ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

साडी हा पेहराव अनेक महिलेसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. साडी नेसताना तुम्ही त्यात कोणत्या प्रकारचा साडी पेटीकोट घातला आहे यावरून तुमचा लूक ठरत असतो. साडी नेसल्यावर स्त्रीचं सौंदर्य नेहमीपेक्षा अधिक खुलून येतं. मात्र जर तुम्ही चुकीच्या प्रकारचा साडी पेटीकोट निवडला तर तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो. यासाठी साडी पेटीकोट बाबत सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या. साडी पेटीकोट म्हणजे एक प्रकारचा लांब स्कर्ट ज्यावर साडी नेसली जाते. काहीजणी या प्रकाराला परकर असेही म्हणतात. साडी खोचण्यासाठी अथवा ड्रेप करण्यासाठी साडी पेटीकोट गरजेचा असतो. शिवाय पेटीकोटमुळे तुमच्या कंबरेखालील बॉडी शेप चांगला दिसतो. आजकाल साडी पेटीकोट विविध प्रकार आणि रंग आणि निरनिराळ्या कापडात तयार केले जातात. तुमची आवड आणि सोय यानुसार तुम्ही साडी पेटीकोटची निवड करू शकता. मॅचिंग सेंटरमध्ये जवळजवळ सर्वच रंग आणि त्यातील शेडमधील पेटीकोट उपलब्ध असतात. साडीतील लुक खुलून दिसायला हवा असेल तर साडी पेटीकोट विषयी ही माहिती अवश्य वाचा.

everything about petticoat

साडी पेटीकोट निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी –

ते आरामदायक असावे –

साडी पेटीकोट हा नेहमी  आरामदायक असावा. यासाठी पेटीकोट तुमच्या पोटावर फार घट्ट अथवा फार सैल नसेल याची काळजी घ्यावी. एखाद्या खास प्रसंगासाठी जेव्हा तुम्ही फिश कट पेटीकोट वापरता तेव्हा त्यामुळे तुम्हाला साधारण हालचाल करणं सोपं जाईल याची काळजी घ्या.

पेटीकोटची फिटींग आणि लांबी-

साडी पेटीकोटची फिटींग आणि लांबी तुमच्या मापाची असावी. कारण प्रत्येकीची उंची आणि शरीराचा आकार निरनिराळा असतो. त्यामुळे तुम्ही निवडलेला प्रकार हा तुमच्या बॉडी शेपला सूट करेल असा असावा. शिवाय पेटीकोट तुमच्या उंचीनुसार योग्य लांबीचा असेल तर साडीतला तुमचा लुक चांगला दिसतो. त्यामुळे साडी पेटीकोट तुमच्या मापाचे असतील याची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

पेटीकोटचे कापड योग्य असावे –

विविध प्रकारच्या कापडांमधील साडी पेटीकोट बाजारात उपलब्ध असतात. कॉटन, टेरीकोट, होजिअरी, सॅटीन यापैकी तुमच्या सोयीनुसार कापडाची निवड तुम्ही करू शकता. पूर्वी सर्वच पेटीकोट हे सुती कापडापासून तयार केले जायचे. मात्र आता विविध कापडांमधील पेटीकोटमुळे तुम्हाला योग्य पेटीकोट निवडण्यासाठी खूप व्हरायटी मिळू शकते.

साडीनुसार निवडा पेटीकोट स्टाईल –

साडी पेटीकोट विविध कापडांप्रमाणेच विविध आणि हटके स्टाईलमध्ये उपलब्ध असतात. ए-लाईन, मर्मेड, कळी डिझाईन पेटीकोट, फ्लेअर्स डिझाईन पेटीकोट अशा विविध प्रकारात पेटीकोट मिळतात. तुम्ही कोणत्या प्रकारची साडी नेसणार आहात यावर कोणता पेटीकोट निवडायचा हे ठरवा. कारण कळी अथवा प्लेअर्सचे पेटीकोट मुळे तुमच्या सिल्क साडीला लेंहगा लुक मिळू शकतो. तर एखादी नेट अथवा पातळ कापडाची साडी मर्मेड पेटीकोटमुळे खुलून दिसते.

पेटीकोटचा रंग असावा परफेक्ट  –

साडी पेटीकोटचा रंग तुमच्या साडीला अगदी मॅचिंग असायला हवा. कारण पातळ साड्यांमधून पेटीकोटचा रंग दिसतो. रंगामध्ये थोडासा जरी फरक असेल तर पातळ कापडातील साडीचा लुक बिघडू शकतो. शिवाय इतर साड्यांमधून चालताना कधी कधी पेटीकोटचा खालचा भाग दिसतो. जर विसंगत रंगाचा साडी पेटीकोट घातल्यास ते फारच विचित्र दिसू शकते. यासाठी तुमच्या साडीसाठी परफेक्ट रंगाचा पेटीकोट निवडा.

साडी पेटीकोटचे प्रकार-

ए-लाईन पेटीकोट –

everything about petticoat 4

ADVERTISEMENT

साधारणपणे सर्वच साड्यांमध्ये या प्रकारचा पेटीकोट वापरता येतो. साध्या पद्धतीने कोणतीही साडी नेसताना ए – लाईन शेपचा हा पेटीकोट योग्य ठरतो. कारण हा पेटीकोट पायघोळ आणि मोकळा असल्यामुळे हवा खेळती राहते. सहाजिकच त्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटतं. साडी नेसून वावरताना पाय आणि पेटीकोटमध्ये व्यवस्थित जागा असल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. मात्र असं असलं तरी हा पेटीकोट तुम्हाला नेट, जॉर्जेट आणि सिफॉन मटेरिअलच्या टाईट ड्रेपिंग साडीप्रकारात नेसता येत नाही.

कळीचा पेटीकोट –

या प्रकारच्या साडी पेटीकोटला कळ्यांप्रमाणे कापड जोडलेले असते. त्यामुळे या पेटीकोटचा घेर वाढतो. घेरदार पेटीकोटमुळे चालताना मोकळेपणा येतो. शिवाय अशा प्रकारच्या साड्यांमुळे साडीला एखाद्या घागऱ्याप्रमाणे लुक देता येतो.

मर्मेड पेटीकोट –

पातळ पोताच्या अथवा नेटच्या साड्यांमध्ये मर्मेड पेटीकोट परिधान केला जातो. कारण हे पेटीकोट बॉडी हगिंग असल्यामुळे साडीमधून शरीर सुडौल दिसते. शिवाय यामध्ये गुडघ्यांपर्यंत घट्ट फिटींग आणि गु़डघ्यांच्या खाली फ्लेअर्सचा शेप असतो.  कंबरेच्या खालील भाग आकर्षक दिसण्यासाठी पातळ साड्यांमध्ये मर्मेड पेटीकोट वापरले जातात.

आमची शिफारस गुलाबी रंगाचा मर्मेड साडी पेटीकोट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. 894 रू. हा साडी पेटीकोट तुम्ही खरेदी करू शकता. 

ADVERTISEMENT

ए-लाईन लेअर पेटीकोट –

अशा प्रकारच्या पेटीकोटला लेअर्स अथवा वरून नेट जोडलेले असते. हे पेटीकोट लग्नसमारंभात वापरले जातात. कारण या पेटीकोटमुळे कांजीवरम सारख्या पारंपरिक साड्यांना एक हटके लुक देता येतो. साडी एखाद्या लेंहग्याप्रमाणे दिसण्यासाठी या पेटीकोटच्या खालील भागाला लेअर्स लावलेले असतात. ज्यामुळे साडी एखाद्या घागऱ्याप्रमाणे आणि सुटसुटीत दिसते.

पेटीकोटचे कापड कसे असावे

everything about petticoat  2

कॉटन – सुती कापडात साडी पेटीकोट बाजारात सहज उपलब्ध असतात. सुती कापडामुळे कंबरेखालील भागात हवा खेळती राहते. साडी कंबरेभोवती गुंडाळलेली असल्यामुळे खूप गरम होत असतं. मात्र साडीत सुती पेटीकोट घातला तर त्यामुळे गरम कमी होतं.

आमची शिफारस कॉटनचे रेडीमेड परकर विकत घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. कमीत कमी अडीचशे रूपयांपासून साडी पेटीकोट तुम्हाला विकत मिळू शकतात.

ADVERTISEMENT

टेरीकॉट – टेरीकॉट कापडामध्ये कॉटन काही प्रमाणात मिक्स केलेलं असतं. हे कापड हलकं असल्यामुळे जर तुमची साडी भरजरी अथवा जड असेल तर तुम्ही टेरीकोट कापडातील पेटीकोट वापरू शकता. शिवाय हे कापड कॉटनपेक्षा स्वस्त असतं. पावसाळ्यात ते लवकर वाळतं. त्यामुळे पावसाळ्यात नियमित साडी नेसणाऱ्या महिला टेरीकोट मटेरिअलचे साडी पेटीकोट घालतात.

होजिअरी – होजिअरी कापड अंगाला चिकटून बसतं. ज्यामुळे तुमच्या पेटीकोटची फिटींग व्यवस्थित बसते. चांगल्या फिटींगच्या पेटीकोटमुळे साडी चापून चोपून नेसता येते. ज्यामुळे तुम्ही नक्कीच आकर्षक दिसता.

सॅटिन – सॅटीनचे मटेरीअल हलके, सुळसुळीत आणि चमकदार असते. नेटच्या साड्यांमध्ये अशा  प्रकारच्या मटेरिअलचा पेटीकोट घालत्यामुळे साडीचा रंग खुलून दिसतो. पेटीकोटचा चमकदारपणा तुमच्या नेटच्या पारदर्शक साड्यांमधून बाहेर दिसतो. लग्नसमारंभ अथवा एखाद्या पार्टी बऱ्याचदा फोटोसेशनसाठी प्रखर प्रकाशयोजना केलेली असते. अशा वेळी साडी पारदर्शक असल्यास सॅटीनचे पेटीकोट घालत्यामुळे तुमची साडी आणखी छान दिसू शकते.

आमची शिफारस काळ्या रंगाचा सॅटीन पेटीकोट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. एस के टेक्सटाईलचा हा साडी पेटीकोट तुमच्यासाठी बत्तीस टक्के सूटने साडे तिनशे रूपयांना उपलब्ध आहे. 

ADVERTISEMENT

सिल्क- जर तुम्हाला सॅटीनच्या कापडातील सुळसुळीत पेटीकोट नको असेल तर तुम्ही एखाद्या खास साडीसाठी प्युअर सिल्कचा पेटीकोट शिवून घेऊ शकता. सिल्क महाग असल्यामुळे ते बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते तुम्हाला शिवूनच घ्यावे लागतात. शिवाय हा पेटीकोट शिवून घेणे खर्चिक देखील असू शकते.

साडी नेसताना POPxo चा व्हिडीओ जरूर पहा

साडी पेटीकोट कसे विकत घ्यावेत ?

साडी पेटीकोटमध्ये विविध रंग आणि प्रकार बाजारात उपलब्ध असतात. मात्र या दोन पद्धतीने तुम्ही पेटीकोट खरेदी करू शकता.

रेडीमेड –

रेडीमेड पेटीकोट तुम्हाला कोणत्याही मॅचिंग सेंटरमध्ये विकत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार हवा तो साडी पेटीकोटचा प्रकार निवडू शकता. रेडीमेड पेटीकोट तुम्हाला ऑनलाईनदेखील विकत घेता येतात. आजकाल अनेक ऑनलाईन शॉप्स आहेत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पेटीकोट तुम्हाला पाहता येतात.

ADVERTISEMENT

कस्टमाईज –

पेटीकोट तुम्ही तुमच्या उंची आणि बॉडी शेपनुसार साडी पेटीकोट शिवून घेऊ शकता. बऱ्याचदा लग्नसमारंभ अथवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी तुम्ही साडी पेटीकोट शिऊन घेऊ शकता.  ज्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित बसतात. तुम्ही एखाद्या ड्रेस डिझानरकडून अथवा तुमच्या टेलरकडून हवा तसा साडी पेटीकोट शिवून घेऊ शकता.

साडी कशी नेसावी याचा POPxo हा व्हिडीओ जरूर पहा. 

साडी पेटीकोट विषयी असलेले प्रश्न FAQs

पेटीकोट शिवाय साडी नेसता येते का ?

नक्कीच, वास्तविक साडी पेटीकोटमुळे साडी सुंदर दिसते. मात्र असं असलं तरी साडी पेटीकोट शिवाय तुम्ही साडी नेसू शकता. कंबरेला साडीची गाठ बांधून त्यावर साडी नेसता येते. महाराष्ट्रीयन नऊवारी साडी याचप्रकारे नेसली जाते. त्याचप्रमाणे धोती स्टाईल,  आंध्रा पुजा स्टाईल, तामिळ-तेलुगू पारंपरिक साडी, नृत्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही साडींचे प्रकार, अशा साड्यांमध्ये पेटीकोट वापरण्याची गरज नसते.

नेटच्या साडीमध्ये कोणत्या प्रकारचा साडी पेटीकोट घालावा?

नेटच्या साडीमधून तुमचा साडी पेटीकोट दिसत असतो. त्यामुळे नेटच्या साड्यांमध्ये परफेक्ट मॅचिंग रंगाचा सॅटीन मर्मेड साडी पेटीकोट घालावा. मर्मेड साडी पेटीकोटमुळे तुमच्या कंबरेखालील भाग सुडौल दिसतो.

ADVERTISEMENT

साडी शेपवेअर म्हणजे काय आणि ते खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?

साडीमध्ये शेप चांगला दिसण्यासाठी आणि बेली फॅट कमी  दिसण्यासाठी अनेकजणी साडी शेप वेअर खरेदी करतात. मात्र ते खरेदी करताना ते तुमच्या मापाचे खरेदी करा. कमी साईझचे शेपवेअर घातल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यासाठी खरेदी करताना ते ट्राय करून बघा. साडी शेपवेअर घालून बसता येत असेल तर ते तुमच्या मापाचे आहे असं समजा. शिवाय ते अगदी हलक्या कापडाचे असतील याची काळजी घ्या.

आमची शिफारस तुमच्या मापाचं सारी शेअपवेअर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. नऊशे रूपयांपासून साडी शेपवेअर या ठिकाणी उपलब्ध आहेत.

everything about petticoat  1

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

ADVERTISEMENT

साडी नेसल्यावर या ‘20’ हटके आणि ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तुमच्यावर नक्कीच शोभून दिसतील

मकर संक्रांत स्पेशल: संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

15 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT