उन्हाळ्याच्या दिवसात घामुळं, रॅशेस या समस्या तर असतातच, पण याचबरोबर अजून एक समस्या असते ती म्हणजे अंडरआर्म्समधील dark patches अर्थात वाढलेला काळेपणा. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त घाम हा काखेत येत असतो आणि हा घाम साचतो. ज्यामुळे अंडरआर्म्समध्ये काळे डाग जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये वाढतात. खरं तर उन्हाळा म्हणजे स्लिव्हलेस आणि स्ट्रेपी टॉप्स घालण्याचा ऋतू. असं असलं तरीही या डार्क पॅचेसमुळे मुलींना नेहमीच त्रास होत राहतो. अंडरआर्म्समध्ये जर तुमच्या केसांची खूपच ग्रोथ पटापट होत असेल आणि घामामुळे डार्क पॅचेस वाढत असतील तर आम्ही तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणार आहोत. अशा 7 टिप्स ज्यामुळे तुम्हाला यातून लगेच सुटका मिळेल.
तुमची त्वचा म्हणजे तुम्हाला कायम नैसर्गिकरित्या चमकती दिसायला हवी. त्यातही जेव्हा गोष्ट अंडरआर्म्सची असते तेव्हा प्रत्येक मुलीला थोडी जास्तच काळजी असते. जर काळे डाग पडत असतील तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे साखर आणि लिंबू. हे तुमच्या त्वचेसाठी अप्रतिम स्क्रब आहे. लिंबू रस आणि साखर एकत्र करून तुम्ही साधारण 2 मिनिट्स हा स्क्रब तुमच्या काखेत स्क्रब करत राहा आणि नंतर कोमट पाण्याने तुमचे अंडरआर्म्स धुऊन टाका. हे करण्याने केवळ तुमचे अंडरआर्म्स स्वच्छच नाही होणार, तर अधिक मुलायमदेखील होतील. हे लावत असताना तुम्हाला अंडरआर्म्सची त्वचा थोडी रफ होत असल्याचं भासलं तरीही दोन मिनिट्स पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे मिश्रण रगडत राहा. कारण याने कोणताही वाईट परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही.
दोन चमचे बेसनात दूध मिक्स करून थोडी जाड पेस्ट बनवून घ्या. हवं तर तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभर हळद मिक्स करा. हळद तुमची त्वचा चमकवण्याचं काम करते. आता हे तयार झालेलं मिश्रण तुम्ही अंडरआर्म्सला लाऊन साधारण 10 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्याने हे साफ करून घ्या. असं केल्यास, तुमची अंडरआर्म्सची त्वचा अगदी मऊ मुलायम होईल आणि त्यावरील काळे डागही निघून जातील.
वाचा - मान काळी असली तर त्यावर नक्की काय उपाय करायचे
अंडरआर्म्सच्या बाबतीत नेहमीच डार्क पॅचेसची अडचण निर्माण होते. पण यातून सुटका हवी असल्यास, तुम्ही हा पर्याय नक्की वापरा. बटाटा कापून दोन मिनिट्ससाठी एका भांड्यात भिजवून ठेवा. आता पाण्यातून काढून बटाटा तुमच्या अंडरआर्म्सवर चोळा. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक असतात. त्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो. तसंच संत्रही नैसर्गिकरित्या अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे. संत्र्याची सुकलेली सालं तुम्ही ब्लेंडरमधून वाटून घ्या. याची पावडर बनवा. ही दोन चमचे पावडर घेऊन त्यात दही मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट साधारण 10 ते 15 मिनिट्स तुम्ही अंडरआर्मला लावा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा फरक हा अप्रतिम असेल.
अंडरआर्म्समधील त्या नको असलेल्या केसांपासून तुम्हाला नक्कीच सुटका हवी असते. कारण सतत शेव्ह अथवा वॅक्स करायलादेखील कंटाळा येतो. यातून सुटका मिळवण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे exfoliating! एक चांगला स्क्रब यासाठी तुमची मदत करू शकतो. बॉडी शॉपचा Sea Body Scrub एक चांगला पर्याय आहे, जो तुमचे काखेतील वाढलेले केस काढून टाकण्यासाठी मदत करतो. हे वापरल्यानंतर मात्र तुमच्या त्वचेवर मॉईस्चराईजर लावायला विसरू नका.
तुमच्याकडे कोरफड जेल तर नक्कीच असेल. तुम्हाला कधीही ताजेपणा हवा असल्याचं वाटलं, तर तुम्ही अंडरआर्म्समध्ये कोरफड जेल लावा. यामुळे तुमच्या काखेतून घामाच्या दुर्गंधीची शक्यताही कमी होते. घाम कमी आल्याने काळे डागही कमी होतात.
तुमचे अंडरआर्म्स हे काही तुमच्या शरीरापासून वेगळे नाहीत. मग असं असताना मसाज करताना अथवा मॉईस्चराईजर लावताना तुम्ही या भागाकडे लक्ष का देत नाही? या भागालाही या गोष्टींची तितकची आवश्यकता असते जितकी शरीराच्या इतर भागांना असते. अंडरआर्म्सना मसाज करण्यासाठी कोकोनट ऑल्मंड ऑईलचा वापर करा. बऱ्याचदा मसाज केल्यानेही तुमच्या काखेतील काळे डाग निघून जातात.
अंडरआर्म्स शेव्ह करण्यापासून जास्तीत जास्त दूर राहा. यामुळे तुमची त्वचा कडक आणि कोरडी होते. कोणत्याही हार्श साबणाचा वापर करू नका. कारण हे साबण तुमच्या अंडरआर्म्समधून मॉईस्चर कमी करतात. तसंच कधीही काखेत डायरेक्टली कोणतंही डिओड्रंट वापरू नका. कारण त्यामुळे डार्क पॅचेस पटकन येतात. तसंच बऱ्याचदा यामुळे रॅशेसदेखील येतात.
फोटो सौजन्य - Shutterstock
हेदेखील वाचा -
अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी
अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या
#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय