‘बदल हा नेहमीच होत असतो’ हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अगदी फिट होतं. साडी हा तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. साडी आवडत नाही असं म्हणणाऱ्यादेखील कधी ना कधीतरी साडी नेसतातच. अर्थात ही साडी काळानुरूप बदलत गेली आहे. साडी हा खरंतर स्त्री चं सौंदर्य वाढवणारा असा कपड्याचा प्रकार आहे. भारतामध्ये कांजीवरम, बनारसी, पैठणी अशा कितीतरी प्रकारच्या साड्या आहेत. शिवाय साडी नेसण्याचं एक वेगळं टेक्निक आहे. तुम्ही कशी साडी नेसता त्यानुसार तुम्ही कसे इतरांमध्येही शोभून दिसता हे अवलंबून असतं. साडी नेसण्याच्या विविध पद्धती असतात. काळानुसार अर्थात आता साडी नेसण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. शिवाय प्रत्येक जण साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसत असतं. अजूनही आपण सणा समारंभाला पारंपरिक पद्धतीच्या साड्याच नेसतो. पण इतर वेळा मात्र साडीमध्ये आपल्याला वेगवेगळे ट्रेंड दिसून येत आहे. आम्ही याबद्दल आयटीएम आयडीएमच्या फॅशन डिझाईन डिपार्टमेंटच्या रिहा सय्यद यांच्याशी बातचीत केली. त्यांनी खास ‘POPxo Marathi’ला साडी नेसण्याच्या पाच विविध स्टाईल्स सांगितल्या आहेत. तुम्हीदेखील या स्टाईल्स फॉलो करून समारंभामध्ये शोभून दिसू शकता. अर्थात पारंपरिक साडी आधुनिक ट्विस्टसह कशी असावी याच्या पाच पद्धती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
स्कार्फ/नेक रॅप साडी हा प्रकार थोडा स्टायलिश आहे. तर तुम्ही साधारण थंडीच्या दिवसात कुठे लग्नाला जात असाल तर तुम्ही ही स्टाईल फॉलो करू शकता.
नेसायची पद्धत :
नेहमीच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीचा पदर न घेता हा पदर स्कार्फ पद्धतीने घ्या. तुम्ही हा पदर गळ्याभोवती घेऊन पुढच्या बाजूने गुंडाळा. स्कार्फप्रमाणेच हा पदर तुम्हाला तुमच्या मानेभोवती गुंडाळायचा आहे. शिवाय काही फंकी दागिने घालून तुम्ही तुमच्या साडीचा लुक अजून ग्लॅमरस करू शकता.
सध्या अशा प्रकारची साडी हा ट्रेंड आहे. हा थोडासा पारंपरिक पण त्याचबरोबर अत्याधुनिक प्रकार आहे. तुम्हाला या साडीमध्ये अनेक डिझाईन्स पाहायला मिळतील.
नेसायची पद्धत :
साडी नेसायची ही जॅझ पद्धत आहे. तुम्ही साडी नेसल्यावर त्यावर मॅचिंग क्रेप घालायचा असतो. यामध्ये डिझाईनर साडीचा जास्त वापर करण्यात येतो. या साडीची शोभा वाढवण्यासाठी तुमच्या ब्लाऊज अथवा साडीच्या रंगाचा क्रेप तुम्ही यावर घालू शकता.
नवरीची साडी अथवा कंबरपट्टा यावरून ही स्टाईल सुचली असण्याची शक्यता आहे. तुम्ही साडी नेसल्यानंतर एखादा बारीक अथवा तुमच्या साडीच्या वा ब्लाऊजच्या कपड्याचा बेल्ट तुम्ही साडीला कमरेला लावू शकता. तुम्ही जर बारीक असाल तर तुम्हाला ही साडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल.
नेसायची पद्धत :
तुम्ही नेहमीप्रमाणेच पाचवारी साडी नेसा आणि तुमच्या कमरेच्या ठिकाणी बेल्ट लावा. तुम्हाला अधिक पारंपरिक वेष हवा असल्यास, तुम्ही त्या ठिकाणी कंबरपट्टादेखील बांधू शकता. तुमच्या साडीची शोभा अधिक वाढवायची असल्यास, तुम्ही तुमचा ब्लाऊज ऑफशोल्डर वापरावा.
तुम्ही एखाद्या लग्नाला जाणार असाल तर तुम्ही नक्कीच ही नवी आणि ट्रेंडिग स्टाईल करून पाहा. धोती स्टाईल साडी नेसणं हे पँट स्टाईल साडीप्रमाणेच आहे. पारंपरिक आणि आधुनिक या दोन्हींचं मिश्रण यामध्ये सामावलेलं आहे. समांथा, शिल्पा शेट्टी आणि सोनम कपूर या सुंदर अभिनेत्रींमुळे सध्या ही स्टाईल पुन्हा एकदा ट्रेंड झाली आहे.
नेसायची पद्धत :
पेटीकोटऐवजी तुम्ही ही साडी नेसताना लेगिंगचा वापर करा. ही साडी नेसणं अतिशय सोपं आहे. तुम्ही तुमच्या लेगिंगमध्ये ही साडी अडकवून नेहमीप्रमाणे नेसा. तुमचा पदर तुम्ही साधारण 2-3 इंच काढून ब्लाऊजला पिनअप करा. त्यानंतर तुम्ही पदराचा लोअर पार्ट तुमच्या हिप्सजवळ आणा आणि तिथे पदर काढून पुन्हा पिन लावा. नंतर उरलेल्या प्लेट्स काढून धोतीच्या आकाराप्रमाणे नेसा. पण ही साडी नेसताना बॉर्डर व्यवस्थित दिसत आहे की नाही याकडे नीट लक्ष द्या. ही साडी थोडी वेगळी असली तरीही दिसायला खूपच आकर्षक दिसते.
मुमताझ साडी अथवा लेहंगा साडी याप्रमाणेच ही मरमेड साडीदेखील असते. फक्त याच्या पदरामध्ये एक ट्विस्ट असतो.
नेसायची पद्धत :
साडी नेसायच्या वेळी याचा पदर असा काढायचा की, मरमेडप्रमाणे याची शेपटी दिसायला हवी. कदाचित यावर खूप काम करावं लागेल असं वाटतं. पण काही एक्स्ट्रा टक्स आणि प्लेट्सची गरज असते. त्यामुळे अशी साडी नेसायची असल्यास, बॉर्डरवाल्या साडीचीच निवड करा. शिवाय तुमचा पदर नेहमीपेक्षा थोडा मोठा काढा.
फोटो सौजन्य - Instagram
हेदेखील वाचा
या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने
साडी नेसताना या '14' चुका टाळा