ADVERTISEMENT
home / आपलं जग
टेक्नोलॉजीचे साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी घ्या ही काळजी

टेक्नोलॉजीचे साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी घ्या ही काळजी

कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईट असतो. असंच काहीसं आपल्या आयुष्यातील टेक्नोलॉजीच्या वापराबाबत झालं आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्व जण आज टेक्नोलॉजीच्या विळख्यात अडकले आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यातील टेक्नोलॉजीचं प्रस्थ वाढत चाललं आहे. उदाहरणार्थ मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतर रूटीन गॅजेट्स. आपल्याला माहीत आहे की, काही टेक्नोलॉजी ज्या आपण वापरत आहोत त्या आरोग्यासाठी घातक आहेत तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांचा वापर करत आहोत. जसं जसं आपल्या टेक्नोलॉजीचं प्रस्थ वाढत आहे. तसे त्याचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. जसं रोज डोक दुखणं, हृदयाची धडधड वाढणे, झोप न लागणे, राग येणे, सतत तणाव जाणवणे, आळस येणे या समस्या अनेकांना जाणवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया टेक्नोलॉजीचे हे साईड ईफेक्ट्स कसे टाळता येतील ते.

मोबाईल ठेवण्याची योग्य जागा

how-to-keep-mobile

आपण नेहमी बघतो की, अनेकजण जीन्स किंवा पँटच्या खिशात मोबाईल ठेवताना दिसतात. तर काहीजणांच्या शर्टच्या वरच्या खिशात मोबाईल असतो. पण ते चुकीचं आहे. कारण मोबाईलमधून सतत लहरी बाहेर पडतात ज्यामुळे रेडिएशनचा धोका वाढतो. त्यामुळे महिलांनी नेहमी पर्समध्ये मोबाईल ठेवावा तर पुरूषांनी कमरेला साईड पाऊच लावून त्यात फोन ठेवावा. कधीही झोपताना तुमच्या डोक्याजवळ मोबाईल किंवा कोणतंही उपकरण ठेऊ नये. उशीच्या खाली तर मोबाईल कधीच ठेऊ नये.  

लिफ्ट किंवा मेट्रोमध्ये मोबाइलचा वापर टाळा

Passenger-Elevator

ADVERTISEMENT

आधीच वर सांगितल्याप्रमाणे मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी या आपल्यासाठी घातक असतात. लिफ्ट किंवा मेट्रोमध्ये बंद जागेत रेडिएशनचा धोका अजूनच वाढतो. कारण या दोन्ही जागा पूर्णपणे बंद असतात. तसंच या ठिकाणमी मोबाईील सिग्नल कमी होतो. तेही शरीरासाठी नुकसानदायक असत. मोबाईल सिग्नल कमी झाल्याने कॉल लावणंही योग्य नाही.  

लॅपटॉपवर काम करताना

how-to-keep-laptop

कित्येकवेळा अनेकजण रिक्शामध्ये किंवा ट्रेनमध्ये मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम करताना दिसतात. अगदी वर्क फ्रॉम होम करतानाही हा प्रकार सर्रास दिसून येतो. पण असं नाही केलं पाहिजे. कारण या दरम्यान लॅपटॉपमधून जी हीट निघते ती आपल्या प्रजनन क्षमतेवर तर परिणाम करतेच पण आपल्या शरीराच्या खालच्या भागावरही वाईट परिणाम करते. त्यामुळे लॅपटॉप कधीही मांडीवर ठेऊन काम करू नये. तसंच जास्त वेळ लॅपटॉपवर काम केल्याने तुमच्या डोळ्यांच्या रेटीनावर वाईट परिणाम होतो.

डोळ्यांना द्या आराम

how-to-take-care-of-eyes

ADVERTISEMENT

जेवढं शक्य असेल तेवढं फोनपासून लांब राहा. कॉम्प्यूटरवर कमीत कमी वेळ काम करण्याचा प्रयत्न करा. ते शक्य नसल्यास दर एक तासाने थोडा तरी ब्रेक घ्या. आवश्यक तेवढी झोप घ्या. कमी झोप झाल्यानेही डोळ्यांवर ताण पडतो. सतत मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीन बघणं टाळा, मधेमधे तुमचं लक्ष दुसरीकडे केद्रींत करा. जर तुम्हाला रोज लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरवर जास्त काम करणं आवश्यक असल्यास अँटीग्लेयर चष्म्याचा किंवा अँटीग्लेयर स्क्रीनचा वापर करावा.

मोबाईलचा करा कमीत कमी वापर

mobile-usage-time

मोबाइलचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करा. तसंच आपल्या डोळ्यांपासून मोबाईल लांब धरा. शक्य असल्यास कमी रेडीएशनवाला फोन खरेदी करा. कारण आजकाल प्रत्येक घरात जितक्या व्यक्ती तितके फोन असं समीकरण झालं आहे. त्यामुळे आपापसांतील संवादही कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच तणावही वाढत आहे. म्हणूनच सोशल मीडियापेक्षा सोशल लाईफमध्ये अॅक्टीव्ह राहा. आपापसातील नातेसंबंध सुधारण्यासाठी एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

गॅजेट्सवर अवलंबून राहू नका

dependence-on-gadgets

ADVERTISEMENT

रोजच्या आयुष्यात आपण नकळत अनेक गॅजेट्सवर अवलंबून राहू लागलो आहोत. जसं कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, वाटणासाठी मिक्सर अशा प्रत्येक छोट्या-छोट्या कामांसाठी आपण गॅजेट्सचा आधार घेत आहोत. पण तज्ज्ञांनुसार गॅजेट्सचा वापर हा सीमित काळासाठी केला पाहिजे. याचा अति वापर करू नये. यामुळे तुम्ही आळशी होता.

मग पुढच्या वेळी कोणतंही गॅझेट घेण्याआधी या गोष्टींचा विचार नक्की करा.

हेही वाचा –

मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

सकाळचा नाश्ता न केल्यास होऊ शकतात हे साईड इफेक्ट्स

फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने होणारे साईड ईफेक्ट्स

26 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT