उन्हाळ्यात मजामस्ती करण्यासाठी मुंबईतील परफेक्ट वॉटर पार्क्स!

उन्हाळ्यात मजामस्ती करण्यासाठी मुंबईतील परफेक्ट वॉटर पार्क्स!

मे महिना सुरु झाला आहे आणि शाळांनाही सुट्टी सुरु झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उन्हाळ्याचे दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. मुंबईतदेखील उन्हाने हल्ली जास्त काहिली व्हायला लागली आहे. अशामध्येच सगळे ग्रुप आता प्लॅन करतात ते मुंबईतील वेगवेगळ्या वॉटर पार्कमध्ये जाऊन मजामस्ती आणि धमाल करण्याचे. कारण इतक्या उन्हाळ्यात पाण्यात डुंबण्यासारखी मजा कुठेच नाही. आपल्या आवडत्या माणसांबरोबरच फन गेम्स असतील तर अगदी सोने पे सुहागा! पण काही जणांना नक्की कुठे जायचं? मुंबई आणि मुंबईजवळ असे कोणते वॉटरपार्क्स आहेत जिथे आपल्या बजेटमध्ये जाता येईल हे माहीत नसतं. त्यासाठीच आम्ही खास तुमच्यासाठी ही माहिती देत आहोत. हा लेख वाचा आणि मस्तपैकी लगचेच आपल्या कुटुंब आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वॉटर पार्कला जायची योजना आखा. आम्ही दिलेली ही यादी नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल.


अडलॅब्स इमॅजिका वॉटर पार्क (Adlabs Imagica Water Park)


Imagica 1


अडलॅब्स इमॅजिका वॉटर पार्कचं नाव कोणी ऐकलं नाही असं नक्कीच नाही. या ठिकाणी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या अशा राईड्स आहेत ज्या पर्यटकांच्या आकर्षणाचं कारण आहेत. नवी मुंबईपासून 68 किलोमीटर अंतरावर असणारं हे वॉटर पार्क म्हणजे अमर्यादित मजेचं भांडारच आहे. मुंबईत राहून या वॉटर पार्कला गेलं नाही तर काहीच केलं नाही.


कुठे: मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे जवळ


इथे कसं जावं:


 • मुंबई - पुणे एक्स्प्रेसजवळ तुमची कार घेऊन जावं अथवा खूपजण असाल तर गाडी करूनच जावं

 • दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही इमॅजिकाजवळील बस स्टॉपजवळून बसनेदेखील जाऊ शकता

 • इमॅजिकाच्या संकेतस्थळावरून तुम्ही बस अथवा कार बुक करण्याचा पर्यायदेखील घेऊ शकता


आम्हाला काय आवडलं: Boomeranggo, Swirl Whirl, Floatsa, Raftaastic, Soakerz, Splash, and Loopy Whoopy.


काय घालावं: पॉलिस्टर अथवा नायलॉन स्वीमसूट, तुम्ही पार्कमधूनही भाड्याने स्वीमसूट घेऊ शकता. स्वीमसूटमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर नायलॉनचे पटकन सुकणारे कपडे


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs. 899

 • विद्यार्थी: Rs. 799

 • लहान मूल: Rs. 799


वेळ: सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7 वा.


वॉटर किंगडम (Water Kingdom)


आशिया खंडातील सर्वात मोठं थीम पार्क म्हणून ओळख असणारे वॉटर किंगडम हे मुंबईची शान आहे. शहरातील केंद्रस्थानी वसलेलं हे थीम पार्क साधारण 47 किलोमीटर मुंंबईपासून दूर आहे. वॉटर किंगडममध्ये अतिशय थरारक आणि मजा आणणाऱ्या असा राईड्स आहेत. एस्सेल ग्रुपचा भाग असणारं हे थीम पार्क कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी एक आकर्षक ठिकाण आहे. एक दिवसात तुम्ही संपूर्ण मजामस्ती करून येऊ शकता.


कुठे: बोरिवली, एस्सेल वर्ल्डजवळ


इथे कसं जावं:


 • कारमधून गेल्यास, पश्चिम द्रूतगती महामार्गाचा वापर करा

 • भाईंदर बस स्टॉपवरून MBBT Bus #4 पकडा


आम्हाला काय आवडलं: What-a-coaster (the tallest ever vertical drop ride in the country), Serpent Safari, Elephant Safari.


काय घालावं: नायलॉन स्वीमसूट, तुम्ही पार्कमधूनही भाड्याने स्वीमसूट घेऊ शकता. स्वीमसूटमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर नायलॉनचे पटकन सुकणारे कपडे


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 949

 • वरिष्ठ नागरीक: Rs 399

 • लहान मूल: Rs 699


वेळ:


सोमवार ते शुक्रवार: सकाळी 10 ते संध्या. 8
शनिवार आणि रविवार: सकाळी 9 ते रात्री 8:30


सूरज वॉटर पार्क (Suraj Water Park)


suraj-water-park-in-mumbai


ठाण्यापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असणारं सूरज वॉटर पार्क हे नक्कीच महाराष्ट्रचा अभिमान आहे. आतापर्यंत या पार्कला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 11 एकर्स जमिनीमध्ये हे वॉटर पार्क बांधण्यात आलं आहे. तुम्हाला जर साहस आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या वॉटर पार्कला भेट द्यायला हवी. मुंबईतील सर्वोत्कृष्ट वॉटर पार्कपैकी हे एक आहे.


कुठे: घोडबंदर हायवे


इथं कसं जावं:


 • कार असल्यास, घोडबंदर हायवेला कारने जावं

 • अथवा मुंबई लोकल ट्रेन पकडून ठाण्याला उतरावं आणि त्यानंतर रिक्षा अथवा बसने तुम्हाला इथे पोहचता येतं


आम्हाला काय आवडलं: Ulatpalat slide, Ding-dong slide, Labakzamakmatak slide


काय घालावं: तुमच्या शरीरावरील कपडे तुम्ही खेळत असलेल्या उपकरणांमध्ये अडकण्याची भीती असते त्यामुळे स्वीमसूट घालण्याला प्राधान्य द्या. तुम्ही इथे भाड्यानेही स्वीमसूट घेऊ शकता.


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 800

 • लहान मूल: Rs 650


वेळ: सकाळी 10 ते संध्या. 6


शांती सागर वॉटर पार्क (Shanti Sagar Water Park)


उन्हाळ्यामध्ये जाण्यासाठी ही खूपच चांगली जागा आहे. उल्हास नदीच्या काठी हे शांती सागर वॉटर पार्क बांधण्यात आलं आहे. जवळच दिसणारा निसर्गरम्य धबधबा हा इथलं सर्वात मोठं आकर्षण आहे. तुमच्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून जाण्यासारखं ठिकाण हे नक्कीच आहे.


कुठे: वसंत, अंबरनाथ पश्चिम


इथे कसं जावं:


अंबरनाथ रेल्वे स्टेशनला ट्रेन पकडून जावं आणि स्टेशनवरून शांती सागर वॉटर पार्कसाठी असलेली पिक अप सर्व्हिस घ्यावी.


आम्हाला काय आवडलं: Octagonal slide, laughing joker, water film fall, and tube slide.


काय घालावं: कोणताही तुम्हाला आवडेल तो ड्रेस घाला. पण ओढण्या असलेले ड्रेस वापरू नका. पण आम्ही तुम्हाला स्वीमसूट वापरण्याचा सल्ला देऊ.


प्रवेश शुल्क: Rs 200 per person


वेळ: सकाळी 10:30 ते संध्या 6


टिकूजी नी वाडी वॉटर पार्क (Tikuji Ni Wadi Water Park)


कौटुंबिक सहल आणि मित्रपरिवाराबरोबर येण्याचं हे उत्कृष्ट ठिकाण आहे. मध्य मुंबईपासून साधारण 25 किलोमीटर दूरवर वसलेलं हे ठिकाण आहे. वेगवेगळ्या वयांच्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या राईड्स इथे उपलब्ध आहेत. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वॉटरपार्क जेवणासह तुम्हाला सोय उपलब्ध करून देते.


कुठे: टाटा पॉवर हाऊसच्या समोर


इथं कसं जावं:


पूर्व द्रूतगती महामार्गावरून तुम्ही तुमची कार घेऊन जाऊ शकता


आम्हाला काय आवडलं: Family Play, Lazy River, Kids Pool


काय घालावं: स्वीमसूट जो तुम्हाला पार्कमध्येदेखील मिळू शकतो.


