एकदा तरी करून पाहायलाच हवेत हे 10 *फोरप्ले मूव्हस*

एकदा तरी करून पाहायलाच हवेत हे 10 *फोरप्ले मूव्हस*

असं म्हणतात प्रत्येक कामाची सुरूवात चांगली झाली की, त्याचा शेवटही गोड होतो. तसंच काहीसं फोरप्ले आणि सेक्सबाबत आहे. फोरप्ले ही सुरूवात आहे आणि सेक्स हा त्याचा गोड शेवट. त्यामुळे गोड शेवटासाठी सुरूवातही तितकीच छान होणं गरजेचं आहे.


फोरप्ले हा सेक्समधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि स्त्री व पुरूष दोघंही हा भाग अगदी मनसोक्त एन्जॉय करू शकतात. जर तुमच्या फोरप्लेची सुरूवात धडाकेदार झाली की तुमचा सेक्सचा आनंद निश्चितच द्विगुणीत होतो. असं म्हणतात की, फोरप्ले हा फक्त स्त्रियांकडूनच एन्जॉय केला जातो. पण ते काही खरं नाही. खरंतर फोरप्लेची नॉटी सेशन्स पुरूषाला सेक्सच्या मेन कोर्स करता रेडी करतात. जर तुम्हाला तुमच्या सेक्सच्या रूटीनला स्पाईस अप करायचं असेल तर तुम्ही आपल्या जोडीदारासोबत हे 10 फोरप्ले मूव्हस नक्कीच ट्राय करायला हवेत.


1. त्याला द्या संपूर्ण शरीराचा ताबा


बरेचदा आपण त्याच्या समोर आपलं संपूर्ण शरीर एक्सपोज करायला थोडं टाळतोच आणि अनेकींना यामध्ये अवघडलेपणा वाटत असतो. पण पुरूष हा व्हिज्युअली सगळं अनुभवण्यासाठी आसूसलेला असतो. त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट पाहिल्यावर जितकं आकर्षण वाटतं तितकं ते झाकलेलं किंवा ते समोर आलं नाहीतर, तेवढं आकर्षण वाटत नाही. त्यामुळे पुढच्या फोरप्लेमध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा ताबा बिनदिक्कत त्याला द्या.  काळजी नाही... फ्री फिल करा. फोरप्लेचा आनंद घ्या.


2. तुमच्या हातांची जादू 


giphy2


तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमचे हात त्यांची जादू सेक्सदरम्यान दाखवतात. त्याचा सेक्ससाठी नसलेला मूड कसा बनवायचा याची जादू तुमच्या हातात आहे. त्याच्या केसात हात फिरवा. त्याच्या मानेला तुमच्या कोमल हातांनी विळखा घाला आणि असं बरंच काही तुम्ही सेक्सच्या सुरूवातीला फोरप्लेमध्ये करू शकता. सर्वात महत्त्वाचा हातांचा वापर तुम्हाला माहीत असेल जो तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. तुमच्या हाताच्या प्रत्येक स्पर्शासोबत त्याचा आनंद द्विगुणीत होईल आणि एकदा त्याचा मूड ऑन झाला की, मग त्याची परतफेड तो दुप्पट प्रेमाने करेलच.   


3. तुमच्या फॅन्टसीजना पुन्हा जगा


प्रत्येक व्यक्तीची सेक्शुअल फँटसीही असतेच आणि त्या पुन्हा पुन्हा अनुभवायला ही आवडत असतं. जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये असाल तेव्हा त्याच्याशी याबाबत बोला. त्याच्या फँटसीज जाणून घ्या. पुन्हा त्या फँटसीज एकमेंकासोबत अनुभवा. यामुळे तुमचं सेक्स लाईफ नक्कीच चांगलं होईल. अशी आम्हाला खात्री आहे.  


4. मिठीचा घट्ट विळखा


giphy3


पुरुषांना सर्वात जास्त हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडेच सतत लक्ष देणं. तो तुमच्यासाठी किती स्पेशल आहे याची त्याला जाणीव करून द्या. त्याला घट्ट मिठीत घ्या किंवा त्याला अनपेक्षित असताना जवळ ओढून घ्या. त्याने तुम्हाला अनेकदा घरातल्याचं लक्ष नसताना कमरेत हात घालून जवळ ओढलं असेल. आज तुम्ही तसं करा. त्यालाही तुमच्या या अनपेक्षित मिठीने आनंदी होऊ द्या. कारण सरप्राईज हे प्रत्येकालाच प्रिय असतात.


5. ते विशेष पॉईंट्स विसरू नका


तुमच्या जोडीदाराला सीड्यूस करताना त्याच्या त्या विशेष पॉईंट्सवर प्रेमाचा वर्षाव करायला मात्र विसरू नका. उदा. मान आणि कान. त्याच्या कानाजवळ केलेल्या स्पर्शाने तो नक्कीच रोमांचित होईल. कधीतरी थोडं सेक्सी आणि डर्टी टॉक तुम्हीही करून पाहा. फोरप्ले नंतरच्या सेक्ससाठी तुम्ही किती आतुर आहात हे त्याला सांगा. प्रेम दिलं तर मोबदल्यात प्रेमच मिळेल.


6. थोडीशी मजा-मस्ती


आता त्याला तुम्ही पुढच्या गोष्टींची हींट तर दिलीच आहे. पण म्हणून लगेच अॅक्शन सूरूच व्हायला हवी असं नाही. थोडं त्याच्या मनाने केलंत आता थोडावेळ ताणूनही धरा. थोडं त्याला चिडवा. मग त्याचीही उत्सुकता ताणली जाईलच. एखादी गोष्ट लगेच मिळाली तर त्याची मजा येत नाही. जितकी मजा एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहायल्यावर मिळते.


7. डान्सची कमाल


giphy 4


आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूँ... दिल झूम जाये ऐसे बहारों में ले चलूँ. अशा ओळी ऐकताच त्याचा मूड बनला नाहीतर नवलच. रूटीन सेक्सला स्पाईस अप करण्यासाठी तुम्ही एखादा असा स्पाईस अप अॅक्टही करू शकता. मस्तपैकी असं एखादं गाणं लावा आणि त्याच्या बीट्सवर तुमच्या जोडीदारासोबत स्लो डान्स करा. तुमच्या मदतीला हॉलीवूड, बॉलीवडू आणि अगदी मराठीतही अनेक अशी प्रणयपूर्ण गाणी आहेतच. थोडी मजा, थोडा डान्स आणि मग…...


8. ओरल सेक्सची गुरूकिल्ली


सेक्सचा महत्त्वपूर्ण भाग जसा फोरप्ले आहे तसा फोरप्लेचा महत्त्वपूर्ण भाग आहे ओरल सेक्स. हळूवार ओरल सेक्सचा आनंद त्याच्या ‘त्या’ जागी प्रेम करून नक्की द्या. ओरल सेक्सची हळूवार सुरूवात तुमच्या जोडीदाराला मात्र नक्कीच वाईल्ड करेल.  


9. सेक्स आनंद द्विगुणित करण्यासाठी ईडीबल्स


giphy5


एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा एकाच प्रकारे केल्यास त्याचा कंटाळा येणं साहजिक आहे आणि सेक्सच्या बाबतीत तर पुरूषांना एक्सपेरिमेंट करायला नक्कीच आवडतं. त्यातही जर ईडीबल आयटम्स असतील तर क्या कहने. थोडासा चॉकलेट सॉस, स्ट्रॉबेरीज, थंडगार बर्फ आता या ईडीबल्सचा वापर कसा करायचा हे वेगळं सांगण्याची गरज नसेलच.


10. जादूई सेक्सी लाँजरी


शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेक्सच्या बाबतीत तुम्ही प्रेटी आणि सेक्सी लाँजरीवर नेहमीच विसंबून राहू शकता. तुमच्याकडे असलेली सेक्सी किंवा त्याला आवडणारी लाँंजरी घाला. मग स्वतःला त्याच्यासमोर हळूवारपणे एक एक करून अनड्रेस करा आणि मग पुढे काय होईल हे वेगळं सांगायला नकोच.


मग पुढच्या वेळी सेक्सआधी त्यात फोरप्लेची स्टेप फॉलो करायला विसरू नका. कारण स्टेप बाय स्टेप गोष्टी केल्याने त्यांचा आनंद नक्कीच दुप्पट मिळतो. नाही का….


फोटो सौजन्य : Giphy 


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील: 


सेक्स लाईफला स्पाईसअप करणाऱ्या '10' सेक्स स्टाईल्स


आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)


सेक्स करताना पुुरुषांनी या 10 ठिकाणी करावा महिलांना स्पर्श


सेक्स करताना मनात हमखास येतात 'हे' प्रश्न, तुम्हालाही पडतात का?