या वर्षी मराठीतील अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या आहेत. सेलिब्रेटी वेडिंग म्हणजे सोशल मीडियावरदेखील अगदी धमाल असते. सेलिब्रेटीजच्या लग्नसोहळ्याचे अथवा प्रि-वेडिंगच्या फोटोंची त्यांचे चाहते वाट पाहत असतात. मालिकेतील कलाकारांवर तर प्रेक्षक अगदी घरातील व्यक्तींप्रमाणे प्रेम करतात. दिल दोस्ती दुनियादारी ही अशीच एक मालिका. जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या मालिकेचे दोन्ही भाग लोकप्रिय झाले. या मालिकेतील पात्रांवर चाहत्यांनी मनापासून प्रेम केलं. दिल दोस्ती दुनियादारी मधील सुव्रत जोशी आणि सखी गोखले ही जोडी आज विवाहबंधनात अडकले आहे. सुव्रत आणि सखी अनेक वर्षांपासून एकमेंकांना डेट करत होते. आज पुण्यात कुटुंबिय आणि मित्र-मंडळींच्या साक्षीने हे विवाहबंधनात अडकले आहेत.
या दोघांच्या लग्नाची चर्चा काही दिवसांपासून रंगत होती. मात्र हे लग्न जाहीरपणे न करता अगदी शांतपणे करण्यात येत आहे. काल रात्री सखीच्या मेंदीचा कार्यंक्रम उत्साहात पार पडला. त्याचे काही फोटो सुव्रत आणि सखीच्या मित्रमैत्रीणींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सखी मेंदीच्या कार्यक्रमात फारच आनंदी दिसत होती. सखीला तिच्या मैत्रीणी सायली संजीव, आरती वडगबाळकर यांनी मेंदी काढली. सखीच्या मेंदी सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी मित्रमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमेय वाघ, सुमीत राघवन, चिन्मयी सुमीत, जितेंद्र जोशी, पर्ण पेठे, ऋता दुर्गुळे धमालमस्ती करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सखी गोखले ही अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. सध्या सखी लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. त्यामुळे ती तिच्या लग्नासाठी खास सुट्टी घेऊन भारतात आली आहे. लग्नानंतर सखी पुन्हा लंडनला रवाना होणार आहे. सखी आणि सुव्रत बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच सखीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती पार्टी करताना दिसत होती. ते फोटो पाहून ते तिच्या बॅचलर पार्टीचे असावेत, अशी चर्चा रंगली होती.
View this post on Instagram
सुव्रत आणि सखीच्या प्रेमाचं सूत' दिल, दोस्ती, दुनियादारी'मध्ये जुळलं होतं. दिल दोस्ती दोबाराच्या दुसऱ्या भागातमध्येही हे दोघं एकत्र होते. त्यानंतर त्यांनी मराठी नाटक अमर फोटो स्टुडिओमध्येही एकत्र काम केलं होतं. सोशल मीडियावरील अनेक पोस्टवरून त्यांनी एकमेकांचे प्रेम जगजाहीर केलं होतं. सखी गोखले आता लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे तर सुव्रतचा डोक्याला शॉट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. मैत्री आणि प्रेम या नंतर आता लग्नामुळे या दोघांच्या नात्याला एक वेगळं स्थान प्राप्त झालं आहे.
अधिक वाचा
वरूणची गर्लफ्रेंड नताशाला चाहत्याची विचित्र धमकी
ढोल ताशाला जेव्हा चढते गेम ऑफ थ्रोन्सची झिंग
काम मिळवण्यासाठी त्यांना करावा लागतोय गर्भाचा त्याग
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम