सु्ट्टी संपतेय.. मुंबईतील या ठिकाणी करा स्वस्त आणि मस्त शाळेची खरेदी

सु्ट्टी संपतेय.. मुंबईतील या ठिकाणी करा स्वस्त आणि मस्त शाळेची खरेदी

चला उन्हाळा आला संपत आला आहे. घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या शाळेची तयारी करणे तुम्ही पालक म्हणून बंधनकारक आहे. जून महिना म्हणजे शाळेचं नवीन वर्ष.. नव्या वह्या, शाळेचे दप्तर, कंपासपेटी, पावसाळी चपला घेणे आलेच. तुम्हीही अजून सुट्टी एन्जॉय करताय? पण लवकरच घरी परतून तयारीला लागणार असाल तर मुंबईत आणि मुंबई उपनगरातील या ठिकाणी तुम्हाला शाळेच्या वस्तू स्वस्त आणि मस्त दरात मिळू शकतील.


मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ


  • क्रॉफ्रेड मार्केट
abdulrehman street


मुंबईतील असं ठिकाणी जिकडे तुम्हाला अगदी सगळं काही मिळू शकेल. जाताना नेलेली रिकामी पिशवी येताना हमखास भरलेली असणारच! अशी खात्रीलायक शॉपिंग तुम्ही या ठिकाणी करु शकता. क्रॉर्फेड मार्केट परिसरात वेगवेगळ्या वस्तूंसाठी गल्ली आहे. तशीच एक गल्ली सगळ्या स्टेशनरी वस्तूंसाठी आहे. जिथे तुम्हाला होलसेल भावात सगळ्या वस्तू मिळू शकतील. साधारण मे महिन्याच्या शेवटी या ठिकाणी खूप गर्दी असते ती शाळा सुरु होईपर्यंत ही गर्दी तुम्हाला या बाजारांमध्ये दिसते. येथील अब्दुल रहमान स्ट्रिटवर तुम्हाला ही  दुकाने पाहायला मिळतील.


मुंबईतील स्ट्रीट मार्केट


कसे जाल?


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन तुम्हाला या ठिकाणी जाणे अधिक सोयीस्कर आहे. मागच्या डब्याला बसून तुम्हाला मस्जिदच्या किंवा क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने मागे यायचे आहे. तुम्हाला क्रॉफर्डच्या समोर दिसणाऱ्या गल्लीतून सरळ आत जायचे आहेत एक गल्ली ओलांडून ही गल्ली लागते.


*या ठिकाणी काही दुकाने तुम्हाला एकत्र दिसतील. तर काही इकडतिकडच्या गल्लीत थोडीफार पसरलेली आहेत.


काय मिळेल?


वह्या, पुुस्तके, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, बॅग,


शिवाय येथेच तुम्हाला चांगल्या पावसाळी चपला, रेनकोट यांचे वेगवेगळे प्रकार चांगले  मिळू शकतील.


येथील अनेक दुकाने होलसेल आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदीच 2-4 वह्या घेण्यासाठी जाऊ नका.


Also Read About मुंबईतील अभिनय शाळा


  • दादर
dadar market


मुंबईच्या मध्यभागी असलेलं दादर तर अनेकांसाठी घरेदीचा फिक्स स्पॉट आहे. दादरला तशी रोजच गर्दी असते. पण आता तुम्हाला साधारण जुलै महिन्यांपासून बाजारांमध्ये शाळांचे ड्रेस, दप्तर, वॉटर बॅग, पाऊच, कंपास असे प्रकार जास्त दिसतील.


Also Read मुंबई मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम जागा


कसे जाल?


दादर पश्चिमेला तुम्हाला अशा प्रकारातील खरेदी जास्त करता येईल. तुम्हाला दादर स्टेशनला उतरुन पश्चिमेला यायचे आहे. सुविधा दुकानाच्या पुढील गल्लीत तुम्हाला डाव्या बाजूला वळायचे आहे. तेथे तुम्हाला दुकानांवर आणि रस्त्यावरही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू दिसतील. दादर पश्चिमेला आयडियल हे पुस्तकांसाठी प्रसिद्ध दुकान आहे. तेथे तुम्हाला शालोपयोगी वस्तू मिळतील. याशिवाय या दुकानाच्या समोरील गल्लीतही  अनेक दुकानं आहेत जिथे या शालोपयोगी वस्तू मिळू शकतील.


अगदी माफक दरात तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर दादर हे उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला या शिवायही अनेक खरेदी या ठिकाणी करता येईल.


काय मिळेल? 


शालेय पुस्तके, वह्या, रेनकोट, पावसाळी चपला, दप्तरे, पाऊच, कंपास इत्यादी


मुंबईतील या बाजारांमध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त इनरवेअर


  •  विलेपार्ले
villeparle station


पुस्तकाच्या किंवा शाळेच्या इतर खरेदीसाठी तुम्हाला कुठे जायचे असेल तर तुम्ही विलेपार्ले येथे देखील जाऊ शकता. पार्ले इतरवेळीही खरेदीसाठी चांगले आहे. पण साधारण जून महिन्यात या ठिकाणी तुम्हाला शालोपयोगी वस्तू दिसायला लागतात.


प्रकारची संग्रहालये देखील वाचा


कुठे जाल?


पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्हाला विलेपार्ले पूर्वेला यायचे आहे. पूर्वेला उतरल्यानंतर तुम्हाला भाजी मार्केट दिसेल . त्यामागेच तुम्हाला दुकाने दिसतील. पार्ल्यात पार्ले बुक डेपो नावाचे प्रसिद्ध दुकान आहे जिकडे तुम्हाला सगळी पुस्तक, वह्या, गणवेश, दप्तर अशा वस्तू मिळू शकतील.


पार्ले त्या तुलनेत तुम्हाला थोडे महाग वाटू शकेल. पण तुम्हाला इथे मिळणाऱ्या वस्तू नक्कीच चांगल्या असतील.


काय मिळेल?


शालेय पुस्तके,वह्या, दप्तर.वह्या पुस्तकांची कव्हर्स


  • घाटकोपर
ghatkopar station


शाळेचे दप्तर, पावसाळी चपला घ्यायच्या असतील तर तुम्ही हमखास घाटकोपरला जायला हवे. कारण घाटकोपर हे असे ठिकाण आहे जिकडे तुम्हाला वस्तूंच्या खरेदीपासून ते खादाडीपर्यंत सगळे काही करता येईल. त्यामुळे तुम्ही आवर्जून घाटकोपरला जायलाच हवे


कुठे जाल?


तसं पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त गर्दी ही घाटकोपरला पश्चिमेला असते. या ठिकाणी अगदी रस्त्यापासून ते दुकानातील वस्तूंची तुम्हााल खरेदी करता येऊ शकते. जर तुम्हाला फॅन्सी पावसाळी चपला तुम्हाला मिळू शकतात.तेही अगदी 300 रुपयांपासून


काय मिळेल? 


उत्तम पावसाळी सँडल, चपला, रंगीबेरंगी बॅगा.. विशेषत: तुमचं मूल नर्सरीत जात असेल तर तुम्हाला या ठिकाणी छान वस्तू मिळू शकतील.


  • अंधेरी
mumbai market fi


अंधेरी पश्चिम हे देखील खरेदीसाठी फारच प्रसिद्ध आहे. अंधेरी पश्चिमेला स्टेशनबाहेरच तुम्हाला काही दुकाने दिसतील. तिकडे तुम्हाला चांगल्या प्रतीच्या बॅगा पाहायला मिळतील.


कसे जाल?


अंधेरी स्टेशनवर पश्चिमेकडे उतरल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला काही दुकानं लागतील. या दुकानांमध्ये तुम्हाला चांगल्या चप्पल आणि बॅगा दिसतील. साधारण जूनच्या सुरुवातीला या ठिकाणी शालोपयोगी वस्तू दिसू लागतात.


काय मिळेल?


पावसाळी सँडल, दप्तर, वॉटर बॉटल, नर्सरी आणि ज्युनिअर केजीसाठी भरपूर वस्तू


  • गिरगाव
पुस्तकांच्या खरेदीसाठी गिरगाव हे अगदी बेस्ट आहे. शाळेची कोणतीही पुस्तकं हमखास गिरगावात मिळतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून गिरगावात खरेदीसाठी जायला हवे.


कसे जाल? 


चर्नी रोड स्टेशनला उतरुन तुम्ही गिरगावात जाऊ शकता. गिरगावात अनेक पब्लिशिंग हाऊस देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला केजी पासून पीजी पर्यंतची सगळी पुस्तके या ठिकाणी मिळतात. या शिवाय भुलेश्वरमध्ये तुम्हाला शालोपयोगी वस्तूदेखील मिळू शकतील. 


काय मिळेल? 


शॉपिंगसाठी भुलेश्वर आणि गिरगाव एकदम अड्डाच आहे. तुम्हाला प्रत्येक सणवारानुसार बाजारातील स्टॉल्स बदलेले दिसतील. आता तुम्ही गेलात तर तुम्हाला शालोपयोगी वस्तूंचे अधिक स्टॉल दिसतील. 


लग्नासाठी शॉपिंग करताय मग तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात


  • बोरिवली


    rainyshoes


 बोरिवली हे खरेदीसाठी चांगले आहे हे आधीही आम्ही तुम्हाला मुंबई शॉपिंगमध्ये सांगितलेच आहे. बोरिवली पश्चिमेला आता सगळीकडे तुम्हाला शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू हमखास मिळतील. 


काय मिळेल? 


रेनकोट, पावसाळी, चपला आणि शालोपयोगी बऱ्याच वस्तू  तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील 


 


हल्ली मुलांना अनेकदा शाळेतूनच वस्तू दिल्या जातात. त्यामुळे पालक हल्ली फार खरेदी करायला बाहेर जात नाही. पण तरीदेखील नर्सरीला जाणाऱ्या पालकांचा उत्साह असतो. त्यांना त्यांच्या मुलांना नवनवीन वस्तूंची खरेदी करुन द्यायची असते. म्हणूनच जर तुम्हाला लहान मुलं असतील आणि शाळेची काहीही बंधने नसतील तर तुम्ही अगदी मस्तपैकी या वस्तूंची खरेदी करु शकता. 


सध्याचा जमाना हा ऑनलाईन खरेदीचा आहे. त्यामुळे अनेक जण ऑनलाईन शॉपिंग करतात.वह्या, पुस्तके ऑनलाईन मागवायला बघतात. पण तुम्ही एकदा तरी मुंबईच्या या बाजारांमध्ये खरेदी करुन पाहा तुम्हाला खरचं खरेदीचा वेगळा आनंद मिळेल. मग जाताय ना शॉपिंगला 


(फोटो सौजन्य- Instagram)