन : सुखद दिवस


व्यापार व व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असणार आहे. त्यामुळे चिकाटी कायम ठेवून मिळणा-या संधीवर लक्ष ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या. आज तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. गृहिणींना आर्थिक टंचाईचा आज सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तणाव येऊन लक्ष विचलित होऊ शकतं.


वृषभ : कागदपत्रे सांभाळा


 महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवण्याचा आज तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. ते व्यवस्थित आहेत की नाही हे बघुन सुरक्षित ठिकाणी ठेवा. सौ बका एक लिखा त्यामुळे लिखित दस्तावेज विशेष करुन सांभाळा. कष्ट सार्थकी लागण्याचा आजचा दिवस असेल. वैवाहिक जीवनात शांतता राहिल. परिणामी घरातही आज शांततापूर्ण वातावरण राहिल.


मिथुन : धाडस नको


व्यावसायिकांनी आज कुठलेही धाडस करायला नको. महत्त्वाचे कुठलेही निर्णय आज घेऊ नका. यशस्वी व्यक्तीच्या मागे एक जोडीदार असतो. त्यामुळे जोडीदराच्या मताला आज महत्त्व द्या. नाही तर चुकीचे निर्णय घेतले जाऊन नुकसान होऊ शकते. घरामध्ये जर शितयुद्ध सुरु असेल तर त्यात वेळीच लक्ष घालून मिटवि­ण्याचा प्रयत्न करा.


कर्क : ग़ुंतवणूक सांभाळून


व्यवसाय वृद्धीसाठी, प्रगतीसाठी जर तुम्ही आज गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. सगळी महत्त्वाची कागदपत्रे तज्ज्ञांच्या सल्ल्याने तपासून घ्या. वडीलांकडून आज तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. आपल्या कामामध्ये त्याचा उपयोग करुन घ्या. घरातील वातावरण आज अत्यंत खेळीमेळीचे राहिल.


सिंह : व्यवसायाची संधी


आज तुमच्यासाठी अत्यंत लाभाचा दिवस आहे. कारण आज व्यवसायाची संधी तुमच्याकडे चालून येणार आहे. तिचा लाभ घ्या. तुमच्या बाबतीत तुम्ही जो विचार केलेला असेल त्या सर्व अपेक्षित गोष्टी आज साध्य होऊ शकतात. त्यामुळे घरात आज आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल. स्त्री आज समजुतदारीने वागतील.


कन्या : प्रगतीचे योग


आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभाचा आहे. कारण ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल असून प्रगतीचे योग आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा लाभ घे­ण्यात कमी पडू नका. दुपारनंतर आज तुमची प्रकृती बिघडू शकते. छोटे दुखणेही त्रासदायक ठरु शकतं. त्यामुळे आज स्वत:ची काळजी घ्यायला हवी. घरात आज प्रसन्न वातावरण राहिल.


तूळ : अर्थसहाय्य मिळेल


व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही जर अर्थसहाय्य मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा आहे. आज तुम्हाला यश मिळणार असल्यामुळे प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करा. सकाळी फिरायला जा. भावंडांशी मदतभेद होण्याची शक्यता आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, हे लक्षात घ्या.


वृश्चिक : गुंतवणूक करा


प्रगतीसाठी तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर आजचा दिवस त्यासाठी खूप चांगला आहे. आज गुंतवणूक करायला हरकत नाही. दातांच्या दुखण्याने तुम्ही जर त्रस्त असाल तर आज विशेष काळजी घ्या. आपले दुखणे आज वाढू शकते. तुमच्या मोठ्या भावाचे नुकसान होण्याची आज शक्यता आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्या.


धनु : सावध राहा


व्यवसायिकांनी आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करतांना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रे तज्ज्ञाद्वारे तपासून घ्या. निर्णय घेण्याआधी सल्ला, मार्गदर्शन घ्यायला विसरु नका. संधीवाताचा त्रास असलेल्यांनी आज काळजी घ्यायला हवी. आपला त्रास वाढू शकतो. मित्रांकडून आज तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.


मकर : कागदपत्रे सांभाळा


सौ बका एक लिखा. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवण्याचा आज तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. अपचनाचा त्रास होण्याची आज शक्यता आहे. त्यामुळे आहाराविषयीचे पथ्य सांभाळून स्वत:ची काळजी घ्या. मित्रांच्या गाठीभेटी आज होऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो. त्यामुळे मनाला प्रसन्न वाटेल.