सुंदर टाचा हव्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी 'हा' उपाय जरूर करा

सुंदर टाचा हव्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी 'हा' उपाय जरूर करा

पायाच्या टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकींना जाणवते. मात्र त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्षच केलं जातं. हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही तुम्हाला टाचांना भेगा पडण्याचा त्रास होऊ शकतो. जर वेळीच पायांची काळजी घेतली नाही तर पायाच्या भेगा वाढून त्यातून रक्त येतं, कधी कधी तर चालणंही कठीण होऊ लागतं. टाचांच्या भेगांमध्ये धुळ आणि माती गेल्यामुळे त्यात इनफेक्शन होऊन दुखणं अधिकच वाढतं. यासाठी या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. नियमित तुमच्या पायांच्या टाचांची काळजी घेतल्यास त्रास कमी होतो आणि टाचा फुटत नाहीत . जर तुम्हाला क्रॅक हिल्सचा त्रास असेल तर काही उपाययोजना आधीच करणं फायदेशीर ठरतं. यासाठी दररोज रात्री झोपताना काही स्किन केअर रूटीन फॉलो करा. या बेडटाईम रूटीनमुळे तुमच्या टाचा सुंदर आणि मुलायम दिसतील. सुंदर टाचांमुळे कोणतेही फूटवेअर तुम्हाला सुंदर दिसतात. निरनिराळ्या प्रकारचे फुटवेअर ट्राय करायचे असतील तर पायांच्या टाचांची काळजी अवश्य घ्या. शिवाय पाय सुंदर असण्यासोबत निरोगी असतील असतील तर तुम्हाला चालतानाही जास्त त्रास होत नाही. 


रात्री झोपण्यापूर्वी पायांना मॉश्चराईझर लावा


Lavender oil


चेहऱ्याप्रमाणेच नियमित हात आणि पायांची काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीराला मॉश्चराईझर लावण्यास विसरू नका. पायांच्या टाचांनादेखील मॉश्चराईझर लावा आणि त्यावर मोजे घाला. रात्री मॉश्चराईझर लावल्यामुळे कमीत कमी  सात ते आठ तास तुमच्या त्वचेवर ते व्यवस्थित मुरतं शिवाय रात्री त्वचेवर धुळदेखील बसत नाही. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल.


बद्दल वाचा - पायाचे दुखणे


टाचांसाठी होममेड मॉश्चराईझर 


घरातच मॉश्चराईझर तयार करण्यासाठी तिळाचे तेल आणि लवेंडर ऑईल एकत्र करून ते त्वचेवर लावा. एका बाऊलमध्ये अर्धा कप तिळाचं तेल आणि सहा थेंब लवेंडर तेल घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे मिश्रण पायांच्या भेगांवर लावल्यास पायांच्या भेगा लवकर भरून निघतात. लक्षात ठेवा प्रत्येकवेळी हे तेल वापरण्यापूर्वी बाटली शेक करा ज्यामुळे या मिश्रणाचे एक थिक सोल्यूशन तयार होईल. हे मिश्रण नियमित पायांना लावल्यामुळे तळव्यांना होणारा दाह कमी होतो आणि तुम्हाला रात्री गाढ झोपदेखील लागते.


तिळाच्या तेलाचे त्वचेवर होणारे फायदे


तिळाचे तेल जखम बरी करण्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय यामध्ये अॅन्टी इन्फ्लेंम्टरी आणि अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे हे तेल त्वचेच्या मुळापर्यंत जाऊन पोषण करतं. तिळाच्या तेलामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. तिळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे त्वचेतील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात.


लवेंडर ऑईलचे त्वचेवर होणारे फायदे


लवेंडर तेलातदेखील अॅंटी  इन्फ्लेंम्टरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होतो. शिवाय या तेलामुळे त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे शांत आणि निवांत झोप लागते.


नियमित पायांना या तेलाने मालिश केल्यामुळे तुमच्या पायांच्या टाचा सुंदर आणि मऊ होतील. आम्ही सांगितलेला हा उपाय जरूर करा आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट करून कळवा.


पायांच्या भेगांपासून होतोय त्रास तर, घरच्या घरी करा 'हे' उपाय (How To Heal Cracked Heels In Marathi)


मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)


वेदनादायी शू बाईटवर '15' घरगुती उपाय आणि इतर टीप्स (How To Prevent Shoe Bite In Marathi)


ALso Read Remedies To Prevent Shoe Bites In Marathi


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक