मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये घ्या जाणून

मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये घ्या जाणून

व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. त्यामुळे एकाच दिवशी जन्म झालेल्या व्यक्तीदेखील वेगवेगळ्या असतात. त्यांचा स्वभाव, आवड निवड, चांगुलपणा आणि वाईटपणा हे कधीही समान नसतं. आपण दर महिन्यानुसार या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती नक्की कशा असतात हे जाणून घेतो. यावेळी मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतील याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींची कल्पनाशक्ती ही इतरांच्या तुलनेत जास्त असते. पण तरीही काय चांगलं आणि काय वाईट याची तुलना या व्यक्ती करू शकत नाहीत. नेहमी दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपण चांगले आणि आदर्श व्यक्तीमत्व असल्याचं दर्शवण्याचा या व्यक्ती प्रयत्न करत असतात. या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींच्या राशीचा स्वामी हा शुक्र आहे. या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तीची रास ही वृषभ (Taurus) असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पाहूया काय आहेत या महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्य -


1 - या व्यक्ती अतिशय जिद्दी आणि हेकेखोर स्वभावाच्या असतात. त्यामुळे लगेचच कोणाच्या सांगण्यावरून काही ऐकतील असं होत नाही. मात्र या व्यक्तींना एखादी गोष्ट न आवडल्यास, त्याविरोधात लगेचच आपला राग व्यक्त करतात. म्हणूनच लग्नानंतरही आपल्या जोडीदाराबरोबर या व्यक्तींचे खटके उडत असतात. जेव्हा या व्यक्तींना राग येतो तेव्हा या व्यक्ती खूपच तावातावाने बोलून आपली तब्बेत खराब करून घेतात.


2 - नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे या व्यक्ती जास्त आकर्षित होतात. या व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्टिफिशिअल अर्थात अनैसर्गिक गोष्टींचा तिटकारा आहे. या राशीच्या व्यक्ती खूपच हळूवार आणि भावनात्मक स्वभावाचे असतात. यांच्या कमकुवतपणाचा लोक फायदा उचलतात. बऱ्याचदा भावनेच्या भरात वाहून या व्यक्ती आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतात.


3 - आराम करणं यांना सर्वात जास्त आवडत असून अतिशय प्रामाणिक अशा या व्यक्ती असतात. जेव्हा गोष्ट प्रेमाची असते तेव्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसणं त्यांना आवडत नाही. मुद्द्याला हात घालणं या व्यक्तींना जास्त आवडतं. प्रेमासाठी या व्यक्ती पूर्णतः समर्पित असतात आणि आपल्या जोडीदाराकडूनही त्यांना हीच अपेक्षा असते. त्यांचं हेच वैशिष्ट्य त्यांना एक यश गाठून देतं. आपल्या प्रेमासाठी कोणताही त्याग करण्यासाठी या व्यक्ती तयार असतात.


4 - या राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदारामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता अजिबात आवडत नाही. जेव्हा अशी  कोणतीही कमतरता त्यांना जाणवते, ती काढून टाकण्यासाठी दिवस - रात्र या राशीच्या व्यक्ती मेहनत करतात.


5 - या राशीचा स्वामी शुक्र आहे. धन - वैभव, नाती, सौंदर्य प्रसाधन अशा विषयांकडे या व्यक्ती आकर्षित होतात. जन्मापासूनच या व्यक्ती जिद्दी स्वभावाच्या असतात. एखादी गोष्ट करायची ठरवली तर, कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय या व्यक्ती मागे हटत नाहीत. मेहनती आणि जिद्दी अससल्यामुळे मीडिया, चित्रपट, संगीत आणि कला क्षेत्रामध्ये या व्यक्तींनी आपलं करिअर निवडायला हवं.


popxo astro


6 - या राशीच्या व्यक्तींचं मन खूपच मोठं आहे आणि आपल्या आवडीबरोबरच कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता कसं उभं राहायचं याचीही यांना चांगली जाण असते. यांच्या आयुष्यात सर्वात भाग्यशाली गोष्ट असते ते म्हणजे पुस्तक. पुस्तक वाचल्यानंतर या व्यक्तींना अतिशय शांत वाटतं आणि मानसिक समाधान मिळतं. पुस्तक ही अशी वस्तू आहे जी या व्यक्तींसाठी लकी चार्म आहे.


7 - मे महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना तसं तर आपण किती मोठे आहोत हे दाखवायची हौस थोडी जास्तच असते. वास्तविक हे खरंदेखील आहे. पण तरीही लोक यांची कदर करत नाहीत कारण या व्यक्ती मदत तर करतात पण चार ठिकाणी त्या केलेल्या मदतीचा ढिंढोरा वाजवतही फिरतात. या व्यक्तींचा हा स्वभाव बऱ्याच जणांना आवडत नाही.


8 - आपणच निर्माण केलेल्या जगामध्ये या व्यक्ती आनंदी असतात. यामध्ये थोडासा जरी बदल झाला तरी त्यांना ते त्रासदायक ठरतं. हीच यांची सर्वात मोठी भीती आहे. आपल्या कम्फर्ट झोनमधून या व्यक्ती फार कमी वेळा बाहेर येतात. तसंच एखादी हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर या व्यक्ती कायम बेचैन राहतात.


9 - या व्यक्ती खूपच मेहनती असतात. कोणतंही काम पूर्णत्वाला नेल्याशिवाय शांत बसत नाहीत. यांच्या कामाचं योग्य कौतुक झालं तर अशक्यप्राय गोष्टदेखील शक्य करून दाखवणाऱ्या या व्यक्ती असतात.


10 - फॅशन सेन्सची बाब असेल तर या व्यक्तींचा यामध्ये कोणीच हात धरू शकत नाही. गर्दीमध्ये वेगळं दिसण्यासाठी या व्यक्ती नेहमीच आपली फॅशन काहीतरी वेगळी आणि अप्रतिम निवडतात. घरामध्ये कितीही अस्ताव्यस्त असले तरीही बाहेर मात्र अतिशय अप्रतिमरित्या या व्यक्ती वावरतात.


भाग्यशाली क्रमांक – 5, 35, 50, 57, 82


भाग्यशाली रंग – लाल, हलकासा निळा, खाकी (चॉकलेटी)


भाग्यशाली दिवस –  शुक्रवार, शनिवार आणि बुधवार


भाग्यशाली खडा – हिरा अथवा पोवळं


मे महिन्यात जन्म घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती


मार्क झुकेरबर्ग, पंकज उधास, सनी लियोनी, माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, जेनिफर विंगेट इत्यादी


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या


मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशाअसतात, जाणून घ्या


एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या