ADVERTISEMENT
home / Natural Care
हातावरची जुनी मेंदी काढण्यासाठी घरगुती उपाय (How To Remove Mehendi In Marathi)

हातावरची जुनी मेंदी काढण्यासाठी घरगुती उपाय (How To Remove Mehendi In Marathi)

आजकाल प्रत्येक लग्नाच्या निमित्ताने किंवा एखाद्या फंक्शनच्या निमित्ताने हमखास मेंदी काढली जाते. पण फंक्शन झालं की परत ऑफिसला जायचं म्हणून काहींना मेंदी पटकन काढून जावी असं वाटतं. कारण आजकाल बऱ्याच ऑफिसेसमध्ये फिंगर प्रिंटने मार्क इन केलं जातं आणि हाताला मेंदी असेल तर अटेंडन्स लागणं जरा कठीणच होतं. तसंच ऑफिसमध्ये काम करतानाही हातातली मेंदी जरा खटकतेच. दुसरीकडे जोपर्यंत मेंदीचं डिझाईन (marathi mehndi design) छान आणि डार्क दिसत असतं तोपर्यंत हात बघायला छान वाटतो. पण जसं मेंदी फिकट होऊ लागते किंवा तिचे पापुद्रे सुटू लागतात. तिच्याकडे पाहायची इच्छा होत नाही. हौसेने लावलेली मेंदी मग नकोशी वाटू लागते.

झटपट मेंदी काढून टाकण्याचे घरगुती उपाय (How To Remove Mehendi With Homemade Hacks)

आता काळजी नको, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरच्या घरी हातावरील मेहंदी काढून टाकण्याचे घरगुती आणि सोपे उपाय. त्यामुळे नकोशी वाटणारी मेंदी तुम्हाला लगेच काढता येईल. मग वाचा घरच्या घरी मेंदीपासून सुटका मिळवण्याचे सोपे घरगुती उपाय

अँटीबॅक्टेरिअल सोप (Antibacterial Soap)

घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे अँटीबॅक्टेरिअल साबण. जर तुम्हाला मेंदी लवकरात लवकर जावीशी वाटत असेल तर साबणाने वारंवार हात धुवा. म्हणजे मेंदी लवकरात लवकर फिकट होईल.

%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B2 %E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA - How To Remove Mehendi In Marathi

ADVERTISEMENT

अँटीबॅक्टेरिअल सोपने तुमचे हात वारंवार धुवा. मेंदी घालवण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. त्वरित परिणामासाठी प्रत्येक तासाला हात धुवा किंवा किमान 10-12 वेळा हात धुवा जोपर्यंत मेंदी फिकट होत नाही. अँटीबॅक्टेरिअल सोप्स हे त्वचेसाठी थोडे हार्श असतात. त्यामुळे त्वचेवरील मेंदीचा थर निघण्यास मदत होते. वारंवार सोपने हात धुतल्यामुळे तुमचे हात ड्राय होऊ शकतात. तसंच मेंदीमुळेही हात कोरडे होतात. त्यामुळे वरील उपाय वापरल्यानंतर तुमच्या हातांना व्यवस्थित मॉईश्चराईज करायला विसरू नका.

तसेच सर्वोत्कृष्ट मेहंदी आहे याबद्दल देखील वाचा

मीठाचं पाणी (Salt Water)

मीठ हे तुमच्या शरीरातील वेदना आणि अपवित्रता तसंच तुमचं शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ करतं.

%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4

ADVERTISEMENT

एका बाऊलमध्ये खडे मीठ आणि पाणी घ्या. तुमचे हात त्यात किमान 20 मिनिटं बूडवून ठेवा आणि नंतर ते नीट पूसून घ्या. त्वरित परिणामासाठी निदान मेंदी जाईपर्यंत रोज एकदा वर सांगितल्याप्रमाणे मीठाच्या पाण्यात हात बूडवून ठेवावे. आधीच म्हटल्याप्रमाणे मीठ हे एक चांगल क्लेंजर असल्याने मेंदीचा रंग यामुळे निघतो आणि हळूहळू मेंदी फिकट होते. जास्त वेळ मीठाच्या पाण्यात हात बूडवून ठेवल्याने तुमच्या हाताची त्वचा खेचली जाते आणि ड्रायसुद्धा होते. त्यामुळे या उपायानंतर ताबडतोब मॉईश्चराईज करा.

स्क्रबिंग (Exfoliating Scrub)

जर तुन्हाला मेंदी हातावरून लवकर कशी निघेल असा प्रश्न पडला असेल तर एक्सफॉलिएशन हा चांगला उपाय आहे. त्यामुळे तुमच्याकडे चांगला फेस स्क्रब असल्यास हा उपाय तुम्ही लगेच अंमलात आणू शकता.

%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97 - How To Remove Mehendi In Marathi

तुमच्या हातांना तुमच्या आवडत्या स्क्रबने चांगला मसाज करा. किमान दोन ते तीन मिनिटं. जोपर्यंत मेंदी फिकट होत नाही तोपर्यंत हा उपाय रोज करा. स्क्रबमधील बीड्सला मेंदी घासली जाऊन डाग कमी होऊन काही काळाने नाहीसे होतात. कोणतंही एक्सफॉलिएटर वापरण्याआधी तुम्हाला त्याची अ्ॅलर्जी नसल्याची खात्री करून घ्या. हळूवारपणे स्क्रब हाताला चोळा. जास्त जोरात चोळल्यास हाताला इजा होऊ शकते. लक्षात ठेवा की, मेंदी बऱ्याचश्या प्रमाणावर फिकट होईल पण पूर्णतः निघणार नाही.

ADVERTISEMENT

कोमट पाणी (Warm Water)

कोमट पाणी हा अनेक समस्यावरील एक चांगला उपाय आहे. मग ते एखादा दुखरा भाग शेकणे असो वा क्लिन्ज करणे असो. कोमट पाण्याने आराम मिळतोच.

तुमचे हात 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यात बूडवून ठेवा. नंतर लुफाह तुमच्या हातावर हळूवार घासा. यामुळे मेंदी हळूहळू निघेल. चांगल्या परिणामासाठी दिवसातून एकदा तुमचे हात कोमट पाण्यात बुडवून ठेवा. तसंच तुम्ही दिवसातून दोन-तीन वेळा हात कोमट पाण्याने धुऊही शकता. कोमट पाण्याने मेंदीचे कण निघू लागतात. त्यामुळे हात चोळल्याने मेंदी निघू आरामात निघते. लक्षात घ्या की, पाणी जास्त गरम नसावे, नाहीतर तुमचे हात भाजू शकतात. तसंच तुम्ही वापरणार असणारा लुफाह मऊ असावा. हा उपाय करून झाल्यानंतर हाताला चांगलं मॉईश्चराईज करा म्हणजे हात ड्राय होणार नाहीत.

ऑलिव्ह ऑईल आणि मीठ (Olive Oil And Salt)

ऑलिव्ह ऑईल हे खरंच एक वरदान आहे. याचा अनेक फायदे आणि उपयोग आहेत. त्याचपैकी एक चांगला उपयोग म्हणजे मेंदी काढण्यासाठी. ज्याचे काही साईड ईफेक्ट्सही नाहीत.

एक कापसाचा बोळा घेऊन तो ऑलिव्ह ऑईल आणि मीठात बुडवा. आता हा कापूस संपूर्ण हाताला चोळा. निदान 10 मिनिटं तरी हे तेल त्वचेमध्ये मुरू द्या. जर तुम्हाला चालत असेल तर हात तसेच राहू द्या. कारण तुमच्या त्वचेत तेल शोषले जाईलच. त्वरित परिणांमासाठी तुम्ही दिवसांतून दोनतीनदा हा उपाय करून पाहू शकता. ऑलिव्ह ऑईल हे चांगल इम्लसिफायर असल्याने मेंदीचे डाग लगेच निघतात. त्यामुळे मेंदी काढण्याचा हा सोपा आणि चांगला उपाय आहे.

ADVERTISEMENT

बेकींग सोडा आणि लिंबाचा रस (Baking Soda And Lemon Juice)

लिंबू किंवा लिंबाचा रस हाही एक चांगला क्लिझिंग एजंट आहे. ज्याचे अनेक फायदे आणि उपयोग आहेत. त्यामुळे जुनी मेंदी काढण्याच्या दृष्टीने हाही एक स्वस्त आणि घरगुती उपाय आहे. आश्चर्य म्हणजे लिंबाच्या रसाचा वापर हा मेंदी काढल्या हातावर पडू नये म्हणूनही केला जातो. मेंदी हातावर काढून झाल्यानंतर लिंबू आणि साखरेचं पाणी लावलं जातं. त्याच लिंबाचा उपयोग हा जुनी झालेली मेंदी काढण्यासाठीही होतो.

%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97 %E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE %E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF %E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B0%E0%A4%B8

लिंबाचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक म्हणजे लिंबू चिरून डायरेक्ट हाताला चोळू शकता किंवा पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून त्यात हात बूडवून ठेऊ शकता. तत्काळ परिणामासाठी हा उपाय तुम्ही दिवसांतून दोनदा करू शकता. लिंबातील ब्लिचींग एजंट्समुळे मेंदीचा रंग आपोआप निघतो. पण लक्षात घ्या तुमच्या हातावर जर कापलेलं असेल किंवा जखम असेल तर लिंबाचा रस लावू नका. कारण त्यामुळे जखमेला किंवा कापलेल्या जागी झोंबू शकतं. हा उपाय केल्यानंतर मॉईश्चराईज करायला विसरू नका.

हायड्रोजन पेरॉक्साईड (Hydrogen Peroxide)

हायड्रोजन पेरॉक्साईड हे विषारी नाही. कोणत्याही मेडीकल किंवा कॉस्मेटीक शॉप्समध्येही सहज खरेदी करता येतं. बरेचदा नखाचं नेलपेंट काढण्यासाठी किंवा पेडीक्युअरसाठीही याचा वापर केला जातो. त्यामुळे घरातही हे उपलब्ध असतंच.

ADVERTISEMENT

%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8 %E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1 - How To Remove Mehendi In Marathi

एक कापसाचा बोळा घेऊन तो हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये बूडवा आणि हातावर हळूवार चोळा. काही मिनिटं तसंच ठेवून धुवून टाका. तुम्हाला लगेचच रिजल्ट दिसेल. याचा परिणाम लगचे दिसून येतो. त्यामुळे ही चांगली टेक्नीक आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडमधील ब्लीचिंग एजंट्समुळे मेंदीचे डाग काढणं सोपं जातं. पण लक्षात घ्या प्रत्येक प्रकारच्या त्वचेला हा उपाय चालेलच असं नाही. त्यामुळे हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा आणि मग संपूर्ण हाताला हायड्रोजन पेरॉक्साईड लावा.

टूथपेस्ट (Whitening Toothpaste)

हो.. टूथपेस्ट, जी तुम्ही रोज दात ब्रश करण्यासाठी वापरता. तुम्हीही टूथपेस्टचे अनेक उपयोग जाणून हैराण असालच. जसं चांदीचे दागिने चमकवण्यासाठी, कपड्यांवरील डाग काढण्यासाठी किंवा अगदी हातावरील मेहंदी काढण्यासाठीही.   

तुम्हाला फक्त हातावर भरपूर पेस्ट घेऊन ती मेंदी असलेल्या हातांवर लावायची आहे. मग तो हात सूकू द्या आणि धूवा. सुकल्यावर मेंदीचा रंग नक्कीच कमी झाला असेल. लवकर रिजल्टसाठी एकदाच लावणं पुरेसं आहे. पण तरीही मेंदी राहिल्यास एका दिवसाच्या गॅपने पुन्हा लावून पाहा. टूथपेस्टमधील अब्रेजिव्ह्स आणि डिटर्जंट्समुळे मेंदीचे डाग निघतात किंवा फिकट होतात. पण लक्षात ठेवा टूथपेस्ट लावण्याआधीही पॅचटेस्ट नक्की घ्या.

ADVERTISEMENT

नारळाचं तेल आणि साखर (Coconut Oil And Raw Sugar)

कोमट तेल आणि साखर हे मिश्रण एक चांगल एक्सफॉलिएंट एजंट म्हणून काम करतं.

जुनी मेंदी असलेल्या हातावर तेल चांगल लावा आणि ते त्वचेत मुरू द्या. यानंतर त्यावर साखरेचा थर लावा. काही वेळ हात तसाच ठेवा आणि मग लुफाहने चोळून स्वच्छ धुवा. शेवटी मॉईश्चराईज करा.

