कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. पानाचा वापर हा फक्त विडा म्हणून नाहीतर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही केला जातो. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य जनतेचंही आवडतं आहे. पान तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचं हे पान असतं. याच पानाला इंग्रजीमध्ये बीटल लीफ, हिंदीमध्ये पानचं पान, तेलगूमध्ये तमालपाकु तर मराठीत याला तांबुल असं म्हटलं जातं. स्वादानुसार पानाचे चार प्रकार असतात - कडू, आंबट, तिखट आणि गोड. पानाच्या औषधीय गुणांचा उल्लेख हा चरक संहिता या पुराण ग्रंथातही केलेला आढळतो. पानामध्ये बाष्पशील तेलांसोबतच अमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट आणि अनेक प्रकारची विटॅमीन्सही आढळतात.
पान हा भारतीय खाद्य परंपरेचा मुख्य भाग आहे. कारण जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत पानाचा वापर केला जातो. भरपेट मेजवानीनंतर आजही पान खाणं मस्ट मानलं जातं. आपल्या भारतीय परंपरेत तर देवालाही पानाचा विडा करून वाहिला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. प्रत्येक पूजेत किंवा सणावाराला विड्याच्या पानाचा वापर हा शुभ मानला जातो. यामुळे विड्याच्या पानाचे शुभ प्रतीक आणि चमत्कारी आयुर्वैदीक गुण असे दुहेरी फायदे आहेत. चला जाणून घेऊया विड्याच्या पानाच्या अजून काही वैशिष्ट्य -
विड्याच्या पानाने होईल वजन कमी
तीळ आणि मस हटवण्यासाठी विड्याचं पान आहे रामबाण उपाय
जास्तकरून लोक नुसतं विड्याचं पान खाण्याऐवजी तंबाकू-सुपारी किंवा यावर गुलकंद घालून पानाचा विडा खाणं पसंत करतात. पण हे पान फक्त तुमच्या तोंडाची चवच वाढवत असं नाहीतर याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. चला जाणून घेऊया काही आरोग्यदायी फायदे.
वाचा - त्वचेसाठीही आहे कढीपत्ता फायदेशीर (Curry Leaves Benefits For Skin)
ज्या लोकांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी हे पान खाणं खूपच फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरीसोबत पानाचं सेवन केल्यास तुम्हाला व्यवस्थित भूक लागेल.
विड्याच्या पानं ही ब्लड शुगर कंट्रोल करण्यातही सहाय्यक असात आणि अँटी डायबिटीक गुणांसाठीही ओळखली जातात. एक संशोधनानुसार जी लोक नियमितपणे पानाचं सेवन करतात त्यांना डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो.
तसेच तुळशीच्या पानांच्या फायद्यांबद्दल वाचा
कितीही भयंकर डोकेदुखी असो, पानं वाटून त्याचा रस कपाळावर लावल्यास काही मिनिटांतच डोकेदुखी दूर होईल.
विड्याच्या पानाचा रस जर तुम्ही जखमेवर लावला आणि त्यावर पट्टी बांधून ठेवली तर तुमची जखम दोन दिवसात भरते. याशिवाय विड्याच्या पानाचा उपयोग हा फोड किंवा गळू आल्यावरही केला जातो. विड्याची पान थोडीशा गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून ते फोड आलेल्या ठिकाणा लावल्यास आराम मिळतो.
विड्याचं पान हे सर्दी खोकला आणि कफ यावर खूपच गुणकारी आहे. याशिवाय पानाचा वापर हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, अस्थमा यासांरख्या रोगांमध्येही होतो. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर विड्याचं पान मधासोबत खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
पानाचा वापर हा चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग किंवा मुरूमापासून सुटका मिळवण्यासाठीही केला जातो. कारण पानांमध्ये असतात अँटी बॅक्टेरियल गुण जे तुमच्या त्वचेला फंगल इन्फेक्शनपासून वाचवतात. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी विड्याची 8 ते 10 पान घेऊन वाटून घ्या. मग ही वाटलेली पान दोन ग्लास पाण्यात मिक्स करून ते पाणी चांगल आटेपर्यंत उकळून घ्या. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर वापरा. यामुळे तुमचे पिंपल्स होतील दूर आणि चेहरा होईल डागविरहीत.
अनेक गायकांना तुम्ही पानाचं सेवन करताना पाहिलं असेल. कारण पानाचं सेवन केल्याने तुमचा आवाज स्वच्छ आणि पातळ होतो. विड्याच्या पानाचं पाणी प्यायल्यास तुमच्या गळ्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होतील.
पानात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडातील रोगाणु, बॅक्टेरिया आणि श्वासाशी निगडीत इतर रोगांपासून आपला बचाव होतो. विड्याची पान चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होतं आणि दातही चांगले राहतात. तसंच तुमच्या हिरड्याही मजबूत राहतात.
पोटांशी निगडीत कोणताही प्रोब्लेम असल्यास तुम्हाला विड्याच्या पानाच्या सेवनाने आराम मिळतो. कारण विड्याच पान हे थंड असतं. त्यामुळे विड्याच्या पानांचा रस प्यायल्याने गॅस्ट्रीक अल्सर होत नाही.
विड्याच्या पानाला सर्वात उत्तम माऊथ फ्रेशनर मानलं जातं. कारण या पानांमधील घटक आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करतात. यामुळे विड्याच्या पानाचा वापर हा जास्तकरून माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.
विड्याचं पान हे कामोत्तेजना वाढवण्यात सहाय्यक मानलं जातं. पूर्वीच्या काळी लोक आपल्या प्रणय क्षणांना अजून अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी याचा वापर करत असत. असं म्हणतात की, सेक्सआधी पान खाल्ल्याने तुमच्या सेक्स अनुभव अजूनच आनंदी होतो.
विड्याची पान चावून खाल्ल्यास तुमचं पचन तंत्रही सुधारतं. जेव्हा आपण विड्याचं पान चावून खातो तेव्हा आपल्या लाळ ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो. जो आपल्या पचनतंत्रासाठी खूप आवश्यक असतो. कदाचित म्हणूनच साग्रसंगीत जेवण झाल्यावर नेहमी पान खाण्याची प्रथा आहे. ज्यामुळे तुमचं जेवण लवकर पचतं.
एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, विड्याचं पान चावून खाल्ल्यास तोंडाच्या कॅन्सरपासून सुटका होते. खरंतर विड्याच्या पानात जास्त प्रमाणात एस्कॉर्बिक अॅसिड असतं जे एक चांगलं अँटी ऑक्सीडंट आहे. हे शरीरातील फ्री रॅडीकल कमी करतं.
कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण - Coriander Benefits in Marathi
तज्ज्ञ असं मानतात की, विड्याच्या पानांच्या सेवनाने आपलं वजन संतुलित राहतं आणि मेटाबॉलिजमसुद्धा चांगलं राहतं. ज्यामुळे शरीरात एक्स्ट्रा फॅट्स जमा होत नाही. आयुर्वेदानुसार विड्याच्या पान शरीरातील मेद धातू म्हणजेच बॉडी फॅट काढण्याचं काम करतं. ज्यामुळे आपलं वजन कमी राहतं. जर तुम्ही काळ्या मिरीसोबत रोज विड्याच्या पानाचं सेवन केलं तर 8 आठवड्यात तुमचं वजन कमी होईल.
शरीरावर नको असलेले तीळ आणि मसपासून सुटका हवी असल्यास तुम्ही करू शकता विड्याच्या पानांचा वापर. अनेक लोक यासाठी निरनिराळे उपाय करून पाहतात पण अनेकांना हे माहीत नसेल की, यासाठी विड्याच्या पानांचाही वापर केला जाऊ शकतो तेही कोणत्याही नुकसानाशिवाय. हा खूप जुना आयुर्वेदीक उपाय आहे. तीळ किंवा मस काढण्यासाठी सर्वात आधी विड्याच्या पानावर थोडासा सफेद चुना लावा आणि हे पान मस असलेल्या ठिकाणी लावा. सुकेपर्यंत तसंच राहू द्या. असं आठवड्यातून कमीतकमी 3 ते 4 वेळा करा. थोडीशा जळजळ होईल पण त्वचेला कोणतंही नुकसान होणार नाही.
- जर तुम्हाला अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर झोपण्याआधी विड्याचं पान मीठ आणि ओव्यासकट चावून खावं चांगली झोप लागेल.
- तोंड आल्यास विड्याची पान पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने चूळ भरा म्हणजे तुम्हाला होत असलेला त्रास कमी होईल.
- जर तुमच्या अंगाला खाज सुटत असेल तर विड्याची पान पाण्यात उकळून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा.
- डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लालसर दिसत असल्यास विड्याची पान पाण्यात उकळून ते पाणी थंड करा आणि त्या पाण्याने डोळे धुवा.
- शरीरावर एखाद्या ठिकाणी भाजल्यास विड्याची पानाची पेस्ट बनवून लावा. काही वेळाने पेस्ट धुवून टाका आणि त्यावर मध लावा. त्या जागी जळजळ होणार नाही आणि डागही दिसणार नाही.
- एखाद्या महिलेला प्रेग्नंसीनंतर स्तनपान देण्यात त्रास होत असल्यास विड्याची पान धूवून मोहरीच्या तेलासोबत तव्यावर थोडी भाजून घ्या. थोडं कोमट झाल्यावर दोन्ही स्तनांच्या निप्पल्सच्या आसपास लावा. सूज आणि वेदना कमी होतील.
- उन्हाळ्यात जास्त करून अनेकांना नाकाचा घोण्या फुटण्याचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी विड्याची पान कुस्करून त्याचा वास घ्या. लगेच फरक पडेल.
- जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर विड्याच्या पानाच्या रसात मध मिक्स करून घेतल्यास एनर्जी टॉनिकप्रमाणे तुम्हाला उर्जा मिळेल.
- जर एखाद्या महिलेला श्वेत पदराचा त्रास असेल तर 10 पान 2 लीटर पाण्यात उकळून घ्या आणि मग त्या पाण्याने योनी धुवा. यामुळे श्वेतपदराची समस्या दूर होईल.
विड्याची पान ही रंगाला हिरवी असली तरच ती चांगली असतात. पिवळी झालेली पान घेऊ नये. कारण पिवळी झाल्यावर या पानातील औषधीय गुण निघून जातात. नेहमी विड्याच्या ताज्या पानांचा वापर करा. याशिवाय कुजलेली पान ज्यांचा रंग काळा झाला असेल. ती कधीही खाऊ नका. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
खरंतर पानांमध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. पण पानाचा गरजेपेक्षा जास्त आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं. एकीकडे पान चावल्याने तोंडाच्या कॅन्सरपासून सुटका होऊ शकते. तर तेच पान जर तंबाखू किंवा जर्दा घालून खाल्ल्यास घश्याचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे पानाचं सेवन हे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात करावं. म्हणजे शरीरावर भविष्यात होणारे परिणाम टळतील.
मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
संशोधनानंतर असं आढळलं आहे की, तंबाकूरहित पान हे आरोग्यासाठी चांगलं आहे. पण जर तुम्ही पानात तंबाखू घालून खात असाल ते तुमच्या शरीरासाठी हानीकारक आहे. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे.
पानातील औषधीय गुणांबद्दल कोणतीच शंका नाही. पण कोणतीही गोष्ट अति खाल्ल्यास ती हानीकारक ठरते. त्यामुळे रोज पानाचं सेवन करावं पण ठराविक प्रमाणात.
पानाचा वापर हा अगदी राजा-महाराजांच्या काळापासून केला जात आहे. त्याकाळापासून पानाचा वापर हा उत्तेजना वाढवण्यासाठी, अँटीसेप्टीक आणि माऊथ फ्रेशनरच्या रूपात केला जात आहे.
तुमच्या कपड्यांवर जर पानाचा डाग पडला तर डाग पडलेल्या ठिकाणी दही लावा. काही वेळासाठी तसंच ठेऊन नंतर चोळून घ्या. डाग हलका होईल. हा उपाय 2- 3 वेळा करा. डाग गायब होईल.
असं आवश्यक नाही की, पान खाल्ल्यावर तुमचे दात पिवळे पडतील. तुम्ही किती वेळ पान चावता यावर ते अवलंबून आहे. तज्ज्ञानुसार, पान चावल्याने दात पिवळे होत नाही. जर तुम्ही पान खाल्ल्यानंतर व्यवस्थित चूळ भरली तर तुमच्या दातांवर पिवळेपणा चढणार नाही.
मग आजच तुमच्या घरी विड्याच्या पानांचं झाड नक्की लावा आणि त्याच्या औषधी गुणांचा भरपूर लाभ घ्या.
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:
विविध आजारात गुणकारी गुळवेल आणि गुळवेलाच्या सेवनाचे दुष्परिणाम
बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे