वजन कमी करायचं असल्यास फॉलो करा 'हा' वेट लॉस डाएट चार्ट

वजन कमी करायचं असल्यास फॉलो करा 'हा' वेट लॉस डाएट चार्ट

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला खाणंपिणं सोडण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त गरज आहे ती एका हेल्दी आणि बॅलेन्स्ड डाएटची. ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. बॅलेन्स डाएट म्हणजे घरचं जेवण ज्यामध्ये पोळी, भाजी, डाळ, फळ आणि सॅलडचा समावेश असेल. तसं तर आपलं घरचं अन्न म्हणजेच एक बॅलेन्स डाएट आहे. पण जोपर्यंत त्याच्यात जास्त तूप किंवा मीठाचा समावेश होत नाही तोपर्यंत. एक सत्य हेही आहे की, जर आहार चविष्ट असेल तर तो पचायला सोपं जातं, म्हणूनच असं म्हटलं जातं की, हेल्दी फूड म्हणजे तुमच्या चवीशी तडजोड करणे अजिबात नाही. आपले भारतीय मसाले इतके चविष्ट आणि कमालीचे आहेत, एवढंच नाहीतर त्यांच्यात आजार बरे करण्याची क्षमताही आहे. याच कारणामुळे जास्तकरून योग्य प्रमाणात वापरलेले मसाले हे आरोग्यासाठी चांगले असतात.


IMG-20170925-WA0017 %281%29


न्यूट्रीविटी (Nutrivity.in) च्या फाउंडर आणि न्यूट्रीशनिस्ट केजल सेठ सांगतात की, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला घरी बनवलेलं पौष्टीक आणि चविष्ट जेवण जेवायला हवं. वजन कमी करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहाराचं प्रमाण हे कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की, जेवणावर बंधन घालण्यापेक्षा आवश्यक आहे ते हेल्दी इटींग हॅबिट्स डेव्हलप करणं. यामुळे तुम्हाला चांगले काब्रोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश करायला हवा आणि याशिवाय फायबरयुक्त फळ आणि भाज्या खायला हव्यात. तेव्हाच आपण हेल्दी इटींगच्या आर्टमध्ये मास्टर होऊ आणि वेट लॉसही शक्य होईल. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहे हेल्दी वेट लॉस डाएट चार्ट -1. सकाळी उठल्यावरएक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा सब्जा (तुळशीचं बी) घालून प्या.2.  ब्रेकफास्टएक कप दूध/ चहा/ कॉफी + एक बाऊल पोहे (ज्यामध्ये 2 मोठे चमचे मूग, भरपूर भाज्या घाला पण बटाटा घालू नका), या पोह्यामध्ये तेलही कमी असलं पाहिजे.किंवाएक बाऊल उपमा (यामध्ये कमीत कमी तेल आणि जास्तीत जास्त भाज्या घाला).किंवा2 ड्राय खाकरे + 1 बाऊल मूग (ज्यामध्ये तुम्ही सिझनिंग आणि लिंबू घालू शकता).किंवा


 


2 अंड्यातील पांढरा भाग (स्क्रम्बल / ऑम्लेट / पोच्ड / उकडून) + 1 मल्टीग्रेन टोस्टकिंवा2 मल्टीग्रेन टोस्ट  + 1 मोठा चमचा पीनट/ आल्मंड बटरकिंवा1 बाऊल मुसली /व्हीट फ्लेक्स /  ओट्स फ्लेक्स (शुगर फ्री ) + 1 बाऊल योगर्ट + दालचिनीसोबत सुकामेवा.


 pexels-photo-793759


3.  मिड मॉर्निंग स्नॅक्सकोणतंही फळ


 4. लंच टाईम


1 बाऊल सॅलड + 1 बाऊल भाजी  (कमीत कमी तेल आणि बटाटा नाही) + 2 व्हीट ओट्स पोळ्या (गव्हाच्या पीठात एक मोठा चमचा बारीक केलेल्या ओट्सचं पीठ मिक्स करा) + 1 बाऊल डाळ (कमीत कमी तूपासोबत) / 1 बाऊल चिकन / फिश (कमीत कमी तेलात, ग्रिल्ड /बेक्ड /रोस्टेड)5. ईव्हीनिंग स्नॅक्स1 बाऊल ड्राय /सूकी भेळ (नो बटाटा, नो शेव, नो पूरी)/ 1 बाऊल चणे + शेंगदाणे मिक्स / 1 बाऊल ग्रीक योगर्ट / 1 अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट6. लेट ईव्हनिंग फूड1 बाऊल मिक्स फ्रूट + 2 क्रश्ड वॉलनट्स / बादाम7. डीनर टाइम1 बाऊल सॅलड + 1 बाऊल पावभाजीची भाजी किंवा 1 केळ / चणा डाळ, कोणतीही एक भाजी बटरशिवाय, पीनट्स + 2 स्लाईस होल व्हीट ब्रेड / 2 व्हीट ओट्स पोळ्या (नो बटर / नो तेल / नो तूप)  किंवा1 बाऊल डाळ सूप  + 1 छोटं व्हेज सँडविच (होलव्हीट ब्रेड) + / अंडं / श्रेडेड चिकन /टोफू , व्हेजिटेबल्स , 1 चमचा बटर, नो चीज़ , नो मेयोनीज)किंवा1 बाऊल रगडा + 2 पॅटीस (व्हेजिटेबल्स, ओट्स, चणा डाळीचा वापर करा) + 1 ग्लास ताककिंवा1 बाऊल मिक्स व्हेज पास्ता  (रेड सॉसचा ,सोबत 20 ग्रॅम पनीरही घाला)किंवा1 बाऊल दाल खिचडी (यामध्ये तांदूळाच्याऐवजी दलियाचा वापर करा आणि भरपूर भाज्या घाला.)किंवा1 बाऊल ब्राऊन राईस बिर्यानी + 1 बाऊल दही (यामध्ये भाज्या घाला आणि कमीतकमी तेलाचा वापर करा.)8. बेड टाईम1 ग्लास पाण्यासोबत 1 चमचा बडीशोप + ओवा (50:50 च्या प्रमाणात)


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं


बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय


Weight Loss Diet Plan In Marathi


वजन कमी करण्याच्या नैसर्गिक पद्धती