हेअर कंडीशनर (Hair Conditioner)

केसांना मॉईश्चराईज करणार हेअर कंडीशनर हे मेंदी काढून टाकण्यासाठी ही उपयोगी आहे.

मेंदी असलेल्या हातावर कंडीशनर लावा आणि ते त्वचेत चांगलं शोषलं जाऊ द्या. काही वेळाने हात पाणाने धूवून टाका.

ADVERTISEMENT

स्विमिंग (Go For A Swim)

हो.. मेंदी काढण्यासाठी स्विमिंग हाही एक चांगला उपाय आहे. याचे दोन फायदे आहेत, एक म्हणजे तुमची मेंदीही निघेल आणि दुसरं तुमचा फिटनेस गोलही पूर्ण होईल.

स्विमिंग पूलमधील क्लोरिनेटेड पाण्यामुळे त्वचेवरील मेंदीचा थर निघून जातो. साधारण 40 मिनिटं स्विमिंग केल्यावर तुम्हाला मेंदी फिकट झालेली दिसेल.

2 DIY मेहंदी काढण्याची पद्धत (DIY Methods To Remove Mehndi At Home)

पद्धत 1 (Method 1)

साहित्य : मीठ, ऑलिव्ह ऑईल, कापसाचा बोळा, बाऊल, सोप आणि पाणी.

स्टेप्स:

ADVERTISEMENT

पहिल्यांदा जुनी मेहंदी काढण्यासाठी पद्धत ऑलिव्ह आणि मीठाचं मिश्रण करून घ्या.

एका बाऊलमध्ये काही चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यात तेलाच्या प्रमाणानुसार एक ते दोन चमचे मीठ घाला. तेलात मीठ विरघळून घ्या.

आता हे ऑलिव्ह ऑईल आणि मीठाच्या मिश्रणात कापसाच्या बोळा बुडवा आणि मेंदी असलेल्या हाताला चोळा. काही वेळ या मिश्रणाने मेंदी असलेल्या ठिकाणी मसाज करत राहा. जोपर्यंत तुम्हाला रंग हलका झाल्यासारखा वाटत नाही. उपाय करून झाल्यावर हात स्वच्छ धुवा. पहिल्या प्रयत्नातच मेंदी निघेल. पण तरीही न निघल्यास दुसऱ्या दिवशी पुन्हा हा उपाय करा.

पद्धत 2 (Method 2)

साहित्य : लिंबू, बाऊल, कापसाचा बोळा, सोडा पावडर (बेकींग सोडा किंवा बेकींग पावडर), सोप, क्लिअर रॅप आणि पाणी.

ADVERTISEMENT

स्टेप्स :

पहिल्यांदा हातावरील मेहंदी काढण्याची पद्धत क्लिनींग सॉल्यूशन बनवून घ्या. यासाठी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि 2 चमचे सोडा पावडर घ्या आणि ते चांगल मिक्स करा.  

आता कापसाचा बोळा घेऊन त्या मिश्रणात बूडवून चांगला भिजवून घ्या. त्या कापसाच्या बोळ्याने जूनी मेंदी असलेल्या हातावर हे मिश्रण लावा. मिश्रण लावून झाल्यावर हाताला क्लिअर रॅपने गुंडाळा. निदान काही वेळ हात तसाच ठेवा.

काही वेळाने हाताला लावलेलं क्लिअर रॅप काढून टाका आणि हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धूवून घ्या. पण लक्षात ठेवा की, हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून पाहा.

ADVERTISEMENT

जर वरील उपायांचा वापर करूनही मेंदी निघाली नाही तरी निराश होऊ नका. कारण मेंदी जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसच हातावर टीकते. तुमचा हात जर पाण्यात जास्त वेळ राहत असेल तर मग मेंदी लवकर जाण्यास काहीच हरकत नाही. जर तुम्हाला मेंदीची अॅलर्जी असेल किंवा वरील एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असल्यास कोणताही उपाय वापरण्याआधी डर्मेटॉलॉजिस्ट सल्ला जरूर घ्या.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेही वाचा – 

नवरीच्या हातावर रंगलेल्या मेंदीवरून कळून येतं नवऱ्याचं प्रेम

ADVERTISEMENT

नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत

नखांशिवाय नेलपेंटचा असाही होऊ शकतो वापर

03 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT