कोथिंबीर (Coriander) कोणाला माहीत नाही असं शक्यच नाही. भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. पण कोथिंबीरची स्वतःची अशी एक वेगळी चव असते जी, पदार्थाला एक स्वाद आणते. पण कोथिंबीरमध्ये अनेक औषधीय गुण असतात याची माहिती तुम्हाला आहे का? आपल्याला फक्त जेवणापुरतंच कोथिंबीर माहीत असते. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या आरोग्यालासाठीदेखील कोथिंबीर तितकीच गुणकारी आहे. जाणून घेऊया काय खास वैशिष्ट्य आहेत कोथिंबीरची आणि कशाप्रकारे इतर बाबतीतही कोथिंबीरचा उपयोग होऊ शकतो.
त्वचेसाठी कोथिंबीरची पानं असतात लाभदायक
कोथिंबीरची पानं केसांसाठी कशी आहेत फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर कशी आहे उपयोगी
हिरवी कोथिंबीरची पानं आणि धने अर्थात याचे दाणे दोन्ही जेवणामध्ये स्वाद वाढवातात. जेवणामध्ये भलेही मिरची अथवा मसाला नसो पण तुम्ही कोथिंबीर आणि धन्याचा वापर केल्यास, तुमच्या जेवणाला उत्तम चव येते. पण तुम्हाला हे माहीत आहे का? या कोथिंबीरमध्ये अनेक गुण लपले आहेत. यामध्ये प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, फायबर आणि बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, आयर्न, थियामीन, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीनदेखील असतं. आम्ही तुम्हाला या लेखात कोथिंबीरचे फायदे, उपाय आणि नुकसान या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. सर्वात पहिले जाणून घेऊन कोथिंबीर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कशी उपयुक्त आहे हे पाहूया
त्वचेसंबंधित असणाऱ्या काही समस्या ज्याप्रमाणे पिंपल्स, कोरडी त्वचा, टॅनिंग यासाठी कोथिंबीरचा खूपच चांगला फायदा होतो (kothimbir benefits in marathi). वास्तविक कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण असतात जे तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. यामध्ये विटामिन सी असून तुमच्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते आणि एजिंगची लक्षणं दिसत असल्यास, यावर रोख लावण्यासही कोथिंबीरीची मदत होते. याशिवाय फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांवरही कोथिंंबीर हा चांगला उपाय आहे. कोथिंबीरच्या पानांमध्ये चिमूटभर हळद घालून याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल आणि चेहऱ्यावरली ब्लॅकहेड्सदेखील निघून जातील.
कोथिंबीरमध्ये खरंच अनेक औषधीय गुण आहेत. त्वचेबरोबरच तुमच्या केसांसाठीही कोथिंबीर उपयुक्त आहे. तुम्हाला अतिप्रमाणात केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल अथवा नैसर्गिकरित्या तुमचे केस तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचे असतील तर कोथिंबीरचा रस यासाठी उपयुक्त आहे. कारण यामध्ये केसांना आवश्यक असणारे विटामिन्स आणि प्रोटीन्स असतात. जे केसांची वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हिरव्या कोथिंबीरचा रस काढून तो केसांमध्ये लावा आणि मग 30 मिनिट्स झाल्यावर केस धुवा. यामुळे तुमच्या केसांची गळती थांबेल. तसंच तुमचे केस जर कुरळे असतील आणि तुम्हाला ते स्ट्रेट करायचे असतील तर कोथिंबीरची पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा आणि साधारण 2 तास केस तसेच ठेवा आणि मग नेहमीप्रमाणे शँपूने केस धुवा. असं केल्यामुळे तुमचे केस आपोआप स्ट्रेट होतील. पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करण्याची त्यासाठी गरज भासणार नाही.
कोथिंबीर ही प्रत्येक घरामध्ये वापरली जाते. पण खाण्याशिवाय अन्य बाबतीतही कोथिंबीरचा फायदा होतो. कोथिंबीर आयुर्वेदिक औषध आहे. बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त उपचार आहे. आरोग्यासाठी नक्की काय फायदे होतात कोथिंबीरचे हे जाणून घेऊया -
कोथिंबीरची पानं हे विशेषतः पचनतंत्रासाठी फायदेशीर आहेत. हे यकृत नीट राखण्यासाठी मदत करतात. तसंच कोथिंबीरच्या पानांमुळे पोटाची समस्या दूर होऊन पचनशक्ती वाढते. पोटदुखी, सूज, गॅस, बद्धकोष्ठसारख्या पोटांच्या समस्यांवर कोथिंबीर हा चांगला पर्याय आहे. हेच कारण आहे की, भारतीय पदार्थांमध्ये कोथिंबीर केवळ आताच नाही तर अनादी काळापासून गार्निशिंगसाठी वापरली जात आहे. कोथिंबीरची ताजी पानं ताकामध्ये मिसळून खाल्ल्यास, पोटदुखी, कोलायटिस आणि पचन यासारख्या समस्यांपासून सुटका होते.
हायपोथायराईडिज्म अर्थात थायरॉईड सारखी समस्या कोणालाही कधीही उद्भवू शकते. पण हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यावर नियंत्रण ठेवायचं असल्यास, तुम्ही रोज कोथिंबीर खायला हवी. कोथिंबीर तुमच्या शरीरातील असंतुलित हार्मोन संतुलिन करण्यास मदत करतात. त्यामुळे कोथिंबीर तुम्हाला थायरॉईड होऊ नये असं वाटत असल्यास, रोज खा.
मधुमेहग्रस्त रोग्यांसाठी कोथिंबीर खूपच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी कोथिंबीरचा चांगला उपयोग होतो. शरीरामधील मेटाबॉलिजमदेखील योग्य तऱ्हेने होतं. कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी अतिशय जलद गतीने कमी करते.
उपाय - कोथिंबीरची पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून प्या. तुम्हाला हवं तर तुम्ही धणेदेखील तुमच्या रोजच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये वापरू शकता. याचा खूप फायदा मिळतो.
वय वाढल्याप्रमाणे लोकांना बऱ्याचदा शरीरामध्ये काठी आणि सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. कोथिंबीरच्या पानांमध्ये अँटीइन्फ्लेमेट्री गुण आढळतात, ज्यामुळे गाठी अर्थात आर्थरायटिससारख्या आजारांचा कमी परिणाम होतो. कोथिंबीरची पानं वाटून त्याचा लेप करून घ्या आणि धण्याचं तेल ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून रोज दोन वेळा तुमच्या सांध्यांवर मालिश करा. त्याने आराम मिळेल.
ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये पोटामध्ये प्रचंड दुखतं आणि अत्याधिक रक्तस्राव होतो, त्यांना कोथिंबीरचं सेवन करायला हवं. यामुळे ब्लीडिंगवर नियंत्रण येतं आणि त्याचबरोबर शरीराचा ऊर्जा स्तरही सुधारण्यास मदत होते. मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होत असेल तर अर्धा लीटर पाण्यामध्ये कोथिंबीरची पानं आणि त्यामध्ये थोडी साखर घाला आणि उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड झाल्यावर प्या. याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. कोथिंबीर हा मासिक पाळीचा त्रास होत असल्यास खूपच चांगला उपाय आहे. यामुळे तुमच्या मासिक पाळीसंबंधी समस्या दूर होतील.
किडनी अर्थात यकृताच्या आजारावर कोथिंबीर हा खूपच फायदेशीर पदार्थ आहे. एका संशोधनात सिद्ध झाल्याप्रमाणे जे लोक नियमित कोथिंबीर खातात, त्यांना यकृत बिघडण्याची समस्या होत नाही. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरही नेहमी कोथिंंबीर खाण्याचा सल्ला देतात.
तुम्हाला प्रचंड प्रमाणात कफाचा त्रास होत असेल तर तुम्ही कोथिंबीरचा उपयोग करा. कोथिंबीरला कफनाशक म्हटलं जातं. तसचं तुम्हाला बऱ्याच कालावधीपासून ब्रोंकायटिस अथवा दम्यासारखे आजार असतील तर त्यावरही कोथिंबीर हा चांगला आणि योग्य उपाय आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी दोन चमचे ताज्या कोथिंबीरचा रस प्यायल्यास तुमची ही समस्या लगेच दूर होईल. तुम्हाला कफाने होणारा त्रास नक्कीच बंद होईल. कोशिंबीरीप्रमाणेच कफ झाल्यास ओव्याचाही वापर तुम्ही करू शकता. यासाठीच जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे.
कोथिंबीरमध्ये असलेले विटामिन ए हे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. त्यासाठी नियमित स्वरूपात हिरव्या कोथिंबीरची पानं तुम्ही खायला हवीत. जेणेकरून तुमच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही तऱ्हेची समस्या येणार नाही. इतकंच नाही तर, कोथिंबीरमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुण हे डोळ्यांना येणारी खाज, सूज आणि अन्य नेत्रविकारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे डोळ्यांशी निगडीत कोणतीही समस्या असल्यास, कोथिंबीर खाल्ल्याचा लाभ होतो.
तुम्हाला सतत तुमच्या शरीरामध्ये थकवा जाणवत असेल अथवा सतत कामामुळे तुम्हाला चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर, तुम्ही दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये 10 ग्रॅम खडीसाखर आणि अर्धा वाटी पाणी घालून सकाळ - संध्याकाळ प्या. यामुळे तुम्हाला खूपच फायदा होईल. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा येऊन थकवा दूर करण्यास मदत होते.
चामखीळ (wart) म्हणजे शरीरावर काही ठिकाणी तीळापेक्षाही मोठा असा मस्सा उगवतो. पण काहीवेळा आपल्यासाठी त्रासदायक ठरतो. अशावेळी मस्सा काढून टाकता येतो की नाही याची सगळ्यांना माहिती नसते. पण तुमच्या शरीरावरील असे चामखीळ काढून टाकण्यासाठी तुम्ही नैसर्गिकरित्या प्रयत्न करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोथिंबीरची मदत होते.
उपाय - कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याची एक जाडीभरडी पेस्ट बनवा आणि रोज ही पेस्ट तुमच्या चामखीळावर लावा. संपूर्ण 1 महिना तुम्ही हा प्रयोग केल्यास, तुम्हाला चामखीळ दिसणार नाही.
कोथिंबीर हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो मेटाबॉलिजम वाढण्यासाठी आणि चरबी जाळण्याचं काम करत असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोथिंबीरच्या पानांमध्ये अथवा धण्यांनी बनलेल्या काढ्यामध्ये रक्तातील लिपीड स्तर कमी करण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. गरम पाण्यात कोथिंबीर उकळून त्याचा चहा बनवून प्या. आठवड्यातून असं कमीत कमी 4 ते 5 वेळा करा. काही दिवस असं केल्यास, तुम्हाला तुमचं वजन कमी होताना जाणवेल. तुम्ही वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयोग केले असतील तर हे सगळे प्रयोग सोडून हा एकच प्रयोग करा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि अगदी सोप्या पद्धतीने तुमचं वजनही कमी होईल. याशिवाय आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक रेसिपीदेखील देत आहोत, ज्यामुळे तुम्ही आपलं वजन लवकरात लवकर कमी करू शकाल.
सर्वात पहिले एका भांड्यात अथवा जारमध्ये एक लिंबाचा रस काढा. आता त्यामध्ये वाटलेली 60 ग्रॅम कोथिंबीर घाला आणि त्यामध्ये पाणी मिसळा. हे आता योग्य तऱ्हेने मिक्स करून घ्या. हा तयार झालेला ज्युस रिकाम्या पोटी रोज प्यायल्यास, तुमचं 5 किलोपर्यंत वजन कमी होऊ शकेल.
कोथिंबीर ही थंड असते त्यामुळे याचं जास्त नुकसान नाही. पोटाच्या समस्येसाठी कोथिंबीर चांगली असते पण याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास, तुम्हाला अलर्जी होण्याचा धोका असतो. त्यामुळे याचा परिणाम तुम्हाला त्वचेवर इन्फेक्शन झाल्याच्या स्वरूपात दिसू शकतो. तसंच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गरोदर महिलांनी कोथिंबीर जास्त प्रमाणात खाऊ नये. पण जुन्या पिढीतील लोकांच्या सांगण्याप्रमाणे कोथिंबीर खाल्ल्याने आईच्या स्तनांतील दूधामध्ये वाढ होते. तसंच तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे कोथिंबीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या त्वचेवर सनबर्न होण्याचीही शक्यता निर्माण होते. हे जास्त काळापर्यंत राहिल्यास, त्वचेचा कॅन्सर उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा फायदा होईल इतकाच त्या पदार्थांचा उपयोग करावा. अतिसेवन करणं टाळावं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही.
कोथिंबीर हे थंड असते. पण भाजीला अथवा कोणत्याही पदार्थाला स्वाद येईल त्याच प्रमाणात कोथिंबीर तुम्ही खाद्यपदार्थांमध्ये घाला. कारण अतिप्रमाण हे कोणत्याही गोष्टीत चांगलं नाही. त्याने स्वाद बिघण्याची शक्यता निर्माण होते.
कोथिंबीर ही औषधी वनस्पती आहे. त्यामुळे कच्ची आणि शिजवून दोन्ही प्रकारात खाल्ल्लास याचा शरीराला फायदाच होतो. फक्त त्याचं योग्य प्रमाण ठरवून घ्यावं.
कोथिंबीरमध्ये विटामिन ए असतं. त्यामुळे तुम्हाला चष्म्याचा जास्त नंबर असेल तर तुम्ही कोथिंबीर खावी. यामुळे तुमचा नंबर कमी होतो. कमी नंबर असल्यास, तुम्हाला चष्मा पूर्णपणे घालवण्यासाठीही फायदेशीर ठरतं.