लग्नसराईला जोरदार सुरूवात झाली आहे. अनेकांच्या घरात लग्नाआधीची गडबडदेखील सुरू असेल. नववधूसाठी लग्नाआधी अनेक गोष्टींची तयारी करावी लागते. लग्नानंतर नवीन घरी गेल्यावर नववधूला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची गरज लागू शकते. लग्नानंतर नव्या घरात रुळायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या वेडिंग बॅगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असालाच हव्यात ज्यामुळे तुमची ऐनवेळी पंचाईत होणार नाही. वास्तविक लग्नानंतर सासरी जाताना माहेरच्या तुमच्या सर्वच गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सूचवत आहोत. ज्या तुमच्या बॅगेत असायलाच हव्या.
लग्नसोहळ्यानंतर घरी गेल्यावर आणि पाहुणे मंडळी आपल्या निघून गेल्यावर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते. झोपण्याआधी योग्य पद्धतीने मेकअप काढा. लग्नाच्या दगदगीत कितीही थकला असाल तरी मेकअप काढण्याचा कंटाळा करू नका. कारण लग्नासाठी केलेला मेकअप हा नेहमी हेवी आणि लॉंग लास्टिंग असतो. जो व्यवस्थित काढणे फार गरजेचे आहे. तुमच्या वेडिंग बॅगमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचे मेकअप रिमूव्हर ठेवा. बाजारात आजकाल अनेक चांगल्या प्रकारचे रिमूव्हर उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार रिमूव्हरची निवड करा. शिवाय ते रिमूव्हर अशा ठिकाणी ठेवा जे तुम्हाला पटकन सापडेल.
मेक अप काढून टाकल्यावर तुम्हाला रात्री झोपण्यासाठी चांगल्या स्लीपवेअरची नितांत गरज असते. लग्नानंतर तुमच्या नव्या घरी कोण-कोण असणार याचा अंदाज घेऊन स्लीप वेअरची निवड करा. असे स्लीप वेअर असे निवडा जे तुमच्यासाठी आरामदायक असतील आणि तुम्हाला त्यामुळे शांत झोप लागू शकेल. हनीमूनला जाताना कॅरी करण्यासाठी लॉंजरी आणि सेक्सी नाईटवेअर देखील तुमच्या बॅगेत असायलाच हवेत. मात्र पहिल्या दिवशी घालण्यासाठी डिसेंट स्लीपवेअर वेडिंग बॅगमध्ये जरूर ठेवा.
टॉवेल ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाने स्वतःचीच वापरावी. त्यामुळे तुमचा टॉवेल तुम्हाला लगेच मिळेल अशा ठिकाणी पॅक करा. कारण रात्री फ्रेश झाल्यावर तुम्हाला तुमच्या टॉवेलची गरज लागू शकते.
लग्नसोहळा आणि त्या आधीची तयारी यामुळे तुम्ही अगदी थकून जाता. लग्न आणि संसाराची सुरूवात कितीही मनमोहक असली तरी दगदगीमुळे तुम्हाला शारीरिक त्रास देखील होऊ शकतो. नव्या घरी तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा जोडीदार सोबत असला तरी पहिल्या दिवशी तरी स्वतःची काळजी स्वतःच घ्या. अचानक एखादा त्रास झाला तर उपाय करण्यासाठी तुमच्या बॅंगेत ओटीसी औषधे अवश्य जवळ बाळगा.
लग्नानंतरदेखील अनेक विधी असतात. ज्यांच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तयार राहावे लागते. यासाठी तुमच्या बॅगेत पुढच्या दोन-तीन दिवसांसाठी लागणारे कपडे तयार ठेवा. ज्यामुळे नव्या घरात तुमचा गोंधळ होणार नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही जे कपडे घालणार आहात त्याची आधीच तयारी करून ठेवा. साडी,पेटीकोट,इनरवेअर अशी सर्व गोष्टींचे सेट करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला तयारी करणे सोपे जाईल.
तुमच्या बॅगेत मेकअप किटदेखील तयार ठेवा. ज्यामध्ये फेसवॉश, बॉडीवॉश, टिश्यू, मॉश्चराईझर, टोनर, कॉंम्पॅक्ट, लिपस्टिक अशा बेसिक मेकअपसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवा. कारण दुसऱ्या दिवशी नव्या घरी सर्वांसाठी तुम्ही फार महत्त्वाच्या असणार. सर्वजण तुम्हाला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी आतूर असणार. अशा वेळी नववधूचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसण्यासाठी हलका मेकअप जरूर करा.
लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप
माऊथ फ्रेशनर देखील तुमच्या बॅगेत असायलाच हवे. असं म्हणतात फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन. आज तुमच्या वागण्या-बोलण्याची छाप तुमच्या नव्या कुंटुंबावर पडणार आहे.
एक चांगली हॅंडबॅग जरूर जवळ ठेवा. ज्या बॅगेत तुमच्या सर्व गोष्टी राहू शकतील. आवश्यक पैसै, मोबाईल, रुमाल, मेकअप किट त्यामध्ये जरूर ठेवा. लग्नानंतर बाहेर जाताना ती बॅग तुम्ही कॅरी करू शकता. शिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी पहिल्या दिवशी शोधण्याचा गोंधळ होऊ नये म्हणून पॅकिंग करतानाच त्या गोष्टी या छोट्या बॅगेत ठेवा. मात्र ती बॅग तुमच्या जवळच राहील याची काळजी घ्या.
लग्नात आणि लग्नानंतर काही दिवस तुम्हाला पारंपरिक पेहराव आणि हेअरस्टाईल करावी लागते. यासाठी लागणारे बॉबीपिन्स, हेअरपिन्स, साडीपिन्स जरूर बॅगेत ठेवा.
एखादे सौम्य आणि मनमोहक सुंगधाचे परफ्युम तुमच्या हॅंडबॅगमध्ये ठेवा. कारण लग्नानंतर तुमचे रोमॅंटिक जीवन सुरू होते. अशा वेळी जोडीदारासोबत सहजीवनाची सुरूवात करताना परफ्युम अत्यंत गरजेचे असू शकते.
लग्नसराईमध्ये या 15 गाण्यांनी मोहरेल नववधूचे मन
लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो*
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम