ADVERTISEMENT
home / भविष्य
वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका

वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका

काही जणांंना इतरांच्या गोष्टी वापरण्यात काहीच गैर वाटत नाही. भावंडाच्या अथवा मित्र-मैत्रिणींच्या कपड्यांपासून सर्वच गोष्टींवर जणू आपला हक्क आहे असं अनेकांना वाटत असतं. मात्र लक्षात ठेवा इतरांच्या काही गोष्टी वापरल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. वास्तूशास्त्रानूसार काही गोष्टी वापरू नयेत. कारण त्यांच्यामधील ग्रहदोषांमुळे त्या वस्तूंच्या माध्यमातून तुमचं नुकसान होऊ शकतं. यासाठी दुसऱ्यांनी वापरलेल्या या गोष्टी चुकूनही वापरू नका. यासाठीच अशा कोणत्या गोष्टी नुकसानकारक आहेत हे जरूर जाणून घ्या. तसेच यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)

चप्पल-

used footwear

समजा तुम्ही एखाद्या मंदीरात गेला आणि तिथे तुमच्या चपला चोरी झाल्या तर रागाने इतरांच्या चपला घालून घरी जावू नका. कारण इतरांच्या चपलांमधील निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. असं म्हणतात की चपला चोरीला जाणं म्हणजे दारिद्र कमी होणं. त्यामुळे इतरांचे दारिद्र घरी घेऊन येवू नका. त्याऐवजी नवीन चपला घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल.

ADVERTISEMENT

रुमाल –

used hankey

अनेकदा घरातील मोठी माणसे तुम्हाला इतरांचा रूमाल वापरू नका. मात्र त्यामागची कारणे माहीत नसल्यामुळे आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र इतरांचा वापरेला रूमाल वापरल्यामुळे घरात क्लेष निर्माण होऊ शकतात. शिवाय वैज्ञानिकदृष्टा बघायला गेलं तर इतरांच्या रूमालामधील घाण अथवा बॅक्टेरियामुळे तुम्हाला इनफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे इतरांचे वापरलेले रूमाल वापरणं धोक्याचं असू शकतं.

गादी अथवा बेड –

ADVERTISEMENT

bed

प्रत्येकाने आपल्या गादी अथवा बिछान्यामध्ये झोपणं हेच हितकारक असू शकतं. इतरांच्या बेडवर झोपण्यामुळे वास्तूदोष होऊ शकतो. इतरांच्या बेडवर झोपल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

कपडे –

used clothes

ADVERTISEMENT

बऱ्याचजणांना  इतरांचे वापरलेले कपडे घालण्याची सवय असते. भावंडे अथवा मित्र-मैत्रीणींचे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही असे अनेकांना वाटते. अनेकजण वापरलेले कपडे इतरांना दान करतात.  मात्र असे इतरांचे कपडे घालणं धोक्याचं ठरू शकतं. कारण असं केल्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते.

पेन –

pen

अनेकांना पेन विसरण्याची सवय असते. जेव्हा अशा  लोकांना काहीतरी लिहावं लागतं तेव्हा पटकन इतरांचं पेन ते वापरतात मात्र काम झाल्यावर अशी माणसं ते पेन आपल्याच खिषात टाकून निघून जातात. एकतर असं वागणं हे मुळातच चुकीच आहे शिवाय याचे चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण असे केल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी कोणाचेही पेन वापरू नका आणि कोणालाही तुमचे पेन वापरण्यास देऊ नका.

ADVERTISEMENT

घड्याळ –

wrist watch

हातामध्ये वापरण्याचे  घड्याळ देखील कधीच कोणी वापरलेले घेऊ नये कारण त्यामध्ये देखील वापरण्याऱ्या व्यक्तीची निगेटिव्ह अॅनर्जी असते. ज्यामुळे तुमचे अतोनात नुकसान होऊ शकतं. असं वापरलेलं घड्याळ वापरल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान आणि अपयशाचा सामना करावा लागू शकतो.

तुमचं लकी चार्म –

ADVERTISEMENT

lucky charms things

प्रत्येकाच्या आयुष्ययात एक लकी चार्म असतो. एखादी अशी गोष्ट जी तुमच्यासाठी फारच लकी असते. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो अशी गोष्ट कधीच इतरांना देऊ नका. कारण यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचंही नुकसान होऊ शकतं.

कलियुगातही वरदान ठरणारी तुळशीची पानं – Benefits Of Tulsi Leaves In Marathi

उन्हाळ्यात ही ५ फळं ठेवतील तुम्हाला ‘हायड्रेट’

ADVERTISEMENT

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

31 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT