घामामुळे दिवसभर होणाऱ्या चिकटपणामुळे सगळेच वैतागले आहे. मुंबईकरांना आता कधी एकदा मे महिना संपतो असं झालं असेल. पण त्यातल्या त्यात या उकाड्यापासून तुम्हाला थोडा थंडावा हवा असेल तर सोपा उपाय म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करणे. हो…अजूनही अर्धा मे महिना आहे. हा उरलेला महिना सुसह्य करायचा असल्यास थंड पाण्याने आंघोळ करायला सुरूवात करा. कारण थंड पाण्याने आंघोळ केल्यावर फक्त थंडावाच नाहीतर अजूनही अनेक फायदे आहेत. थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला दिवसभर ताजंतवान वाटतं. तुमच्या सौंदर्यासाठीही थंड पाणी उत्तम आहे. तुम्ही हेही ऐकून हैराण व्हाल की, गरम पाण्याने जरी रक्तसंचार उत्तेजित होत असला तरी काही वेळाने तो मंद होतो. पण थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे खूपच आहे.
थंड पाण्याने आंघोळ केल्यावर आळस, थकवा आणि अंग दुखणं कमी होऊन शांत झोप लागते. तसंच जळजळ आणि खाज येणंही थांबतं. थंड पाण्याने त्वचेवर तुकतुकीतपणा येतो आणि रक्तही शुद्ध होतं. मग चला जाणून घेऊया थंड पाण्याच्या आंघोळीचे अजून काही फायदे.
1. थंड पाण्याने करा फॅट्स बर्न
आपल्या शरीरांमध्ये दोन प्रकारचे फॅट्स असतात. एक म्हणजे व्हाईट फॅट जे आपल्या शरीरासाठी वाईट असतं आणि दुसरं म्हणजे ब्राऊन फॅट जे आपल्यासाठी चांगल असतं. व्हाईट फॅट जे आपल्या जेवणात आढळतात. हे फॅट्स आपल्या शरीरावरील कंबर, पाठीचा खालचा भाग आणि मान या भागावर जमा होऊ लागतात. या फॅटपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. ब्राऊन फॅट आपल्यासाठी चांगलं असतं, जे आपल्या शरीरातील उब कायम ठेवतं. आता तुमच्यासाठी एक चांगली बातमी म्हणजे आपण जेव्हा जास्त थंड पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी कॅलरीज बर्न होऊ लागतात. त्यामुळे वजन लवकर कमी होतं.
2. थंड पाण्याने निघून जाईल थकवा
अॅथलीट नेहमीच व्यायाम केल्यानंतर आईस बाथ घेतात. पण तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही फक्त थंड पाण्याने आंघोळ केलीत तरी खूप आहे. यामुळे तुमचं बॉडी फटीग म्हणजेच थकवा लगेच निघून जाईल.
3. थंड पाण्याने होतो मूड फ्रेश
आळस दूर करण्यासाठी सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करा. कारण जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुम्हाला थोडासा शॉक लागल्यासारखं वाटतं आणि तुमचा श्वासोश्वास जोरात सुरू होतो. तसंच हृदयाची धडधडही वाढते. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तसंचार वाढतो आणि तुम्हाला अगदी छान फ्रेश झाल्यासारखं वाटतं. सुस्ती निघून जाते.
4. थंड पाण्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती
हे तर तुम्हाला माहीतच असेल की, थंड पाण्याने आंघोळ केल्यावर रक्तसंचार चांगला होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का थंड पाण्याने तुमची प्रतिकारक शक्तीही चांगली राहते. प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स वाढतात आणि आजारांशी लढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला आजार होत नाहीत.
5. त्वचा होते स्वच्छ आणि केस होतात सुंदर
जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर तुम्ही नक्कीच थंड पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. ज्यामुळे त्वचेवर घाण जमा होऊ लागते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. तसंच थंड पाण्याने केस धुतल्यास केसात जमलेली घाण स्वच्छ होऊन आकर्षक दिसू लागतात.
हेही वाचा
मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
वजन कमी करण्यापासून फायदेशीर आहे गरम पाणी पिण्याचे फायदे
जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत