आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी, वाचा टीप्स

आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी, वाचा टीप्स

महिन्यातून एकदा तरी तुम्ही पार्लरमध्ये आयब्रोड थ्रेडींग करायला जात असाल .पण आयब्रोज थ्रेडींग केल्यानंतर तुम्ही तुमच्या आयब्रोजची काळजी घेता की नाही? आता काळजी कशी घ्यायची असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज तुम्ही तुमच्या आयब्रोजची थ्रेडींग करताना आणि त्यानंतर  नेमकी कशी काळजी घ्यावी याविषयीच थोड्या टीप्स देणार आहोत. या टीप्स तुम्हाला माहीत असतील पण त्या मागील कारणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.


तुम्हालाही हवेत जाड आयब्रोज, मग फॉलो करा या टीप्स 


 पावडर लावणे गरजेचे


eyebrows 1 %281%29


आयब्रोज करताना तुमच्या आयब्रोजला पावडर लावली जाते. याचे कारण असे आहे की, तुम्ही आयब्रो थ्रेडींग करायला जाता तेव्हा तुम्हाला घाम आलेला असतो किंवा तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असतो. त्यामुळे एक्स्ट्रा केस काढताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यावर पावडर लावली जाते. त्यामुळे तुमची पार्लरवाली तुमच्या आयब्रोजना पावडर नीट लावते का ते नीट पाहा. जर ती लावत नसेल तर लावून घ्या.


 चांगला दोरा वापरणे गरजचे


अनेकांना आयब्रोज थ्रेडींग करताना जखमा होतात. याचे कारण तुम्ही आयब्रोज सैल पकडता आणि दुसरे म्हणजे दोऱ्याला असणारी धार. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही आधी दोरा तपासून पाहा. तुम्हाला तो दोरा जास्त धारदार वाटत असेल तर दुसरा दोरा घेण्यास सांगा. त्यामुळे तुमच्या आयब्रोजना जास्त त्रास होणार नाही. जखमा होणार नाही.


अप्परलीपवरील केस काढताना अशी घ्या काळजी


पकडायला जमत नसल्यास सांगा


अनेकदा पार्लरमध्ये गर्दी असते आणि तुम्हाला नुसते आयब्रोज करायचे असतात. अशावेळी तुम्ही तुमचे काम पटकन आटोपायला बघता. काहींना आयब्रोज पकडणे जमत नसते. तरी ते पकडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तुम्ही आयब्रोड घट्ट पकडण्यासाठी तुम्हाला मदत हवी असे सांगा. तुम्हाला ती मदत पार्लरमधून मिळू शकते. तुम्ही फक्त बोलणे गरजेचे आहे. कारण विनाकारण त्रास सहन करण्यापेक्षा तुम्ही मदत मागणे नेहमीच चांगले असते.


हालचाली करु शकतात घात


आता डोळ्यावर काहीतरी केले जात आहे म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्याचे भाव बदलणारच.जर तुम्हाला आयब्रोज करताना दुखत असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तिला आवर्जून सांगा. मध्ये मध्ये थांबा. वरील भागांचे केस काढताना त्रास होत नाही. पण डोळ्यांच्या वरील भागातील केस काढताना खूप त्रास होतो. तुम्ही जरा जरी हालचाल केली तरी तुमच्या आयब्रोजचा शेप बदलू शकतो शिवाय जखम होऊ शकते ती वेगळी गोष्ट त्यामुळे जर तुम्हाला दुखत असेल तर मध्ये थांबा


मसाज करु नका


eyebrows massage


आयब्रोज थ्रेडींग केल्यानंतर अनेकांना आवडणारी गोष्ट म्हणजे मसाज. किती छान रिलॅक्स वाटतं ना. पण आयब्रोज केल्यानंतर लगेचच मसाज करण्याची काहीच गरज नसते. मसाजसाठी वापरले जाणारे क्रिम तुमच्या उघडलेल्या छिद्रांमध्ये जाण्याची शक्यता असते. ज्याचे परिणाम म्हणजे तुम्हाला आयब्रोजवर बारीक पुळ्या येतात. त्यामुळे जर तुम्हाला फारच जळजळ होत असेल तर त्या ठिकाणी बर्फ चोळा.तुम्हाला आराम पडेल.


नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला कसा आाणता येईल *ग्लोआता पार्लरमध्ये आयब्रोज थ्रेडींगसाठी जाताना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.