पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांमध्ये मानसिक ताणाच्या समस्येत पाच वर्षांत 10% वाढ

पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांमध्ये मानसिक ताणाच्या समस्येत पाच वर्षांत 10% वाढ

प्रथमच आई होणाऱ्या महिलेसाठी बाळाचा जन्म हा जीवनातील उल्हासित करणारा टप्पा असला तरी या कालावधीत ती महिला शरीराने आणि मनाने थकत असते. गरोदरावस्थेत असताना तिचे लाड झालेले असतात, त्याच्या विपरीत भूमिका आई झाल्यानंतर पार पाडावी लागते. त्यातच हॉर्मोन पातळीच्या चढ-उताराची भर पडते आणि खिन्न वाटणेसुद्धा साहजिक असते. तज्ज्ञांच्या मते थोड्याफार प्रमाणात चिंताग्रस्त होणे सर्रास आढळते आणि पहिल्यांदा आई होणाऱ्या महिला गरोदरावस्थेत असताना अत्यंत तणावाखाली असतात आणि या आकडेवारीमध्ये भरच पडत आहे. गेल्या पाच वर्षात या गोष्टीची 10 % वाढ झाल्याची आढळली आहे. यासंदर्भात POPxo मराठीने खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी याची कारणं आणि उपायही सांगितले आहेत. जाणून घेऊया काय आहेत नक्की कारणं आणि उपाय.  


stressed mother


पहिल्यांदा आई झाल्यानंतर मानसिक तणावाची कारणं


यासंदर्भात डॉ. अनु विज यांनी सांगितले की, "पहिल्यांदा माता होणाऱ्या ७-८% महिला मानसिक तणावातून जात असल्याचे गेल्या पाच वर्षांत मला दिसून आले आहे. याची कारणंही त्यांनी स्पष्ट केली.


  • पहिल्यांदाच आई होणाऱ्या ज्या महिलांचे वय जास्त आहे, ज्यांचा करिअर घडविण्याकडे कल आहे आणि ज्यांनी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह उपचार (एआरटी) घेतले आहेत त्यांच्यात मानसिक ताण आढळून येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

  • वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांनुसार गर्भधारणा करण्यासाठी एआरटीमध्ये उपचार केले जातात. यात ओव्ह्युलेशन इंडक्शन (ओआय),आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन (एआय) यासारख्या उपचारांचा समावेश आहे. अशा प्रकारचे उपचार घेतल्यानंतर त्याचे फलित काय असेल याचा त्यांना ताण येतो. अशा मानसिक ताणांमध्ये महिलांमध्ये अशक्तपणा, मळमळ, उलट्या, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसून येतात.

  • त्याचप्रमाणे अशा महिलांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होऊ शकतो, जो वाढत्या वयाचा एक भाग असतो.

  • गरोदरपणात शारीरिक आणि मानसिक बदल होतात. काही वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांना कदाचित नैराश्य येऊ शकते, त्या चिंतातूर होऊ शकतात किंवा कारणाशिवाय रडू येण्यासारखे स्वभावात उतार-चढाव होऊ शकतात. काही केवळा त्यांना अचानक अत्यानंद होऊ शकतो. त्याचप्रमाणे या मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो व नाडीचे ठोके वाढतात. त्याचा बाळाच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.


post pregnancy


मानसिक ताणावरील उपाय


या मानसिक तणावासंदर्भात अनेक उपाय आहेत, त्याचीही माहिती करून घेऊया -


  • मातांनी आनंदी आणि सकारात्मक राहावे आणि त्यांनी उत्पादनक्षम वातावरणात असावे, जेणेकरून बाळाचे मन संतुलित राहील.

  • कोपिंग मेकॅनिझम (मानसिक परिस्थिती सांभाळण्याचे मार्ग) वापरून नवमातांमधील मानसिक तणावाचे व्यवस्थापन करता येते.

  • योगासने, ध्यानधारणा, म्युझिक थेरपी यासारखी रिलॅक्सेशन तंत्रे आणि तणावास कारणीभूत ठरणारे घटक ओळखल्याने मानसिक तणावाचे व्यवस्थापन करता येऊ शकते.

  • त्याचप्रमाणे ज्या महिलांना अशा प्रकारचा मानसिक तणाव असतो, त्यांनी आपल्या पतीशी आणि कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. वेळेवर अशा प्रकारचा संवाद साधल्याने मानसिक तणाव हाताळण्यास मदत होते.

  • परिस्थिती गंभीर झाली असेल तर त्या महिलेला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची शिफारस करण्यात येते. ते समुपदेशन करतील आणि औषधे देतील.

  • नवमातांनी आपल्या भावना साचू देऊ नका, कारण त्याने तुमच्या परिस्थितीचे निदान करणे कठीण जाईल. म्हणून तुमच्या ताणाबद्दल आणि लक्षणांबद्दल तुमच्या डॉक्टरशी बोला. असे केल्याने तुमचे आयुष्य पूर्ववत होऊ शकेल


फोटो सौजन्य - Shutterstock 


हेदेखील वाचा - 


आई व्हायचंय...तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून


गर्भनिरोधक गोळ्या वापरणं सुरक्षित की असुरक्षित, जाणून घ्या


‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा