प्रत्येकाला माहीत हवे बडीशेप खाण्याचे हे 20 फायदे (Saunf Benefits In Marathi)

प्रत्येकाला माहीत हवे बडीशेप खाण्याचे हे 20 फायदे (Saunf Benefits In Marathi)

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते. अनेकांकडे बडीशेपचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणूनही केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप (Fennel Seeds) किंवा सौंफमध्ये असे अनेक गुण आहेत जे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत. बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे. कारण बडीशोपमुळे फक्त एक नाहीतर अनेक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे काय काय फायदे असतात ते...    


बडीशेप खाण्याने होणारे फायदे (Health Benefits Of Saunf In Marathi)


1 - खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.


2 - बडीशेप खाल्ल्याने पीरियड म्हणजे मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसतील तर बडीशोप आणि गूळ खा. तसंच रोज बडीशेप खाल्ल्याने तुमच्या गर्भाशयाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही.


3 - ब्यूटी बूस्टरच्या रूपातही बडीशेप खूपच परिणामकारक आहे. हो. जर तम्ही सकाळ-संध्याकाळ बडीशोेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा ग्लो करते.


4 - बडीशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.


5 - ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते, त्यांनी गुलकंद आणि बडीशेप मिक्स करून दूधातून प्यावं.


benefits of fennel seeds for stomach pain in hindi


वाचा - जिरे पाणी पिण्याचे फायदे


6 - पोटात दुखत असल्यास बडीशेप खाल्ल्यास फरक पडतो. पण लक्षात घ्या ही बडीशोप भाजलेली असावी. अशा प्रकारची बडीशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.


7 - जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.


8 - बडीशेप खाल्ल्याने तुमची स्मरणशक्तीही वाढते. यासाठी बडीशेपसोबत बदाम आणि खडीसाखर समप्रमाणात मिक्स करून खावी.


9 - दररोज बडीशेप खाल्ल्यास तुमची दृष्टी चांगली होते. प्रत्येक दिवशी 5-6 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी राहतात.


10 - बडीशेप हा अॅसिडीटीवरील रामबाण उपाय आहे. याचा वापर अनेक अॅसिडीटीवर आराम देणाऱ्या औषधांमध्ये केला जातो.


11 - जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.


12 - घश्यात खवखव जाणवत असेल तर बडीशेप दिवसभर थोडी थोडी घेऊन चावून खा. हळूहळू घश्याची खवखव दूर होईल. अनेक गायक, रेडिओ जॉकी आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जे प्रोफेशनल्स असतात. ते आपल्या आवाजासाठी रोज भाजलेली बडीशेप आणि खडीसाखर हमखास खातात.


13 - हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यात तुम्ही खडीसाखर घालून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल आणि बरं वाटेल.


benefits of fennel seeds for increase breast size in hindi


14 - बडीशेपचा वापर हा छोट्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठी आणि तसंच सुडौल करण्यासाठीही केला जातो. बडीशोपमध्ये फ्लेवोनॉईड अॅस्ट्रोजन नावाचं हार्मोन आढळतं. जे स्तनांचा आकार वाढवण्यात सहाय्यक असतं. दूधासोबत बडीशेप घेतल्यास स्तनांचा आकार वाढण्यास खूपच फायदा होतो.


गुळवेल म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)


15 - जर तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ 30 मिनिटं एक चमचा बडीशेप खावी. खरंतर बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते.


16 - जर तुम्हाला जुलाब लागल्यास बडीशेप खाण्याने लगेच आराम मिळतो. बडीशेपमध्ये एनिटोल आणि सिनेऑल नावाची तत्व असतात. जी कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यात सहाय्यक ठरतात. कारण यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात.


17 - तुम्हाला जर युरीनला जळजळ होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खा. लगेच आराम मिळेल. ही गोष्ट अगदी खरी आहे कारण मी याचा वैयक्तिक अनुभव घेतला आहे. उन्हाळ्यात बरेचदा महिलांना युरीनला जळजळ होण्याचा त्रास होतो. त्यावर लगेच आराम मिळण्यासाठी बडीशेपच सेवन नक्की करा.


18 - जर तुम्हाला फार्टची समस्या असेल तर काही दिवस धनाडाळल आणि जिऱ्यासोबत बडीशेपेचं सेवन करा. नक्कीच फायदा होईल.


19 - जर तुमची पचनशक्ती चांगली करायची असेल तर सुकी, भाजलेली आणि कच्ची बडीशेप समप्रमाणात मिक्स करा आणि रोज का. तुमची पचनक्रिया चांगली होईल आणि शरीराला जडत्वही जाणवणार नाही.


20 - बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं.


वाचा - Benefits Of Amchur Powder In Marathi


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


जीभेच्या रंगावरून ओळखा तुमच्या आरोग्य समस्या


आंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट


मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे


Types Of Oilve Oil & Uses In Marathi


जिरे पाणी पिण्याचे फायदे (Jeera Water Benefits)