डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव

डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव

नेहमी असं म्हटलं जातं की, डोळ्यातील भाव सर्व काही सांगून जातात, त्यासाठी तुम्हाला बऱ्याचदा शब्दांचीही गरज भासत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? हे जरी रोमँटिक वाटत असलं तरीही डोळ्यांवरून खरंच माणसांचा स्वभाव ओळखता येतो. समुद्रशास्त्राप्रमाणे डोळ्यांचा रंग आणि माणसाच्या स्वभावाचा खूपच जवळचा संबंध असतो. डोळ्यांच्या रंगावरून माणसाला व्यवस्थित ओळखता येतं. असं तर जास्तीत जास्त माणसांचे डोळे हे काळे अथवा ब्राऊन अर्थात घारे असतात. पण खरं तर डोळ्याचे 5 रंग असतात. याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या डोळ्याचा रंग आणि त्यांचा स्वभाव जुळतो का हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा.


ब्राऊन रंगाचे डोळे


light-brown


ज्या व्यक्तींचे डोळे ब्राऊन रंगाचे असतात, त्या व्यक्ती आकर्षक असतात. त्यांच्यामध्ये एक वेगळीच गोष्ट असते ज्यामुळे इतर लोक त्यांंच्याकडे आकर्षित होतात. गर्दीमध्ये आपलं अस्तित्व वेगळं असण्याची या व्यक्तींची इच्छा असते आणि या व्यक्तींचा स्वभावही तसाच असतो. इतर व्यक्ती करत असलेल्या कामापेक्षा त्याच कामातून कसा वेगळेपणा दाखवायचा हे या व्यक्तींना व्यवस्थित जमतं. साधारणतः 55 टक्के व्यक्तींच्या डोळ्यांंचा रंग हा ब्राऊन असतो. या व्यक्तींना व्यवस्थित राहणीमान खूपच आवडतं.


निळ्या रंगाचे डोळे


blue


निळ्या रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या बुद्धीजीवी असतात. दुसऱ्या व्यक्तींच्या भावनांची कदर करणं या व्यक्तींना चांगलंच जमतं. आपल्या सुंदर डोळ्यांच्या रंगामुळे या व्यक्ती इतर व्यक्तींना आपल्याकडे लगेच आकर्षित करून घेऊ शकतात. अशा व्यक्तींकडे दुसऱ्यांना संमोहित करून घेण्याची कला असते. आपण नेहमी कोणची तरी मदत करायला हवी अशा स्वभावाच्या या व्यक्ती असतात. प्रत्येक ठिकाणी अगदी कमी तिथे आम्ही असा या व्यक्तींचा स्वभाव असतो. जो नेहमीच त्यांना इतर व्यक्तींपेक्षा वेगळं ठरवतो.


हिरव्या रंगाचे डोळे


green-eyes


ज्या व्यक्तींचे डोळे हिरव्या रंगाचे असतात ते अगदी जिंदादिल स्वभावाचे असतात. अशा व्यक्ती या युनिक असतात.  त्यांचा स्वभाव इतर व्यक्तींपेक्षा नेहमीच वेगळा आणि उठून दिसतो. नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तींना आपल्या आसपास माणसं हवी असतात. दुसऱ्यांशी बरोबरी करण्यात या व्यक्ती माहीर असतात. पण तितक्यात समजूतदार असल्यामुळे कितीही बरोबरी केली तरी समोरच्या माणसाच्या भावना या व्यक्ती दुखवत नाहीत. या व्यक्तींच्या जवळ येणं अतिशय सोपं आहे, पण यांच्यापासून दूर जाणं खूपच कठीण आहे. अशा व्यक्तींशी लवकर फारकत घेता येत नाही.


काळ्या रंगाचे डोळे


black


ज्या व्यक्तींचे डोळे काळे असतात त्या व्यक्ती सिक्रेट खूपच चांगल्या तऱ्हेने लपवू शकतात. साधारणतः भारतामध्ये जास्त व्यक्तींचे डोळे हे काळे असतात. पण काळ्या डोळ्यांच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं हे अतिशय कठीण असतं. या व्यक्तींंना कोणत्याही गोष्टीचा दिखावा आवडत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या छळवणुकीपासून या व्यक्ती नेहमी दूरच राहतात. या व्यक्तींचा सिक्स्थ सेन्स खूपच चांगला असतो. कोणत्याही गोष्टीत योग्य सल्ला या व्यक्ती देऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी अशा व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा.


ग्रे रंगाचे डोळे


grey


ज्या व्यक्तींचे डोळे ग्रे अर्थात राखाडी रंगाचे असतात ते अतिशय आक्रमक स्वभावाचे असतात. इतकंच नाही तर ते अतिशय जिद्दीही असतात. जे काम ते मनाशी पक्कं करतात ते काम पूर्ण झाल्याशिवाय या व्यक्ती मागे हटत नाहीत. मात्र या व्यक्ती मनाने अतिशय साफ असतात. खोटं बोलणं या व्यक्तींना अजिबातच आवडत नाही. या व्यक्तींवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकता.


फोटो सौजन्य - Shutterstock


हेदेखील वाचा 


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


न्यूमरोलॉजी: तुमच्या जन्मदिवसाची तारीख नक्की काय दर्शवते माहीत आहे का


आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का