ADVERTISEMENT
home / Party
वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात अशा डेनिम जीन्स

वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात अशा डेनिम जीन्स

डेनिम फॅब्रिक वापरून बनविलेली जीन्स सर्वच वयोगटातील लोकांना आवडते. खरं तर ही आवडण्याचं कारण म्हणजे या कपड्यात जास्त कम्फर्टेबल फील होतं. सध्या उन्हाळा असला तरीही डेनिम ही अशी फॅशन आहे जी आपण कायमस्वरूपी फॉलो करत असतो. कोणाला कधी काय आवडेल हे सांगता येत नाही. बऱ्याच फॅशन बदलत असतात, पण डेनिमची फॅशन कधीच बदलत नाही. कोणत्याही प्रकारच्या टॉप, शर्ट, टी-शर्टच्या खाली जीन्स चांगली शोभून दिसते. चांगल्या दर्जाच्या जीन्सची जास्त काळजी घ्यावी लागत नाही, तसंच ती दीर्घकाळ टिकते. सध्याचा ट्रेंड आणि ग्राहकांना नक्की काय आवडत आहे हे लक्षात घेऊन ‘POPxo मराठी’ने स्पायकरच्या GYM JNS चा आढावा घेतला. या नव्या कलेक्शनमध्ये डेनिम जिम, कॉलेज, ऑफिस, डेटसाठी किंवा नाईट पार्टीसाठी वापरण्यास अनेक जीन्स आहेत. डेनिमचे विविध प्रकार आहेत. डेनिम सहसा दोन बाजूने स्ट्रेच्ड होते पण ही नवी जीन्स चार बाजून स्ट्रेच्ड होणारी आहे. तसंच लवकर वाळण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्यातदेखील या जीन्स घालणं तुमच्यासाठी चांगलं आहे. डेनिम्सच्या अशा कोणत्या वेगवेगळ्या जीन्स आहेत ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात आलू शकता आणि त्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात अशा जीन्स हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या जीन्स

रॉ वॉश्ड जीन्स –

jeans 1

गडद रंगाची शेड असलेली जीन्स सेमी फॉर्मल कार्यक्रमांसाठी शोभून दिसते आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी सुद्धा चांगला पर्याय आहे. लाईट ब्लू आणि मध्यम निळ्या रंगातील जीन्स संपूर्ण दिवसभर वापरली जाऊ शकते. 

पाच खिसे असलेली जीन्स –

पाच खिसे असलेली जीन्स एक कायमस्वरूपी वापरातील जीन्स आहे, जी कधीही फॅशन मधून बाहेर जात नाही अर्थात आऊट ऑफ फॅशन होत नाही. क्लासिक इंडिगो जीन्स किंवा चांगल्या दर्जाचे डेनिम फॅब्रिकपासून बनविलेल्या कोणत्याही कपड्याची केलेली निवड चुकत नाही. ही डेनिम कोणाच्याही वॉर्डरोबमधून कधीही गायब न होणारी गोष्ट आहे.

ADVERTISEMENT

स्पायकर GYM JNS –

jeans 3

यामध्ये डेनिम मध्ये कुलोट्स, जिम जीन्स, मॉम जीन्स असे प्रकार आहेत. यामध्ये वापरलेले फॅब्रिक वजनाने हलके तरीही मजबूत असल्याने जिम मध्ये तर वापरता येतेच, शिवाय उन्हाळ्यातही ती आरामदायी वाटते. कॉन्सर्टसाठी उत्तम पर्याय आहे. डेनिम शॉर्ट तुम्हाला स्मार्ट लुक देईल, त्याच सोबत जिम जीन्सवर डेनिम जॅकेट घालून तुम्ही स्टायलिश दिसू शकता.

डेनिम लुक –

jeans 2

डेनिम ट्रकर, शर्ट आणि जीन्स किंवा जॉगर्स सारखे कपडे मजबूत असतात. तसेच त्यांना जास्त जपावे लागत नसल्याने संध्याकाळी पार्टीला जाताना, वीकेंडला मित्रांसह फिरताना अधिक या कपड्यांचा अधिक चांगला उपयोग होतो. डेनिम मध्ये उच्च दर्जाचे कॉटन असल्याने उन्हाळ्यात कुठेही फिरताना आरामदायक वाटते.

ADVERTISEMENT

इंडिगो डाईड जीन्स –

मिड वॉश्ड इंडिगो डाईड जीन्सची क्लासिक जोडी प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये असणे आवश्यक आहे. एखाद्या कार्यक्रमात ड्रेस कोड नसल्यास जीन्स तिथे खूप उपयोगी येते. संध्याकाळी इव्हेंटसाठी जात असल्यास गडद निळ्या किंवा काळ्या रंगाची गडद जीन्स परफेक्ट शोभून दिसेल. जर गडद रंगाचे शर्ट किंवा टॉप घालत असाल तर, त्या खाली त्याच रंगातील फिक्यारंगाची जीन्स परिधान करा.   

हेदेखील वाचा

तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असायला हवेत डेनिमचे ‘हे’ आऊटफिट्स

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज

ADVERTISEMENT

कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

 

20 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT