ADVERTISEMENT
home / सौंदर्य
Multani Mitti Benefits In Marathi

त्वचेसाठी मुलतानी मातीचे फायदे (Multani Mitti Benefits In Marathi)

मुलतानी माती (Fuller Earth) कोणाला माहीत नसेल असं नाही. सर्वात जास्त वापरली जाणारी ही माती आपल्या सौंदर्यासाठी खूपच उपयुक्त ठरते असं म्हणतात. अर्थात आपली त्वचा अधिक चांगली होण्यासाठी क्लिन्झिंग म्हणून मुलतानी माती काम करते. आपली त्वचा अधिक मुलायम बनवण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होतो. चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्यास, त्वचेवरील डेड स्किन जाऊन त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार होण्यास या मातीचा जास्त उपयोग होत असतो. शिवाय मुलतानी माती हा उत्कृष्ट प्रकारचा चेहऱ्यासाठी मास्क आहे आणि त्यामुळेच इतर रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करण्यापेक्षा मुलतानी मातीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मुलतानी माती चेहऱ्यावर लावताना ओली असते पण नंतर सुकते. याचा अर्थ आपल्या चेहऱ्यावरील अधिक तेल मुलतानी माती काढून टाकत असते. मुलतानी माती फायदे आणि उपयोग आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

मुलतानी मातीची नावं
त्वचेसाठी मुलतानी मातीचे फायदे
केसांसाठी मुलतानी मातीचे फायदे
मुलतानी मातीचे फायदे
मुलतानी मातीने होणारं नुकसान
मुलतानी मातीसाठी आवश्यक टिप्स 
मुलतानी मातीचे फेस पॅक 

मुलतानी मातीचे गुण (Properties Of Multani Mitti)

मुलतानी मातीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यामध्ये तेल, पाणी आणि रंग शोषून घेण्याची क्षमता असते. याशिवाय यामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स असतात. मुख्य स्वरूपात हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट असतं आणि त्याशिवाय मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियमचंदेखील खूप चांगलं प्रमाण असतं. वास्तविक ही माती दिसायला अतिशय साधारण दिसते. पण याचे कण अतिशय बारीक असतात आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. साधारण मातीपेक्षा याचं वेगळेपण म्हणजे यातील पाणी आरामात शोषून घेतलं जातं. ही माती कोणत्याही गोष्टीतील रंग हटवू शकते आणि कोणत्याही गोष्टी शोषून घेऊ शकते. त्यामुळे चेहरा असो वा शरीर अथवा केस, तेल शोषून घेण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करण्यात येतो.

कॉस्मेटिक आणि डर्मेटोलॉजीमध्ये मुलतानी मातीचा उपयोग (Use Of Multani Mitti In Cosmetics And Dermetology)

मुलतानी मातीचा सर्वात जास्त उपयोग हा कॉस्मेटिक आणि डर्मेटॉलॉजीमध्ये करण्यात येतो. याचे अप्रतिम गुण चेहऱ्यावरील माती, तेल आणि घाण साफ करण्यास उपयोगी आहे. त्याच कारणामुळे सर्व ब्यूटी आणि वैद्यकीय क्षेत्रात याचा सर्रास वापर केला जातो. विशेषतः कॉस्मेटिक्स अर्थात सौंदर्यप्रसाधन क्षेत्र आणि अॅक्ने आणि अन्य त्वचेच्या प्रॉब्लेम्सच्या उपचारासाठी याचा वापर करण्यात येतो. याशिवाय मुलतानी मातीचा वापर वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी इंडस्ट्रीयल ऑईलच्या रिजनरेशनसाठीदेखील करण्यात येतो.  

ADVERTISEMENT

मुलतानी मातीची नावं (Types Of Multani Mitti)

वापरानुसार मुलतानी माती ही काही वेगळ्या नावानेदेखील ओळखली जाते –

  • ब्लिचिंग क्ले – या मातीला ब्लिचिंग क्ले असंही म्हटलं जातं, कारण ही माती कोणत्याही कपड्याला ब्लीच केल्यास, चांगली सफेदी देते.
  • व्हायटनिंग क्ले – जेव्हा चेहऱ्यावर पिगमेंटेशनसारख्या समस्या उद्भवतात तेव्हा याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे याला व्हायटनिंग क्ले असंही म्हणतात.
  • मुलतानी माती – मुलतानी माती असं नाव यासाठी देण्यात आलं आहे की, जुन्या काळात जेव्हा सौंंदर्यप्रसाधन क्षेत्रात याचा वापर करण्यात येत होता. तेव्हा ही माती पाकिस्तानमधील मुलतानमधून मागवण्यात येत होती.

Tanning oil आणि सनस्क्रिनमध्ये नेमका फरक काय

मुलतानी मातीचा उगम कुठून झाला (Origin Of Multani Mitti)

वास्तविक मुलतानी माती ही जगभरात बऱ्याच ठिकाणी मिळते आणि याचा उपयोग जगभरात सगळीकडे करण्यात येतो. पण याव्यतिरिक्त जगभरात सौंदर्यप्रसाधन आणि वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी कुठे जास्त प्रमाणात तर कुठे कमी प्रमाणात याचा उपयोग केला जातो. वर्ष 2005 मध्ये अमेरिका या मातीचा सर्वात मोठा उत्पादक होता जो साधारणम 70 टक्के मुलतानी मातीचं उत्पादन करत होता. त्यानंतर जपान आणि मेक्सिको यांनी उत्पादनात बाजी मारली. अमेरिकेत मुलातानी माती अर्थ फुलर्स अर्थ वॉल्कॅनोची राख बनवण्यात येते. तर अमेरिकेत साधारणतः याच्या 24 राज्यांमध्ये खाणी आहेत. पण मुळात याचा उगम हा पाकिस्तानमधील मुलतानमध्ये झाल्यामुळेच याचं नाव मुलतानी असं ठेवण्यात आलं आहे.

मुलतानी मातीचे फायदे (Benefits Of Multani Mitti In Marathi)

सौंदर्याच्या बाबत जर मुलतानी मातीच्या फायद्याबाबत सांगायचं झालं तर ही माती त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला याचे अप्रतिम फायदे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

त्वचेसाठी मुलतानी मातीचे फायदे (Multani Mitti For Skin)

त्वचेसाठी मुलतानी मातीचे फायदे

  • मुलतानी मातीचा उपयोग हा नैसर्गिक स्क्रब (Natural Scrub) म्हणून करण्यात येऊ शकतो
  • मुलतानी माती त्वचेवरील व्हाईट आणि ब्लॅक हेड्स (White and Black heads) काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे
  • मुलतानी माती डेड सेल्स (remove dead cells) काढून टाकून त्वचा क्लिन करते आणि त्वचेवरील घाण साफ करून उत्कृष्ट क्लिन्झर म्हणून काम करते
  • मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम असतं जे चेहऱ्यावरील पिंपल्स काढून टाकण्यासाठी मदत करतं. तसंच चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठीही याची मदत होते
  • मुलतानी माती त्वचेवरील सर्व अशुद्धता घालवते आणि तुमच्या त्वचेसाठी ही उत्कृष्ट टोनर म्हणूनही काम करते
    तुमची त्वचा तेलकट (oily skin) असल्यास, मुलतानी मातीसह गुलाबपाणी घालून त्वचेवर लावा. त्यामुळे तुमची त्वचा अगदी बॅलेन्स्ड होईल
  • गाजरासह मुलतानी माती चेहऱ्याला लावल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते
    मुलतानी माती ब्लड सर्क्युलेशन (Blood Circulation) सुधारते आणि त्यामुळे त्वचेवर चमक येते
  • त्वचेवर चमक आणण्यासाठी मुलतानी मातीचे घरगुती मास्क बरेच जण वापरतात आणि ते फायदेशीरदेखील असतात
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी मुलतानी मातीचा चांगला उपयोग होतो
  • सनटॅन आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठीदेखील याचा उपयोग असरदार आहे
  • मुलतानी मातीमध्ये तुम्ही इसेन्शियल ऑईल घालून चेहऱ्याला लावल्यास, तुमची त्वचा अगदी मऊ आणि मुलायम होते
  • मुलतानी माती एक अँटीएजिंग एजंटसुद्धा मानली जाते

केसांसाठी मुलतानी मातीचे फायदे (Multani Mitti For Hair)

  • मुलतानी माती केसांना कंडिशन करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे
  • तुम्हाला जर केसगळतीची समस्या असेल तर त्यासाठीदेखील तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता
  • तुम्हाला तुमचे केस मजबूत, काळे आणि मऊ हवे असतील तर नियमित स्वरूपात मुलतानी मातीचा हेअर मास्क लावायला हवा
  • आवळ्याच्या रसाबरोबर मुलतानी मातीचा पॅक बनवून केसांना लावा, त्यामुळे तुमच्या केसांमध्ये नैसर्गिक चमक राहील

Also Read Home Remedies For Acne Scars In Marathi

आरोग्यासाठी मुलतानी मातीचे फायदे (Health Benefits Of Multani Mitti)

आरोग्यासाठी मुलतानी मातीचे फायदे

  • मुलतानी माती अँटीसेप्टीक एजेंट असून याचा उपयोग स्किन इरिटेशनसाठी करण्यात येऊ शकतो
  • त्वचेवर आलेले रॅश आणि सूजदेखील मुलतानी मातीमुळे कमी होतात. शिवाय तुम्हाला जर एखाद्या गोष्टीपासून
  • त्वचेवर अलर्जी आली असेल तर त्यासाठीदेखील तुम्ही मुलतानी मातीचा उपयोग करू शकता
  • याशिवाय महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी उद्भवणाऱ्या मसल्समधील ताण, सनबर्न किंवा त्वचेवरील जळजळ या सर्व गोष्टींवरदेखील मुलतानी मातीचा उपयोग करता येऊ शकतो. त्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते
    याचा उपयोग तुम्ही बॉडी वॉश म्हणूनदेखील करू शकता
  • याशिवाय मुलतानी मातीचा उपयोग कपड्यांवरील ग्रीस, तेल, वॅक्स अथवा रक्ताचे दाग काढण्यासाठीदेखील केला जातो

मुलतानी मातीमुळे होणारं नुकसान (Side Effects Of Multani Mitti)

माती असो वा मुलतानी माती कधी ना कधी तरी तुम्हालाही खावी असं वाटलं असेल ना? पण तुम्हाला माहीत आहे का ही एक इटिंग डिसऑर्डर अर्थात खाण्याचा आजार आहे. बऱ्याचदा तुमच्या शरीरातील काही कमतरतेमुळे तुम्हाला माती खावीशी वाटते. पण मातीमधील काही तत्व ही तुमच्या शरीरासाठी बाधक असतात. याशिवाय साध्या मातीमुळे तुमच्या पोटामध्ये जंत निर्माण होण्याचीही शक्यता असते, तिथे मुलतानी माती खाल्ल्यास, ही शक्यता कमी असते. पण तुम्ही मुलतानी माती जास्त खाल्ल्यास, किडनी स्टोन अर्थात मुतखडा आणि आतड्यांमध्ये अडचण निर्माण होते.

ADVERTISEMENT

वाचा – त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया 

मुलतानी माती खाणं कसं सोडावं (How To Remove The Habit Of Eating Multani Mitti)

तुम्हाला जर मुलतानी माती (Fuller Earth) खायची सवय असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा ही माती कमी खायची कमी करा. कमी कमी करत याची मात्रा अगदी कमी प्रमाणावर आणा. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा ही माती खाल तेव्हा ती पोटापर्यंत जाऊ देऊ नका. तोंडात त्या मातीचा स्वाद घ्या आणि मग थुकून टाका. त्यानंतर ब्रश करा. असं तुम्ही केलंत तर तुमची माती खायची सवय लवकरच सुटेल.  

मुलतानी मिट्टीसाठी आवश्यक टिप्स (How To Use Multani Mitti)

1. मुलतानी माती ही खरंतर खूप स्वस्त असते. पण तरीही मुलतानी मातीऐवजी कोणीही तुम्हाला दुसरं उत्पादन देऊ शकतं. त्यामुळे ही खरेदी करताना याचा रंग पिवळा आहे की नाही याची खात्री करून मगच खरेदी करावी.

2. थंड आणि सुक्या ठिकाणी ही माती ठेवा. या मातीला हवा अथवा सूर्यकिरण लागू देऊ नका. या मातीला हवा लागल्यास, ही माती ओली होऊन खराब होते. तसंच सूर्याच्या किरणांमुळेदेखील ही माती खराब होते. त्यामुळे ही माती फ्रिजमध्ये अथवा कोणत्याही हवा न लागणाऱ्या ठिकाणी ठेवा.

ADVERTISEMENT

3. मुलतानी माती नियमित स्वरूपात आपली त्वचा साफ करण्यासाठी वापरा. त्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यासकट संपूर्ण शरीरावर पाणी लावून मुलतानी मातीचा एक थर लावा. हा थर सुकल्यानंतर अथवा साधारण 15-20 मिनिट्स ठेवल्यानंतर कोमट पाण्याने साफ करा.

मुलतानी मातीचा फेस पॅक (Multani Mitti Face Pack In Marathi)

मुलतानी मातीपासून बनलेले मास्क हे त्वचेमधून तेल आणि घाण काढून टाकतात. त्यामुळे हा त्यावर उत्कृष्ट उपाय आहे. याशिवाय त्वचेचे जास्त प्रॉब्लेम्स अर्थात पिंपल्स आणि अॅक्ने दूर करण्यासाठी प्रभावी आहे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ही मुलतानी माती उपयोगी आहे. तसंच त्वचेवरील गोरेपणा, त्वचेचा रंग खराब झाल्यास अथवा सूर्यामुळे त्वचा काळवंडली असल्यास, मुलतानी मातीमुळे यावर बराच फरक पडतो. ही माती स्किन टायटनिंग आणि स्किन व्हाईटनिंगसाठी खूपच चांगला उपाय आहे. तुम्हालादेखील घरच्याघरी फेस पॅक करायचा असेल तर मुलतानी मातीचा कसा उपयोग करता येऊ शकतो हे आम्ही तुम्हाला सांगतो –

वाचा – कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल

1. त्वचा मुलायम करण्यासाठी बदामासह बनवा फेसपॅक (Multani Mitti Face Pack For Soft Skin)

मुलतानी माती आणि बदामाचा फेस पॅक त्वचा मऊ बनवते. दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा बदाम कापून घाला आणि मग दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा. 20 मिनिट्स नंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. तुमचा चेहरा मऊ तर होतोच शिवाय चमकदारदेखील होतो.

ADVERTISEMENT

2. चेहरा साफ करण्यासाठी संत्र्याची सालं आणि चंदनासह बनवा स्क्रब (Multani Mitti Face Pack For Clear Skin)

तुम्हाला जर तुमचा चेहरा एकदम क्लीन आणि क्लिअर हवा असेल तर तुम्ही दोन चमचे मुलतानी मातीमध्ये संत्र्यांची सुकलेली सालं आणि चंदनची पावडर घालून स्क्रब करा. जास्त प्रमाणात हे बनवून तुम्ही एका टाईट कंटेनरमध्ये ठेऊन द्या. त्यानंतर तुम्हाला हवं तेव्हा काढून त्यात दूध मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्याला वा शरीराला लावून बॉडी स्क्रब करा. हे एक उत्कृष्ट क्लिन्झर आहे.

