उन्हाळ्यात थंडावा देतील या '5' रिफ्रेशिंग आईस टीज

उन्हाळ्यात थंडावा देतील या '5' रिफ्रेशिंग आईस टीज

आपल्या भारतीयांना सर्वात जास्त प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये समावेश होतो तो गरमागरम चहाचा. काही जण इतके चहाबाज असतात की, उन्हाळा असला तरी त्यांचं चहाप्रेम काही कमी होत नाही. चहाशिवाय जणू त्यांचं पानच हलत नाही. पण चहाप्रेमींना जरी उन्हाळ्यात चहा पिणं कितीही आवडत असलं तरी सगळ्यांनाच आवडेलच असं नाही. चहा तर प्यायचा असतो पण गरम नाही. मग त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणजे आईस टी. आईस टी तुम्ही आत्तापर्यंत ट्राय केली नसेल तर या उन्हाळ्यात नक्की पिऊन पाहा. कारण आईस टी गारेगार तर असतेच पण तेवढीच टेस्टी आणि एनर्जीदायकही असते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत 5 प्रकारच्या आईस टी, ज्या तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून पाहा.


1. अॅप्पल सिनमन आईस टी (Apple Cinnamon Iced Tea)


हे कॉम्बीनेशन ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पण गोड सफरचंदासोबत दालचिनीची चव खूपच छान लागते. यासाठी तुम्हाला लागेल ½  कप सफरचंदाचा ज्यूस, ½ कप उकळून घेतलेला चहा, चिमूटभर दालचिनी, साखर चवीनुसार आणि बर्फाचे तुकडे आवश्यकतेनुसार. पाहा कशी बनवता येईल ही आईस टी -

Subscribe to POPxoTV

 


2. वॉटरमेलन आईस टी (Watermelon Iced Tea)


उन्हाळ्यातील सर्वात जास्त हवहवंसं आणि सहज मिळणारं फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड नुसतं खा, ज्यूस करून प्या किंवा अगदी सॅलड करून खा ते चांगलंच लागतं. आता चाखून पाहा याची आईस टी. कलिंगडामुळे तुमचं वजनही कमी होईल आणि मेटाबॉलीजमही चांगलं होईल. या आईस टीसाठी तुम्हाला लागेल उकळून घेतलेला चहा, कापलेलं कलिंगड, लिंबाचा रस, साखर आणि बर्फाचे तुकडे. पाहा कशी बनवता येईल ही आईस टी -


ब्लॅक टीच्या दुष्परिणामांबद्दलही वाचा

Subscribe to POPxoTV

3. लेमन-मिंट आईस टी (Lemon-Mint Iced Tea)


लिंबू आणि पुदीना यांचं जर मिश्रण केलं तर ते मन आणि डोकं दोन्ही अगदी शांत करतं. या आईस टीसाठी तुम्हाला लागणारं साहित्य आहे, लिंबू, पुदीना, साखर, चहा पावडर आणि पाणी. किती सोप्पं आहे ही आईस टी बनवणं ते पाहण्यासाठी पाहा हा व्हिडीओ -

Subscribe to POPxoTV

4. मँगो-कार्डमम आईस टी (Mango-Cardamom Iced Tea)


आंबाच्या सिझनमध्ये आंब्याची आईस टी तर करायलाच हवी आणि जर आंब्यासोबत वेलचीही असेल तर लई भारी. ही अप्रतिम आईस टी बनवण्यासाठी तुम्हाला लागेल उकळून घेतलेला चहा, आंबा किंवा मँगो क्रश, साखर, लिंबू आणि वेलची. पाहा कसं बनवता येईल ही आईस टी -

Subscribe to POPxoTV

5. लेमन लव्हेंडर आईस टी (Lemon Lavender Iced Tea)


फीट आणि निरोगी शरीरासाठी जर चहामध्ये सुंदर सुवासही असेल तर कसं वाटेल. या आईस टीमध्ये आहे चव आणि सुवासाच अनोख कॉम्बिनेशन. या आईस टीसाठी तुम्हाला लागणारं साहित्य आहे,  उकळून घेतलेला चहा, लव्हेंडर सिरप आणि फक्त लिंबू. पाहा या आईस टी चा व्हिडीओ -

Subscribe to POPxoTV

मग या आईस टीज घेतल्यावर तुमचाही उन्हाळा नक्कीच होईल, थंडा थंडा कूल कूल.


हेही वाचा -


मँगो ड्रींक्सच्या या सोप्या रेसिपीज करा आणि मिळवा वाहवा


उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या 'लिंबूपाणी'


तुमच्यासाठी कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपीज


उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज