लहानपणापासून आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडायची असेल तर तुमच्या पेहरावाइतकंच तुम्ही कोणत्या प्रकारचे फुटवेअर वापरता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लहानपणी त्याचं महत्त्व इतकं लक्षात येत नाही. पण जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा मात्र आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा फुटवेअर असतात हे नक्कीच कळतं. सध्या हाय हिल्सला खूपच प्राधान्य दिलं जातं. ऑफिस मीटिंग्ज असो वा कोणत्याही फॉर्मल मीटिंग्ज आपल्या कपड्यांना शोभतील असे हाय हिल्स मुली वापरतात. बऱ्याच उंचीने लहान मुली तर रोज हाय हिल्स घालतात. हाय हिल्सशिवाय त्यांचं अजिबातच काम चालत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पारंपरिक कपड्यांवरही हाय हिल्स चांगल्या दिसतात. पार्टी तर हाय हिल्सशिवाय पूर्ण होतच नाही. सांगण्याची बाब अशी की, फुटवेअरची गोष्ट आली की, हाय हिल्सशिवाय आपलं कलेक्शन पूर्ण होतच नाही. जास्तीत जास्त अभिनेत्री या हाय हिल्समध्येच दिसतात. खरं तर त्यांच्यामुळेच सामान्यांमध्येही ही फॅशन अधिक प्रचलित आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? रोज हाय हिल्स घातल्यास, काय परिणाम भोगावे लागतात? आम्ही तुम्हाला याविषयीच सांगणार आहोत.
कसे निवडाल योग्य फुटवेअर - How to Choose Right Footwear in Marathi
हाय हिल्स घालण्याचे तोटे - Side Effects of Wearing High heels in Marathi
टाचांमध्ये होणारा त्रास - Pain in Heels
पाठ आणि कंबरदुखी - Back and Waist pain
नियमित स्वरूपात हाय हिल्स घालण्याने काय नुकसान होतं हे लक्षात घेऊन दक्षिण कोरियातील संशोधनकर्त्यांनी एअर होस्टेसचं प्रशिक्षण घेणाऱ्या काही मुलींवर संशोधन केलं. एअर होस्टेसना हाय हिल्सच घालाव्या लागतात त्यामुळे संशोधन त्यांच्यावर करण्यात आलं. या संशोधनादरम्यान प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचा दोन गट करण्यात आला. एक गट ज्यामध्ये सिनिअर्स होते तर दुसऱ्या गटात नुकत्याच प्रशिक्षणासाठी जॉईन झालेल्या मुली होत्या.
यांच्यावर कॉम्प्यूटराईज्ड एक्सरसाईज मशीनने तपासणी करण्यात आली. यामध्ये आढळून आलं की, सिनिअर मुलींच्या तुलनेत नव्या मुलींच्या टाचा आणि मांसपेशी या अधिक मजबूत होत्या.
जपानमध्ये जास्त कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आहे. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे ड्रेस कोड आखण्यात आलेले आहेत. या ठिकाणी महिलांना स्कर्टबरोबरच हाय हिल्स घालणं अनिवार्य आहे. महिला स्मार्ट आणि स्टायलिश दिसाव्यात यासाठी असा नियम करण्यात आला आहे. पूर्ण दिवस काम केल्यानंतर हाय हिल्समुळे जपानी महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना नेहमीच टाचांच्या त्रासालाही सामोरं जावं लागतं. हा त्रास समोर आणण्यासाठी एक कँपेन चालवण्यात आलं होतं. ज्यामध्ये हाय हिल्स घालणं हे स्मार्टनेस नाही तर नाईलाजास्तव करावं लागत असल्याचं सांगण्यात आलं. या कँपेनचं नाव कुटू असं ठेवण्यात आलं आहे. वर्कप्लेसच्या ठिकाणी काम करताना होणारा त्रास पाहून जपानी मॉडेल आणि अभिनेत्री यूमी इशिकावाने या कँपेनला सुरुवात केली.
जपानमध्ये कुत्सू म्हणजे फुटवेअर, कुत्सू के कु आणि मीटू के टू असं मिळून या कँपेनचं नाव यूमि इशिकावाने कुटू असं ठेवलं आहे. या कँपेनला काही दिवसातच पंचवीस हजरापेक्षा अधिक महिलांचा पाठिंबा मिळाला आहे. हे कँपेन अधिक व्यापक बनवण्यासाठी यूमीने सोशल मीडियाचीदेखील मदत घेतली आणि हे कँपेन लोकप्रिय केलं. यूमी इशिकावाच्या म्हणण्याप्रमाणे, महिलांप्रती होणाऱ्या त्रासाला संपवण्याचं काम तिला करायचं आहे. आता हा कुटू हॅशटॅगने आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे. केवळ महिलाच नाही तर जपानी पुरुषांनीदेखील या कँपेनला आपलं समर्थन दिलं आहे.
हाय हिल्स घालण्यामुळे पाय आणि टाचांमध्ये खूपच त्रास होतो. शरीराच्या अन्य भागांवरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो. वास्तविक हाय हिल्स घातल्याने पायाच्या पुढच्या भागावर अतिरिक्त भार पडतो. ज्यामुळे कोणता ना कोणतातरी त्रास हा उद्भवतोच.
हाय हिल्स जरी तुम्हाला खूप स्टायलिश आणि स्मार्ट लुक देत असल्या तरीही चालताना तुम्ही हाय हिल्स घातल्यानंतर नैसर्गिकरित्या चालत नाही. यामध्ये शॉख ऑब्झर्वेशन अजिबात नसतो. त्यामुळे तुमच्या गुढघ्यावर चालताना दबाव येतो. काही दिवसांनंतर तुमच्या गुडघ्यांवर आलेला हा दबाव अधिक त्रासाचं कारण होतो.
पाय दुखणं हे आजकाल खूपच कॉमन झालं आहे. प्रत्येक एका मुलीकडून हे ऐकू येतंच असतं. दिवसातून काही तास गेल्यानंतर पायांमध्ये दुखायला लागतं आणि मग जसजशी संध्याकाळ होत जाईल हा त्रास वाढतो. तुम्ही जर रोज हाय हिल्स घालत असाल तर पायांच्या दुखण्याचं महत्त्वाचं कारण हे असू शकतं. रोज हिल्स घातल्यामुळे पायांबरोबरच पायाच्या तळव्यामध्येही कायम त्रास होत राहातो.
हाय हिल्स घातल्यामुळे टाचांवर एक वेगळाच जोर पडतो. त्यामुळे टाचांना त्रास होणं हे स्वाभाविक आहे. सतत हाय हिल्स घातल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित न होता, असंतुलित होतो. ज्यामुळे सतत टाचांमध्ये त्रास होत राहातो.
हाय हिल्स घातल्यानंतर बऱ्याच महिलांना चालता येत नाही. त्यांना संतुलन राखता येत नाही. त्यामुळे सतत पडण्याचा धोका असतो. हाय हिल्स घातल्यानंतर जरा जरी पाय डगमगला तरी तुमचा पाय मुरगळतो आणि त्यामुळे त्रास होण्याची भीती राहाते.
महिलांना पाठ आणि कंबरदुखी ही समस्या अगदी कॉमन आहे. प्रत्येक घरातील महिलेला हा त्रास असतो. कधी कधी त्रास इतका वाढतो की, हे दुःख असह्य होतं. त्यासाठी बऱ्याच महिला आपल्या जीवनशैलीला दोष देत असतात. खरं तर जीवनशैलीपेक्षाही महत्त्वाचा भाग हा हाय हिल्सचा असतो. तुम्ही जर हाय हिल्स घालत असाल तर त्यामुळे तुमच्या पाठीत आणि कंबरेत सतत दुखत राहातं. हाय हिल्स घातल्यामुळे तुमच्या शरीराचं वजन योग्य भागात विभागलं जात नाही. हा असंतुलित भागच तुमच्या पाठ आणि कंबरदुखीचं कारण बनतो.
तुमचं वजन जास्त आहे आणि तरीही तुम्ही नियमित स्वरूपात हाय हिल्स घालत असाल तर तुमचं संतुलन खराब होऊ शकतं. हाय हिल्स शिरा आणि मांसपेशींना नुकसान पोहचवतात.
हाय हिल्सचा आकार अशा प्रकारचा असतो की, त्यामुळे तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह योग्य तऱ्हेने होऊ शकत नाही. सांगायची बाब अशी की, रक्तप्रवाह कमी प्रमाणात होतो. रक्तप्रवाह कमी झाल्यास, त्याचा डोक्यावर परिणाम होतो, जे तुमच्या शरीरासाठी योग्य नाही.
हाय हिल्स घालणं तुम्हाला कितीही आवडलं तरीही यामुळे तुमच्या शरीराचा भार हा तुमच्या कंबर, पार्श्वभाग, खांदे आणि हाडांवर येतो. त्यामुळे शरीराचं पोस्चर खराब होतं. शरीर बेढब होतं आणि त्यामुळे कोणालाही याचा फायदा नक्कीच होत नाही.
हाय हिल्स घातल्यामुळे जर तुमच्या पायांच्या टाचांमध्ये त्रास होत असेल तर त्यावर काही उपाय आहेत, जे करून तुम्ही तुमचा त्रास कमी करू शकता. तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर, ड्राईव्ह करताना अथवा ऑफिसमध्ये आल्यावर हिल्स काढून ठेवा आणि ऑफिसमध्ये दुसऱ्या चप्पल घाला. तुम्ही मीटिंगमध्ये व्यस्त असाल तर बसलेल्या ठिकाणी तुम्ही खाली तुमच्या हिल्स काढून ठेवा. त्यामुळे तुमच्या पायांना आराम मिळेल. लक्षात ठेवा हाय हिल्स घालून धावणं अथवा जिने चढणं या गोष्टी करणं टाळा. यामुळे तुमच्या पायांना जास्त नुकसान पोहचू शकतं.
हाय हिल्स घालणं तुमच्यासाठी अनिवार्य असतील अथवा तुमच्या कामाचा हा एक अविभाज्य भाग असेल तर त्यासाठी तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी केल्यास, तुम्ही या त्रासापासून वाचू शकता. सध्या बाजारामध्ये फूट कुशन्स मिळतात. या फूट कुशन्स तुम्ही हाय हिल्स घालण्याच्या आधी पायांना लाऊन आराम मिळवू शकता. हवं असल्यास, तुम्ही बँडेड ब्लिस्टर ब्लॉकचा प्रयोगही करू शकता. केमिस्टच्या दुकांनांमध्ये जेल इन्सर्टदेखील मिळतात, जे या त्रासापासून तुम्हाला सुटका देऊ शकतात. शिवाय तुम्ही पायांच्या बोटांजवळ फोम अथवा कापूस ठेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला त्याठिकाणी त्रास होणार नाही. आपल्या पायांचा रोज नीट व्यायाम करा. पायांची बोटं आणि पाय अशा तऱ्हेने नीट वाकवा की, संपूर्ण ठिकाणी रक्तप्रवाह नीट राहील. तसंच तुम्ही कोमट पाण्यात एम्सम मीठ घालून पाय त्यात काही वेळ बुडवून ठेवा. जेणेकरून तुमच्या पायातील रक्तप्रवाह व्यवस्थित होईल आणि तुमच्या पायातून थकवा निघून जाईल.
कधीही फुटवेअरमुळे पायाचं नुकसान होतं असं म्हटलं जातं तेव्हा आपण हाय हिल्सचं पहिले नाव घेतो. काही लोकांचं म्हणणं असतं की, फ्लॅट चप्पल ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. त्यामुळे पायांना कोणतंही नुकसान होत नाही. पण असं काहीही नाही. फ्लॅट फुटवेअर घातल्यास, पायांना जास्त त्रास होतो. सर्वात पहिले जाणून घेऊया की, असं का होतं? वास्तविक फ्लॅट फुटवेअर घातल्यामुळे पायांच्या गोलाईला पाठिंबा मिळत नाही. इतकंच नाही तर, टाचांवरही अतिरिक्त दबाव येतो. फ्लॅट चप्पल्समुळे टाचांमध्ये त्रास होणं हे सामान्य आहे. तुम्ही नीट निरीक्षण केलंत तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही फ्लॅट चप्पल घालून जास्त चाललात अथवा जास्त वेळ उभे राहिलात तर तुमच्या पायांमध्ये दुखायला सुरुवात होते.
आपल्या शरीराचा पूर्ण भार हा आपल्या पायांवर पडत असतो. विशेषतः पायांच्या तळव्यावर अथवा पायांच्या खालच्या बाजूला. त्यामुळे आपण पायाच्या या भागाची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. जर आपण फुटवेअर खरेदी करत असताना, त्याची उंची, त्याचं स्ट्रक्चर, बोटांचं स्ट्रक्चर, पायाच्या खालची गोलाई यासारख्या मुख्य गोष्टींवर लक्ष देऊन मगच फुटवेअर निवडावं. हे सर्व लक्षात ठेऊन फुटवेअर विकत घेतल्यास, इतर त्रासांना सामोरं जाण्याची वेळ येणार नाही. फुटवेअर खरेदी करताना त्याचा सोल ठीकठाक मोठा आहे की नाही हे पाहा. पातळ स्ट्रॅप्सवाल्या चप्पल घालताना पायांमध्ये ग्रिप व्यवस्थित येत आहे की नाही ते पाहा. त्यासाठी नेहमी मोठी आणि योग्य फिटिंगची स्ट्रॅप चप्पल घाला. स्वस्त चप्पल खरेदी करण्याच्या नादात आपल्या पायांचं नुकसान करून घेऊ नका. या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन ब्रँडेड चप्पलच खरेदी करा.
तुम्ही जर जबरदस्तीने हाय हिल्स घालणार असाल तर असं अजिबात करू नका. जेव्हा तुम्ही हाय हिल्स घालण्यासाठी कम्फर्टेबल असाल, तेव्हाच घाला अन्यथा, प्लॅटफॉर्म अथवा वेजेस अशा प्रकारच्या चप्पल्सना प्राधान्य द्या.
रोज जर हाय हिल्स घातल्या तर सर्वात पहिले म्हणजे तुम्ही नकारात्मक स्वरूपात प्रभावित होता. नियमित स्वरूपात हाय हिल्स घातल्याने तुमच्या टाचांमध्ये अधिक त्रास होऊ लागतो. कंबर आणि पाठीमध्ये दुखायला लागतं आणि त्यामुळे अधिक आजारपण येत जातं.
सर्वात पहिले हाय हिल्स काढून टाकाव्या. त्या ठिकाणी पायांना जर कुठे लागलं असेल तर त्यावर डिसइन्फेक्टंट लावा. हवं तर आपले पाय मीठयुक्त कोमट पाण्यात काही काळ बुडवून ठेवावेत. त्यामुळे तुमच्या पायातील थकवा निघून जातो.
फुटवेअर खरेदी करताना त्याची लांबी, त्याचं योग्य स्ट्रक्चर, त्याच्या खालचा भाग, गोलाई या सर्व गोष्टी नीट लक्षात ठेवायला हव्यात.
फ्लॅट चप्पल वापरल्यामुळे तळव्याला सपोर्ट मिळत नाही. तसंच टाचेवर अतिरिक्त दबाव येतो. त्यामुळे सतत तुमच्या तळवा आणि टाचेमध्ये त्रास होतो.
फोटो सौजन्य - Shutterstock
हेदेखील वाचा -
उंच दिसण्यासाठी करा 10 tips and tricks!
वेदनादायी शू बाईटवर '15' घरगुती उपाय आणि इतर टीप्स
पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स