कोरफड कशी आहे उपयुक्त आणि काय आहे नुकसान - Aloe Vera Benefits For Glowing Skin In Marathi

कोरफड कशी आहे उपयुक्त आणि काय आहे नुकसान - Aloe Vera Benefits For Glowing Skin In Marathi

कोरफड ही बघायला गेलं तर अशी वनस्पती आहे जी बऱ्याच रोगांवर उपायकारक आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सौंदर्यासाठी कोरफड जास्त उपयोगी ठरते. तसंच प्रत्येक ऋतूमध्ये कोरफडीचा उपयोग करता येतो. कोरफडीच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फोलिक अॅसिडसारखे अनेक पोषक तत्व आहेत. कोरफडमधील अनेक अशा पोषक तत्वांमुळेच याचा उपयोग बऱ्याच सौंदर्यप्रसाधनांमध्येही करण्यात येतो. आरोग्याच्या दृष्टीनेदेखील कोरफड ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आहे. कोरफडच्या आतील जेलमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असून तुम्हाला एखादी लहानशी जखम अथवा कापलं असेल अथवा काही भाजलं असेल तर फर्स्ट एड म्हणून कोरफडचा उपयोग करण्यात येतो. नक्की काय आहेत कोरफडचे फायदे आणि नुकसान हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला कोरफडचा उपयोग कसा करता येऊ शकतो हेदेखील जाणून घ्या.


केसांसाठी कोरफड 


आरोग्यासाठी कोरफडचे फायदे 


कोरफड जेल आणि कोरफड ज्युसचे 17 आरोग्यदायी आणि सौंदर्यासाठी होणारे फायदे 


कोरफडमुळे होणारं नुकसान 


कोरफडीचे उत्पादन 


कोरफडसंबंधित प्रश्न - उत्तर 


त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी लाभकारक (Benefits Of Aloe Vera For Skin In Marathi)


1. Benefits Of Aloe Vera For Skin In Marathi


मऊ ओठांसाठी (Aloe Vera For Lips In Marathi)


कोरफडमध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे कोरड्या, फाटलेल्या ओठांसाठी कोरफड हे एक वरदान आहे. आपल्या ओठांवर कोरफड जेल लावा आणि मग पाहा त्याचा परिणाम. फक्त कोरफड जेलच लावायची आहे. तुम्हाला अगदीच हवं असेल तर त्या जेलमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑईलदेखील तुम्ही मिक्स करून लिप बामप्रमाणे लाऊ शकता. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम होतील.


सुंदर डोळ्यांसाठी (Aloe Vera For Eyes In Marathi)


तुमचे डोळे सकाळी उठल्यानंतर थकलेले असतली अथवा सुजलेले असतील तर कोरफड यावर उत्तम उपाय आहे. डोळ्यांच्या आसपास कोरफड जेल लावायला सुरुवात करा. बऱ्याच अंडरआय क्रीममध्येदेखील कोरफडचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे तुमचे डोळे नेहमी ताजेतवाने राहतील.


वॅक्सिंगच्या रॅशेसला करा बाय (Reduce Redness After Waxing Using Aloe Vera)


तुम्हाला वॅक्सिंग, थ्रेडिंग, प्लकिंग अथवा चेहऱ्यावरून केस काढल्यानंतर पिंपल्स अथवा लाल रॅशेस येत असतील तर ते बरं करण्यासाठी देखील कोरफड अत्यंत गुणकारी आहे. कोरफडमुळे काही मिनिटातच हे रॅशेस निघून जातात आणि तुम्हाला बरं वाटतं.


अँटी एजिंग गुण (Aloe Vera For Anti Aging In Marathi)


कोरफड त्वचेची इलास्टिसिटी सुधारते आणि त्यामुळे फाईन लाईन्स, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. त्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑईल आणि थोडीशी ओटमील पावडर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लाऊन साधारण अर्ध्या तासाने थंड पाण्याने धुवून घ्या आणि मग पाहा परिणाम.


वाचा : व्हिटॅमिन डी म्हणजे काय


अप्रतिम मॉईस्चराईजर (Aloe Vera As Moisturizer)


कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे हे त्वचेला योग्य तऱ्हेने हायड्रेट करतं तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. त्यामुळेच तेलकट आणि पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी कोरफड हा एक चमत्कारच आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणं हे सामान्य लक्षण आहे आणि त्यावरदेखील कोरफड हा परफेक्ट उपचार आहे. कोरफड जेल ही मॉईस्चराईजरप्रमाणे त्वचेवर लावा आणि तुमचं काम झालं. तुम्ही ही जेल तुमच्या नखांवरही लाऊ शकता. नखांनादेखील कोरफड जेल मॉईस्चराईज करून मजबूत आणि चमकदार बनवते.


डाग आणि पिंपल्स आणते संपुष्टात (Aloe Vera For Acne In Marathi)


चेहऱ्याचं सौंदर्य जपून ठेवण्यासाठी कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफडमध्ये अँटी फंगल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल घटक असतात ज्यामुळे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स निघून जाण्यास मदत होते आणि शिवाय तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्यापासून कोरफड थांबवते. यामध्ये पॉलीसॅकेराईड्सदेखील असतात जे नव्या सेल्सच्या वाढीसाठी मदत करतात. यामुळे पिंपल्स लवकर भरतात आणि तेदेखील कोणत्याही डागाशिवाय. हा कोरफडीचा एक अचूक उपयोग आहे. तुमच्या पिंपल्सवर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावा अथवा या जेलमध्ये लिंबाचा रस घालून लावल्यासदेखील याचा चांगला परिणाम होतो.


सनबर्नवरील उत्कृष्ट उपचार (Aloe Vera For Sunburn In Marathi)


सूर्याचे किरण आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला सर्वात मोठं नुकसान पोहचवतात. कोरफड ज्युसमध्ये त्वचेला सूर्याच्या किरणांपासून वाचवण्याची शक्ती असते आणि त्याशिवाय यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण असतात जे त्वचेतील मुलायमपणा कमी असल्यास, तो दूर करतात. त्यासाठी जेव्हा तुम्ही उन्हात घरातून बाहेर पडता तेव्हा कोरफड ज्युस चांगल्या तऱ्हेने आपल्या चेहऱ्यावर लावा.


चामखीळापासून सुटका (Get Rid Of Warts)


कोरफड जेलमध्ये काही वेळ कापूस बुडवून ठेवा जेणेकरून तो जेल व्यवस्थित शोषून घेईल. त्यानंतर तो कापूस तुमच्या चामखीळावर लावा आणि मग टेपने चिकटवा. असं नियमित केल्यास, काही आठवड्यातच तुमचा चामखीळ आपल्या आपणच गळून पडेल.


स्ट्रेच मार्क्स आणि पोर्सच्या समस्येवर परिणामकारक (Aloe Vera For Stretch Marks In Marathi)


कोरफड जेल नियमित लावल्यामुळे स्ट्रेच मार्क बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि हे एक अॅस्ट्रिजेंटप्रमाणे काम करतं आणि पोर्स टाईट करण्यासाठी मदत करतं.


कमालीचा स्क्रब (Aloe For Scrub In Marathi)


कोरफड जेलमध्ये थोडी साखर आणि लिंबू रस मिसळून स्क्रब तयार करा आणि मग वापर करा. हे डेड स्किन काढून टाकण्यासह त्वचा हायड्रेट करण्यासाठी उपयोगी आहे. यामुळे तुम्हाला नरम, मुलायम आणि स्वच्छ त्वचा मिळेल. याशिवाय कोरफड रसामध्ये नारळाचं थोडंसं तेल घालून हाताचा कोपरा, गुडघा, टाचा यांना लावल्यास, याठिकाणी असलेला काळेपणा निघून जातो.


वाचा - भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी


केसांसाठी कोरफड (Aloe Vera For Hair In Marathi)


2. Benefits Of Aloe Vera For Skin In Marathi


कोरफडमध्ये असणाऱ्या गुणांमुळे केसांना मजबूती मिळते आणि त्यामुळे केस सुंदर दिसतात. हे केसांच्या मुळाशी जाऊन पीएच संतुलित करण्यासाठी मदत करतात. कोरफड केसांची गळती थांबवते, तसंच केसांची वाढ करण्यास मदत करते, स्कॅल्पच्या समस्यांंपासून दूर राहण्यास मदत करते तसंच केसांना कंडिशन करण्यासाठीही उपयोगी आहे. आता इतके गुण असल्यांतर केस निरोगी तर राहणारच. जेल तशीच आपल्या केसांना लाऊन मसाज करा आणि काही वेळ तसंच ठेऊन मग धुवा. तुम्हाला हवं तर “लिव-इन कंडिशनर अथवा स्टायलिंग क्रीम”प्रमाणे देखील वापरू शकता. कोरफडच्या दोन पानांमधून जेल काढून घ्या. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळून नीट फेटून घ्या. आता तुमच्या ओल्या केसांवर हे लावा. त्यानंतर गरम टॉवेल साधारण 15 ते 20 मिनिट्स बांधून ठेवा. त्यानंतर गरम पाणी आणि शँपूने केस धुवा. असं आठवड्यातून एकवेळ केल्याने केस काळेभोर आणि सुंदर होतात.


आरोग्यासाठी कोरफडचे फायदे (Aloe Vera Health Benefits In Marathi)


तसं तर जगभरात कोरफडीचे 400 पेक्षा अधिक वेगवेगळे प्रकार आहेत. पण या सगळ्यात केवळ 5 प्रकारच आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. कोरफडचा वापर एक पौष्टीक आहार म्हणूनदेखील करण्यात येऊ शकतो. मिनरल्स और विटामिन्स भरपूर प्रमाणात असलेली कोरफड आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. चमकणार्‍या त्वचेसाठी साधे आयुर्वेदिक टिप्सही जाणून घ्या. यामुळे बरेच फायदे होतात. जाणून घेऊया काय आहेत फायदे -


1-  कोरफड मधुमेह अर्थात डायबिटीस असलेल्या आजारी माणसांसाठी फायदेशीर आहे


2- पोटाशी संंबंधित समस्यांसाठीदेखील कोरफड रामबाण उपाय आहे


3- सांधेदुखीवरदेखील कोरफडीने आराम मिळतो


4- रक्ताची कमतरता दूर करतं तसंच शरीराची रोगप्रतिरोधक क्षमतादेखील वाढवते


5- नियमित स्वरूपात कोरफड ज्युस प्यायल्यास शरीरातील एनर्जी चांगली राहते


6- कोरफड ज्युस नियमित प्यायल्याने तुमचं वजन घटतं


7- कोरफड ज्युसने कावीळ असल्यास, बरी होते


8-  तुम्ही सकाळी उठून कोरफड ज्युस प्यायल्यास तुमचं पोट साफ होतं आणि तुम्हाला नीट भूक लागते


9- सकाळी रिकाम्या पोटी कोरफड ज्युस पिण्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळते


10- लहान मुलांना सर्दी अथवा खोकला झाल्यास, 5 ग्रॅम कोरफड ज्युसमध्ये मध घाला. यामुळे मुलांची सर्दी आणि खोकला दूर होतो


वाचा - ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा


एलर्जीपासून दूर ठेवते कोरफड (Aloe Vera For Allergies In Marathi)


उन्हाळ्यात बरेचदा उन्हातून एसीमध्ये आणि एसीमधून लगेच उन्हात गेल्यामुळे त्वचेवर बऱ्याच एलर्जी येण्याचा धोका असतो. यामुळे खाज, जळजळ आणि रॅशेस दूर करण्यासाठी कोरफड हा चांगला उपाय आहे. खाज येत असणाऱ्या ठिकाणी थोडावेळ तुम्ही कोरफड जेल लाऊन ठेवा आणि त्यानंतर काही वेळ ठेऊन नंतर धुवा. यामुळे तुम्हाला खाज आणि एलर्जीपासून लगेच आराम मिळतो. याशिवाय कोरफड जेलमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे लहानमोठी जखम, कापलं अथवा भाजलं असल्यास, फर्स्ट एड म्हणूनदेखील वापर करता येतो.


कोरफडमुळे होणारं नुकसान (Side Effects Of Aloe Vera In Marathi)


तुम्हाला हे वाचून थोडं आश्चर्य नक्कीच वाटेल की, इतके औषधीय गुण असणारी कोरफड त्यामुळे नुकसान कसं काय होऊ शकतं? पण यामुळे नुकसानदेखील होतं. कोरफडमध्ये असणाऱ्या लॅक्सेटिव्हमुळे तुम्हाला काही त्रासाचा सामना करावा लागू शकतो


1- कोरफड ज्युस पिण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वास्तविक जेव्हा तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असता तेव्हा डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत असता तेव्हा कोरफडचा ज्युस तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतो.


2- कोरफड ज्युस रोज घेतल्यास तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी याचं सेवन चांगलं आहे. मात्र ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा लोकांसाठी हे नक्की त्रासाचं कारण होऊ शकतं.


3- ज्या लोकांना हृदयासंबंधित त्रास आहे त्यांनी कोरफड ज्युस अजिबात पिऊ नये. रोज हा ज्युस प्यायल्यास, तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात तसेच तुमच्या शरीरामध्ये थकवा येऊ लागतो.


4- कोरफड प्रमाणापेक्षा जास्त तुमच्या पोटात गेल्यास, डिहायड्रेशनचा त्रासदेखील होऊ शकतो.


5- कोरफड ज्युसमधील असलेले लॅटेक्स आपल्या शरीरातील मांसपेशी कमी करतात. त्यामुळे हे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


6- गर्भवती महिलांनीदेखील कोरफडचा ज्युस पिऊ नये कारण याचं सेवन केल्याने त्यांचं गर्भाशय संकुचित पावण्याचा धोका असतो. हे पोटात गेल्यास पोटातील बाळाला धोका होण्याचा संभव असतो.


वाचा - आरोग्यासाठी ज्येष्ठमधाचे उपयोग


कोरफडचे उत्पादन (Aloe Vera Products)


पतंजलि एलोवेरा जेल (Patanjali Saundarya Aloe Vera Gel)


3. Benefits Of Aloe Vera For Skin In Marathi


कापल्यास, भाजल्यास, अथवा एखाद्या किड्याने चावल्यास, कोरफडीचा पत्ता औषध म्हणून अनेक वर्षांपासून लावण्यात येतं. यामुळे स्किन एलर्जीदेखील ठीक होते. एलोवेरा जेल, पतंजलिचं एक असं उत्पादन आहे जे प्रत्येकाच्या घरी असायलाच हवं. कारण यामध्ये कोरफड असल्यामुळे तुम्हाला लहानसहान लागल्यास, ही जेल लावावी.


हिमालया हर्बल मॉईस्चराईजिंग एलोवेरा फेस वाॅश (Himalaya Herbals Moisturizing Aloe Vera Face Wash)


4. Benefits Of Aloe Vera For Skin In Marathi


हिमालय हर्बलचं हे मॉईस्चराईजिंग एलोवेरा फेस वाॅश केवळ तुमची त्वचाच साफ नाही करत तर त्वचेचे पोर्स बंद करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्वचेला हे हायड्रेट करतं आणि मॉईस्चराईज करतं. याशिवाय हे फेसवॉश साबणमुक्त आहे त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू देत नाही.


खादी नॅचरल मिंट अँड एलोवेरा फेस मसाज जेल (Khadi Natural Mint And Aloe Vera Face Massage Gel)


5. Benefits Of Aloe Vera For Skin In Marathi


हे मसाज क्रिम तुमच्या त्वचेमध्ये तजेलदारपणा घेऊन येतं. यामध्ये मेन्थॉल असल्यामुळे हे कमी प्रमाणात लावा. हे त्वचेच्या आतपर्यंत जाऊन त्वचा योग्य तऱ्हेने मॉईस्चराईज करते. यामध्ये अँटिसेप्टिक गुण असल्यामुळे कापल्यावर अथवा भाजल्यावर हे क्रिम लावणं नक्कीच चांगलं आहे.


वाचा - कोरफडाच्या ‘या’ 12 गुणांमुळे तुमचे सौंदर्य वाढेल


कोरफडसंबंधित प्रश्न उत्तर - FAQ’s


प्रश्न - रात्रभर चेहऱ्याला कोरफड लाऊन झोपू शकते का?


उत्तर - तुमची त्वचा सॉफ्ट आणि संवेदनशील असेल तर आम्ही तुम्हाला हा सल्ला देऊ की, कोरफड जेल चेहऱ्यावर लाऊन झोपू नका. ज्यांची त्वचा हार्ड अथवा नॉर्मल आहे ते रात्रभर जेल लाऊन झोपू शकतात पण असं रोज रात्री करू नका हाच आमचा सल्ला असेल.


प्रश्न- कोरफडमुळे चेहऱ्याचा रंग गोरा होतो का?


उत्तर - कोरफड जेल ऑईल फ्री हायड्रेशन देण्यासाठी मदत करतं. हे तुमच्या त्वचेचा रंग आहे तसाच राखण्यासाठी मदत करू शकतं. कोरफड तुमची त्वचा तजेलदार बनवते पण हे स्किन व्हाईटनिंगसाठी अजिबातच उपयुक्त नाही.


प्रश्न- कोरफड चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स काढू शकतं का?


उत्तर - ज्या लोकांना हात, चेहरा आणि शरीराच्या इतर भागांवर काळे डाग आहेत, त्यांनी कोरफडच्या मदतीने यावर उपाय करावा. यामुळे हे काळे डाग वाढणार नाहीत आणि तुमची त्वचा तजेलदार आणि चमकदार होईल.


फोटो सौजन्य - Shutterstock


Indian Beauty Tips In Marathi


Beauty Tips For Glowing Skin In Marathi


Ayurvedic Tips For Glowing Skin In Marathi