ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

डोळे हे चेहऱ्याचं सौंदर्य वाढवणारा प्रमुख भाग आहे हे नाकारून चालणार नाही. अगदी आतापर्यंत कितीतरी गाणीही डोळ्यांवर रचण्यात आलेली आहेत. हेच डोळे अजून सुंदर बनवण्यासाठी वापर होतो तो काजळ आणि आयलायनरचा. पण ते आयलायनर तुम्ही कसं लावावं याच्याही विविध स्टाईल्स आहेत. तुम्ही नेहमी एकाच प्रकारे आयलायनर लावत राहिलात तर तुम्हाला आणि बघणाऱ्यालाही कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही आयलायनरची स्टाईलदेखील सतत बदलत राहायला हवी. आता तुम्ही म्हणाल की, आपल्याकडे ते कसब नाही. पण या अशा काही सोप्या स्टाईल्स आहेत ज्या तुम्हीदेखील करू शकता. आयलायनर लावायच्या खूप स्टाईल्स आहेत. ज्यापैकी बऱ्याचशा स्टाईल्स आपल्याला माहीतही नाहीत. पण आम्ही तुम्हाला काही खास स्टाईल्स सांगणार आहोत. तुम्हीदेखील या स्टाईल्स तुमच्या डोळ्यांवर नक्कीच करू शकता.

आयलायनरचं काय महत्त्व?

हल्ली कुठेही जाताना काजळ किंवा आयलायनर लावल्याशिवाय घराबाहेर पडलेलं सहसा कुणी दिसत नाही. बाकी काही मेकअप करण्याची आवश्यकताच भासत नाही जर तुम्ही आयलायनर लावलं असेल. डोळ्यांचा मेकअप त्यामुळेच हल्ली जास्त प्रमाणात केला जातो. पण डोळ्यांचा भडक मेकअप असेल तर लिपस्टिक लाईट लावा. अगदी नाही लावली तरीही चालेल. ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना इतर कोणतेही प्रयोग करण्यापेक्षा लायनरचा एक स्ट्रोकच पुरेसा असतो. पण बऱ्याच जणींना कॉलेजमध्ये असताना लायनरचा वापर नक्की कसा करायचा याची व्यवस्थित माहिती नसते. त्यामुळे ही खास माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. फक्त आयलायनर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही आयलायनर ज्या कंपनीचं वापरत असाल ती प्रसिद्ध कंपनी असायला हवी. माहीत नसलेल्या कंपनीचं आयलायनर वापरू नका. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना हानी पोहचण्याची भीती असते. तसंच डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं असे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे चांगल्या दर्जाचं आणि कंपनीचं आयलायनरच तुम्ही वापरा. आयलायनर असलं तरीही ते दिवसभर लावून ठेऊ नये. तसंच जे आयलायनर घ्याल ते लाँगलास्टिंग आहे की नाही हे पाहून घ्या. कारण दिवसातून तीन ते चार वेळा आयलायनर लावावं लागल्यास, डोळे आणि त्याजवळची नाजून त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे शक्यतो या गोष्टींकडे नीट लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारात विविध रंगांचे आयलायनर आले आहेत म्हणून आपण ते वापरू नयते. आपल्या त्वचेला आणि डोळ्यांना कोणता रंग सुंदर दिसेल याचा विचार करूनच मग आयलायनर वापरावं. अन्यथा ते फार भडक दिसतं आणि आकर्षक दिसण्याऐवजी वाईट दिसतं. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आकार आणि रंगाप्रमाणेच आयलायनरचा वापर करावा. आता पाहूया काय आहेत आयलायनरच्या विविध पद्धती –

Also Read How To Reduce Under Eye Bags

ADVERTISEMENT

आयलायनर लावण्याच्या पद्धती (Different Eyeliner Styles)

कॅट आयलायनर स्टाईल (Cat Eyeliner Style)

Cat

तुम्हाला तुमच्या डोळ्यांना कॅट आय लुक द्यायचा असेल तर कॅट आयलायनर स्टाईल नक्की ट्राय करा. या तऱ्हेच्या लायनरसाठी तुम्ही काजळचा वापर केल्यास जास्त चांगलं. डोळ्यांच्या वरच्या भागावर जिथे तुम्ही लायनर लावता तिथे आणि तुम्ही खालच्या भागात जिथे काजळ लावता तिथे एकत्र जोडून विंग बनवून घ्या. आता लहान अँग्युलर आयब्रशच्या मदतीने काजळ तुमच्या डोळ्यांमध्ये व्यवस्थित ब्लेंड करा. हे लावणं अतिशय सोपं आहे. असं केल्यानंतरत तुम्हाला कॅट आय लुक मिळेल.

वाचा – डोळ्यांना खाज सुटण्यासाठी घरगुती उपचार

विंग्ड आयलायनर स्टाईल (Winged Eyelinerr Style)

Winged

ADVERTISEMENT

या तऱ्हेच्या आयलायनर लुकमध्ये विंग्ज स्टाईल बनवण्यात येते. पण  कॅट आयलायनरप्रमाणे डोळ्यांच्या खालच्या भागात हे जोडलं जात नाही. तसंच कॅट स्टाईलच्या तुलनेत याचे विंग्ज मोठे असतात. त्यासाठी तुम्ही लिक्विड आयलायनरचा वापर करा. लिक्विड आयलायनर यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

ग्लिटरी आयलायनर स्टाईल (Glitter Eyeliner Style)

Glitring
ही स्टाईल 2018 मध्ये सुरु झालेल्या मेकअप ट्रेंड्सपैकी एक आहे. डोळ्यांवर ग्लिटरी मेकअप करणं हे आता ओव्हर मेकअपची निशाणी राहिलेली नाही. म्हणजे आता ग्लिटरी मेकअप हा रोजच्या आयुष्यातलादेखील एक भाग झाला आहे. पार्टी मेकअपसाठी हा लुक अप्रतिम आहे. तुम्ही तुमच्या ड्रेसच्या रंगाच्या हिशोबाने हे आयलायनर मॅच करू शकता. अथवा बोल्ड रंगाच्या शेडमध्येसुद्धा हे लायनर वापरू शकता. हा लुक पार्टीसाठी एक अप्रतिम लुक आहे. शिवाय तुम्ही इतर लोकांमध्ये या लुकमुळे वेगळ्या दिसू शकता.

डबल विंग्ड आयलायनर स्टाईल (Double Winged Eyeliner Style)

Double Winged

डबल विंग्ड आयलायनर स्टाईल तुमच्या डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांवर करावी लागते. या दोन्ही भागांवर विंग्ड बनवले जातात. हा लुक दिसायला खूपच बोल्ड आणि स्टायलिश असतो. पण हे लक्षात ठेवा की, दोन्ही विंग्जमध्ये थोडीशी गॅप असणं आवश्यक आहे. गॅप असेल तरच हे विंग्ज दिसायला चांगले दिसतील. तुमचा लुक इतरांच्या तुलनेत नक्कीच उठून दिसेल आणि तुमच्या डोळ्यांची शोभा वाढवेल.

ADVERTISEMENT

वाचा – भारतात मिळाणाऱ्या बेस्ट आयलायरची

स्मोकी आयलायनर स्टाईल (Smoky Eyeliner Style)

eyeliner-styles-images

ही स्टाईल दिसायला जितकी स्टायलिश आहे, लावायलादेखील हे आयलायनर तितकंच सोपं आहे. तुम्हाला फक्त लावल्यानंतर डोळ्यांच्या आऊटर कॉर्नरवर लहान अँग्युलर ब्रशच्या मदतीने लायनर स्मज करायचं आहे. आता त्यावर आयशॅडो ब्रशच्या मदतीने ग्रे, ब्राऊन अथवा काळ्या रंगाच्या आयशॅडोने रंगवा. हा लुक तुम्हाला खूपच स्टायलिश बनवतो आणि शिवाय तुम्ही यामुळे आकर्षकदेखील दिसता.

मल्टीकलर्ड आयलायनर स्टाईल (Multicolored Eyeliner Style)

multicoulored

ADVERTISEMENT

ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटतं, पण हे लावल्यानंतर दिसायला मात्र खूपच सुंदर दिसतं. अशा स्वरूपाच्या आयलायनर स्टाईलमध्ये डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या भागात दोन्ही वेगवेगळ्या रंगाचे आयलायनर लावले जातात. पण हे लावताना लक्षात ठेवा की, यासाठी ब्राईट शेड्सचा वापर करू नका. कारण तसं केल्यास, ओव्हर मेकअप लुक दिसून येतो. त्यामुळे हलक्या शेड्सचा वापर करून हे मल्टीकलर्ड आयलायनर स्टाईल करून पाहा.

व्हाईट अंडरलाईन आयलायनर स्टाईल (White Underline Eyeliner Style)

white underline
या स्वरूपाचं आयलायनरची सध्या खूपच चलती आहे. डोळ्यांच्या खालच्या भागावर (जिथे तुम्ही काजळ लावता) तिथे आतल्या बाजूला व्हाईट आयलायनर लावलं जातं. तसंच डोळ्यांच्या वरच्या भागावर कोणत्याही तुमच्या आवडत्या रंगाचं आयलायनर लावा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली लावलेलं व्हाईट आयलायनर जास्त चांगल्या तऱ्हेने ऊठून दिसतं. गोऱ्या स्किन टोनवर अशा तऱ्हेचं आयलायनर खूपच चांगलं दिसतं.

डबल आयलायनर स्टाईल (Double Eyeliner Style)

double eyeliner
याच्या नावाप्रमाणेच याची स्टाईल आहे. या तऱ्हेच्या स्टाईलमध्ये आयलायनरच्या वर एक ते दोन स्ट्रोक लावले जातात. यामध्ये दोन वेगवेगळे शेड्स तुम्ही एकत्र लाऊ शकता. त्यामुळे हे दिसायला खूपच सुंदर दिसतं. तुम्ही हे आयलायनर कॅट आयलायनर स्टाईलबरोबर मॅच करू शकता. त्यामुळे तुमचे डोळे अधिक स्टायलिश आणि सुंदर दिसतील.

उत्कृष्ट वॉटरप्रूफ आयलायनर

ADVERTISEMENT

मेटॅलिक आयलायनर स्टाईल (Metallic Eyeliner Style)

metalic
मेटॅलिक आयलायनर स्टाईलसाठी मेटॅलिक आयलायनरचाच वापर करा. हे दिसायला खूपच शाईनी आहे आणि डोळ्यांना मेटालिक लुक देतो. त्यासाठी तुम्हाला मेटॅलिक आयलायनर पेन्सिलने डोळ्यांच्या वरच्या भागावर आऊटर एरियावरून आतल्या बाजूला लावायला सुरुवात करा. असंच खालच्या बाजूच्या भागावरही करा. पार्टी लुकसाठी अशा स्वरूपाचं आयलायनर स्टाईल परफेक्ट आहे.

शिमरी आयलायनर स्टाईल (Shimmer Eyeliner Style)

shimmery
शिमरी आयलायनर दिसायला ग्लिटरी आयलायनरप्रमाणेच लावू शकता. मात्र या दोन्ही आयलायनरमध्ये फरक आहे. या आयलायनरमध्ये मात्र ग्लिटरच्या तुलनेत लहान लहान पार्टिकल्स असतात जे दिसायला शाईनी असतात पण डोळ्यांना ग्लिटरी लुक देत नाहीत.

हाफ सर्कल आयलायनर स्टाईल (Half Circle Eyeliner Style)

half circle
हाफ सर्कल आयलायनर स्टाईल करण्यासाठी डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या आऊटर कॉर्नर्सवरून इनर कॉर्नर्सच्या दिशेने यावं लागेल. पण तेही पूर्ण नाही तर फक्त अर्ध. जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडाल तेव्हा ही स्टाईल अगदीच नैसर्गिक वाटते. ही स्टाईल तुम्ही रोज कॉलेजला जातानादेखील करू शकता. ऑफिसला जातानाही तुम्हाला जर अगदी साधासा लुक हवा असेल तर तुम्ही ही स्टाईल वापरू शकता.

पपी आयलायनर स्टाईल (Puppy Eyeliner Style)

puppy eye
पपी आयलायनर स्टाईल कॅट आयलायनर स्टाईलच्या अगदी विरूद्ध आहे. ज्याप्रमाणे कॅट आयलायनरमध्ये विंग्ज वरच्या बाजूला घेतले जातात त्याप्रमाणे पपी आयलायनर स्टाईलमध्ये विंग्जचे कर्व्ह हे खालच्या बाजूला असतात. यामुळे डोळे क्यूट वाटतात. कदाचित याचमुळे या स्टाईलचं नाव पपी आयलायनर असं ठेवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

इजिप्शियन आयलायनर स्टाईल (Egyptian Eyeliner Style)

egypsian
आयलायनरची ही स्टाईल अशी आहे ज्यामध्ये लायनर थोडं बोल्ड आणि वरच्या दिशेने लावलं जातं. हे इजिप्शियन स्टाईलने प्रेरित आहे. यामुळे तुमचे डोळे मोठे दिसतात आणि डोळ्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. कोणत्याही फॅन्सी ड्रेससाठी तुम्ही ही स्टाईल करू शकता.

बॉक्सी कॅट आयलायनर स्टाईल (Boxy Cat Eyeliner Style)

boxy cat
तुमचं व्यक्तिमत्त्व बिनधास्त असेल आणि आयलायनरबरोबर बोल्ड एक्स्परिमेंट करायला तुम्ही घाबरत नसाल तर हे बॉक्सी कॅट आयलायनर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पाहा. या स्वरूपाच्या स्टाईलमध्ये विंग्ज खूप मोठे असतात आणि वरच्या भागामध्ये असतात. रोजच्या धावपळीत हे लावता येणार नाही. पण तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये जात असलात तर अशा प्रकारची स्टाईल नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता.

अंडरआय आयलायनर स्टाईल (Under Eye Eyeliner Style)

undreye

या स्टाईमध्ये डोळ्यांच्या वरच्या भागांना अजिबात आयलायनर लावत नाहीत. पण डोळ्याच्या खालच्या भागावर मात्र विंग्ज बनवून आयलायनर लावण्यात येतं. कदाचित काजळ लावल्यासारखं एखाद्याला वाटू शकतं. पण हा लुक तुम्हाला साधं दिसण्याबरोबरच वेगळी स्टाईलदेखील देतो. अशी स्टाईल करून तुम्ही रोज कॉलेज अथवा ऑफिसला जाऊ शकता.

ADVERTISEMENT

थिन आयलायनर स्टाईल (Thin Eyeliner Style)

thin eyeliner

थिन आयलायनर स्टाईल विशेषतः टीनएज मुलींवर चांगली दिसते. त्यांच्यासाठी ही स्टाईल परफेक्ट आहे. डोळ्यांवर आयलायनरचा पातळसा लेअर तुम्हाला ओव्हर मेकअप केल्याचा फीलही आणू देत नाही. शिवाय ज्यांनी नुकतच आयलायनर लावायला सुरुवात केली आहे अथवा शिकत आहेत त्यांच्यासाठी ही सर्वात सोपी आणि सहज स्टाईल आहे.

स्ट्रेट आयलायनर स्टाईल (Straight Eyeliner Style)

straight eye

तुम्हाला एखाद्या पेपरवर सरळ लाईन आखायला सांगितली तर तुम्ही एकदम सहज आणि सोपेपणाने ती लाईन आखाल. पण हीच लाईन जर डोळ्यावर आखायची असली तर? कोणत्याही विंग्जशिवाय अथवा बोल्डनेसशिवाय डोळ्यांवर एक सरळ रेष या स्ट्रेट आयलायनर स्टाईलमध्ये मारली जाते. या तऱ्हेच्या स्टाईलमध्ये कोणत्याही प्रकारचा कर्व्ह नाही. डोळ्यांवरून आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला एक सरळ रेष मारत या मग ती लाईन लायनरने फील करून घ्या.

ADVERTISEMENT

ग्राफिक आयलायनर स्टाईल (Graphic Eyeliner Style)

graphic

यामध्ये अर्थातच तुम्हाला ग्राफिक डिझाईन करायचं आहे पण कॉम्प्युटरवर नाही तर डोळ्यांवर. यासाठी थोडी मेहनत नक्की लागणार आहे. पण ही स्टाईल करून पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच ही मेहनत घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. कारण या मेहनतीचं फळ नक्कीच खूप सुंदर असेल. त्यामुळे ही स्टाईल नक्की करून पाहा. याचे विंग्ज तुमच्या डोळ्याच्या वरच्या भागापासून घेऊन अगदी डोळ्याच्या वरपर्यंत न्यायचे आहेत आणि केवळ मधली पापणीची जागा रिकामी ठेवायची आहे. हे लायनर पूर्ण डोळ्यांना व्यापतं.

गॉडेस आयलायनर स्टाईल (Goddess Eyeliner Style)

goddess

फोटोंमधील देवीदेवतांचे मोठे मोठे डोळे नेहमीच तुम्हाला आकर्षिक करत असतील. तुम्ही देखील हा लुक मिळवू शकते. यासाठी तुम्हाला फक्त थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. ही स्टाईल करण्यासाठी तुम्हाला विंग्ज तुमच्या आयब्रोजपर्यंत घेऊन जायचे आहेत. ही स्टाईल तुम्हाला गॉडेस लुक देत असल्यामुळेचे याला हे नाव पडलं आहे.

ADVERTISEMENT

बोल्ड आयलायनर स्टाईल (Bold Eyeliner Style)

bold eyeliner

बोल्ड आयलायनर हे थिन आयलायनरच्या अगदी विरुद्ध स्टाईल आहे. तुमच्याबरोबर कधी असं झालं आहे का? लावायचं असतं थिन आयलायनर पण नीट होत नाही आणि बोल्ड आयलायनर लावलं जातं. इथेदेखील असंच काहीसं करावं लागेल. डोळ्यांवर थिक लायनर लावायचं आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना बोल्ड लुक मिळतो आणि तुम्ही खूपच वेगळे आणि आकर्षक दिसता.

हेदेखील वाचा – 

सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग

ADVERTISEMENT

सुंदर डोळ्यांसाठी अशी घ्या ‘पापण्यांची’ काळजी

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी फॉलो करा या ‘10 टीप्स’

04 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT