ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सत्य घटनेवर आधारीत ‘जजमेंट’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

सत्य घटनेवर आधारीत ‘जजमेंट’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

मराठी साहित्यामध्ये अशा अनेक कादंबऱ्या आहेत ज्या सत्य घटनांवर आधारीत आहेत. माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कांदबरीवर एक मराठी चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. जजमेंट असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले असून येत्या 24 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी मुंबईतील एका सोहळ्यात या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी लेखिका नीला सत्यनारायण, अभिनेता मंगेश देसाई आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित होते.

तेरे नामचा ‘राधे’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कसा आहे ट्रेलर?

आता हा चित्रपट सत्यघटनेवर आधारीत आहे म्हटल्यावर साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता वाढते.  ट्रेलर पाहिल्यानंतर मंगेश देसाई याने साकारलेला सायको आयपीएस अधिकारी चीड आणण्यास उद्युक्त करतो. मोठ्या पदाचा अधिकारी असूनही बायकोला कसपटासमान समजणारा हा अधिकारी आपल्या बायकोचा खून करतो. वडीलच आईचा खून करतात हे मुलगी पाहते. पण त्यावेळी काहीच करु शकत नाही. पण तब्बल 20 वर्षांनी ती मुलगी मोठी होऊन आपल्या आईच्या खूनाची शिक्षा वडिलांना देण्यासाठी पुन्हा केस सुरु करते. आता ती तिच्या अधिकारी वडिलांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देईल का? हे सांगणारा हा ट्रेलर आहे.

पाहा ट्रेलर



नीला सत्यनारायण यांनी सांगितला अनुभव

नीला सत्यनारायण यांच्या सत्यघटनेवर आधारीत कादंबरीवर हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. नीलाताईंनी त्यांच्या या कादंबरीमागील अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, की घटना आमच्याच एका अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील आहे. यातील एक- एक अनुभव खरा आहे. तो आता वेगळ्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहेच. पण ज्यावेळी मला त्या मुलीने तिचा अनुभव सांगितला त्यावेळी मी तिच्या या घटनेवर कादंबरी लिहायची ठरवली.

ADVERTISEMENT

‘जिवलगा’ मालिका आली प्रेक्षकांच्या भेटीला

मंगेश देसाईचा अफलातून अभिनय

एक अलबेला…,खेळ मांडला, बायोस्कोप अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या मंगेश देसाई याने या चित्रपटात ग्रे शेड असलेली भूमिका साकारली आहे. एक असा अधिकारी जो कायद्याचा वापर करत पत्नीच्या खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटतो. पण आपण काहीही चूक केली नाही याची खात्री तो सगळ्यांना पटवून गुन्हा गिळून आपले आयुष्य जगतो. पण त्याच्या गुन्ह्याची उकल करायला त्याची मुलगी कित्येक वर्ष वाट पाहते. त्यानंतर ही त्याच्यातील रग कमी झालेली नाही, या भूमिकेसाठीचा अभिनय मंगेशने इतका चपखल केला आहे की, ट्रेलरशेवटी तुम्हाला त्याचा रागच येईल.

निसाच्या डेब्युवर काजोलने काय केला खुलासा

काय आहे कथा?

एका सनदी अधिकाऱ्याला घरात मुलगा व्हावा असे वाटत असते. पण त्याला एकापाठोपाठ दोन मुली होतात. त्यामुळे तो सतत बायकोला मारहाण करत असतो. एक दिवस तो आपल्या पत्नीला मारुन टाकतो. नवऱ्याचा होणारा जाच तिच्या वडिलांनाही माहीत असतो. पण नातींचे आयुष्य वाऱ्यावर पडू नये म्हणून ते गप्प बसतात. घरात गिझरचा स्फोट झाला आणि बायको मेली असे कारण कोर्टात पटवून देत तो यातून सुटतो. शिवाय मुलींनाही तो निर्दोष असल्याचे कोर्टात सांगायला भाग पाडतो. पण त्या कुटुंबातील मोठ्या मुलीने तिच्या आईला बाथरुममध्ये वडिलांनीच आईला मारले होते हे पाहिले होते. वडिलांना शिक्षा मिळवण्यासाठीच ती वकील होते आणि योग्य वेळ आल्यानंतर ती तिच्या आईच्या मृत्यूची केस ओपन करते आणि लढा देते. हा वडील विरुद्ध खुनी बाप असा लढा आहे.

ADVERTISEMENT

(सौजन्य- youtube,instagram)

23 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT