ओठांवरील मिशी पुरुषांची शान असते. तर महिलांसाठी ओठांवरील केस श्राप असते. अशा फार कमी महिला असतील ज्यांना ओठांवर केस नसतील पण ज्यांना ओठांवर दाट लव असते त्यांना ती नकोशी होते. मग काय दर 15 दिवसांनी महिला पार्लरकडे धाव घेतात आणि ओठांवरील लव काढून घेतात. पण तुम्ही काही दिवस तुमचा चेहरा चांगला दिसावा म्हणून कोणत्या पद्धतीने केस काढता?त्या पद्धतीचा तुमच्या त्वचेवर काही परिणाम होऊ शकतो का? किंवा ती पद्धत योग्य आहे का? याची माहितीसुद्धा तुम्हाला असायला हवी. आज आपण अपर लीप (Upper lip) वरील केस काढताना काय काळजी घ्यायला हवी याविषयीच अधिक माहिती घेणार आहोत मग करायची का सुरुवात
अनावश्यक केस काढून आणा चेहऱ्यावर ग्लो, वाचा टीप्स
अप्पर लीपवरील केस काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकी मुख्यपद्धती आम्ही खाली दिलेल्या आहेत. त्या पाहुया
थ्रेडींग (threading) हा असा प्रकार आहे जो फारच सर्वसामान्य आहे आणि त्याहीपेक्षा स्वस्त आणि मस्त आहे म्हणून अनेक जण या पद्धतीचा अवलंब करतात. ओठांच्यावरील भागाला पावडर लावून आयब्रोजप्रमाणे ओठांवरील केस काढले जातात. 100 पैकी किमान 75 महिला तरी या पद्तीचा अवलंब करतात.
ओठांवरील केस काढण्यासाठी आणखी एक पद्धत म्हणजे वॅक्सिंग (waxing). इतर वॅक्सिंगप्रमाणेच तुमच्या ओठांवरील केस वॅक्सिंगने काढले जातात. एका फटक्यात हे केस निघतात. म्हणून अनेक जण ओठांवरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग करतात. हा प्रकार अनेक जणींना थ्रेडिंगपेक्षा बरा वाटतो म्हणून केला जातो.
केस काढण्यासाठी ज्यांच्याकडे पेशंस नावाची गोष्ट जास्त असते अशा व्यक्ती वेळ काढून हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर करतात. ही क्रिम लावून तुम्हाला थोडं पाच ते सहा मिनिटं वाट पाहावी लागते. त्यानंतर पाण्याने हेअर रिमुव्हल करण्याचा भाग तुम्हाला धुवून घ्यावा लागतो. तुमचे केस अगदी कसालाही त्रास न होता निघून जातात. शिवाय येताना त्यांची ग्रोथ कशी असेल याचीही फार काळजी करावी लागत नाही
तर झटपट आणि पटकन केस काढता येण्यासाठी इतर अवयांवरील केसांसोबतच खूप जण रेझरचा वापर करतात. आता हे खरं आहे की, त्यानंतर येणारी ग्रोथ ही थीक असते पण तरीदेखील अनेकजण घाईत असताना याचा वापर करतात. पार्लरमध्ये जाऊन ज्यांना थ्रेडिंग करायचे नसते अशा महिला मस्त शेव करुन ओठांवरील लव काढून टाकतात.
आता वरपैकी काहीच न करणाऱ्या महिला साधा सोपा आणि त्रास न देणारा पर्याय निवडतात तो म्हणजे ब्लिचींगचा. केस सोनेरी रंगाचे केल्यानंतर तुमचे केस दिसत नाहीत. त्यामुळे काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ज्या महिलांना तेथे होणारी जळजळ आणि जखम सहन होत नाही त्या महिला तेथील केस काढून टाकण्यापेक्षा त्यांना सोनेरी रंगाचे करुन झाकणे पसंद करतात. पण हे ब्लिचिंग योग्य सल्ल्याने झाल्यास उत्तम.
तुमचे केस पांढरे झालेत, मग घरच्या घरी असे काळे करता येतील तुम्हाला तुमचे केस
अपरलीप करताना तुम्हाला आधी तुमची त्वचा कशी आहे ते ओळखायचे आहे. म्हणजे जर तुमची त्वचा सेंस्टिव्ह (sensitive) प्रकारातील असेल तर तुम्हाला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण केस काढताना तुमच्या ओठांंवरील त्वचा ओढली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही वॅक्सिंग आणि थ्रेडींगच्या भानगडीत पडू नका.
अनेकांना घाईगडबडीत अंगावर रेझर फिरवण्याची सवय असते. जर तुम्ही ही केस काढण्यासाठी रेझरचा वापर करत असाल तर तुमचा तो रेझर वेगळा ठेवा. अपरलीप्ससाठी वापरणारे लेझर नेहमी वेगळे ठेवावे. बाजारात खास लहान आकाराचे रेझर मिळतात. ते तुम्ही घेतल्यास उत्तम. रेझर फिरवताना तुम्हाला सावकाश फिरवायचा आहे. ओठांवरील केस इतर केसांप्रमाणे जाड नसतात .त्यामुळे तुम्हाला रेझर पटापट फिरवण्याची काहीच गरज नाही. विशेषत: ओठांच्या कडांना जरा जरी रेझरची धार लागली तरी तुम्हाला तिथे जळजळ होऊ शकते. आणि तुम्ही सौंदर्य वाढवण्यासाठी जी गोष्ट करत आहात ती तुम्हाला महागात पडू शकते.
रेझर फिरवल्यानंतर ओठांवरील भाग कधीकधी अधिक जळजळू लागतो. ती जळजळ कमी होण्यासाठी तुम्हाला त्यावर अॅलोवेरा जेल लावायची आहे. तुम्हाला जरी जळजळ होत नसेल तरी तुम्ही तेथे अॅलोवेरा जेल लावल्या उत्तम तुम्हाला थंडावा वाटेल शिवाय पोअर्स ओपन झाल्यानंतर त्यामध्ये अॅलोवेरा जेल गेल्यास परत येणाऱ्या केसांची वाढ रुक्ष नसेल.
आता तुम्ही ओठांवरील केस काढताना तुम्हाला वॅक्स करायची सवयच झाली असेल तर तुम्ही एक काळजी घेणे गरजेची आहे ती म्हणजे वॅक्स करताना एक किंवा दोन स्ट्रोकमध्ये केस निघाले नाहीत. तर तुम्हाला संपूर्ण केस काढण्याचा हटट् सोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही वॅक्स पुन्हा लावून केस काढू नका. कारण त्यामुळे तुमची त्वचा नाहक ओढली जाते. वयोमानानुसार सैल होत जाते. त्यामुळे लक्षात ठेवा फक्त दोन स्ट्रोक .
*हल्ली वॅक्समध्येही अनेक प्रकार आहेत. म्हणजे हनी, चॉकलेट,स्ट्रॉबेरी, रिका असे वेगवेगळे वॅक्स सध्या वापरले जातात. तुम्हाला सूट होईल अशा वॅक्सची निवड करा.
रेझर फिरवल्यानंतर तुम्हाला नको असतील जाड केस तर मग या टीप्स करा नक्की फॉलो
ज्या प्रमाणे आयब्रोज केल्यानंतर तुम्हाला पार्लरवाली दीदी क्रिम लावून थोडा मसाज करुन देते. त्याने अगदीच रिलॅक्स वाटते. पण अपरलीप्सच्या बाबतीत तसे काहीच करु नका. कारण मसाज केल्यामुळे तुमची त्वचा अधिक लाल पडू शकते. तुमचा हनुमान करुन घ्यायचा नसेल तर या ठिकाणी मसाज करु नका.
थ्रेडिंग नंतर तुम्हाला अधिक जळजळ होत आहे असे वाटत असेल आणि अॅलोवेरा जेल जवळ नसेल तर तुम्ही बर्फदेखील चोळू शकता. पण बर्फही अगदी एक ते दोन मिनिटांसाठीच चोळा त्यावरही नाही.
हेअर रिमुव्हल क्रिम लावण्यास काहीच हरकत नाही. पण यातील केमिकल्स तुमच्या नाकातून लवकर शरीरात जाण्याची शक्यता असते.त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे याचा प्रयोग करताना सावधान
केस महिन्यातून किती वेळा ओठांवरील केस/ लव काढायला हवी?
हा प्रश्न नेहमीच महिला करतात. पण प्रत्येकाची केसांची वाढ ही वेगळी असते. काहींचे केस हे अगदी दुसऱ्याच दिवशी बारीक बारीक दिसू लागतात. तर काहींना महिन्यातून केवळ एकदाच अपरलीप्सवरील केस काढावे लागतात. पण सर्वसाधारणपणे तुम्ही महिन्यातून दोनदा केस काढले तर चालतील त्यापेक्षा जास्तवेळा तुम्ही तेथील केस काढले तर तुमचा ओठांकडील भाग अधिक रुक्ष, काळवंडलेला दिसू लागतो.
लेझर ट्रिटमेंट घेतल्यानंतर पुन्हा केस येत नाही का?
लेझर ट्रिटमेंट संदर्भात अनेकांना फारच प्रश्न असतात. म्हणजे लेझर ट्रिटमेंट करणे सुरक्षित आहे की नाही? एकदा लेझर केल्यानंतर पुन्हा केस कधीच येत नाहीत का? वगैरे…. जर तुम्ही लेझर करणार असाल तर लक्षात ठेवा की, व्यक्तिनिहाय याचे निकाल असतात. काही जणांना अजिबात केस येत नाही तर काही जणांना अगदी पातळ केस येतात आणि ते तुम्हाला फक्त रेझरने हलक्या हाताने काढले तरी चालतात.
ओठांवर वॅक्सिंग करणे चांगले नाही का?
किमान चेहऱ्यावर वॅक्सिंग करणे चांगले नाही कारण वॅक्सिंग करताना तुमची त्वचा ओढली जाते. ओठांवरील त्वचा फारच नाजूक असते जर तुमची त्वचा अधिक ओढली गेली तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो चेहऱ्याला वॅक्स करणे टाळा.