प्रवेश शुल्क:


 • जेवणासह: Rs 800

 • जेवणाव्यतिरिक्त: Rs 700


वेळ: सकाळी 10 ते संध्या 6


शिवगंगा वॉटर पार्क (Shivganga Water Park)


shivganga-water-park-in-mumbai


हे वॉटर पार्क थोडंं नवं वॉटर पार्क आहे. असं असलं तरीही याची सध्या चांगली प्रसिद्धी झाली आहे. 10 एकर्सच्या जमिनीवर बांधलेलं हे वॉटर पार्क अगदी झाडं, देऊळ आणि कँटीन अशा सुविधांनी नटलेलं आहे. थोडं लांब असलं तरीही इथे येऊन नक्कीच तुमचा थकवा जाईल.


कुठे: शिव मंदिरजवळ, पनवेल


इथं कसं जावं:


पनवेलपर्यंत ट्रेन पकडावी आणि त्यानंतर रिक्षाने वॉटर पार्कपर्यंत जावं


आम्हाला काय आवडलं: Tube Slides, Rain Dance, Waterfall


काय घालावं: संकेतस्थळावर काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण तुम्ही तुमचा स्वीमसूट बरोबर घेऊन जावा असाच सल्ला आम्ही तुम्हाला देऊ


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 850

 • लहान मूल: Rs 750


वेळ: सकाळी 9 ते संध्या. 6 PM


शांग्रीला वॉटर पार्क (Shangrila Water Park)


शांग्रिला हे खूपच प्रसिद्ध वॉटर पार्क आहे. 15 एकर्सच्या जमिनीवर असणारं हे पार्क कौटुंबिक पिकनिक आणि मित्रपरिवारासाठी उत्कृष्ट आहे. मुंबईपासून साधारण 45 मिनिटांच्या अंतरावर हे आहे. या ठिकाणी कायम पर्यटकांचा ओघ असतो आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे.


कुठे: मुंबई नाशिक हायवे


इथं कसं जावं:


पूर्व द्रूतगती महामार्गावरून तुमची कार घेऊन अथवा गाडी भाड्याने करून जावं. भिवंडी पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच हे पार्क आहे.


आम्हाला काय आवडलं: Waterfall, rain dance


काय घालावं: स्वीमसूटला प्राधान्य. तसंच पार्कमध्ये तुम्हाला आवश्यक गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता.


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 650

 • लहान मूल: Rs 600

 • Add-ons: Rs 250 दोघांकरिताही


वेळ: सकाळी 10 ते संध्या 6


निशीलँड वॉटर पार्क (Nishiland Water Park)


nishiland-water-park-in-mumbai


मुंबई - पुणे हायवेवर हे निशीलँड वॉटर पार्क असून अतिशय व्यवस्थित सोयीसुविधा असणारं वॉटर पार्क आहे. इतकंच नाही तर तुमच्या खिशाला परवडणाऱ्या वॉटर पार्कपैकी हे एक पार्क आहे.


कुठे: मुंबई - पुणे हायवे


इथं कसं जावं:


 • मुंबई - पुणे हायवे वर तुमची कार अथवा भाड्याची कार घेऊन जावं

 • कर्जत स्टेशनपर्यंत ट्रेनने जाऊन तिथून रिक्षानेही जाता येतं


आम्हाला काय आवडलं: Wave Pool, Rain Dance, Jacuzzis


काय घालावं: संकेतस्थळावर काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण तुम्ही तुमचा स्वीमसूट बरोबर घेऊन जावा असाच सल्ला आम्ही तुम्हाला देऊ


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 325

 • लहान मूल: Rs 300


वेळ: सकाळी 10 ते 6


ग्रेट एस्केप वॉटर पार्क (Great Escape Water Park)


हे कौटुंबिक वातावरण असणारं वॉटर पार्क शहरापासून 59 किलोमीटवर आहे.  या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला बऱ्याच स्लाईड्स खेळण्यासाठी असून तुमच्या खिशाला परवडण्यासारखं हे वॉटर पार्क आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही बऱ्यापैकी स्वस्त वॉटर पार्क शोधत असाल तर हे उत्कृष्ट वॉटर पार्क आहे.


कुठे: पारोल भिवंडी रोड


इथं कसं जावं:


 • पश्चिम द्रूतगती महामार्गावरून आपली कार अथवा भाड्याने कार करून जावं

 • अथवा वसईपर्यंत ट्रेनने प्रवास करावा आणि तिथून रिक्षा करून जावं


आम्हाला काय आवडलं: The Funnel Ride, Jungle Gym Water ride


काय घालावं: नायलॉन स्वीमसूट, तुम्ही पार्कमधूनही भाड्याने स्वीमसूट घेऊ शकता. स्वीमसूटमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर नायलॉनचे पटकन सुकणारे कपडे


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 250

 • वरीष्ठ नागरीक: Rs 150

 • लहान मूल: Rs 200


वेळ :


 • सोमवार ते शनिवार: सकाळी 10:30 ते संध्या. 7 PM

 • रविवार आणि इतर सुट्टीचा दिवस: सकाळी 9 ते संध्या. 6


आनंद सागर वॉटर पार्क (Anand Sagar Water Park)


तुमच्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी हे सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. वेगवेगळ्या राईड्स तुम्हाला या ठिकाणी खेळायला मिळतील. अतिशय स्वस्त आणि मस्त असं हे वॉटर पार्क आहे. शिवाय तुमच्या खिशाला कोणताही त्रास नाही.


कुठे: अंबरनाथ पूर्व


इथं कसं जावं:


 • आनंद नगर एमआयडीसी हायवेपर्यंत तुम्ही कार घेऊन जा

 • कल्याण जंक्शनपर्यंत ट्रेनने या आणि तिथून पाले गावाला जाणारी बस पकडा. गावच्या बस स्टॉपपासून चालत 5 मिनिटांच्या अंतरावर वॉटर पार्क आहे.


आम्हाला काय आवडलं: Family Play, Lazy River, Kids Pool


काय घालावं: संकेतस्थळावर काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण तुम्ही तुमचा स्वीमसूट बरोबर घेऊन जावा असाच सल्ला आम्ही तुम्हाला देऊ


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 250

 • मूल: Rs 200


वेळ: सकाळी 10 ते संध्या 6


रॉयल गार्डन वॉटर पार्क (Royal Garden Water Park)


royal-garden-water-parks-in-mumbai


अतिशय सुंदर असं हे वॉटर पार्क ज्यामध्ये 4 स्विमिंग पूल्स, 15 वेगवेगळ्या स्लाईड्स, वेव्ह पूल्स आणि धबधबादेखील आहे. तसंच इथे कार राईड्स आणि तुम्हाला आणि मुलांना आवडतील असे गेम्स आहेत. सर्व पुरुष असणारा ग्रुप इथे येऊ शकत नाही. हे कौटुंबिक वॉटर पार्क आहे.


कुठे: वसई तालुका


इथं कसं जावं:


मुंबई अहमदाबाद हायवेवरून तुमची कार अथवा भाड्याची कार


आम्हाला काय आवडलं: Car rides, waterfalls, wavy pools.


काय घालावं: संकेतस्थळावर काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण तुम्ही तुमचा स्वीमसूट बरोबर घेऊन जावा असाच सल्ला आम्ही तुम्हाला देऊ


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 750

 • मूल: Rs 650


वेळ: सकाळी 10 ते संध्या. 5


अम्मू वॉटर पार्क (Ammu Water Park)


साधारण 8 एकर्स जमिनीवर असणारे हे पार्क निसर्गाने भरलेलं आहे. उल्हास नदीजवळ स्थित असणारं हे वॉटर पार्क तुम्हाला मजा करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.


कुठे: कल्याण तालुका


इथं कसं जावं:


पूर्व द्रूतगती महामार्गावरून नंतर अहमदाबाद कल्याण रोडवरून पुढे आपली कार घेऊन जावं.


आम्हाला काय आवडलं: Rain Dance, Kids’ Play Area, Massive Swimming Pool


काय घालावं: ठरवलेलं असं काहीही नाही. पण स्वीमसूटला प्राधान्य द्या.


प्रवेश शुल्क:


 • प्रौढ: Rs 500

 • मूल: Rs 400


वेळ: सकाळी 10 ते संध्या. 6


उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे त्यामुळे आता लवकरच आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर कोणत्या वॉटर पार्कमध्ये जायचं ते ठरवा!


हेदेखील वाचा - 


मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं


फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये 'या' गोष्टी असायलाच हव्यात


Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर