Curry Leaves Benefits In Marathi - केस आणि त्वचेसाठी कढीपत्ता फायदे | POPxo

कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू (Curry Leaves Benefits In Marathi)

कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू (Curry Leaves Benefits In Marathi)

फोडणीत जिरं आणि मोहरीसोबत कढीपत्ता टाकला की, असा मस्त खमंग वास सुटतो की, लगेचच भूक चाळवते. डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्तही कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत जे तुम्हाला माहीत हवेत. जर तुम्ही डाळीत, आमटीत, भाजीत आलेला कढीपत्ता बाजूला काढून टाकत असाल तर तुम्ही तुम्ही आताच कढीपत्त्याचे सेवन सुरु करा तुम्हाला तुमच्यात झालेला बदल लगेच जाणवेल. मग कढीपत्त्याचे हे फायदे जाणून घेण्यासाठी तयार आहात?


तुम्हाला मांड्याना मांड्या घासण्याचा होतो त्रास तर मग वाचाच


कढीपत्त्यामध्ये नेमकं काय असतं?


केसांसाठी कढीपत्ता आहे बहुगुणी


कढीपत्त्याचा असा करा वापर


त्वचेसाठीही आहे कढीपत्ता फायदेशीर


त्वचेसाठी असा करा कढीपत्त्याचा वापर


कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे


कढीपत्त्याबाबत लोकांना पडणारे प्रश्नकढीपत्त्यामध्ये नेमकं काय असतं? (What Exactly Is Curry Leaves)


curry leaves fi %281%29


उग्र वासांच्या या पानामध्ये नेमकं असतं तरी काय? असा तुम्हाला प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण कढीपत्त्यामध्ये काही विशेष गुणधर्म असतात. ते देखील तुम्हाला माहीत हवे. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमि E असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती.


केसांसाठी कढीपत्ता आहे बहुगुणी (Benefits Of Curry Leaves For Hair In Marathi)


केसांसाठी कढीपत्ता बहुगुणी आहे हे अभ्यासातून सिद्ध झालेले आहेच. अनेकांना केसांच्या तक्रारी असतात. त्यात प्रामुख्याने केसगळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे. या सगळ्यावर कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे.


केसगळती (Hair Fall)


hair fall fi


चुकीचा आहार आणि वयोमानानुसार तुमच्या केसांमध्ये बदल होत असतात. कढीपत्त्यामध्ये असलेले केरेटीन आणि प्रोटीन तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगले असते. जर तुम्हाला केसगळतीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कढीपत्ता अगदीच योग्य आहे. कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे तुमचे गेलेले केस परत येऊ शकतात. तुमची केस गळती थांबू शकते. तुम्हाला चमकदार आणि मजबूत केस मिळू शकतात.


केसांची वाढ (Hair Regrowth)


वर सांगित्याप्रमाणे तुमची केस गळती कढीपत्त्यामुळे कमी होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे केसांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम आहे. कढीपत्ता तुमच्या केसांची मूळ मजबूत करतात.या शिवाय जर तुमच्या स्काल्पवर घाण साचली असेल तर ती काढून तुमच्या केसांच्या वाढीला चालना देतात.


पांढरे केस काळे करण्यास मदत (Grey Hair)


अकाली केस पांढरे होण्याचा त्रास हल्ली अनेकांना होतो. अगदी 10 ते 15 या वयोगटातील मुलांचे केसही आजकाल लवकर पांढरे होतात. कढीपत्यामधील व्हिटॅमिन E तुमच्या केसांचा काळा रंग टिकून राहतो. केस पांढरे होण्यापासून कढीपत्ता परावृत्त करते म्हणून तुमच्या आहारात कढीपत्ता असायला हवे.


कोंडा करते दूर (Dandruff)


serum on hair


तुमच्या स्काल्पवरील घाण अर्थातच साचलेल्या रुपातील असलेला कोंडा कढीपत्ता काढून टाकते. कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा वापरामुळे तुमच्या केसांसाठी त्रासदायक असलेला कोंडा कमी होतो. कोंडा परत होतही नाही.


स्काल्प करते मॉश्चराईझ (Scalp Moisturizer)


तुमच्या केसांमध्ये हात फिरवून पाहा. तुम्हाला तुमची स्काल्प कोरडी लागते का? स्काल्पला नखाने थोडे खाजवा. तुम्हालाही तुमच्या स्काल्पमधून पांढरे पांढरे आल्यासारखे वाटते का? याचा अर्थ एकच की.तुमची स्काल्प कोरडी झाली आहे. तिला जर तुम्हाला मॉश्चराईज करायची असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर करायलाच हवा.


कढीपत्त्याचा असा करा वापर (Recipe Of Hair Mask And Oil)


कढीपत्त्यापासून बनवा हेअर मास्क (Hair Mask)


केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप चांगला आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. आता तुम्हाला केसांच्या उत्तम वाढीसाठी चांगला हेअर मास्कही तयार करता येईल. तुम्ही दोन पदधतीने हेअर मास्क बनवू शकता.


तुम्हालाही हवी आहे का परफेक्ट फिगर तर मग असा करा डाएट फॉलो


 


  • कढीपत्ता आणि दही हेअर मास्क (Curry Leaves And Curd Hair Mask)


कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दही घाला. तयार मास्क तुम्हाला तुमच्या केसांना लावायचा आहे. हा मास्क लावल्यानंतर तुम्हाला एकदम थंड वाटेल.


*हा मास्क 20 ते 30 मिनिटे ठेवून तुम्ही केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा.


 


  • कढीपत्ता कांदा हेअर मास्क (Curry Leaves And Onion Hair Mask)


आणखी एका प्रकारे तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. काही कढीपत्त्याी पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क तुम्ही तुमच्या केसांना लावावा. साधारण 30 मिनिटे केसांना लावून तुम्ही तुमचे केस धुवून टाका. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करा.


कढीपत्त्याचे तेल (Curry Leaves Oil)


कढीपत्त्याचे तेल  बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल.


नारळाचे तेल गरम करुन त्यात तुम्हाला कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. पाने काळी होईपर्यंत तुम्हाला त्यात कढीपत्ता ठेवायचा आहे. आठवड्यातून दोनदा हे तेल तुम्हाला लावायचे आहे.तुम्हाला 15 दिवसात तुमच्यात झालेला फरक जाणवेल.


 त्वचेसाठीही आहे कढीपत्ता फायदेशीर (Benefits Of Curry Leaves For Skin)


पिंपल्स आणि त्यांचे डाग (Pimples And Marks)


त्वचेच्या विकारापैकी हा एक त्रास अनेकांना सतावतो. पिरेड्सच्या आधी किंवा नंतर कित्येकांना हा त्रास होत असतो. तुमच्या या त्वचेच्या त्रासावर कढीपत्ता फायदेशीर आहे. कडीपत्त्यामधील व्हिटॅमिन A,B,E तुमचे पिंपल्स आणि त्याचे डाग कमी करते.


soft skin


त्वचेवरील सुरकुत्या करते कमी ( Wrinkle Free Skin)


अनेकदा प्रदुषणामुळे तुमचा चेहरा लवकर निस्तेज दिसू लगतो. चेहरा तर काळवंडतोच शिवाय त्यावर सुरकुत्याही दिसू लागतात. जर तुम्हाला Wrinkle free त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या ब्युटी किटमध्ये कढीपत्ता ठेवायलाच हवा.


पिंपल्सना ठेवते दूर (Keep Away Pimples)


जर तुम्हाला पिंपल्स येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा चहा करुन पिऊ शकता. रक्तशुद्धीकरणासाठी कढीपत्ता चांगला असून अगदी ग्रीन टी प्रमाणेच तुम्हाला कढीपत्ता टी बनवायचा आहे.


गरम पाण्यात कढीपत्त्याची पाने उकळून  घ्यावी. कढीपत्त्याचा अर्क असलेले पाणी ग्लासात घेऊन त्यात लिंबू आणि आले घालावे. तयार चहा डिटॉक्स करणारा आहे. त्यामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होणार नाही.


रॅशेस करते कमी (Reduce Rashes)


काहींची त्वचा इतकी नाजूक असते की,त्यांना त्वचेवर अगदी चटनक रॅशेस येतात. हे रॅशेस इतके त्रासदायक असतात की, त्यांना खाजवण्याची इच्छा होते. मग ते अधिक जास्त लाल होतात. कधीकधी तर जखमा देखील होतात. अशावेळी तुम्ही कढीपत्ता गरम पाण्यात घालून तुम्ही छान आंघोळ करु शकता.


त्वचा करते स्वच्छ (Cleanse Your Skin)


तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून तुमची त्वचा स्वच्छ करण्याचे काम कढीपत्ता करत असते. त्यामुळे नित्य सेवनात कढीपत्ता असायला हवा. किंवा तुम्ही त्याचा वापर तुमच्या फेसमास्कमध्ये करायला हवा.


त्वचेसाठी असा करा कढीपत्त्याचा वापर (Recipes For Skin Care Using Curry Leaves)


कढीपत्ता आणि मुलतानी मातीचा मास्क (Curry Leaves And Multani Mitti Mask)


कढीपत्ता आणि मुलतानीचा मास्क तुम्च्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत करते. गुलाबपाणी नॅचरल टोनर असल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला आवश्यक ओलावा मिळतो.


असा तयार करा मास्क


साहित्य: कढीपत्त्याची 10 ते15 पाने, मुलतानी माती, गुलाब पाणी


कृती: कढीपत्त्याची पाने कुटून त्यात साधारण एक ते दीड चमचा मुलतानी माती घाला.गुलाबपाणी घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. तयार मास्क तुमच्या चेहऱ्याला लावा. वाळल्यानंतर धुवून टाका.


curry leaves face mask


कढीपत्ता आणि हळद मास्क (Curry Leaves And Haldi Mask)


जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही हा मास्क ट्राय करायला हवा. हळद आणि कढीपत्त्यातील गुणधर्मामुळे तुम्हाला असलेले पिंपल्स कमी होतात.


असा तयार करा फेसपॅक    


साहित्य:कढीपत्त्याची पाने, हळद/ ओली हळद असेल तरी चालेल, पाणी


कृती: कढीपत्त्याची पाने कुटून घ्यावीत.त्यात हळद पावडर किंवा ओली हळद बारीक करुन घालावी. पाणी घालून थपथपीत पेस्ट बनवून तयार मास्क चेहऱ्याला लावावा. साधारण वाळत आल्यानंतर चेहरा स्क्रब करावा आणि मास्क थंड पाण्याने धुवून घ्यावा.


*आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करुन पाहावा. तुम्हाला पिंपल्स कमी झालेले दिसतील.


तुमचेही केस गळतायत, मग तुम्ही करायला हवा असा डाएट


कढीपत्ता आणि ऑलिव्ह ऑईल (Curry Leaves And Olive Oil)


त्वचेवर तजेला आणायचा असेल तर तुम्ही हा मास्क नक्की ट्राय करायला हवा. या मास्कमुळे तुमची शुष्क त्वचा तजेलदार बनते.


साहित्य: कढीपत्त्याची पाने, ऑलिव्ह ऑईल


कृती: कढीपत्याची पाने कुटून त्यात साधारण चमचाभर ऑलिव्ह ऑईल घाला. तयार पेस्ट चेहऱ्याला लावून त्याचा मसाज करावा. तुमच्या चेहऱ्याला आवश्यक असलेला तजेला तुम्हाला ऑलिव्ह ऑईलमुळे मिळू शकतो. हा मास्क चेहऱ्याला लावल्यानंतर साधारण 2 मिनिट मसाज करा. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाका. त्यामुळे तुम्हाला अजून कसला त्रास होणार नाही.


कढीपत्त्याची वाफ (Curry Leaves Steam)


जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर तुमच्यासाठी कढीपत्त्याची वाफ हा उत्तम  पर्याय आहे.


उकळत्या पाण्यात कढीपत्याची पाने कुस्करुन घाला. त्याची वाफ तुम्ही चेहऱ्यावर घ्या.गरम पाण्यामुळे तुमचे पोअर्स ओपन होतात. त्यामध्ये असलेली घाण निघून जाते. तुमच्या चेहऱ्यावर असलेले डाग देखील कमी होतात.


*आठवड्यातून दोनदा तुम्हाला ही वाफ घ्यायला हरकत नाही. पोअर्स ओपन केल्यानंतर ते बंद करण्यासाठी बर्फ लावायला विसरु नका.


 कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Curry Leaves)


अॅनिमिया ठेवते दूर (Effective On Anemia)


शरीरातील लोह (Iron) कमी झाल्यामुळे अॅमिनिा हा त्रास बळावतो. जर तुम्हाला आर्यन डेफिशिअन्सीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कढीपत्ता चांगला नैसर्गिक उपचार आहे. तुमच्या शरीरातील आर्यनची कमतरता दूर करण्यात ते मदत करते. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर सकाळी उपाशी पोटी तुम्ही एक खजूर आणि कढीपत्त्याची काही पाने खा. कढीपत्त्यामध्ये असलेले पोषकतत्व तुमचा अॅनिमिया दूर करतील.


पचनशक्ती वाढवते (Improves Digestion)


digestion system


तसं पाहायला गेलं तर फोडणीत जो कढीपत्ता घातला जातो. त्याचे कारण हे असते की कढीपत्ता हा पचनासाठी चांगला असतो. विशेषत: डाळी, कडधान्यांमध्ये कढीपत्ता अधिक वापरला जातो. हे पिष्ठमय पदार्थ पोटात गॅस तयार करु शकतात. तो होऊ नये म्हणूनच यांच्या रेसिपीमध्ये कढीपत्ता घातला जातो. तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी कढीपत्ता फारच चांगला आहे.


*जर तुम्हाला अपचनाचा त्रास झाला असेल तर तुम्ही कढीपत्त्याची काही पाने चावून खाल्ली तरी चालू शकतात.त्याचा रस पोटात गेल्यामुळे तुम्हाला लगेचच आराम पडतो.


कोलेस्ट्राल ठेवते नियंत्रणात (Controls Cholesterol)


जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल आणि तुम्हाला कोलेस्ट्राॅल नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही अगदी आवर्जून कढीपत्ता आहारात समाविष्ट करायला हवा. कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते.


वजन ठेवते नियंत्रणात (Weight Loss)


जर तुमचे वजन वाढत असेल तर कढीपत्ता तुम्हाला वजन कमी करायला मदत करु शकतो. मदत कमी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या डाएटमध्ये कढीपत्त्याचाही समावेश करा कारण त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकेल. तुमच्या डाएटसोबत योग्य गोष्ट तुमच्या पोटात जाईल.


आरोग्य सुधारते (Improve Immune System)


तुमच्या आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर ठेवायच्या असतील तर तुम्ही कढीपत्ता खावा. आजारांशी लढण्याची ताकद तुम्हाला कढीपत्ता देऊ शकते. तुमची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे तुम्ही अधिक निरोगी होता.त्यामुळे साहजिकच आजार तुमच्यापासून चार हात दूर राहतात.


कढीपत्त्याबाबत लोकांना पडणारे प्रश्न (FAQ)


एका दिवसात साधारण किती कढीपत्ता खायला हवा? (How many curry leaves one can eat for a day?)


लोकांना कायमच हा प्रश्न पडतो की, नेमका कढीपत्ता किती खावा. पण तुम्ही जर आहारात त्याचे योग्य प्रमाणात सेवन करत असाल तर त्यावर अधिक कढीपत्ता खाण्याची गरज नाही. पण तुम्ही आहारात त्याचा वापर अजिबात करत नसाल तर किमान 15  ते 20 कढीपत्त्याची पाने खाण्यास तुम्हाला काहीच हरकत नाही.


curry leaves


आरोग्यासाठी कढीपत्ता खराच फायदेशीर असतो का? (Is Curry leaves good for health ?)


अनेक आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यास कढीपत्त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे तुम्ही आहारात त्याचा समावेश करावा. पोट, ह्रदय,पचनाच्या सगळ्या त्रासाला कढीपत्ता अगदी दूर ठेवते म्हणूनच कढीपत्ता खावा असे आवर्जून सांगितले जाते.


कढीपत्त्याच्या सेवनाचे काही दुष्परिणाम आहेत का? (Side effects of eating curry leaves)


कढीपत्त्याच्या सेवनाचे कोणतेही दुष्परिणाम अद्याप तरी समोर आले नाहीत. शिवाय अभ्यासातही असे काही समोर आले नाहीत. त्यामुळे तुम्ही कढीपत्ता जास्त खाल्लात तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.


कढीपत्त्याचा त्वचेसाठी उपयोग होऊ शकतो का? (Is curry leaves help to improve skin?)


कढीपत्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आहे जे तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असते. त्यामुळे तुम्हाला कढीपत्त्याचे चांगले फायदे मिळतात. त्वचेसाठी त्याचा वापर तुम्ही त्वचेसाठी करु शकता.


 केसांसाठी कढीपत्ता खावा की, त्यापासून काही बनवावे? ( For good hair we need to eat curry leaves or need to make mask of curry leaves?)


केसांसाठी कढीपत्ता आहारात असल्यास उत्तम. या शिवाय तुम्ही चांगल्या केसांसाठी कढीपत्ता केसांना मास्क स्वरुपातही लावू शकता.


(फोटो सौजन्य- Shutterstock)


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


Effective Home Remedies For Long Hair In Marathi


Home Remedies For Black Hair In Marathi


Home Remedies For Hair Growth In Marathi