3. सावळ्या त्वचेसाठी गाजर आणि ऑलिव्ह तेलाचा फेस पैक (Multani Mitti Face Pack For Dark Skin)

तुमची त्वचा सावळी असेल तर तुम्ही दोन चमचे मुलतानी माती घ्या. त्यात दोन चमचे गाजराचा किस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. हे पॅक चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटानंतर तुमचा चेहरा धुवा.

4. त्वचा टायटनिंगसाठी दूध और चंदनाचा फेस पॅक (Multani Mitti Face Pack For Skin Tightning)

Multani Mitti Face Pack For Skin Tightning

तुम्हाला तुमची त्वचा जर टाईट हवी असेल आणि तेलमुक्त राहायला हवी असेल तर दो चमचे मुलतानी मातीबरोबर दूध आणि चंदन पावडर एका बाऊलमध्ये समान प्रमाणात घ्या आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लाऊन 30 मिनिट्स असाच ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.

ADVERTISEMENT

5. साखर आणि नारळ पाण्यासह अँटीएजिंग फेसपॅक (Anti Aging Face Pack)

मुलतानी माती दोन मोठे चमचे, त्यात दोन मोठे चमचे नारळपणी आणि एक लहान चमचा साखर घालून घ्या. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. जेव्हा हे सुकेल तेव्हा चेहरा गरम वा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करतो आणि खूपच उपयुक्त आहे.

6. कोरड्या त्वचेसाठी अंडे आणि मधाचा फॅसपॅक (Multani Mitti Face Pack For Dry Skin)

एक मोठा चमचा दुधाची पावडर आणि एक चमचा कणीक घेऊन त्यात अंड्याचा पिवळा भाग एक चमचा मिसळावा आणि त्यात दोन मोठे चमचे मुलतानी माती घाला. हा फेसपॅक कोरड्या त्वचेची चमक राखून ठेवण्यासाठी लावण्यात येतो.

7. चमकदार त्वचेसाठी लिंबू दह्यासह फेसपॅक (Multani Mitti Face Pack For Glowing Skin)

दोन चमचे मुलतानी मातीबरोबर एक चमचा दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. आता आपल्या चेहऱ्यावर तसंच गालावर हा पॅक लावून साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा आणि सुकल्यावर थंड पाण्याने तोंड धुवा.

8. त्वचा व्हायटनिंगसाठी बटाट्याबरोबर फेसपॅक (Skin Whitening Face Pack)

दोन मोठे चमचे मुलतानी मातीबरोबर दोन मोठे चमचे बटाट्याची पेस्ट घ्या आणि तुमच्या चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावा. आता 20 मिनिट्स तसंच ठेऊन द्या आणि सुकल्यावर हे थंड पाण्याने धुऊन टाका.

ADVERTISEMENT

9. तेलकट त्वचेसाठी मध – टॉमेटो आणि लिंबाच्या रसासह फेसपॅक (Multani Mitti Face Pack For Oily Skin)

Multani Mitti Face Pack For Oily Skin

तुमची त्वचा तेलकट असेल्यास, तुम्ही दोन चमचे मुलतानी माती त्यात एक मोठा चमचा टॉमेटो रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घाला. आता हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका.

10. पिंपल्स काढण्यासाठी लिंबू – गुलाबपाण्यासह फेसपॅक (Multani Mitti Face Pack For Acne & Pimple)

दोन चमचे मुलतानी मातीबरोबर 1-1 चमचा लिंबू रस आणि गुलाबपाणी घ्या आणि चेहऱ्याला हे लावा. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात पुळ्या आल्या असतील तर त्यामध्ये लिंबाची पावडरदेखील मिसळली तरी चालेल. चेहऱ्यावर हा लावलेला फेसपॅक सुकल्यानंतर अर्धा तासाने थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुमची त्वचा चमकदार बनवतो. चेहऱ्यावरील डाग मिटवतो आणि त्याशिवाय तुमची त्वचा बॅक्टेरियामुक्त करतो.

 

ADVERTISEMENT
13 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT