त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान (Skin Care Tips In Marathi)

Skin Care Tips In Marathi

सुंदर, नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. जर तुमची त्वचा जन्मत: चांगली नसली  म्हणून काय झाले. तुम्ही तुमच्या त्वचेची नीट काळजी घेतली तर तुमची त्वचा ही अगदी छान तजेलदार दिसून शकते. पण जसे मी म्हटले की, तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे म्हणजे काही गोष्टींचे पालन हे तुम्ही केलेच पाहिजे तरच तुम्हाला हवी असलेली त्वचा तुम्हाला मिळू शकेल. या शिवाय तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आम्ही काही प्रोडक्टही तुम्हाला सुचवणार आहोत. आता ही काळजी कशी घ्यायची हे जाणून घेण्याआधी आपण त्वचा नेमकी कशामुळे खराब होते ते जाणून घेऊया. कारण त्या पासूनच तुम्हाला चांगल्या सवयींची सुरुवात करायची आहे. 


त्वचा कशामुळे होते खराब


त्वचेची काळजी कशी घ्यावी - कोरडी त्वचा


तेलकट त्वचेसाठी त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स


त्वचेची काळजी कशी घ्यावी - मिश्र त्वचा


FAQs


त्वचा कशामुळे होते खराब (Causes Of Skin Damage)


त्वचा खराब होण्याचीही काही कारणे आहेत. सर्वसाधारणपणे तुमची त्वचा या काही कारणांमुळे खराब होत असते ही कारणे कोणती ती जाणून घेऊया.


उन्हात सतत वावरणे (Sun Exposure)


Sun Exposure


काहींना कामाच्या स्वरुपामुळे उन्हात सतत वावरावे लागते. उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडते हे खरे असले तरी त्याहूनही अधिक गंभीर परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतात. उन्हात वावरल्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर येतात. चेहरा निस्तेज आणि सुकलेला दिसू लागतो. त्यामुळे त्वचा खराब होण्याचे पहिले कारण म्हणजे उन्हात सतत वावरणे. त्यामुळे तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.


फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच नाही. तर सगळ्याच ऋतुमध्ये तुम्ही उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ घेतला पाहिजे किंवा सनस्क्रिन लावायला हवे.


चुकीच्या खाण्याच्या सवयी (Wrong Food Habits)


चुकीच्या खाण्याच्या सवयींचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो हे अगदी खरे आहे. पेराल तसे उगवते ही म्हण आहे ती तुमच्या खाण्याच्या सवयीबाबत अगदी तंतोतंत लागू पडते. अधिक चटकदार, चमचमीत, तिखट, तेलकट पदार्थ तुमच्या पोटात गेले तर त्याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर चटकन दिसून येतात. तुमची त्वचा अधिक तेलकट वाटू लागले आणि तुमच्या त्वचेवर मुरुम यायला सुरुवात होते. शिवाय अशा खाण्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याच्या तक्रारी देखील उद्भवतात. त्याचा परिणाम त्वचेवरच होतो. चमकणार्‍या त्वचेसाठी उच्च फायबरयुक्त आहार घ्या


उदा. काहींना चायनीज भेळ, भजी, वडापाव खायची सवय असते. तुम्ही तुमची त्वचा आरशात नीट निरखून पाहा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पुळ्या आलेल्या दिसतील. शिवाय सतत तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसू लागते आणि मग अन्य तक्रारी उद्भवतात.


झोपेची कमतरता (Lack of Sleep)


Lack of Sleep


झोप कमी करण्यामध्ये तुमच्या हातातील मोबाईलचा मोठा वाटा आहे. सतत फोनवर असण्याची सवय तुमच्या झोपेवर परिणाम करत असते. तुमची झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. झोप पूर्ण नसेल तर तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला विष्ठेला त्रास होऊ शकतो. पोट साफ झाले नाही तर मग तुम्हाला त्वचेच्या तक्रारी उद्भवू लागतात.


मद्यपानाची सवय (Alcohol Consumption)


मद्यपान, धुम्रपान करणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. हे  माहीत असूनही अनेक जण ओकेजनी म्हणत या गोष्टी करतात. पण सतत मद्यपानाची सवय तुम्हाला भारी पडू शकते. कारण मद्यपानामुळे तुमच्या त्वचेवरील ओलेपणा निघून जातो. तुमची त्वचा थकलेली, कोरडी आणि अधिक वयस्क दिसू लागते.


उदा. तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर तुम्ही तुमचा चेहरा नीट पाहा. अशा त्वचेला कालांतराने सुरकुत्या पडू लागतात.  


न्युट्रिशनची कमतरता (Lack of Nutrition)


तुम्ही किती खाता यापेक्षाही महत्वाचे आहे तुम्ही काय खाता? हे पाहणे महत्वाचे असते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे तुम्हाला तुमच्या जेवणातून मिळत असतील तर तुमच्या शरीरासोबत तुमची त्वचाही चांगली राहते. त्यामुळे ग्लोइंग त्वचेसाठी तुमचा आहार हा चौकस हवा.


उदा. तुमच्या आहारात भाजी, पोळी, भाजी, भात, कोशिंबीर यांचा समावेश असावा. पालेभाज्या, कडधान्य, फळभाज्या यांचा समावेश असावा. त्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. शिवाय तुमची अन्नप्रक्रियाही सुरळीत राहते


ताण-तणाव (Stress)


तुमच्या त्वचेसाठी आणखी एक हानिकारक गोष्ट आहे ती म्हणजे सततचा ताण. तुम्ही जर सतत  ताण-तणावाखाली असाल तर तुमच्या रक्तपुरवठयावर त्याचा परिणाम होतो आणि मग त्याचा त्रास तुमच्या त्वचेवरही होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेण्यापेक्षा थोडे रिलॅक्स व्हायला शिका. ताण घेण्यापेक्षा तुम्ही तुमचे प्रश्न सोडवायला शिका.


चेहरा स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत (Wrong Cleansing Method)


त्वचा चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला त्याची काळजी घेणे गरजेचे असते हे तर आम्ही तुम्हाला सांगितलेच. काही जण दिवसभरातून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप काढत नाही. तर थेट चेहरा फेसवॉशने किंवा क्लिन्झर धुतात. जी चांगली सवय नाही. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर दिवसभरात साचलेली धूळ जात नाही.त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर अधिक होऊ लागतो. त्यामुळे तुम्हाला चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धतही माहीत असायला हवी.  या शिवाय त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ही माहीत हवीत.


(Dirty Hands On Face)


Dirty Hands On Face


खूप जणांना अस्वच्छ हातच चेहऱ्याला लावण्याची सवय असते. म्हणजे काहीही खाल्ले तरी हात न धुता तेच हात चेहऱ्याला लावले जातात.


उदा. जर तुम्ही चीप्स खात असाल जरी ते तेलकट वाटत नसले तरी त्यावर असलेले तेल, मसाला तुमच्या चेहऱ्याला लावतो आणि तुमच्या त्वचेवर पुरळ यायला सुरुवात होते. त्यामुळे लक्षात ठेवा अगदी सुका खाऊ जरी तुम्ही खाल्ला असेल तरी तुम्हाला तुमचा हात धुतल्याशिवाय तुम्हाला तो तुमच्या चेहऱ्यावर लावायचा नाही.


प्रदूषण (Pollution)


वाढते प्रदूषणही तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असते. धूळ, माती, उन तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करत असते. प्रदूषणाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर इतका होतो की, तुमची त्वचा वयाच्या आधीच जास्त वयस्क वाटू लागते. त्यामुळे प्रदूषणापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे.


चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी (Skin Care & Beauty Tips In Marathi)


आता तुमची त्वचा कशामुळे खराब होते हे तुम्हाला कळलेच असेल आता तुम्ही तुमच्या त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी ते पाहूया.


कोरडी त्वचा उपाय (Dry Skin Care Tips In Marathi)


कोरडी त्वचा उपाय


जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातील ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे.


कसे असेल तुमचे स्किन रुटीन (Skin Care Routine)


सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुचा चेहरा छान थंड पाण्याने धुवायचा आहे.


 • तुमच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला चांगला मॉश्चरायझिंग फेसवॉश वापरायचा आहे. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फेसवॉश करत असाल. तर थेट तुम्हाला तुम्हाला तुमचा चेहरा झोपण्याआधी धुवायचा आहे. (सतत चेहरा धुणे तुमच्या त्वचेसाठी चांगला नाही. कारण त्यामुळे तुमचा चेहरा अधिक कोरडा होण्याची शक्यता असते)

 • तुमच्या चेहऱ्यातील ओलावा टिकून राहावा म्हणून आंघोळीनंतर तुम्ही हायड्रेटिंग सीरम लावा.

 • या शिवाय तुमची शरीरावरील त्वचा मॉश्चरायज राहण्यासाठी संपूर्ण अंगाला मॉश्चरायझर लावायला विसरु नका.

 • शिवाय घराबाहेर पडताना चांगले सनस्क्रिन लावा ज्यामुळे तुमच्या त्वचेला सूर्याची अतिनील किरणे त्रास देऊ शकणार नाही.

 • तुमचा चेहरा कोरडा असल्यामुळे तुम्हाला मेकअप करण्याआधी मॉश्चरायझर लावायचे आहे. त्यावर मग तुम्हाला मेकअप करायचा आहे. असे केलेत तर तुमचा मेकअप फुटणार नाही. शिवाय तुमचा चेहरा दिवसभर चांगला दिसेल.


चेहरा असा कराल स्वच्छ (Cleaning Method)


 • बाहेरुन आल्यानंतर कोणत्याही मेकअप क्लिनझरने तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या.

 • आठवड्यातून दोनदा माईल्ड स्क्रबने तुमचा चेहरा स्वच्छ करा.

 • झोपताना मॉश्चरायझर लावून झोपायला विसरु नका.


जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हे काही प्रोडक्ट ट्राय करु शकता (Products For Dry Skin)


कोरड्या त्वचेसाठी योग्य प्रोडक्टच्या प्रतिक्षेत तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास प्रोडक्ट निवडले आहेत. तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने जाणून घ्या.


फेसवॉश (Face Wash)


O3+ Hydrating & Soothing Face Wash- 327Rs.
Kaya Skin Awakening Rinse- 408 Rs.
Skin Lab Cleansing Face Wash- 450Rs.


फेस सिरम (Face Serum)


Jovees Natural Whitening Serum- 404 Rs


त्वचेची काळजी कशी घ्यावी - तेलकट त्वचा (Oily Skin Care Tips In Marathi)


त्वचेची काळजी कशी घ्यावी


तेलकट त्वचेची बरीच दुखणी असतात. जरा काही झाले तर या प्रकारच्या त्वचेला लगेच त्रास होऊ लागतो. चेहऱ्यावर अतिरिक्त तेल साचले की, लगेच मग पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे अशी त्वचा असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.


कसे असेल तुमचे स्किन रुटीन (Skin Care Routine)


 • सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा थोडा पुसून घ्या कारण तुमच्या चेहऱ्यावरील तेलग्रंथीतून तेल बाहेर आलेले असते. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

 • ऑईल कंट्रोल फेसवॉशने तुमचा चेहरा धुवून घ्या. कोरडा करुन तुम्ही त्यावर ऑईल फ्रि मॉश्चरायझर लावा. जर तुम्ही लगेचच बाहेर जाणार असाल तर तुम्हाला सनस्क्रिन लावायचे आहे.

 • अशाप्रकारची त्वचा ही अधिक त्रासदायक असते असे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. त्यामुळे मेकअप करताना तुम्हाला अधिक काळजी घेतली पाहिजे. तुमचा मेकअप हा तुमच्या पोअर्समध्ये जाता कामा नये कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. शिवाय तुम्हाला ऑईलबेस प्रोडक्ट घ्यायचे नाहीत. बेस लावताना तो फारही लावू नका. तुम्हाला जितका लाईट आणि कमी मेकअप करता येईल असा मेकअप करायचा आहे.


चेहरा असा कराल स्वच्छ (Cleaning Method)


 • तेलकट त्वचेच्या व्यक्तिंना चेहऱ्याची अधिक काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे घरी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काहीही न करता मेकअप काढून टाकायचा आहे.

 • मेकअप काढून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फेसवॉश वापरुन चेहरा कोमटपाण्याने धुवायचा आहे.

 • तुमचे पोअर्स बंद करण्यासाठी तुम्हाला छान बर्फ चेहऱ्याला चोळायचा आहे. तुम्हाला छान फ्रेश वाटेल.
  झोपताना तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला Acne preventing क्रिम लावायची आहेजर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही हे काही प्रोडक्ट ट्राय करु शकता  (Products for Oily Skin)


फेसवॉश (Face Wash)


Aroma Magic Neem & Tea Tree Face Wash- Rs 86
Himalaya Herbals Clear Complexion Whitening Face Wash- Rs 115
Bioderma White Objective Moussant- Rs 2678


सनस्क्रिन (Sunscreen)


VLCC De Tan SPF 50 Sun Screen Gel Crème - Rs 291
Biotique Bio Sandalwood Ultra Soothing Face Lotion SPF 50+ UVA/UVB Sunscreen- Rs 150


सीरम (Serum)


Lotus Professional Phyto-Rx Whitening & Brightening Serum- Rs 476
Biotique Bio Dandelion Ageless Visiblly Serum- Rs 483
Neutrogena Fine Fairness Brightening Serum- Rs 764


त्वचेची काळजी कशी घ्यावी - मिश्र त्वचा (Combination Skin Care Tips In Marathi)


मिश्र त्वचा


मिश्र त्वचेला त्या मानाने फार कष्ट घ्यावे लागत नाही. तशी ही त्वचा अनेकदा बॅलन्स राहते. किंवा वातावरणात बदल झाले की, या त्वचेमध्ये बदल होतात. त्यामुळे मिश्र त्वचेच्या व्यक्तिनी विशेष नाही पण नित्यनेमाने काळजी घेणे गरजेचे असते.


कसे असेल तुमचे स्किन रुटीन (Skin Care Routine)


 • सकाळी उठल्याउठल्या तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे.

 • चांगला हायड्रेटिंग फेसवॉश तुम्हाला वापरायचा आहे.

 • हा आणि तुम्हाला मॉश्चरायझर लावायला विसरायचे नाही. आता तुमची त्वचा मिश्र स्वरुपातील असल्यामुळे तुम्ही मॉश्चराझर निवडताना हायड्रेटिंग मॉश्चरायझर निवडायला हवे.

 • उन्हात फिरताना तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो म्हणून अशा त्वचेलाही सनस्क्रिन लावायला विसरायचे नाही.
  मेकअपबाबत सांगायचे झाले तर कोणताही मेकअप तुम्हाला चालू शकतो.


असा स्वच्छ कराल तुमचा चेहरा (Cleaning Method)


 • घरी आल्यानंतर मेकअप क्लिनझरने मेकअप क्लिन करुन तुम्हाला तुमचा चेहरा धुवायचा आहे.

 • तुमच्या चेहऱ्यावर बसलेली धूळ काढण्यासाठी तुम्ही एखादे माईल्ड स्क्रब वापरले तरी चालेल.

 • झोपताना तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सिरम लावून झोपायचे आहे.


जर तुमची त्वचा मिश्र असेल तर तुम्ही हे काही प्रोडक्ट ट्राय करु शकता (Products For Combination Skin)


फेसवॉश (Face Wash)


L'Oreal Paris White Perfect Facial Milky Foam- Rs 131
ENN Wipe Out Chlorophyll Facial Cleanser- Rs 520


सीरम (Serum)


Neutrogena Fine Fairness Brightening Serum- Rs 764
Kaya Brightening Serum- Rs 1233


सनस्क्रिन (Sunscreen)


Nivea Moisturising Sun Lotion SPF 50+ Rs 322
Biotique Bio Sandalwood Ultra Soothing Face Lotion SPF 50+ UVA/UVB Sunscreen- Rs 150


तुम्हालाही पडतात का हे प्रश्न (FAQs)


त्वचेनुसार घेतलेले प्रोडक्ट मला चालतात की नाही हे कसे ओळखावे?


अनेकांना ही भीती असते. जर तुम्ही घेतलेल्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमच्या मानेवर किंवा हातावर त्याचा प्रयोग करुन पाहा. जर तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही. तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अगदी कमी प्रमाणात सुरुवातीला प्रोडक्ट लावून पाहा. पण जर प्रोडक्ट लावताच तुम्हाला काही त्रास होऊ लागला तर तातडीने त्याचा वापर बंद करा. चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारुन चेहरा स्वच्छ करा


हवामानानुसार प्रोडक्ट बदलायला हवे का?


आता हे सर्वस्वी तुमच्या चेहऱ्यावर अवलंबून आहे. कारण काही जणांच्या त्वचेत भरपूर फरक पडतो. म्हणजे काहींची त्वचा उन्हाळ्यात अधिक तेलकट होते.काहींची कोरडी होते.त्यामुळे हा बदल टिपून तुम्हाला प्रोडक्टची निवड करायची आहे.


चेहऱ्यावर मेकअप काढायचे राहून गेले तर काय होऊ शकते?


मेकअप तुमच्या चेहऱ्यावरील बारीक बारीक पोअर्स बंद करत असतात. दिवसभर मेकअपमध्ये वावरल्यानंतर किमान रात्रीच्यावेळी तरी तुमच्या चेहऱ्याला योग्य असा ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला हवा. तुमच्या त्वचेने श्वास घ्यायला हवा. म्हणून मेकअप रोज काढलाच पाहिजे. जर तुम्ही सतत मेकअप काढणे टाळत असाल तर तुम्हाला त्याचे लगेच नाही पण कालांतराने तुमच्या त्वचेवर त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागतील.