डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा

गरोदरपण आणि बाळंतपण स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. बाळंतपणातील प्रसववेदना कितीही कठीण असल्या तरी त्यामुळे तुमच्या माध्यमातून होणाऱ्या नव्या जीवाची निर्मिती ही तुमच्या आयुष्यातील एक सुखद घटना असते. बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर त्याच्या एका स्पर्शातून तुमचा सर्व शीण निघून जातो. या क्षणाची गेले किती तरी महिने तुम्ही वाट पाहत आहात. मात्र हा आनंद अनुभवण्यासाठी डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी ड्यू डेटच्या काही दिवस आधी तुमची मॅटर्निटी बॅग तयार ठेवा. कारण आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कधीही जावं लागू शकतं. हॉस्पिटलमध्ये जाताना दगदग नको  यासाठी या वस्तू आधीच गोळा करून ठेवणं नेहमीच चांगलं असतं.


Maternity Bag


मॅटर्निटी बॅगेत या गोष्टी असायलाच हव्या (Maternity Bag Checklist)


1. हॉस्पिटलची फाईल, आय-डी  आणि मेडिकल कार्ड -


प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तुमची हॉस्पिटलमधील फाईल आणि आय-डी कार्ड बॅगेत भरून ठेवा. कारण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी याची गरज लागणारच. शिवाय तुमचा हेल्थ इन्शूरन्स आणि त्याचे मेडीकल कार्डदेखील तुम्हाला अॅडमीट होताना जवळ ठेवावं लागणार. प्रसूतीकळा सुरू झाल्यावर या गोष्टींची शोधाशोध करण्यापेक्षा आधीच त्या तुमच्या बॅगेत ठेवून द्या.


2.ड्रेसिंग गाऊन-


अनेक हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग गाऊनची व्यवस्था केली जाते. पण तसं नसेल तर दोन - तीन दिवस लागतील असे स्वच्छ, निर्जंतूक, सैल आणि सुती कापडाचे गाऊन तुमच्या बॅगेत भरून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला ऐनवेळी काळजी करावी लागणार नाही. बाळंतपणात कपड्याचे अनेक जोड लागू शकतात. शिवाय तुमची प्रसूती नैसर्गिक होणार की सी-सेक्शन हे तुम्हाला आधीच माहित नसतं. त्यामुळे त्यानुसार जितके दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये रहावं लागेल याचा अंदाज बांधून कपडे भरून ठेवा. प्रसूतीनंतर लागणाऱ्या कपड्यांमध्ये स्तनपान करण्याची सोयीस्कर आणि हलके कपडे अथवा गाऊन असतील याची काळजी घ्या.


पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)


3.स्वेटर आणि पायमोजे-


हॉस्पिटलमध्ये एसी रूमची व्यवस्था असेल अथवा तुमची प्रसूती हिवाळ्यात असेल तर तुम्हाला स्वेटर आणि पायमोजे लागू शकतात. कारण बदलेलं तापमान तुम्हाला अशा वेळी मानवेलच असे नाही. त्यामुळे गरज लागल्यास या गोष्टी तुमच्या जवळ असणं नेहमीच चांगलं असतं.


स्ट्रेच मार्क्सपासून मिळवा सुटका घरगुती उपाय करून - Stretch Marks Treatment in Marathi


4.स्लीपर अथवा फ्लीप फ्लॉप्स-


बाळंतपणानंतर बेडवरून खाली उतरल्यावर, वॉशरूमचा वापर करताना अथवा हॉस्पिटलमध्ये फिरताना तुम्हाला स्लीपरचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळे आधीच एक आरामदायक स्लीपर अथवा फ्लीप फ्लॉप बॅगेत ठेवा.


5.बॉडी लोशन आणि मसाज ऑईल-


Maternity Bag new 4


कधी कधी काही महिलांना प्रसूती दरम्यान पोटाला मालिश करण्याची गरज लागू शकते. अशा वेळी मसाज ऑईल तुमच्यासोबत असणं फार गरजेचं आहे. कारण असं मालिश केल्यामुळे तुम्हाला प्रसववेदना सहन करणं सोपं जावू शकतं. शिवाय प्रसूतीनंतर हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहताना तुम्हाला बॉडी लोशन अथवा मसाज ऑईल नक्कीच उपयोगी पडेल.


6.वॉटर स्प्रे अथवा स्पंज-


जर तुमची प्रसूती उन्हाळ्यात असेल तर उन्हाची काहिली कमी करण्यासाठी तुमच्याजवळ वॉटर स्प्रे आणि स्पंज फायदेशीर ठरेल. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर प्रसूती कधी होणार हे कुणालाच सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात त्रास कमी करण्यासाठी या दोन गोष्टी तुमच्या बॅगेत जरूर ठेवा.


7.म्युजिक गॅजेट्स-


जर तुम्ही गर्भसंस्काराचे कोर्सेस केले असतील तर तुम्हाला गर्भावर संस्कार करताना विशिष्ठ प्रकारचं संगीत ऐकण्यास सांगण्यात येतं. प्रसूतीकळा सुरू झाल्यावर हे संगीत ऐकल्यामुळे तुम्ही आणि तुमचं बाळ निवांत राहू शकतं. प्रसूती दरम्यान जन्म घेण्यासाठी मातेप्रमाणेच बाळालादेखील तितकेच कष्ट घ्यावे लागतात. मात्र गर्भनिर्मितीपासून ऐकलेलं संगीत ऐकल्यामुळे ते तुम्हाला जन्म घेण्यासाठी सहकार्य करतं.


8.आरामदायक उशी-


Maternity Bag new 1


तुम्हाला ज्या उशीची नेहमी सवय असते ती उशी तुमच्यासोबत ठेवा. कारण हॉस्पिटलमधील उशीची तुम्हाला सवय नसेल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी जितकं आरामदायक राहता येईल तितकं राहण्याची  गरज असते.


9.पौष्टिक खाद्यपदार्थ-


प्रसववेदना सुरू झाल्यावर आणि प्रसूतीनंतर तुम्हाला प्रचंड भुक लागू शकते. अशा वेळी विकतचं काहीतरी खाण्यापेक्षा घरी तयार केलेलं अथवा पौष्टिक काहीतरी खाणं गरजेचं असतं. यासाठी प्रसूतीसाठी जाताना तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये सुकामेवा, फळं, पेज, फळांचा  रस असे पौष्टिक पदार्थ जरूर ठेवा.


10.सॅनिटरी पॅड्स-


प्रसूतीनंतर तुम्हाला काही दिवस रक्तस्त्राव होतो. ज्यासाठी तुम्ही आधीच तयार असणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमधून देण्यात येणारे अथवा जवळ असलेल्या लोकांनी आणलेले सॅनिटरी पॅड तुमच्यासाठी आरामदायक असतीलच असे नाही. यासाठी तुम्ही नेहमी वापरत असलेले सॅनिटरी पॅड्स जवळ ठेवा. ज्यामुळे तुमच्यासाठी प्रसूतीनंतरचा काळ सुखावह असेल.


11.आयमास्क आणि इअरप्लग  -


प्रसूतीकळा सुरू कमी जास्त होताना अथवा प्रसूतीनंतर आराम करण्यासाठी तुम्हाला शांततेची गरज असते. हॉस्पिटलमधील वर्दळ आणि आवाज यांचा त्रास होऊ नये यासाठी या गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगेत जरूर ठेवा.


13.आरामदायक इनरवेअर -


गरोदरपणी अथवा प्रसूतीनंतर लागणारे सर्वच कपडे हे फॅशनेबल असण्यापेक्षा आरामदायक असावेत. यासाठी मॅटर्निटी बॅगमध्ये चार ते पाच दिवस लागतील अशा आरामदायक इनरवेअर सोबत ठेवा. सी-सेक्शन झाल्यास तुमच्या पोटावरील शस्त्रक्रियेच्या जखमा दुखणार नाहीत अशा साईजच्या इनरवेअर विकत घ्या. ज्या आरामदायक आणि सुती असतील. कारण प्रसूतीनंतर काही दिवस तुम्हाला रक्तस्त्राव होत असतो. अशा वेळी आरामदायक इनरवेअर असल्यास त्रास कमी होतो.


14.नर्सिंग ब्रा-


तुमच्या बॅगेत नर्सिंग ब्रा असणं फार गरजेचं आहे. कारण बाळंतपणानंतर बाळाला स्तनपान देण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या ब्रा ची गरज लागणार असते.


15.टॉयलेटरीज-


मॅटर्निटी बॅगेत तुमचा नेहमीचा टॉवेल, हेअर ब्रश, डिओड्रंट, टुथपेस्ट, टुथब्रश, फेसवॉश, बॉडीवॉश, शॅम्पू, कंडिश्नर, हेअरड्रायर, हेअर क्लिप्स, टिश्यू पेपर्स, छोटे नॅपकीन , रूमाल अशा गोष्टी ठेवा. कारण प्रसूतीनंतर काही दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज भासू शकते.


16.चष्मा अथवा कॉन्टॅक्ट लेंसेस-


कधी कधी घाईघाईत छोट्याशा वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी विसरलं जाण्याची शक्यता असते. यासाठी मॅटर्निटी बॅगच्या चेकलिस्टमध्ये तुमचा चष्मा अथवा कॉन्टॅक्ट लेंसेसचा जरूर समावेश करा. कॉन्टॅक्ट लेंसेस वापरत असाल तर त्याचं सोल्यूशन आधीच बॅगेत भरून ठेवा.


17.मोबाईल, इअरफोन्स आणि चार्जर-


आजकाल मोबाईल ही सर्वांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे.तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्या जवळच्या लोकांना सांगण्यासाठी मोबाईल एखाद्या दूताचे काम करू शकतो. मात्र जर तुमच्याकडे मोबाईल असेल पण त्याचं चार्जर आणि इअरफोन्स नसतील तर तुमची तारांबळ होऊ शकते. यासाठी आधीच या गोष्टी तुमच्या चेकलिस्टमध्ये लिहून ठेवा.


गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (Post Pregnancy Care Tips In Marathi)


18. घरी जाताना घालण्यासाठी कपडे-


हॉस्पिटलमधून बाळाला घरी घेऊन जाताना लागणारे कपडेदेखील आधीच तुमच्या बॅगेत भरून ठेवा. प्रसूतीनंतर लागणाऱ्या आरामदायक आणि सैल कपड्यांची आधीच तयारी करून ठेवा. त्यातील एक दोन जोड कपडे तुमच्या मॅटर्निटी बॅगेत भरून ठेवा. ज्यामुळे ऐनवेळी तुम्हाला मदत करणाऱ्या माणसांना त्रास होणार नाही.


19. मनोरंजनाचे साहित्य-


हॉस्पिटलमध्ये वेळ घालवणं हे फारच कंटाळवाणं असू शकतं. बाळ झोपलेलं असेल आणि तुम्हाला झोप येत नसेल तर मनोरंजनासाठी एखादं आवडीचं पुस्तक, टॅब्लेट, म्यजिक प्लेअर सोबत ठेवा. शिवाय तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबणाऱ्या व्यक्तीला वेळ घालविण्यासाठी या गोष्टींची गरज भासू शकते.


20 . प्लेट आणि ग्लास आणि पाण्याची बाटली -


बऱ्याच हॉस्पिटलमध्ये या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. पण कधी कधी इतरांनी वापरलेल्या वस्तूंपेंक्षा तुम्हाला तुमच्या प्लेट, ग्लास आणि पाण्याच्या बाटलीचा वापर करणं योग्य वाटू शकतं.


हॉस्पिटलमध्ये बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी -


प्रसूतीनंतर लागणाऱ्या गोष्टींमध्ये बाळाच्या जन्मानंतर त्याला लागणाऱ्या गोष्टींची एक वेगळी बॅग करा. ज्यात बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी ठेवता येतील.


Maternity Bag new 4 %281%29


21.बाळाचे कपडे -


बाळाला जन्मानंतर घातले जाणारे कपडे आरामदायक आणि  सुती असावेत. ज्यामुळे त्याला कोणताही त्रास होत नाही. यासाठी बाळाचे लंगोट, झबलं, टोपडं आणि दुपटी स्वच्छ धुवून निर्जंतूक करून सुकवा आणि बॅगेत भरून ठेवा.


22. बाळाचं स्वेटर,  हाताचे आणि पायाचे मोजे -


गर्भात असताना बाळाला उबदार वातावरणाची सवय असते मात्र प्रसूतीनंतर त्याच्या आजूबाजूचे वातावरण बदलते. तुम्ही सतत त्याला कुशीत घेऊन ठेवू शकत नाही. यासाठीच त्याच्या कपड्यांमध्ये दोन ते तीन उबदार स्वेटर आणि हात आणि पायाचे मोजे ठेवा.


23. बेबी ब्लॅंकेट-


बाळाला घरी घेऊन येताना त्याला गुंडाळण्यासाठी बेबीब्लॅंकेट तुमच्या फायद्याचं ठरू शकेल. कारण यामुळे बाळाला अधिक सुरक्षित आणि आरामदायक वाटेल.


 


24. डायपर-


Maternity Bag new 3


नवजात बाळाला दिवसभरात कमीत कमी दहा ते बारा वेळा डायपर बदलावे लागतात. यासाठी नवजात बाळासाठी असलेले डायपर तुमच्या बॅगेत ठेवा. ज्यामुळे पहिल्याच दिवशी इतरांना धावपळ करावी लागणार नाही.


25. बेबी वाईप्स-


बाळाची त्वचा ही संवेदनशील असते. म्हणूनच त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाला स्वच्छ करण्यासाठी निर्जंतूक असलेल्या बेबी वाईप्स वापर जरूर करा. यासाठी ते आधीच तुमच्या बाळाच्या बॅगेत भरून ठेवा.


मॅटर्निटी बॅगेबाबत असलेले प्रश्न FAQs


मॅटर्निटी बॅग किती मोठ्या आकाराची असावी ?


मॅटर्निटी बॅग एखाद्या मोठ्या जीम बॅगच्या आकाराची असेल तर उत्तम. जर शक्य असेल तर एकच मोठा बॅग करण्यापेक्षा दोन ते तीन मध्यम आकाराच्या बॅग घ्या. ज्यामध्ये बाळाची आणि बाळ्याच्या आईची अशा वस्तूंची विभागणी करता येऊ शकते.


मॅटर्निटी बॅग केव्हा भरून ठेवावी ?


डॉक्टर तुम्हाला तुमच्या प्रसूतीचा अंदाज घेण्यासाठी ड्यू डेट देतात. या तारखेच्या आधी  कमीत कमी पंधरा दिवस मॅटर्निटी बॅग भरून ठेवावी. मात्र आजकाल प्रिमॅच्युअर डिलीव्हरीदेखील बऱ्याचदा होतात. यासाठी अंदाजे लागणारं सामान तुम्ही सातव्या महिन्यानंतर भरून ठेवू शकता. अथवा सातव्या महिन्यानंतर सामानाची लिस्ट बनवून ठेवा. ज्यामुळे तुमची ऐनवेळी धावपळ होणार नाही.


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक


You might like this:


Signs & Symptoms Of Pregnancy In Marathi