home / Love
#Breakup नंतरच कळते नात्याची खरी किंमत, पण वागू नका असे

#Breakup नंतरच कळते नात्याची खरी किंमत, पण वागू नका असे

प्रेमात असताना सगळं कसं अगदी गुलाबी गुलाबी असतं. पण जेव्हा त्या नात्याला ब्रेक लागतो. त्यानंतर मात्र ‘छन से जो तुटे कोई सपना’ अशी सगळ्यांची अवस्था होऊन जाते. आता वर #Breakups यासाठी म्हटले आहे की, काहीजणांचे एकापेक्षा अधिक Break ups  होतात. मग त्यांच्या सोशल मीडियावर वॉलवर ब्रेकअप स्टेटस दिसू लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का? रिलेशनशीपमध्ये होणारे हेच Breakup तुमच्या आयुष्याला चांगली कलाटणी देऊ शकतात. तुम्हाला नात्याची खरी किंमत काय याची जाणीव हेच Breakup करुन देत असतात. तुमचेही एकापेक्षा जास्त # Breakup झाले आहेत का? किंवा तुमचे नुकतेच #Breakup झाले असेल तर त्यातून बाहेर पडा आणि त्यातून चांगला धडा घ्या.

 ‘भूल जा जो हुआ उसे’ (Forget and move on)

bhula dena use

तसं पाहायला गेलं तर आयुष्यात माणसं येतातच जाण्यासाठी… आता हा झाला कोणीतरी मारलेला डायलॉग. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत आहे. ती गोष्ट सतत डोक्यात ठेवून तरी काय होणार आहे. जर एकदा नाते तुटले असेल तर त्याला कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी ती केलेली तडजोड असते जी काहीच उपयोगाची नाही. जर तुमचे एकापेक्षा जास्त ब्रेकअप अगदी क्षुल्लक कारणांमुळे झाले असतील तरी ठिक आहे. असं कित्येकांच्या आयुष्यात होतं. त्यामुळे जे झाले ते तुम्ही विसरण्यातच शहाणपण आहे. मागचे नाते विसरुन जाताना माझ्या काय चुका झाल्या हे तुम्ही शिकलात तर तुम्हाला पुढील आयुष्यात नात्याची किंमत कळते.

व्हॉट्स अॅपच्या ब्रेकअप स्थितीबद्दलही वाचा

उदा. तुमचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे रिलेशनशीप काही कारणामुळे तुटले. या नात्यामध्ये काय चुका झाल्या तुम्हाला माहीत आहेत. त्या चुका मागील नात्यात जाऊन सुधारणे आता शक्य नाही. पण तुम्ही भविष्यात कोणतेही नवे नाते जोडताना मागे केलेल्या चुका करु नका. तुम्ही मागचे विसरुन जा यामध्ये त्या व्यक्तीला विसरुन पुढे जाण्याचा विचार करा असा याचा अर्थ होतो.

Relationship मध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे तर आताच करा Breakup

‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग Breakupमें'(Breakup will not denounce you)

malaika arora

मनातून सगळ्यात आधी ही गोष्ट काढून टाका की, तुमचे तुटलेले नाते तुम्हाला बदनाम करणार आहे. काही जण Breakupनंतर अशी काय गायब होतात की, त्यांना चारचौघात जाणे म्हणजे मागच्या गोष्टी उकरुन काढल्यासारखे वाटते. शिवाय आता आणखी एक Breakup झाला म्हटल्यावर लोकं माझ्यातच दोष काढणार असे वाटू लागते. तुमची चुकी नसतानाही एखाद्या व्यक्तीने सोडून जाणे तुम्हाला त्रास देणारे असणारच पण त्यासाठी तुम्हाला तुमचे आयुष्य इतरांपासून लांब नेण्याची काहीच गरज नाही. दीर्घ श्वास घ्या आणि घराबाहेर पडा. तुम्ही जर काहीच वाईट केलं नसेल तर नाते तुटले हे सांगताना तुम्हाला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही. अनेक नाती कित्येक वर्षांनीही तुटतात. त्यासाठी नेहमीच समजूतदारपणा जबाबदार नसतो. तर अनेक गोष्टी नात्यात दुरावा आणत असतात. त्या दुराव्यात राहून लोकांसाठी नाते ठेवण्यासाठी ते तुटलेलेच बरे असते.

उदा. माझे 4 वर्षांचे नाते अचानक तुटले आता लोकांना तोंड कसे दाखवू. आम्ही लग्न करणार असे लोकांना सांगितले होते आणि आता असे झाले. मी कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नाही. हा विचार तुमच्या मनात येत असेल तर तो काढून टाका. प्रेमविवाहच नाही कित्येक अरेंज मॅरेजही तुटतातच ना. मग त्यात इतकी लाज बाळगण्याची गरज नाही.

मैं ऐसा क्यो हूँ (why with me always…)

mein aisa kyu hoon

काही जणांना सतत Breakups झाल्यानंतर असे वाटत राहते की, माझ्यातच काही तरी प्रॉब्लेम आहे. मलाच सगळे सोडून जातात. माझ्यामध्ये काहीतरी इतके वाईट आहे की, लोकांना ते नकोसे होते. असा विचार करणे तुम्ही सगळ्यात आधी सोडून द्या कारण त्याचा त्रास शेवटी तुम्हालाच होणार आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. तुमच्या सगळ्याच गोष्टी समोरच्याला आवडतील असे होणार नाही. किंवा तुम्हाला समोरच्याच्या काही गोष्टी आवडतील असे होणार नाही. त्यामुळे हा विचार करणे मनातून काढून टाका. मी आहे तशी/तसा चांगला आहे असे स्वत:लाच सांगा

उदा. ज्यांचे सतत ब्रेकअप होते त्यांच्यामध्ये  सतत न्यूनगंड येत राहतो. बाकी सगळ्यांचे अगदी छान सुरु आहे. पण माझे नाही. मी इतका खराब का आहे. मलाच लोक नेहमी का नाकारतात असे अनेकांना वाटू लागते. त्यामुळे होतं असं की, तुम्ही भविष्यात ज्या नात्यात असता ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाऊ नये म्हणून तुम्ही जसे नाही तसे वागायला सुरुवात करता. पण कधी कधी त्याच गोष्टी उद्रेक होतो आणि सगळ्याच गोष्टी बिनसतात.

 बदले की आग  (Taking Revenge is not an option)

revenge

नाते जर कोणत्यातरी नाहक कारणामुळे किंवा फसवणुकीनंतर तुटले असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा राग असणे स्वाभाविक आहे. तुम्हाला त्या व्यक्तीचा बदला कसा घेऊ  आणि कसा नको असे होते. तुमच्यामध्ये ‘बदले की आग’ इतकी असते की, तुम्हाला बदला घेण्याचे नाहक मार्ग सुचतात जे तुम्हाला नको त्या संकटात टाकू शकतात.

उदा. हल्ली सगळं जग सोशल मीडियावर आहे. अनेक जण Breakup झाल्यानंतर भल्या मोठ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकतात. कधीकधी त्या इमोशनल असतात. पण कधीकधी त्या इतक्या व्यक्तिगत असतात की, सोशल मीडियावर बदनामी सत्र सुरु होते. कधी कधी सायबर क्राईम घडेल असे गुन्हे ही अनेकांकडून घडतात आणि ही एक चूक तुमचे आयुष्य कायम उद्धवस्त करु शकते. नात्यात चूक कोणाकडूनही झाली असली तरी तुमच्यासमोर तुमचे उभे आयुष्य आहे.  मिळालेले एक आयुष्य तुम्हाला आनंदात आणि चांगल्या गोष्टी करुन घालवायचे आहे.

ताकी रे ताकी जब तू फेसबुक मे झांकी (Dont ever dare to stalk)

stalking kajol

खूप जणांना ब्रेकअपनंतर आपल्या जुन्या जोडीदाराची इतकी आठवण येते की, ब्लॉक करुनही ते फेक फेसबुक अकाऊंटवरुन एकमेकांच्या आयुष्यात काय सुरु आहे ते झाकून पाहण्याचा प्रयत्न करतात. ही देखील Breakup नंतरची मोठी चूक आहे. जी तुम्ही टाळायला हवी. एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यात नको म्हणूनच ती तुम्हाला दूर करत असते. तिच्या जवळ जाऊन तुम्ही तुमचा अनादर करुन घेण्याची काहीच गरज नाही.

उदा. साधारण 6 महिन्यांपूर्वी तुमचा ब्रेकअप झाला. पण तुम्हाला अचानक स्वत:ची चूक कळली आणि तुम्ही तुमच्या Ex ला मेसेज केला.त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तर तुम्ही खरचं चुकताय. तुम्हाला जसा त्रास झाला आहे. समोरच्या व्यक्तीलाही तितकाच त्रास होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमच्या भूतकाळात झाकून पाहण्याचा प्रयत्न करु नका. एकदा नाते संपल्यानंतर तुम्ही मित्र किंवा मैत्रीण बनून त्या नात्यात राहण्याचा कधीच प्रयत्न करु नका. कारण त्याचा परिणाम तुमच्या भविष्यातील नात्यावर होऊ शकतो.

 हसना है कभी रोना है किस्मत का यही फसाना है (Cry and laugh is part of life)

ezgif.com-resize %283%29

जीवनात आनंद आणि दु:ख नेहमीच येत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? जर तुमच्या आयुष्यात दु:ख आधी आले तर नंतर आलेल्या आनंदाची किंमत ही अधिक असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आधी दु:ख आले तरी त्याचे वाईट वाटू देऊ नका. उलट याचे समाधान माना की, तुमच्या आयुष्यात पुढे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. जाल त्या ठिकाणी गळा काढून रडण्यापेक्षा मस्त हसत राहा. तुम्ही जितके आनंदी राहाल तितका तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला जुन्या गोष्टी आयुष्यात कितीही आठवल्या तरी त्याकडे धडा म्हणून पाहिलात तर त्याचा आनंद तुम्हाला अधिक मिळेल

उदा. आयुष्यात दु:ख आणि आनंद कायम टिकून राहत नाही असे म्हणतात. दु:खातही आनंदाचे काही लहान लहान क्षण तुम्हाला अनुभवण्याची सवय लावायला हवी. नाते तुटल्यानंतर रडत बसण्यापेक्षा जो घालवला तो काळ चांगला होता.त्यांच्या चांगल्या आठवणीतून बाहेर पडा आणि तुम्ही स्वत:चे महत्व ओळखून चांगले आयुष्य जगा.

डेटवर गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड नेहमी करतात या 10 चुका

 लक्षात ठेवा या गोष्टी

Breakup होणे याचा अर्थ तुम्ही खराब असणे असे होत नाही. तुम्ही तुमच्या मनातून हा न्यूनगंड कायम काढून टाका.

नात्याचा खरा अर्थ ज्यांना कळत नाही त्यांच्यासोबत नात्यात राहण्यापेक्षा तुम्ही ब्रेकअप केलेलेच बरे असते.

Breakup तुम्हाला नवे आयुष्य देत असते. तुम्हाला नवा धडा त्यातून मिळत असतो.

हा पण हे या नात्यामध्ये खऱ्या खुऱ्या प्रेमाची नाती येतात. हल्लीची 2 ते 4 महिन्यात तुटणारी नाती यात येत नाही.

तुमच्याही नात्यात होत आहेत गैरसमज? मग तुम्ही हे वाचा

 (सौजन्य-shutterstock, GIPHY)

 

31 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this