जसा उन्हाळा वाढू लागतो तसं सगळ्यानाच फ्रिजमधलं पाणी प्यायची ईच्छा होते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फ्रिजमधलं पाणी पिण्याकडे ओढा असतो. बाहेरून आल्या आल्या तहान लागली की, हात आपोआपच फ्रीजकडे वळतात. कारण थंड पाणी प्यायल्यावर तहान लगेच भागते आणि अगदी थंडगार वाटतं. पण फ्रीजच्या थंड पाण्याचा हा थंडावा शरीरासाठी मात्र नुकसानदायक आहे. चला जाणून घेऊया फ्रिजचं थंड पाणी पिण्याने होणारं नुकसान.
आयुर्वेदात मानलं जातं की, बद्धकोष्ठता हे सगळ्या आजाराचं मूळ मानलं जातं. बद्धकोष्ठता तेव्हाच होते जेव्हा आपली पचनशक्ती कमी होते. फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने आपल्या आतड्या आंकुचन पावतात आणि जेवण नीट पचत नाही. पोटातील जेवण वारंवार न पचल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
तसेच कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचा
घरातील जाणती लोक उगाच नाही, फ्रिजऐवजी माठातलं पाणी प्यायचा सल्ला देत. या मागील खास कारण म्हणजे फ्रिजचं पाणी हे नैसर्गिकरित्या नाहीतर कृत्रिमरित्या थंड होतं. जे आपल्या शरीराच्या प्रतिकारक्षमतेला नुकसानकारक असतं. फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, ज्यामुळे आपली प्रतिकारक्षमता कमी होते आणि आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.
जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील वेगस नर्व्ह थंड होऊन हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. खरंतर या नर्व्हला आपल्या शरीरातील सर्वात लांब म्हणजे कार्निवल नर्व्ह असंही म्हणतात. जी आपल्या मानेपासून हृदय, फुफुस्स आणि पचनसंस्था कंट्रोल करते.
जर तुम्ही रोज फ्रिजचं थंड पाणी प्यायलंत तर तुमचे टॉन्सिल्स वाढू शकतात. याशिवाय फुफुस्स आणि पचनाशी निगडीत रोगही होऊ शकतात. त्यामुळे फ्रिजऐवजी माठातलं किंवा साधं पाणी प्यावं.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असाल आणि सोबतच थंड पाणी पित असाल तर तुमचं वजन कमी होणं शक्यच नाही. तज्ज्ञांनुसार फ्रिजमधील थंड पाणी प्यायलाने आपल्या शरीरात साचलेलं फॅट अजूनच कडक होतं. ज्यामुळे फॅट बर्न करण्यात अडथळा येतो. त्यामुळे जेवल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने पाणी प्या आणि तेही साधं पाणी.
हे मान्य आहे की, थंड पाणी हे साध्या पाण्याच्या तुलनेत तहान लवकर भागवतं आणि यामुळे घश्याप्रमाणेच मनालाही त्वरित समाधान मिळतं. पण शरीरासाठी हे नक्कीच नुकसानदायक आहे. हे जाणून घ्या. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो साधं पाणी प्या. जर थंड पाणी पिण्याची ईच्छा झालीच माठातील थंड पाणी प्या ज्याचे काहीच साईड ईफेक्ट्स नाहीत.
हेही वाचा -
पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का
जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत