मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे in Marathi | POPxo
Home  >;  Wellness  >;  Health  >;  Weight Loss
मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे - Benefit of Fenugreek Seeds For Hair, Skin & Health in Marathi

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे - Benefit of Fenugreek Seeds For Hair, Skin & Health in Marathi

मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतात. मेथी जितकी तुमच्या स्वयंपाकात पदार्थांचा स्वाद वाढवते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयोगी आहे. याचा इतका फायदा आहे की, अगदी अनादीकाळापासून आयुर्वेदामध्येही मेथीच्या दाण्यांचा वापर औषध बनवण्यासाठी केला जात होता. अजूनही याचा वापर औषधांसाठी करण्यात येतो. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न अर्था लोह यासारखे अनेक पोषक तत्व आहेत. मधुमेहीग्रस्त लोकांसाठी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. तसंच ज्या महिला स्तनपान सध्या करत आहेत त्यांच्या शरीरातील दूधाचं प्रमाण वाढवण्यासाठीही मेथीचा उपयोग होतो. वास्तविक मेथी दाण्यांची चव ही बऱ्यापैकी कडू असते मग याचा सुवास खूपच छान असतो. याशिवाय बऱ्याच आजारांवर मेथीचं पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. जाणून घेऊया नक्की मेथी दाण्यांचे काय आहेत फायदे आणि काय आहे नुकसान.


मेथीचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे - Health Benefits of Methi in Marathi


मेथीचे त्वचेसाठी फायदे - Benefits of Methi For Skin in Marathi


मेथीचे केसांसाठी फायदे - Benefits of Methi For Hair in Marathi


मेथीने काय होतं नुकसान - Side Effects of Methi in Marathi


मेथीसंबंधित प्रश्न - उत्तर - FAQs


मेथीचे फायदे - Benefits of Methi in Marathi


मेथीचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे - Health Benefits of Methi in Marathi


Methi


तुम्हाला दैनंदिन आयुष्यात सतत लहान सहान सर्दी, खोकला, पोटदुखी, सांधेदुखी असे आजार त्रस्त करत असतील तरत मेथीचे दाणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. विशेषतः तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास, मेथी दाण्याने नक्कीच तुम्हाला आरामदायी वाटतं. यामधील असलेल्या लोह आणि कॅल्शियमच्या पोषक तत्वामुळे हाडांना मजबूती आणि निरोगीपणा मिळतो. तसंच मेथीच्या दाण्यांमुळे येणारी सूज कमी करण्यासाठी जास्त फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात मेथी पावडर आणि आल्याची पावडर (ज्याला सुंठ म्हणतात) एकत्र करून दिवसातून कमीत कमी दोन वेळा प्या. त्यामुळे तुमची सांधेदुखी निघून जाईल. तसंच पोटदुखीसाठी एक चमचा मेथी दाणे तव्यावर भाजून गरम पाण्याबरोबर घ्या. तुमची पोटदुखी बंद होईल. सर्दी आणि खोकला असल्यास, मेथीची भाजी तुम्ही खा, त्याने लवकर हे आजार बरे होतील.


मधुमेहाकरिता मेथीचा फायदा (Methi for Diabetes)  


diebetes


मधुमेहग्रस्त लोकांना बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या बाबत सल्ले देण्यात येत असतात. चहामध्ये कमी साखरेपासून ते फळांचा राजा आंबादेखील न खाण्यापर्यंत सल्ला देण्यात येतो. पण मधुमेह असणाऱ्यांसाठी मेथी खूपच फायदेशीर असते हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यामध्ये असणारी पोषक तत्व मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्यासाठी तुम्हाला एक चमचा मेथी दाणे एका ग्लासात रात्रभर पाण्यात भिजत घालून झाकून ठेवायचं आहे. सकाळी हे पाणी तुम्ही रिकाम्या पोटी प्या. रोज हे प्यायल्याने तुमचा मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. तुम्ही मधुमेहावरील औषधंदेखील घेत असाल तर, मेथीचं पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा एकदा सल्ला नक्की घ्या.


स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी मेथीचे फायदे (Methi for Breast Milk)


breast milk


तुम्ही नव्यानेच आता आई झालेल्या असाल आणि आपल्या बाळाला स्तनपान करत असाल तर शरीरामध्ये दूध कमी येण्याची समस्या बऱ्याच महिलांना येते. अशावेळी तुम्हाला मेथीचे दाणे आणि मेथीच्या पानांचं सेवन नक्कीच करायला हवं. हे तुमच्या शरीरामध्ये दूध तयार करण्यासाठी मदत करतं. यामधील असणारे विटामिन्स आणि मॅग्नेशियमचे गुण शरीरात दूध अधिक निर्माण करण्यास मदत करतात. त्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर सकाळी मेथीचे हे दाणे तसेच ठेऊन पाणी उकळून घ्या. हे पाणी प्या. असं रोज केल्यामुळे महिलांच्या स्तनांमध्ये दूधाची वाढ होते. तसं तर मेथी दाण्यांचे कॅप्सूल बाजारातही उपलब्ध आहेत पण हे घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आधी एकदा चर्चा करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या मनाने काहीही करू नये.


मासिक पाळीत होणाऱ्या पोटदुखीसाठी मेथीचे फायदे (Methi for Periods Pain)


period


मासिक पाळीच्या वेळेला तुम्ही नेहमी तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांकडून मेथीचं पाणी पिण्याचा सल्ला ऐकला असेल पण तो सल्ला उडवूनही लावला असेल. कारण हे पाणी थोडं कडू असतं. पण हा सल्ला न ऐकणं हे तुमच्यासाठी नुकदानदायक ठरू शकतं. मेथीमध्ये असलेले लोह आणि अन्य पोषक तत्व हे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवतं तसंच मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी, त्रास आणि मूड स्विंग्जदेखील नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं.


बद्धकोष्ठासाठी मेथीचे फायदे (Methi for Constipation)


constipation


तुम्हाला जर बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर यावर मेथीच्या दाण्याचं पाणी हा उत्कृष्ट पर्याय आहे. वास्तविक मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर असतं, जे बद्धकोष्ठ असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतं. हे नैसर्गिक स्वरूपात तुमचं पोट साफ करतं आणि शिवाय बद्धकोष्ठतेपासून सुटकाही मिळवून देतं. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात मेथी पावडर मिसळून ते प्या. सकाळी तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. लक्षात ठेवा की, लहान मुलावर कधीही याचा प्रयोग करू नका. लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, त्यांच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांना मेथी पाणी प्यायला देऊ नका.


हृदयासाठी मेथीचे फायदे (Methi for Heart)


heart


मेथीच्या दाण्यामध्ये असलेली पोषक तत्व तुमच्या हृद्याच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. हे हृदयातील रक्तप्रवाह नियमित करून हृदय निरोगी बनवतं आणि ब्लड क्लॉट होण्यापासूनही वाचवतं. तसंच हृदय रोग कमी होण्यासाठीदेखील याची मदत होते. याचं सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे घ्या. ते उकळून पाणी गाळून घ्या आणि मग त्यामध्ये आपल्या स्वादानुसार मध घाला. मध घातल्यामुळे मेथीचा कडूपणा थोडा कमी होईल तसंच हे पिण्यासाठी सोपं होईल. हे रोज पिण्यामुळे तुम्हाला फायदा होईल.


मेथीचे त्वचेसाठी फायदे - Methi ke Fayde for Skin in Marathi


for skin


मेथी तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. ही त्वचेतील पिंपल्स काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे आणि त्वचेवर सुरकुत्या येण्यापासून रोखते. यातील औषधीय गुण त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यासाठी तुम्हाला मेथीची पानं वाटून त्याचा लेप बनवायला हवा आणि हा लेप तुम्ही चेहऱ्यावर लावल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते. तसंच त्वचेमध्ये तजेलदारपणा टिकून राहतो. याशिवाय मेथीचे दाणे तुमच्या त्वचेला चांगलं मॉईस्चराईज करून त्यातील कोरडेपणा दूर करतात. त्यासाठी तुम्ही एक चमचा मेथी पावडरमध्ये थोडंसं दही घालून जाड पेस्ट बनवून घ्या. ती तुमच्या चेहऱ्याला लावा. नंतर साधारण 30 मिनिट्सनंतर ही पेस्ट हाताने स्क्रब करत काढा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. नंतर तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुवा. थंडी असल्यास, चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोमट पाणीदेखील वापरू शकता. असं आठवड्यातून एक वेळ केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसेल.


शरीराची त्वचा मुलायम बनवण्यासाठी मेथीच्या पानांचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या त्वचेवर चमक तर येतेच शिवाय चेहरा मऊ आणि मुलायम होतो. पिंपल्सपासून सुटका मिळवायची असल्यास, आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास मेथीची पानं मिक्सरमधून वाटून लेप करा आणि तो चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातात आणि लवकर परत येत नाहीत. तसंच हा लेप तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीदेखील चेहऱ्यावर लाऊ शकता. रात्रभर चेहरा तसाच ठेऊन सकाळी उठल्यावर नीट साफ करा. यामुळे चेहऱ्यावर आलेला काळेपणा निघून जाण्यास मदत होते.


मेथीचे केसांसाठी फायदे - Benefits of Methi for Hair in Marathi


for hair


सौंदर्य म्हटलं की, अर्थात केसांकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. त्वचेबरोबरच मेथी केसांसाठीही तितकीच फायदेशीर आहे. यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असतं जे केसांच्या विकासासाठी मदत करतं. मेथी केसगळती रोखणे, केस काळे करणे आणि कोंडा दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसंच केसांना घनदाट, निरोगी आणि मजबूत करण्यासाठीही मेथीचा उपयोग होतो. तुमचे केस गळत असतील तर मेथीची भाजी खावी आणि त्याचबरोबर रोज एक चमचा मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यावं. यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. त्याशिवाय तुम्ही मेथीचे दाणे वा पानं मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करा आणि ती केसांना लावा, सुकल्यानंतर केस धुवा. यामुळेदेखील केसगळती थांबते.


केसांना घनदाट आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही नारळाच्या दूथात 2 चमचे मेथी दाण्याची पावडर मिसळा. ही पेस्ट डोक्यावर आणि केसांना लावा आणि 30 मिनिट्सनंतर केस शँपूने धुऊन घ्या. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतील. चांगल्या परिणामासाठी असं आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करा.


तुम्हाला केस काळे करायचे असतील तर साधारण 50 ग्रॅम मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे भिजलेले दाणे मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस गार पाण्याने धुवा. असं रोज केल्यास, केस काळे होतात. त्याशिवाय तुम्ही 50 ग्रॅम वाटलेले मेथी दाणे नारळाच्या तेलात मिक्स करून साधारण 4 दिवस ठेवा. त्यानंतर हे गाळून घ्या आणि हे तेल तुम्ही केसांना लावा. हे तेल तुमच्या केसांना अधिक चमकदार, मजबूत आणि काळं बनवण्यास मदत करतं.


तुमचे केस जर कोरडे असतील तर चार मोठे चमचे दही घ्या त्यामध्ये तीन चमचे मेथी दाणे वाटून घाला आणि अर्धा तास भिजवून ठेवा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि अर्धा तास तसंच ठेऊन द्या. नंतर शँपूने केस धुवा. यामुळे तुमच्या केसांतील कोरडेपणा दूर होईल आणि केस अधिक मुलायम होतील. तसंच अजून एक उपाय म्हणजे, तुम्ही 4 चमचे मेथी पावडर घ्या त्यामध्ये 1 लिंबाचा रस आणि 1 वाटलेलं केळ मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या केसांवर लाऊन सुकू द्या आणि मग नंतर केस व्यवस्थित धुऊन घ्या. यामुळेदेखील तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील.


मेथीने काय होतं नुकसान - Side Effects of Methi in Marathi


कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात तसंच त्याचं नुकसानही असतं. हेच मेथीच्या बाबतही लागू होतं. मेथीचे फायदे तर आपण जाणून घेतलं आता आपण मेथीने नक्की काय नुकसान होतं ते पण जाणून घेऊया -


1: मेथीचे दाणे शरीरासाठी गरम असतात, त्यामुळे याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास, पोटात जंत होण्याची शक्यता असते. विशेषतः स्तनपान चालू असलेल्या महिलांना याचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. असं होत असल्यास, लगेच तुम्ही मेथी खाणं बंद करायला हवं अन्यथा त्याचा त्रास तुमच्या बाळाला होण्याची शक्यता असते.


2: याचे घरगुती उपाय तुमच्या त्वचेवर करण्याआधी हातावर याचा थोडा प्रयोग करून नक्की पाहा. यामुळे कोणत्याही प्रकारची अलर्जी तर येत नाही ना हे बघून घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित खात्री करूनच मग त्वचेवर याचा प्रयोग करा.


3: मेथीचा जास्त वापर खाण्यात केल्यास, कडू ढेकर, पोटात सूज असे प्रकार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच मेथी खायला हवी.


4: गरोदर असताना मेथी अजिबात खाऊ नका. यामुळे इंटरनल ब्लिडिंग होण्याची शक्यता असते.


5: तुम्ही कोणत्याही आजारासंबंधी औषधं घेत असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मेथी अथवा मेथी दाण्यांचा खाण्यात वापर करा.


मेथीसंबंधित प्रश्न - उत्तर / FAQ’s


प्रश्न - मेथी कोणत्या प्रकारात खाऊ शकतो?


उत्तर - मेथी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये खाऊ शकता. मेथी दाणे तुम्ही मसालाच्या स्वरूपात पदार्थांमध्ये वापरू शकता. तसंच मेथीची भाजी बनवून खाऊ शकता. तसंच तुम्ही मेथी वापरून चविष्ट पराठेही बनवू शकता.


प्रश्न - वजन कमी करण्यासाठी मेथी उपयोगी आहे का?


उत्तर - मेथीमधील फायबर तुमच्या शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच रोज मेथीचं पाणी पिण्यामुळेही तुमचं वजन कमी होतं.


फोटो सौजन्य - Shutterstock


हेदेखील वाचा - 


जेवणात स्वाद वाढवण्यासह काळी मिरीचे असेही फायदे


जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे


'दालचिनी'चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते


जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत

प्रकाशित - मे 15, 2019
2 लाईक्स
सेव्ह करा
शेअर करा
विस्तारीतपणे वाचा
Trending Products

तुमचं फीड