प्रत्येक स्त्रीला तिची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने व्हावी असे वाटत असते. मात्र प्रत्येक स्त्रीचं बाळंतपण वेगळं असू शकते. त्यामुळेच प्रसवकळा सुरू झाल्यावर कधी कधी आई अथवा बाळाच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टरांना सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियन पद्धतीने प्रसूती करावी लागते. बाळंतपणात निर्माण झालेल्या समस्यांमधून सी-सेक्शनमुळे बाळ सुखरूप पद्धतीने जन्माला येते. मात्र या सर्जरीनंतर त्या मातेला भविष्यात अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा अशा महिलांना प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यास बराच वेळ लागतो. आजकालची बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे सी-सेक्शनचे प्रमाण वाढत आहे. शिवाय पहिल्यांदा सी-सेक्शन झाले असेल तर दुसऱ्या बाळाची प्रसूतीदेखील सी-सेक्शन पद्धतीने होण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच आम्ही तुम्हाला सिझेरियन डिलिव्हरीनंतर काय काळजी घ्यावी यासाठी काही उपाय सांगत आहोत.
सी-सेक्शननंतर फॉलो करा या टीप्स-
- सी-सेक्शननंतर पुरेसा आराम करा. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर लगेच घरातील कामे करण्यास सुरूवात करू नका.
- हॉस्पिटलमध्ये असतानादेखील बेडवर जास्तवर पडून राहू नका. डॉक्टरांच्या परवानगीने शरीराची थोडीफार हालचाल तुम्ही नक्कीच करू शकता.
- प्रसूतीनंतर योग्य आहार घ्या. कारण संतुलित आणि पोषक आहारामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य आणि तुमची शरीरप्रकृती दोन्ही उत्तम राहण्यास मदत होते. शिवाय अपथ्यकारक पदार्थ खाल्यास तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.
- प्रसूतीनंतर जड वजन उचलू नका. कारण यामुळे तुमच्या ऑपरेशनच्या जखमांवर ताण येण्याची शक्यता असते.
- डिलीव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी लगेच जड व्यायाम करण्यास सुरूवात करू नका. तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यास चार ते पाच महिन्यांनी तुम्ही हलके व्यायाम अथवा योगासने करू शकता. मात्र हे व्यायाम अथवा योगासने एखाद्या तज्ञाकडून आधी शिकून घ्या.
- हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तुम्ही तुमच्या बाळासोबत घरात अथवा घराबाहेरील बागेत फिरण्याचा व्यायाम नक्कीच करू शकता.
- बाळाला दूध पाजणे अथवा बाळाची इतर कामे करण्यासाठी कुटुंबाची अथवा मदतनीसांची मदत घेण्यास संकोच बाळगू नका. कारण त्यामुळे तुम्हाला पुरेसा आराम मिळेल.
- प्रसूतीनंतर इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे काही महिने बाहेर फिरण्यास जावू नका. कारण अस्वच्छ टॉयलेटचा वापर केल्यास तुम्हाला युरिन इनफेक्शन होऊ शकते.
- प्रसूतीनंतर स्वतःच्या मर्जीने कोणतेही ओ.टी.पी औषध घेऊ नका. कारण त्याचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी त्रासच होऊ शकतो. आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- शरीरावरचे प्रसूतीनंतरचे स्ट्रेच मार्क्स अथवा इतर व्रण स्वीकारा. कारण या व्रणांमुळेच तुम्हाला आई होण्याचे सुख प्राप्त झाले आहे. काही व्रण आयुष्यात तुमच्यासोबत तसेच राहतात तर काही तुम्ही उपचार करून कमी करू शकता. यासाठी बाळाला आणि तुम्हाला चांगल्या दर्जाच्या तेलाने आणि हलक्या हाताने मालिश करा. ज्यामुळे तुम्हाला पूर्ववत होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल.
- सी-सेक्शन झाल्यावर पोट कमी करण्यासाठी सुरक्षा बेल्ट वापरू नका. तुमचे पोट नैसर्गिक पद्धतीने पूर्ववत होईल.
- सकारात्मक विचार करा. कारण डिलीव्हरीनंतर तुम्हाला सतत घरातच राहवे लागणार असल्यामुळे तुमच्या मनात एकटेपणाची अथवा नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते. मेडीटेशन आणि प्रार्थना याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
- प्रसूतीनंतर लगेचच सेक्स करण्याची घाई करू नका. यासाठी तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने आणि डॉक्टरांच्या सल्लाने योग्य तो निर्णय घ्या. कारण याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो.
- बाळाला कमीत कमी सहा महिने स्तनपान द्या.
अधिक वाचा- गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट आणि पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक