जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा तेलकट चेहऱ्याची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्याच्या दिवसात तेल आणि घामामुळे तेलकट त्वचा अजून खराब होऊ शकते. ज्यामुळे ऑईली स्कीनवर ब्लॅकहेड्स, पिंपल्स आणि अन्य त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच अशा त्वचेवर मेकअपही टीकत नाही. पण चिंता करण्याचं कारण नाही, आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची कशी काळजी घ्यावी याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.
ब्युटी एक्सपर्टनुसार अशा त्वचेवर जास्त सीबमचं उत्पादन होऊ लागतं आणि त्यामुळे त्वचा ऑईली होते. खासकरून जर तुमची त्वचा आनुवंशिकरित्या किंवा हार्मोन्समुळे तेलकट असेल तर अशा समस्या लगेचच दूर होत नाहीत. यासाठी सर्वोत्तम त्वचा काळजी उत्पादने कोणती हे जाणून घ्यायला हवं. चला तर मग जाणून घेऊया तेलकट म्हणजेच ऑईली त्वचेची काळजी कशी घ्यावी, तसंच काही घरगुती उपायही जाणून घेऊया.
कशी घ्यावी तेलकट त्वचेची काळजी
तेलकट त्वचेच्या काळजीसाठी घरगुती उपाय
तेलकट त्वचा असणाऱ्यांंनी काय खावं आणि काय खाऊ नये
खरंतर आपल्या चरबीयुक्त ग्रंथी आपली त्वचा नरम आणि आर्द्रतायुक्त राहण्यासाठी सीबमचं उत्पादन करतात. पण जेव्हा अधिक प्रमाणात सीबमच उत्पादन होतं तेव्हा तुमची त्वचा तेलकट दिसू लागते आणि त्यावर पिंपल्स येऊ लागतात. तेलकट त्वचेची दोन मुख्य कारण म्हणजे हार्मोन्स आणि अनुवंशिकता. हार्मोन्समध्ये होणाऱ्या चढउतारामुळे परिणामी एंड्रोजनमध्ये वाढ होते. त्यामुळे सीबमचे प्रमाण वाढते आणि शरीरामध्ये जास्त प्रमाणात एंड्रोजन असल्यास ते सीबम पोर्सच्या माध्यमातून बाहेर फेकलं जातं. हे सीबम त्वचेच्या बाहेरील भागावरील त्वचा तैलीय बनवतं.
जेव्हा अतिरिक्त तेल छिद्रात फसतं आणि मृत त्वचा कोशिका आणि बॅक्टेरियाची त्यात भर पडल्यास पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची निर्मिती होते. तेलकट त्वचा अनुवंशिकही असू शकते आणि त्यामुळे फक्त वारंवार चेहरा धुतल्यानेही समस्या संपत नाही. खरंतर ओव्हरवॉश किंवा स्क्रबिंगमुळे तुमच्या त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते. ज्यामुळे चरबीयुक्त ग्रंथी अधिक प्रमाणात तेल स्त्रवतात. आर्द्रता आणि गरम वातावरणामुळे, औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्सचाही परिणाम सीबमच्या उत्पादनावर प्रभाव पाडतो.
तेलकट त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण योग्य निगा न राखल्यास या प्रकारच्या त्वचेला पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या जाणवू शकते.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर इतर ऋतूंच्या तुलनेत ती उन्हाळ्याच्या दिवसात चिपचिपीत आणि अधिक तेलकट होते. त्यामुळे योग्य प्रकारच्या सनस्क्रीनची निवड करणं आवश्यक आहे. त्यामुळे असं सनस्क्रीन घ्या जे नॉन-ग्रिसी असेल. हे सनस्क्रीन 97 टक्के तुमची त्वचा युव्ही किरणांपासून सुरक्षित ठेवतं. ज्यामुळे तुमची त्वचा सनबर्न होत नाही. तसंच हे लावल्यामुळे तुमची तेलकटही दिसत नाही.
लक्षात ठेवा की, घाम आणि तेल हे तुमच्या तेलकट त्वचेसाठी जास्त हानीकारक आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे त्वचेवरील छिद्रात अजून धूळ अडकते. या कारणामुळे निदान उन्हाळ्याच्या दिवसात तरी तेलकट त्वचा एक्सफॉलिएट करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही केवळ स्क्रबचा वापर करा. जो तुमच्या स्कीन टोनलाही सूट करेल. स्क्रबच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रात अडकलेली धूळ स्वच्छ होण्यास मदत होते. संवेदनशील त्वचेसाठीघरी कशी घेता येईल तेलकट त्वचेची काळजी आठवड्यातून एकदा फेसवॉश किंवा स्क्रबचा वापर करा. जर तुमची त्वचा खूपच तेलकट होत असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा करा.
ब्लॉटींग शीट तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते. ज्यामुळे खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही तेलकट त्वचेसाठी ब्लॉटींग शीटचा वापर करा. हवं असल्यास तुम्ही बाहेर जातानाही तुमच्यासोबत ब्लॉटींग शीट कॅरी करू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या तेलकट चेहऱ्यावर उपाय जास्त प्रमाणात तेल दिसतं. कारण उन्हाळ्यात तुमच्या त्वचेतील ऑईल ग्लँड्स अधिक प्रमाणात सीबमचं उत्पादन करतात. त्यामुळे तुम्ही दिवसातून जास्त वेळा चेहरा धुता. पण हा समस्येवरील उपाय नाही. कारण यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. कारण वारंवार चेहरा धुतल्याने त्वचेतून जास्त प्रमाणात तेलाचं उत्पादन सुरू होतं. त्यामुळे तेलकट त्वचेला अनुकूल क्लींजर वापरा आणि त्यानेच तुमचा चेहरा दिवसातून फक्त दोनदा धुवा. पण लक्षात ठेवा की, हे क्लींजर ऑईल फ्री असावं.
तुमची तेलकट त्वचा असल्यास तुम्ही दिवसातून किमान दोनदा चेहरा धुतला पाहिजे. जर तुमची त्वचा जास्त तेलकट असेल तर तुम्ही तीनवेळाही चेहरा फेसवॉशने धुवू शकता.
टोनर अतिरिक्त तेल नियंत्रित करतं, तसंच त्वचेवरील छिद्र कमी करण आणि त्वचेला पीएच संतुलन बहाल करण्याचं कामही करतं. टोनर हे वॉटर बेस्ड असल्याने यामध्ये एस्ट्रीजंटही असतं. जे त्वचेला हायड्रेट करून ओलं करतं. पण काही टोनर्समध्ये अल्कोहोलही असतं. त्यामुळे टोनरमधील घटक वापरण्याआधी वाचून घ्या. ज्यामुळे त्वचा अति-शुष्क होते आणि त्वचा संवेदनशील असल्यास त्रासही होऊ शकतो. त्यामुळे हलक्या टोनरचा शोधात असल्यास अल्कोहोलविरहीत टोनर हा चांगला ऑप्शन आहे.
तेलकट त्वचा असलेल्यांनी नेहमीच चेहऱ्यासाठी मॉईश्चरायजरचा वापर करावा. मॉईश्चरायजरमुळे तुमच्या त्वचेतील आर्द्रता कायम राहते आणि त्यामुळे त्वचाही चांगली राहते.
तेलकट त्वचेची काळजी घेताना तुम्ही घरातील काही साध्या गोष्टींचाही वापर करू शकता. पाहा घरच्या घरी कशी घेता येईल तेलकट त्वचेची काळजी.
मध हा तुमच्या तेलकट त्वचेसाठी सर्वात चांगला घरगुती उपाय आहे. यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक गुण तेलकट त्वचेला फायदेशीर ठरतात. मध त्वचेतील आर्द्रता कायम राखतं. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि तेलासाठी चेहऱ्यावर मधाचा हलकासा थर लावा. तो किमान 10 मिनिटं ठेवा आणि सुकू द्या. नंतर गरम पाण्याने धुवून टाका. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रोजही तेलकट त्वचेसाठी मधाचा वापर करू शकता.
अंड्यातील पांढरा बलक आणि लिंबू हा तेलकट त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक उपचार आहे. दोन्हीही घटक हे अवयवातील छिद्र कमी करण्यास उपयोगी आहेत. लिंबू आणि इतर आंबट फळांमध्ये अॅसिड तेल शोषून घेण्यास मदत करतात. पण ज्यांना अंड्याची अॅलर्जी असेल त्यांनी हा पर्याय वापरू नये.
अंड्यातील पांढरा भाग आणि लिंबाचा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला लागेल 1 चमचा अंड्यातील पांढरा भाग 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर तोपर्यंत ठेवा जोपर्यंत ते सुकत नाही. मास्क सुकल्यावर कोमट पाण्याने धुवून टाका.
बदाम हे ना फक्त तुमची त्वचा एक्सफॉलिएट करण्याचं काम करतं तर त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि अशुद्धी घटक ही शोषून घेण्याचं काम करतं. बदामचा फेस स्क्रब वापरण्यासाठी कच्चे बदाम वाटून घ्या. मधाचे 2 मोठे चमचे यात घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने सुकल्यावर गरम पाण्याने चेहरा धुवून टाका.
कोरफड हा त्वचेच्या कंडीशनिंगसाठी खूप चांगला घरगुती उपाय आहे. तुम्ही झोपण्याआधी कोरफड जेल किंवा कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावू शकता. रात्रभर तसाच ठेवून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. जर तुम्ही आधी कधी कोरफडाचा वापर केला नसेल तर हातावर थोडा कोरफड गर घेऊन पॅच टेस्ट करा. जर तुमच्या चेहऱ्यावर साईडईफेक्ट दिसला नाहीतर तुम्ही याचा वापर नक्की करा.
टोमॅटोमध्ये असलेलं अॅसिड त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करतं आणि चेहऱ्यावरील छिद्रं खोलतं. एक टोमॅटो मास्क बनवण्यासाठी 1 चमचा साखरेत 1 टोमॅटोच्या गरात मिक्स करून त्वचेवर लावा. चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही तुमच्या त्वचेवर टोमॅटोचा गर किंवा टोमॅटोच्या स्लाईसही लावू शकता.
तेलकट त्वचेसाठी नेहमी वॉटर बेस्ड सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. तेलकट त्वचेसाठी मिळणाऱ्या खास सनस्क्रीनचा वापर करावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर जाताना सनस्क्रीन आवर्जून लावा आणि जर मेकअप केला असल्यास झोपायच्या आधी तो अवश्य रिमूव्ह करा. मेकअप तसाच ठेवून झोपल्यास कोणत्याही प्रकारच्या त्वचेला अपाय होऊ शकतो. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर वापर करा जे कोमल असेल.
तेलकट त्वचा असणाऱ्यांना खाण्यापिण्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पाहा कोणत्या गोष्टी तुम्ही खाणं टाळावं आणि कोणत्या गोष्टी आहारात सामील कराव्या.
काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं. जे तुमच्या त्वचेला अँटीऑक्सीडंटसोबतच हायड्रेटही करत होतं. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट त्वचा असणाऱ्यांनी काकडीचं सॅलड खाण्याचा सल्ला दिला जातो.
सुकामेव्यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं जे तेलकट असल्यास तुमची त्वचेची समस्या लगेच दूर होईल.
संत्र आणि लिंबू यासारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमीन सीसोबतच डिटॉक्सिफाइंग घटकही असतात जे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल बाहेर टाकतात. संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत.
हिरव्या भाज्यांमध्ये तेल किंवा चरबीची मात्रा नसतेच. त्यामुळे त्या फायबर समृद्ध असतात आणि त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते.
अवकॅडो हे फक्त खाण्यासाठीच नाहीतर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल रोखण्यासाठी चेहऱ्यावरही लावता येतं. तुमच्या त्वचेसाठी हे एक उत्तम मॉईस्चरायजरच्या रूपात काम करेल.
डाळींमध्ये भरपूर पोषण असतं. ते चेहऱ्यावरील तेलाचं उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा साफ राहते. तेलाचं संतुलन कायम राखण्यात डाळी खूप चांगल्या असतात. त्यामुळे डाळींना पोषक तत्व आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानलं जातं.
तेलकट त्वचेसाठी द्राक्ष खूपच उपयुक्त असतात. यातील व्हिटॅमीन सीमुळे तुमच्या त्वचेतील विषारी पदार्थांचं उत्सर्जन होतं. तसंच यात पाण्याचं प्रमाणही जास्त असतं.
सुकामेव्याप्रमाणेच माश्यांमध्येही ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यात मदत करतात आणि तेलकट त्वचा सुधारतं. ज्यामुळे पिंपल्स येत नाहीत.
ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं जे मानवी शरीरात आरामात शोषलं जातं. हे तेल नियंत्रित करतं आणि पिंपल्सचं प्रमाण कमी करतं.
डार्क चॉकलेट फक्त स्वादिष्ट नसून यातील अँटीऑक्सिडेंट्सच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील तेल रोखण्यासही मदत होते.
नारळ पाणी तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यात उल्लेखनीय आहे. हे त्वचा स्वच्छ आणि कोमल राखण्यास मदत करतं आणि तेलकट त्वचेच्या समस्याही कमी करतं.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही रोज केळ खाणं फायदेशीर आहे. यामध्ये फॉस्फेट, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ई असतं. जे चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतं. केळ हे एक मजबूत डिटॉक्सीफाइंग एजंट आहे.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर फक्त त्वचेची निगा राखून चालणार नाही तर त्यासोबतच खाण्यापिण्याच्या बाबतीतही काळजी घेणं आवश्यक आहे.
डेअरी प्रोडक्ट्समध्ये टेस्टोस्टेरोनसारखे हार्मोन्स असतात जे ग्रंथींमधील तेलाचं प्रमाण वाढवू शकतात आणि रोमछिद्रांना बंदही करू शकतात. जर तुमची त्वचा तेलकट आणि पिंपल्सयुक्त असेल तर तुम्ही दूध आणि पनीर यांचं सेवन कमीतकमी करा.
इंफ्लेमेट्री फॅट म्हणजेच सॅचुरेटेड फॅट आणि ट्रांस फॅट हे ना फक्त तुमचा हृदय रोग आणि अन्य आरोग्यदायक परिस्थितींचा धोका वाढवतात. याउलट अतिरिक्त सीबम उत्पादनात ही यांचं योगदान असतं. हे टाळण्यासाठी बदाम आणि अक्रोडसारखा सुकामेवा खावा.
जर तुमची स्कीन तेलकट असेल तर तुम्ही जास्त मीठ खाणं टाळावं.
तसंच तेलकट त्वचा असणाऱ्यांनी तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं ही टाळावं.
- संध्याकाळी तुमचा चेहरा फक्च पाण्याने धुवा.
- मेकअप किंवा अतिरिक्त सीबम काढण्यासाठी थोडासा साबण किंवा सौम्य क्लींजरचा वापर करा.
- सकाळी फक्त टोनरने स्प्रे करा. मॉईश्चरायजिंग मास्क किंवा ऑईली प्रोडक्ट्स लावणं टाळा.
- रात्री झोपण्याआधी केस बांधून झोपा आणि दर दोन दिवसांनी उशीचे अभ्रे बदला. कारण केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्समुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे रात्री झोपताना नेहमी केस बांधून झोपा आणि चेहऱ्यावर येऊ देऊ नका.
- चेहरा पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ टॉवेलचा वापर करा.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर बर्फाच्या तुकड्याने रब करा. हे त्वचेवरील छिद्र संकुचित करतं,ज्यामुळे ती छिद्र लहान होतात आणि अतिरिक्त तेल नियंत्रित करतात. त्यानंतर चांगल्या प्रायमरचा वापर करा जे विशेषकरून तेलकट त्वचेसाठी असेल. मग हलकंस कन्सीलर लावा. लक्षात ठेवा जास्त कंसीलर लावल्यास मेकअपला भेगाही पडू शकतात. मॅट फिनिशचं ऑईल-फ्री, नॉनटालोजेनिक मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा. दुपारच्या वेळी उन्हाने चेहऱ्यावर येणाऱ्या जास्तीच्या तेलाल तुम्ही ब्लॉटींग पेपरचा वापर करून थांबवू शकता.
हो. जेव्हा तुमच्यावरील तणाव वाढतो तेव्हा तुमच्या शरीरातील तणाव हार्मोन्स (stress hormones) कोर्टिसोलचा स्तर वाढतो. ज्यामुळे सीबम उत्पादन, तेलकट त्वचा आणि पिंपल्स वाढतात. महत्त्वपूर्ण कामांवर लक्ष केंद्रीत करा, पुरेशी झोप घ्या, योग्य खा आणि तणाव टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.
तेलकट त्वचा ही चेहऱ्यावरील अतिरिक्त सीबमच्या प्रमाणाचा परिणाम आहे. ज्याचं कारण हार्मोनल चढउतार आणि अनुवंशिकपणाही असू शकतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी खास तेलकट त्वचेसाठी मिळणाऱ्या मॉईश्चराईजर्सचा वापर करावा. कारण त्वचा सुकल्यावर तेल ग्रंथींना अजून सीबम उत्पादन करण्याचा संकेत मिळतो.चेहरा फेसवॉशने धुवू शकता