ADVERTISEMENT
home / आरोग्य
रोज ‘10’ टीप्स करा फॉलो आणि करा वजन कमी

रोज ‘10’ टीप्स करा फॉलो आणि करा वजन कमी

तसं तर आपल्या शरीरावर थोडंफार मांस वाईट दिसत नाही. पण ही चरबी एकदा वाढायला लागली की, तुम्हाला स्वतःलाच जाणवायला लागतं की, आता खूप झालं. आता आपल्याला वजन कमी करायलाच हवं. इतकंच नाही तर रोज ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांना कळतही नाही आपलं वजन कधी वाढायला लागलं आणि आपण कधी जाड झालो आहोत. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी काही खास टीप्स सांगणार आहोत. तुम्ही या टीप्स जर रोज फॉलो केल्यात, तर तुमचं वजन नक्कीच रोजच्या रोज कमी होईल. जाणून घेऊया नक्की काय आहेत या टीप्स –

या टीप्स रोज फॉलो करून तुम्ही करू शकता वजन कमी – Best Way To Lose Weight Fast In Marathi

जेवण्यापूर्वी प्या सूप

potato-and-leek-soup

नुकत्याच एका रिसर्चमध्ये सिद्ध झालं आहे की, तुम्ही जेवण्यापूर्वी रोज 1 तास आधी एक बाऊल सूप पित असाल तर तुम्हाला भूक कमी लागते. त्यामुळे अति खाण्यापासून तुम्ही स्वतःला नियंत्रणामध्ये ठेऊ शकता. शिवाय तुमचं पोटही भरलेलं राहतं.

हेल्दी ब्रेकफास्ट करा

आजकाल खूपच जास्त धावपळ असते. सकाळी प्रत्येकालाच ऑफिसला जायची घाई असते. त्यामुळे बऱ्याचशा व्यक्ती सकाळी उशीर होईल म्हणून नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात. पण खरं तर आपल्या शरीरासाठी रोज सकाळी नाश्ता करणं हे जास्त फायदेशीर असतं. ब्रेकफास्ट केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा आणि शक्ती व्यवस्थित राहते. तुम्ही जर रोज वेळेवर नाश्ता सकाळी करत असाल तर तुम्हाला कोणताही आजार पण होणार नाही आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहील.

ADVERTISEMENT

थोड्या थोड्या वेळाने खात राहा

तुम्हाला जर आता फिट राहायचं आहेच तर तुम्हाला त्यासाठी एक योग्य योजना आखून घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्याजवळ नेहमी हेल्दी स्नॅक्स ठेवा. थोड्या थोड्या वेळाने अर्थात दर 2 ते 3 तासाने तुम्ही हे स्नॅक्स खात राहा. यामुळे तुमच्या शरीरातील मेटबॉलिजम वाढतं आणि तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारे फॅट्सदेखील बर्न करतं अर्थात जाळतं.

जेवणात मिरचीचा करा वापर

lal mirchi

तुम्हाला जर तिखट जेवण आवडत असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. तिखट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम  8% जास्त वाढतं. रात्री झोपण्यापूर्वी जेवणामध्ये नक्की हिरवी मिरची खा. कारण मिरची तुमची चरबी कमी करण्याचं काम करते. तसंच हेदेखील पाहण्यात आलं आहे की, तिखट खाणारी माणसं ही नेहमी व्यवस्थित चावून चावून हळू खातात. जी तुमच्या शरीरासाठी एक उत्कृष्ट सवय आहे.

रात्री ग्रीन टी प्या

रात्री झोपण्यापूर्वी नेहमी एक कप ग्रीन टी नक्की प्या. त्यामुळे शरीरातील मेटबॉलिजम वाढतं आणि रात्रभर फॅट बर्न होण्याची प्रक्रिया चालू राहाते. ग्रीन टी फक्त वजनच कमी करत नाही तर, कॅन्सरसारखे आजारही तुमच्यापासून दूर ठेवतो. ग्रीन टी मध्ये कॅफिनचं प्रमाण हे कॉफीपेक्षाही अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायलात तर त्याचे फायदे कमी होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात ग्रीन टी प्या याचा फायदा नक्की मिळेल.

ADVERTISEMENT

हसणं गरजेचं आहे

हसणं ही एका तऱ्हेने एरोबिक एक्सर्साईज आहे. तुम्हाला माहीत आहे का? 30 मिनिटांच्या वेटलिफ्टिंग प्रक्रियेनंतर तुमचं वजन कमी होतं तितकंच वजन हसण्यामुळे होतं. हो हे खरं आहे. तुम्ही रोज एक तास मनापासून हसलात तर तुमची साधारण 400 कॅलरी बर्न होते आणि वजन कमी होतं. त्यासाठी रोज कमीत कमी 15 मिनिटांचा वेळ काढून हा हसण्याचा व्यायाम नक्की करा.

साखर खाणं टाळा

sweets

वजन वाढवण्यासाठी साखर हेदेखील एक मुख्य कारण आहे. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर साखरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जास्त गोड चहा पिऊ नका. अशा सर्व पदार्थांपासून दूर राहा ज्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. दिवसातून कमीत कमी दोन हंगामी फळं खा. केक, पेस्ट्रीज, डेझर्ट, तेलकट पदार्थ या सगळ्या पदार्थांपासून लांब राहा. कारण  हे सर्व पदार्थ वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत सर्वात मोठी बाधा बनू शकतात.

निळ्या रंगाच्या प्लेटमध्ये जेवा

तुम्ही जर निळ्या रंगाच्या प्लेटमधून जेवाल तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा गडद रंगाच्या प्लेटमध्ये जेवण जेवल्यास, भूक कमी लागते. त्यामुळे आपण कमी जेवतो. निळा अथवा असा गडद रंग आपल्या मेंदूमध्ये एक अशा इमेज क्रिएट करतो, ज्यामुळे आपण कमी खाण्यातच संतुष्ट होतो आणि आपलं पोट भरल्या भरल्यासारखं वाटतं.

ADVERTISEMENT

अंधारात झोपा

sleep

उजेडात झोपणाऱ्यांच्या तुलनेत अंधारात झोपणाऱ्यांचा वजन कमी होतं. हे ऐकायला अथवा वाचायला थोडं विचित्र वाटतं. पण हे खरं आहे. ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सने हा शोध लावला आहे की, अंधाऱ्या जागी झोपल्यामुळे शरीरामध्ये हलकेपणा येतो आणि तुमचं वजन कमी होतं. वास्तविक आपण झोपतो तेव्हा मेलाटोनिन हार्मोन आप्लया शरीरामध्ये ब्राऊन फॅट निर्माण करत असतो. ज्यामुळे कॅलरीज बर्न करण्यासाठी मदत मिळते. काळोखात आपलं शरीर जास्त मेलाटोनिन निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रूममध्ये पूर्ण अंधार करूनच झोपा.

झोप पूर्ण करा

तुम्हाला वजन खरंच कमी करायचं असेल तर तुम्ही भरपूर झोप घ्या. कारण झोपेमुळे तुमच्या शरीराचा दिवसभराचा थकवा आणि ताण दूर होतो. ही विशेष गोष्ट आहे की, वजन कमी करण्याच्या या पूर्ण प्रक्रियेत चांगली झोप ही महत्त्वाची भूमिका साकारत असते. झोप तुमच्या हंगर हार्मोन्सलादेखील स्थिर करते. त्यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हेदेखील वाचा – 

ADVERTISEMENT

जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक

वजन कमी करण्यासोबतच अनेक आजारांवर गुणकारी आहे टोमॅटो

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी

07 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT